Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई, कमी पाणी पिणारा गहू
आई, कमी पाणी पिणारा गहू घ्यायची वाटते. आता, तिला विचारावे लागेल.
झंपी आई ग्रेट तुमची.
झंपी आई ग्रेट तुमची.
देवकी कौतुक.
साधना , देवकी ग्रेट आहात
साधना , देवकी ग्रेट आहात तुम्ही !!!
घरी व्हिडीओ करुन ठेवायला सांगते. आई , सासुबाई , मामी लोक करतात अजुनही. पण डोक्यात नाही आल डॉक्युमेंट करायच.
धन्यवाद अन्जू.
धन्यवाद अन्जू.
मला करून पहावेसे वाटतय पण चिकट भांडी कोण घासणार?
लॉकडाउन नंतर बघेन मुड टिकला तर...
>>> आदू, गव्हाच्या रव्याबाबत
>>> आदू, गव्हाच्या रव्याबाबत सांगू शकत नाही .सालपापड्यासाठी
https://www.youtube.com/watch?v=dycmwvMmYmw<<<
देवकी, ह्या रेसीपीत चक्क एकेक पापडी वाफवून करायची आहे... बापरे.. बरीच खटपट आहे ... तुम्हाला शुभेच्छा.
कुरडईसाठी खपली गहू चांगला.
कुरडईसाठी खपली गहू चांगला. आता फारसे कोणी हा गहू करत नसल्याने सहज मिळत नाही.
साधना... अबब
साधना... अबब
सुप्रजाची क्वालीटी नाही राहिली का आता? अरेरे
जे लोक्स वफ्रॉहो (घरून काल्म)
जे लोक्स वफ्रॉहो (घरून काल्म) त्यांनी कमीतकमी वीकडेज मध्ये तरी कुठलाच नवा प्रकार (वरवर सोपा वाटत असला तरी - उदा. पेसरेट्टू) करायच्या फंदात अजिबात म्हजणे अजिबात पडू नये. गप वरण, भात, पोळी भाजी इ. करून गिळावं. ना इकडे फोकस ना तिकडे असं होतं वर मिटींग्स इ वगरे स्केड्यूल्ड असतात त एक डोळा तिकडेही असतोच.
अज पेसरेट्टू ही अगदी बिघडले. नॉनस्टिक पॅन वरही फसले. उगा भिजलेले चांगले मूग वाया गेलेत.
नशीब जरा अजून होते म्हणून उसळ तरी पटकन करता आली आणि वेळ निभली.
त्या ह्यांचा एकदम हातखंडा
त्या ह्यांचा एकदम हातखंडा आयटम आहे पेसरट्टू म्हणजे. त्यांच्या टिप्स अशा
१. मूग ३-४ तास भिजलेले पुरतात. रात्री भिजवून ब्रेफा ला करू नये. पहाटे पाच वाजता भिजवायचे आणि साधारण ९ च्या आसपास ब्रेफा.
२. एकावेळी सगळेच मूग वाटू नये. मिक्सरमधे एक राउंड येतील एवढेच वाटावे ( त्या ह्यांच्याकडे खाणारी तोंड फार. लहानपणी घरात २०-२५ माणसं रोजची असायची ) . पीठ वाटून फार वेळ ठेवू नये.
३. पीठ अगदी गंध वाटू नये. मुगाच्या डाळीचा क्रंच जाणवला पाहिजे खाताना.
४. पीठ डोशाच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे.
५. पेसरट्टू चे पीठ दाटसर पसरावे - साधारण उत्तपा सारखे.
६. तेलापेक्षा लोण्यावर / तुपावर केलेले पेसरट्टू चांगले निघतात आणि चवीला पण छान लागतात.
हा तरीच... पीठ पातळ झालं घाइत
हा तरीच... पीठ पातळ झालं घाइत. मी जरा दोष नॉनस्टिक ला देईनच... आमच्या त्या ह्या - ह्या काहीच होत नाही स्टील च्या चमच्यानी नॉनस्टिकला असं म्हणतात आणि लावतात. पण दोष कधीच त्या ह्यांना द्यायचा नाही. वफ्रॉहो आहे कीनई दोघांचही अजून काही आठवडे...
(No subject)
व्हेज पफ/पॅटिसमध्ये काय काय
व्हेज पफ/पॅटिसमध्ये काय काय फिलिंग्स घालता येतील? (नॉन्व्हेजही चालतील)
1) potato peas
1) potato peas
2) paneer simla mirchi
3) egg Simla mirchi
4) kachori saran
5) peas karanji saran
6) coconut sugar
7) khava poli saran
जे लोक्स वफ्रॉहो (घरून काल्म)
जे लोक्स वफ्रॉहो (घरून काल्म) त्यांनी कमीतकमी वीकडेज मध्ये तरी कुठलाच नवा प्रकार (वरवर सोपा वाटत असला तरी - उदा. पेसरेट्टू) करायच्या फंदात अजिबात म्हजणे अजिबात पडू नये. गप वरण, भात, पोळी भाजी इ. करून गिळावं. ना इकडे फोकस ना तिकडे असं होतं वर मिटींग्स इ वगरे स्केड्यूल्ड असतात त एक डोळा तिकडेही असतोच.>>>>>>>>>>>>>> +१००
पण जालीम जमाना रेस्प्या बनवु बनवु फोटो दाखवून जीव जळवत आहे चुहुबाजुनीच.
त्या ह्यांचा एकदम हातखंडा
त्या ह्यांचा एकदम हातखंडा आयटम आहे पेसरट्टू म्हणजे. त्यांच्या टिप्स अशा>>>>
अरे बापरे! यातली एकही टीप न पाळता आमचे मूगाचे डोसे (लोकांचे पेसरट्टू) केव्हापासून चांगले होत आहेत.पातळपासून जाडपर्यंत डोसे केले जातात.हल्ली हल्ली तर तवा भरून घातले की गॅसकडे जास्त वेळ उभे रहायला नको.नाहीतर ५ माणसांचे डोसे (लॉक्डाऊनमधे ३ जणांचे) करताना वैताग येतो.
प्लिज! बेसिक व्हॅनिला केक ची
प्लिज! बेसिक व्हॅनिला केक ची किवा चॉकोलेट केक ची एरर प्रुफ रेसिपी द्या , मी युज्वली केक मिक्स आणूनच करते , फ्रॉम स्क्रॅच एकदा-दोनदा केला होता फक्त यावेळेस मिक्स आणून ठेवायच राहिलय आणी नवर्याचा वाढदिवस येतोय , त्याला केक फारसा आवडत नाही पण मुलाना बर्थडे म्हणजे केक हवाच अस समिकरण असत.
https://youtu.be/1Zec5WxsBVA
https://youtu.be/1Zec5WxsBVA
मी वरील व्हिडिओ पाहून केलेला पहिल्यांदा. नेहमी करते असा आज पर्यंत तरी फसला नाहीये.. try करून पाहू शकता.
किती मस्त व्हिडीओ असतात
किती मस्त व्हिडीओ असतात हेब्बर किचन चे.इतका मस्त केक एकदम सोपी रेसिपी करून दाखवलाय.जून मध्ये नक्की बनवेन.
https://youtu.be/tDU9QDH0X1Q
https://youtu.be/tDU9QDH0X1Q
मी हा हेब्बार चा केक करुन पाहिला होता, छान होतो.
मी कणिक, गूळ, तूप असे बदल केले होते.
मटकी पुलावची लिंक देऊ शकेल का
मटकी पुलावची लिंक देऊ शकेल का कोणी? शोधून शोधून कंटाळा आला बाई.....
https://youtu.be/jhxQkM_J4gI
https://youtu.be/jhxQkM_J4gI
ही youtube वर तरला दलाल रेसिपी. Youtube वर अजून खूप वेगवेगळ्या रेसिपी आहेत.
मी नेहमीच्या पुलाव सारखच करते आणि कूकरमध्ये. तांदूळ आणि मटकी एकत्र परतून मग गरजे इतकं पाणी. एकच शिट्टी.
चिमु आणि राजसी थॅन्क्स!
चिमु आणि राजसी थॅन्क्स!
हेब्बारचा सोपा वाटतोय आणि सगळ आहे पण योगायोगाने घरात , करते आणि सान्गते कसा झाला ते
मी पण हेब्बार किचन ची फॅन।
मी पण हेब्बार किचन ची फॅन।
केक बिक मात्र करून नाही पाहिलाय पण पावभाजी नेहमी करते. विना कटकटीची पण चवीला जबरदस्त होते.
आजकाल मी पावभाजी करताना
आजकाल मी पावभाजी करताना भाज्या बारीक चिरणे प्रकार पूर्ण bye-bye केलेला आहे, त्यामुळे हेब्बारची रेसिपी वापरता येणार नाही. तिची मसाला परतून घ्यायची आयडिया आवडली, ती पुढल्या वेळेस वापरून बघीन.फक्त वरुन घ्यायचा कांदा बारीक चिरते. कधी-कधी कांदा पण food प्रोसेसर मधून. जास्त वेळा पावभाजी केली जाते.
बेसिक व्हॅनिला केक ची किवा
बेसिक व्हॅनिला केक ची किवा चॉकोलेट केक ची एरर प्रुफ रेसि>>>>>
प्राजक्ता,
https://www.maayboli.com/node/12186 ही बघ रिक्षा
नो फेल केक आहे.
चॉकलेट केक करायला फक्त १/४ कप कोका पावडर घाला.
मी पण हेब्बार किचन ची फॅन। >>
मी पण हेब्बार किचन ची फॅन। >>>> मी पण .
मला पण हेब्बार आवडते.
मला पण हेब्बार आवडते. इतरांसारखं अनावश्यक बडबड, हातवारे वगैरे नसतं. जे करून दाखवायचं आहे ते पटापट गपगुमान करत असते
अगदी अगदी. हेब्बर ताईंची बडबड
अगदी अगदी. हेब्बर ताईंची बडबड सोडा अजून चेहराही कधी पहिला नाही. एकदम 'सिधी बात नो बकवास' रेसिपी असतात. कुणाल कपूर पण टु द पॉईंट बोलून रेसिपी थोडक्यात आटपतो. बोलून बोलून जीव घेणारा 'कुकिंग शुकिंग' वाला मुलगा. त्याला लोक लिहितात की तुझ्या रेसिपी छान असतात पण कमी बोल रे बाबा. मधुरा एवढी अति नाही पण तरीही वैताग आणते मला.
मी मधुराच्या रेसिपी करायला
मी मधुराच्या रेसिपी करायला गेले कि हमखास गंडतात.
कुणाल कपुर इज बेस्ट. हेब्बरच्या रेसिपीज अजुन ट्राय केल्या नाहीयेत त्यामुळे पास!
एकदम 'सिधी बात नो बकवास'
एकदम 'सिधी बात नो बकवास' रेसिपी असतात. >>> अगदी अगदी . म्हणूनच मला फार आवडते ती साईट .
एक्दम कठीण रेसीपीज पण ट्राय कराव्याश्या वाटतात , ईतक्या सोप्या दाखवतात .
Pages