चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मोगले आझम मधला मधुबालाचा अभिनयाच्या बाबतीतला अप्रतिम सीन वाटतो>> मला ती "प्यार किया तो डरना क्या" मधे पृथ्विराजच्या पायाशी खंजीर ठेवते तेव्हा जाम आवडते!!

पण मधुबाला सर्वात सही दिसते ती "अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना,," देव आनंदला काय चिडवते ती!! आणि तोपण तिला..

"चार कदम भी चल ना सकोगे"वर तिचे एक्स्प्रेशन्स.. अहाहा!!

केपी काका, या बीबीचे नाव बदलून बहुतेक "मला आवडलेली आणि अज्ज्याब्बात न खटकलेली गाणी" असे करावे लागेल आता तुम्हाला. आधी नूतन, मग मधुबाला!!

bollywood च्या इतिहासामधल्या अनेक सुंदर भजनांपैकी एक खूप वरच्या दर्जाचे भजन - बैजू बावरातले मन तरपत हरी दर्शन को!

गायक - रफी
संगीतकार - नौशाद
गीतकार - शकील बदायुनी

पण मधुबाला सर्वात सही दिसते ती "अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना,," >> नंदिनी नक्की का? lock कर दू?

मग "आइये मेहरबा" मधली तिची अदा?

तिने घातलेली ती मोठी रिंगवाली नथनी नंतर कुणी घातलेली पाहिली नाही

<< ट्यु,
मधुबालाच्या नथनी सारखी मोठी नथनी ऐश्वर्या राय नी घातलीये की लेटेस्ट 'जोधा अकबर' मधे.:)
हे पहा:
http://aishwaryawedsabhishek.files.wordpress.com/2007/12/aish-jodha-akba...

नाही, डीजे. अ‍ॅशपेक्षा पण मधुबालाची नथनी बरीच मोठी आहे. आणि तिला ती छान दिसते. अ‍ॅशची नथनी इतकी बारीक आहे की दिसतच नाही Happy

माधव, आपापली निवड. मला ती त्याच गाण्यात सर्वात जास्त आवडली. इतके सुंदर आणि निरागस हसणं फक्त तिलाच जमू शकतं..

नन्दिनी,
ही मधुबालाची नथनी, http://www.sulekha.com/mstore/resplendent/albums/default/MEA3.jpg
अ‍ॅश ची पण साधारण त्याच साइझ ची वाटतेय , मधले मणी मधुबालाच्या नथनी मधे मोठे आहेत पण सेम स्टाइल आहे.
राजस्थानी मिनिएचर्स मधे दिसतत असे दागिने.
किशनगढ स्टाइल पेंटिंग ची नायिका 'बनीठनी' घालते तशी नथनी Happy
http://4.bp.blogspot.com/_ZipDZRRuTRA/RwiJJAQNwpI/AAAAAAAAAjk/UCjDXGEZx9...

हूड, चालायचंच! काळ का कुणासाठी थांबलाय कधी? आता तुम्हीच नाही का... ? Proud Light 1
मधुबाला, मुघल-ए-आजम... सगळ्यासाठी हजारो मोदक प्रत्येकी! Happy

पद्मा खन्ना ७० वर्षाची झाल्याबद्दल>>

कैकयीला सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

'रंग दे बसंती' मधील "रु ब रु" हे गाणं ज्या जागी आलं, ते फार खटकलं. चित्रपट पाहण्याआधी गाणे ऐकले होते, त्यावेळी अस वाटल होतं की या गाण्याचे चित्रिकरण आनंदी, हलक्या वातावरणा (मूड) असेल.
पण ज्या प्रसंगी हे गाणं आलं त्यावेळी प्रचंड खटकलं, कदाचित बॉलिवूडच्या परंपरेची सवय असल्या कारणाने (दुखःणं(??)प्रसंगी दु:खद[? कुठलं बरोबर आहे] गाणं वगैरे) त्या प्रसंगी कदाचीत 'खून चला' हे गाणं चाललं असतं.

पद्मा खन्ना न्यूयॉर्कमधे Dance School चालवते. कुठल्या कुठल्य्य Compitition ला पण दिसते.
(मुलींबरोबर कोरियोग्राफर म्हणून)..

अरे हो, तेरा मेरा साथ रहे,हेच गाणे.
नूतनने सादर केलेले आणखी एक अप्रतिम गाणे म्हणजे, मनमोहना बडे झुठे, हारके हार नही माने,
हे सीमामधले. हे गाणे तिने बसूनच सादर केलेय. लताने जयजयवंति मधल्या, अवघड ताना यात घेतल्यात, आणि त्या नूतनने त्याच ताकदीने सादर केल्यात.
अश्या अवघड तानांची वाट, राखीने, लाल पत्थर मधे लावलीय, गाणे सुनी सुनी सांस कि सितार पर.
त्यातल्याच, रे मन सूर मे गा ची पण तिच तर्‍हा. ( या सिनेमात हेमा असूनही तिला ना गाणे ना नाच )
जयजयवंति रागातच, मधुबाला चावला, ने मराठीत, भाग्यलक्ष्मी सिनेमात,
जिवलग माझे मज सांगाति, आळविते जयजयवंति, असे गाणे गायलेय, आणि ते तितक्याच समर्थपणे, जयश्री गडकरने पडद्यावर सादर केलेय. या गाण्यात फक्त तिचा क्लोजपच आहे

प्रेम जोगन बन जा, हे गाणे सोहनी रागातले. ते बडे गुलाम अली खाँ साहेबानी गायलेल्य. नौशादने त्याना त्या गाण्याचे चित्रीकरण दाखवत ते गायला लावले. खॉसाहेब, गाताना भान विसरून तिच्या सौंदर्याला दाद देत राहिले.
रच्याकने, मोहे पनघटपे हे गाणे गारा रागातले. याच शब्दांची एक प्रसिद्ध ठुमरी आहे. हे गाणे लिहिणारा, त्याला संगीतबद्ध करणारा आणि पडद्यावर सादर करणारी, तिन्ही मुसलमान आहेत !!!
ये दिल कि लगी कम क्या होगी, हि कव्वाली पण जयजयवंति रागातलीच आहे.

पद्मा खन्नाने, सिनेमातला पहिला कॅबरे, हुस्न के लाखो रंग, जॉनी मेरा नाम सिनेमात, प्रेमनाथच्या सोबतीने, सादर केलाय. काळ्या बुरख्यात सुरु होणारा हा कॅबरे, केशरी बिकिनीवर संपतो !!!

कुमकुम हि अशीच एक दुर्लक्षित राहिलेली अभिनेत्री. कोहिनूर मधल्या, हमीर रागातल्या, मधुबनमे राधिका नाचे रे, या गाण्यातल्या दिलीपकुमारच्या सतार वादनाचे खुप कौतूक झाले, पण त्यावर कुमकुमने केलेले नृत्य मात्र दुर्लक्षित राहिले ( हि कुमकुम शेवटची धर्मेंद्र बरोबर ललकार मधे दिसली, मग बंबई रात कि बाहो मे, नावाच्या एका सिनेमात पण ती होतीच. )

बसंत बहार मधले, जा जा रे जा बालमवा, हे गाणे पण तिने बसूनच पण अप्रतिम अदा करत सादर केलेय. शर्मिला टागोर (चंद्रमुखी) हेमा (पारो) आणि धर्मेंद्र (देवदास!!!) असा एक सिनेमा येऊ घातला होता. त्यावेळी शर्मिला ने, आपण कुमकुमचा या गाण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार, असल्याचे जाहिरपणे मान्य केले होते. ( हा सिनेमा कधीच आला नाही )
दगा दगा वई वई, या गाण्यावर कुमकुमनेच, (काली टोपी लाल रुमाल, सिनेमात) धमाल नृत्य केले आहे.

दिनेश, तुम्ही फिल्म संगीतचे विकिपेडिया आहात.......... कुणी सर्च मध्ये शब्द टाय्प केला की लगेच पेज उघडते..... Happy .... तुमच्यामुळे माबो चे धागे पाडव्याच्या माळेप्रमाणे झाल्या आहेत.. तुमच्या पोस्ट म्हणजे साखरेची नाणी...

अरे माझे वय बघता, मला हि जुनी गाणी आठवणारच !! नवी नाही लक्षात रहात !!
जुनी गाणी खुपदा, प्रसंगानुरुप असत. उदा. ज्वेल थीफ मधले, होठोंपे ऐसी बात ( यात भुपेंद्रचा पण आवाज आहे ) नुसते बघितले, तर वैजयंतीमाला एवढी टेन्स का, हे कळणार नाही. पण सिनेमातला खलनायक अशोककुमार, तिला जबरदस्तीने नाचायला लावतो, हे कळल्यावरच, त्या नृत्यातले दिगदर्शीय कसब कळते.
तसेच दुसरे गाणे, गाईडमधले ( गाईडमधल्या, अल्ला मेघ दे, सोडले तर सगळ्याच गाण्यांचे टेकिंग उत्तम आहे ) मोसे छल किये जाय. या गाण्याचे शब्द बघता, हा छळ खराच आहे हे कळणार नाही. तसेच या शब्दाना, बागेश्री राग कुणीहि निवडला असता, पण एस डी ने निवडलाय, झिंझोटी. हा राग गंभीर प्रकृतीचा ( आपण शाळेत जे वंदे मातरम म्हणायचो, ते या रागात ) पण परत सिनेमातला प्रसंग बघता, हा राग आणि वहिदाच्या चेहर्‍यावरचा त्रासलेला भाव, अगदी योग्य आहे.
व्ही शांताराम, कलाकारांवर आपण करुन दाखवू तसेच करायला हवे, असे सांगत असत बहुदा. त्यामूळे नृत्यकुशल संध्या, हास्यास्पद ठरत असे. पण त्यातही जर बाकि कुणी दिग्दर्शक ज्यावेळी होता, त्यावेळी ती गाणी सुंदर रित्या चित्रीत झाली आहेत. उदा, नैन से नैन नाही मिलाओ, हे झनक झनक पायल बाजे मधले गीत. ( गायलय हेमंत कुमार आणि लता, अनारकली सिनेमात याच चालीवर दोघानी, जाग दर्दे ईष्क जाग गायलेय. दोन्हीचा राग मालगुंजी ) तसेच याच सिनेमातले, राधा कृष्णाचे गीत पण छान जमलेय.
पण या सिनेमात, आशाचे, मेरे ए दिल बता, प्यार तूने किया पायी मैने सजा, ची नृत्य नसल्याने वाट लागलीय. तसेच याच सिनेमात, मीरेचे एक भजन आहे, जो तूम तोडो पिया, या गाण्याची पण वाट लागलीय.

बंगालणी पुर्वापार नाचात जरा कमीच असत. सुचित्रा सेन, शर्मिला, राखी ते बिपाशा पर्यंत हि परंपरा चालत आलीय.
ममता मधे सुचित्रा सेनचा अभिनय उत्तम असला तरी ती भुमिका एका तवायफची होती (आणि डबल रोलमधली दुसरी भुमिका वकिलाची ) यातली, रहते थे कभी, हि गझल तिने बसून गायलीय हे ठिक, पण
दिलदार के कदमोंपे
पहले तो खंजर रख दिया
फिर कलेजा रख दिया
दिल रख दिया, सर रख दिया
और कहा
चाहे तो मेरा जिया लैले

असे ढासू शब्द असणारे गाणे, तिने अगदी बटबटीतपणे साद्र केलेय. चेहर्‍यावरचा अभ्रक पण दिसतो.
शर्मिला च्या तलाश मधे, मन्ना डे ने तेरे नैना तलाश करे जिसे वो है, तुझही मे कही दिवाने, असे उत्तम गाणे गायलेय. शर्मिला त्या प्रसंगात आहे, पण नाचायला मात्र बेला बोस आहे ( गायकाच्या भुमिकेत शाहू मोडक आहेत )
नर्गिस ला पण अदालत मधे तवायफचा रोल मिळाला होता, उनको ये शिकायत है, यु हसरतोंके दाग वगैरे गाणी तिने बसूनच सादर केलीत. पण एका गाण्यात नाच आहे. (जा जा रे जा रे ) मदनमोहनने या गाण्यात लता बरोबर आशाचा आवाज वापरलाय. तेच शब्द त्याने दोघींकडून दोन चालीत गाऊन घेतले आहेत.
मीनाकुमारी पण नाचात कमीच, तरी तिला चित्रलेखा या नर्तिकेची भुमिका मिळाली होती. यातले आशा आणि उषाचे, कलावती रागातले ( मराठीतले प्रथम तूज पाहता, हे गाणे या रागातले ) काहे तरसाये जियरा, हे गाणे पडद्यावर सादर करताना, नर्तिकेने मुखवटा वापरलाय (आणि मीनाकुमारीची मूठ झाकून राहिली )
कमाल अमरोहीनी, पाकिजा त मात्र कमाल केलीय. सितारा देवीने, चक्क मीनाकुमारीला नाचायला लावले आहे. चलते चलते मधे ती थोडी थिरकलीय, पण कसर भरुन काढलीय ती दोन सहनर्तिकानी. इन्ही लोगोने मधे तिने बरीच मेहनत घेतलीय. थाडे रहियो मधे, तत्काराचा पायाचा क्लोजप तिचा नाही, आणि आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे, मधे बुरख्याआड चक्क पद्मा खन्ना आहे.

मेरा नाम जोकरमधे, तितर के दो आगे तितर (गायक आशा, मुकेश, सिम्मि आणि ऋषी कपूर (हे हे दोघे चक्क गायलेत)) चे चित्रीकरण मला आवडते. मला या सिनेमात रशियन कलावतीचा, बॅले असायला हवा होता, असे वाटते ( हिंदी सिनेमात बॅले बघितल्याचा आठवतच नाही. )
पण या सिनेमात, काटे ना कटे रैना, हे आशा आणि मन्ना डेचे, गौड सारंग रागातले एक छान गाणे होते. तूमच्यापैकी फारच कमी जणांनी ते बघितले असेल, कारण मी हा सिनेमा पहिल्या आठवड्यात बघितला होता, त्यावेळी ते होते, मग काढून टाकले होते ( कारे कारे बदरा, का ठेवले ते सांगायला हवे का ? )
या गाण्यावर पद्मिनीने उत्तम भरतनाट्यम सादर केले होते, आणि राज कपूर, टकलू गायकाच्या गेटप मधे होता, थेट पडोसन मधल्या मेहमूदची आठवण यावी.

थोडेसे विषयांतर...

चित्रपटातील अप्रतीम गाणी; गीत, संगीत आणि चित्रिकरण या तिन्ही departments मध्ये नावाजलेली...
असा धागा आहे का?

नसल्यास कोणी उघडेल का?

त्या धाग्यासाठी माझी निवड (few to begin with): गाईड, हम दोनो व तीन देवीयां ची सगळी गाणी, अंदाज मधले राजेश खन्ना आणि हेमा मालिनी वर चित्रित झालेले "जिंदगी एक सफर है सुहाना..."

चैनसे हमको कभी आपने जिने ना दिया... हे गाणे ऐकताना असेच खटकते. अक्षरशः घासात खडा यावा तसे होते दुसर्‍या कडव्याला. एवढे अप्रतिम गाणे पण तरीही ते तसेच गंडलेले का ठेवले आहे कळत नाही. Sad

अभिमानमधले 'तेरे मेरे मिलन की...' गाण्यात कडव्यांची अदलाबदल झालीये असे वाटते. चित्रपटात दोन्ही कडवी वेगवेगळ्या प्रसंगी येतात त्यामुळे खटकत नाही. पण ऐकताना 'नन्हा सा..' आधी आणि 'तुझे थामे..' नंतर येते ते खटकतेच Happy

सिंडे, अभिमान मधे जयाचे बाळ नुकतेच वारलेले असते, म्हणुन हळहळ म्हणुन ते नन्हासा गुल , कडवे असावे आशा दर्शवणारे, नंतर मग तिला सावरावे, प्रेमाची उभारि वगैरे द्यावि या उद्देशाने तुझे थामे,,,बहुतेक!!!

मासूमः दो नैना एक कहानी...
आधीच सांगतो, हे गाणे अप्रतिम आहे ऐकायला. कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही, विशेषतः कडवी ऐकताना. चाल, आवाज, संगीत सगळेच मस्त.

पण मुलांना झोपवताना म्हणायच्या गाण्याच्या दृष्टीने शब्दरचना अगम्य नाही का वाटत? आपल्यालाही पटकन अर्थ कळत नाही. मला अजूनही कळाला असे वाटत नाही. मग त्या लहान मुलांना काय कळणार? कदाचित एवढ्या जड गाण्यामुळेच ते झोपून जात असतील Happy तरी शबाना बरीच बरी दिसली आहे यात. तिचा नेहमीचा तो नुकतीच घटस्फोट घेउन आलेला लुक नाही दिसत. नाहीतर ती हसली तरी ते हास्य प्रसन्न वगैरे नसते, कायम "क्या गम है जिसको..." छाप असते.

तिसरे कडवे योग्य आहे कारण तिची अवस्था त्यात बहुधा सांगितलेली आहे. पण पहिली दोन कडवी कळत नाहीत. एकूण ही त्या 'दो नैनो' की कहानी आहे काय?
http://www.youtube.com/watch?v=MZL_dpb_6Lo

लता मंगेशकर यांच्या नितांतसुंदर गाण्यांपैकी एक गाणे "आप यूं फासलों से गुज़रते रहे, दिल से कदमों की आवाज़ आती रही". जांनिसार अख्‍तर यांचे शब्द आणि त्यावर कळस म्हणजे खैय्याम यांचे संगीत. गाण्याच्या सुरुवातीलाच लताजींचा आलाप आणि हलकस हसुन बोललेले "आप आप यूं फासलों से गुज़रते रहे....." क्या बात है!!! हे गाणे कधीही ऐकली तरी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. तिसर्‍या कडव्यात लताजींनी "आपकी गर्म बांहों में खो जाएंगे...........आपके नर्म ज़ानों पे सो जायेंगे........" यानंतर घेतलेला हलकासा pause आणि त्यानंतरचे ......मुद्दतों रात नींदें चुराती रही’ ऐकुन वेड व्हायला होते.

पण नुकताच या गाण्याचा व्हिडीओ बघण्यात आला, हिरो आणि हिरवीन कोण आहे माहित नाहि पण अतिशय टुकारपणे (मला तरी वाटते) गाणे चित्रित करण्यात आले आहे. एव्हढ्या रोमँटिक गाण्यात हिरवीन सफेद कपडे घालुन भुतासारखी वावरते. मला वाटते कि बहुदा तिला कामाचे पूर्ण पैसे दिले नसावे, संपूर्ण गाण्यात एकदाहि ती हसली नाही :(. आणि तो हिरो हि अगदी मख्खपणे नुसताच चालत राहतोय. अर्थात गाणे नुसतेच ऐकायला अजुनही आवडतेच Happy

आप यूं फासलों से गुज़रते रहे
चित्रपटः शंकर हुसेन
स्वरः लता मंगेशकर
गीतः जांनिसार अख्‍तर
संगीतः खय्याम

हे गाणे तु नळीवरः
http://www.youtube.com/watch?v=JzI4icCY50o

अतिशय सुंदर गाणे आहे हे.... मी खुप लहानपणी बघितलेला हा चित्रपट. यातल्या हिरविनीला झोपेत घराबाहेर पडुन भटकण्याची सवय असते आणि असे झोपेतच भटकत असतानाच तिला हिरो भेटतो. बहुतेक हे गाणे तीने झोपेतच म्हटले असावे. म्हणुन मख्खपणे वावरतेय. प्रिया राजवंश तर नाहीये ना???? Happy

मी अजुन हा चित्रपट पाहिला नाहि. पण गाणे ज्याम आवडते. यातील दुसरे लताचे गाणे "अपने आप रातों मे चिलमने सरकती है" हे सुद्धा अप्रतिम आहे.

यातल्या हिरविनीला झोपेत घराबाहेर पडुन भटकण्याची सवय असते आणि असे झोपेतच भटकत असतानाच तिला हिरो भेटतो.>>> तरीच Happy

प्रिया राजवंश तर नाहीये ना???? >>>> नाही प्रिया राजवंश तर नक्कीच नाही.

<<नाही प्रिया राजवंश तर नक्कीच नाही.

ती नक्कीच प्रिया राजवंश नाहिये!
चित्रपटः शंकर हुसैन
कलाकारः कंवलजित, मधुचंदा

यातच रफीचे 'कही एक मासुम नाजुक सी लडकी, बहुत खुबसुरत मगर सांवलीसी' हेही आहे. हे सुद्धा ऐका. अतिशय सुंदर आहे.. शब्द, चाल आणि रफीचा आवाज सगळे अगदी उत्तम... पुर्ण गाण्याभर संतुर वाजत राहते..

Pages