चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तमरित्या सादर झालेल्या गाण्यांचा एक बा फ हवा. अगदी संग्रही ठेवावीत अशी गाणी हवीत, तिथे.

मदनमोहनने यमन रागात, लताकडून दोन गाणी गाऊन घेतली आहेत. एक आहे, जा रे बदरा बैरी जा रे जा रे, आणि दुसरे, जिया ले गयो जी मोरा सावरीया. दोन्ही गाणी सुंदर आहेत, मला नेमके आठवत नाही, पण यापैकि एक गाणे, बिंदूवर चित्रीत झालेय !!!!

काला पानी मधले आशाचे, नजर लागी राजा तोरे बंगलेपर, ची वाट नलिनी जयवंत ने लावलीय. तिला नाचाचे अंग नव्हतेच, तरी तिला या भुमिकेसाठी तिला का घेतले कुणास ठाऊक ? तबल्याच्या उत्तम ठेक्यावर जिथे ततकार (फूटवर्क) अपेक्षित होता, तिथे बाईंचा क्लोजअप आहे.

मुझे जीने दो मधले, लताचे रात भी कुछ भिगी भिगी, अप्रतिमरित्या चित्रीत झालेय, पण यातलेच नदीनारे ना जाओ श्याम, मात्र सोसो आहे, वहीदा असुनही नाच नाही. गाण्याची सिनेमातली चाल वेगळी आहे आणि सिनेमात एक जास्तीचे कडवे आहे.
याच सिनेमात, आँखमे भरलो रंग सखी री, आँचल भरलो तारे, मिलन रुत आ गयी, हे अति अवघड चालीतले गाणे आहे. आशाने जान ओतलीय या गाण्यात, आणि पडद्यावर वहिदाचा नाच असूनही, तो गाण्याच्या मानाने फिका पडलाय.

>> ती फक्त एकाच भुमिकेत फिट्ट बसली असती --- सोनिया गांधीच्या.
अगदी बरोबर.

'गुलाबी आँखे जो तेरी देखी' या गाण्यात राजेश खन्ना जे काही बागडतो ते पाहूनही खूप करमणूक होते. गाण्याच्या वेगानुसार न झेपणारं बाहूबल दाखवून नंदाला उचलणं वगैरे तर अतिच आहे. नंदा त्या गाण्यात दोन-तीन वेळा छान हसते पण तो गाण्यातील अभिनय म्हणून की ती राजेश खन्नाच्या नाचाला (?) हसतेय तेच कळत नाही. शिवाय गाण्यात काहीही त्या काळचं सेन्सॉर दृश्य नसतानाही कॅमेरा उगाच फुलांवर नेऊन ओळींचा शेवट केलेला आहे.

'गुलाबी आँखे जो तेरी देखी'
>>
प्रत्यक्षात गुलाबी डोळ्यांची मुलगी समोर आली तर काय होईल...
(रामसे च्या सिनेमातून पळून आली असा समज होऊन चक्कर येईल Wink )

आईशप्पत! या "गुलाबी आँखे" ने माझ्या मं.गौ. च्या रात्री अंताक्षरीत कहर झाला होता. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास कुणीतरी हे गाणे सुरु केलं आणि सगळे "ही झोपेत आहे बहुतेक! 'गुलाबी' आँखे क्काय!" म्हणत Rofl पण पुढची ओळ स्वॅप करायची म्ह्टली तरी कळस! म्हणजे " गुलाबी आँखे जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया" चं उलट करुन " शराबी आँखे जो तेरी देखी, गुलाबी ये दिल हो गया" हे तरी कसं शक्य आहे! Rofl बिचारीचं कुणी ऐकलं नाही आणि ते गाणंच बाद केलं! Biggrin
अजून एका सुंदर गाण्याची वाट लागलेली आहे. "पल पल दिल के पास" गाणं इतकं रोमँटिक आणि हळवं.. आणि समोर कोण तर धर्मेंद्र आणि राखी! ईईई... आणि ते ही सकाळी (!) बागेत फिरत बसलेत. मॉर्निंग वॉक ला आल्यासारखे! Lol

पण धर्मेन्द्र हॅन्डसम दिसलाय या गाण्यात. आणि सकाळी बागेत फिरताना वगैरे नाहीये गाणं. त्याने लिहिलेली प्रेमपत्र (त्यात गुलाबांच्या पाकळ्या उडताना वगैरे सकट :प) ती वाचत असलेली दाखवलीय आणि तो समोर आहे असा भास तिला होतोय. तो ब्लॅकमेल पिक्चर अगदीच बकवास आहे, उलट त्यातल्यात्यात जरा क्रिएटिव सिच्युएशन शोधलेय दिग्दर्शकाने गाण्याला.

डीटेल्स तू म्हणतेस तसे असतील कदाचित पण राखी- धर्मेंद्र जोडी काही जमत नाही! कदाचित मला मुळातच राखी आवडत नसल्याने (कायम अन्याय झालेली आई) मला याचा व्हिडिओ आवडत नसावा. Happy

ह्म्म्म.. माझे हे सर्वात आवडते गाणे - ऐकायला आणि पाहायलाही... धर्मेद्र ग्रेट दिसतो या गाण्यात आणि अ‍ॅक्टींगही लाजवाब केलीय त्याने...

राखी आवडत नसल्याने (कायम अन्याय झालेली आई)

ती आता......... सलमान आणि शारुख्ची आई झाल्यापासुन.. Sad यांचा जन्म होण्याआधी ती अशी नव्हती... Happy

पल पल दिलके पास is one of the best songs....

अजून एक गाणे. " लागा चुनरी मे दाग...". हे गाणं खरं तर अध्यात्मिक म्हणता येईल असं आहे. त्याच्या शब्दांमध्ये एक आर्तता आहे. एक पश्चात्तापाचा भाव आहे. पण व्हिडिओ मधे मात्र गाणं म्हणणार्‍या राजकपूरच्या आणि नाचणार्‍या नर्तकीच्या चेहर्‍यांवर एखादी वात्रट नौटंकी चालू असल्याचे भाव आहेत. (of course ह्या गाण्याची चित्रपटातली context मला माहित नाही. पण तरीही....)

आशू, ashbaby, मलाही " पल पल दिलके पास..." ऐकायला आणि बघायलाही आवडतं. (त्या राखीमधे का कुणास ठाऊक कायमच एक वेडसरपणाची झाक जाणवते.)

पण भाभूचा चेहराच तसा त्याला तो तरी काय करणार? मधुबाला 'एक परदेसी मेरा दिल ले गया' असे लाजत लाजत लडिवाळपणे त्याला म्हणते तेव्हा तो 'आली अजुन एक तक्रार, ह्यांचे हरवतात आणि आम्हाला शोधायला लागते' असे भाव चेह-यावर आणुन, हवालदाराच्या आवेशात तिला 'कौन परदेसी तेरा दिल ले गया?' म्हणुन विचारतो. >> Lol Rofl

लागा चुनरी मे दाग......... राज कपूर खोटी दाढी लावून शास्त्रीय संगीत उस्ताद असल्याची भूमिका करत असतो... असा सीन आहे... राजकपूरने गाणे सुंदर गायले आहे पडद्यावर !

हे 'मौला..' गाणं पहा.. फारच गोड.. नौहीद काय गोड दिसली आहे >>> मला हे गाणं ऐकायला फार्फार आवडतं. बघितल्यावर साफ निराशा झाली. नौहीदचे पातळ केस 'जुल्फे तेरी इतनी घनी' Uhoh मिचमिचे डोळे 'आंखे तरी इतनी हंसी' Uhoh

जामोप्या, या सिनेमात नूतन मुख्य अभिनेत्री होती (दिल हि तो है) आशाने गायलेली यमन मधली कव्वाली, निगाहे मिलाने को जी चाहता है, ही तिच्यावर चित्रीत झालीय. सरोज खानचे हे पहिले नृत्यदिग्दर्शन. सुंदर आहे हे गाणे, ऐकायलाही आणि पडद्यावरही.
लागा चूनरी मे दाग, वर नाचलीय ती रत्ना ( सौ भारत भूषण ) या गाण्यामागचा अध्यात्मिक अर्थ तिला समजत नाही, असा प्रसंग आहे तो. तूम किसी और को चाहो तो मुष्कील होगी, हे मुकेशचे गाणे पण यातलेच आणि शीर्षक गीत पण त्याच्याच आवाजात आहे.

>>नौहीदचे पातळ केस 'जुल्फे तेरी इतनी घनी' अ ओ, आता काय करायचं मिचमिचे डोळे 'आंखे तरी इतनी हंसी' अ ओ,

सेंट परसेंट खरं !!
एवढ्या सही गाण्याचा पार विचका.

ये कालि कालि आंखे !(ईथवर ठीक) आहे,
ये गोरे गोरे गाल (मूळ गाण्यात काजोल) तिचे गाल कुठल्याहि क्रिम ने गोरे झालेले नव्ह्ते त्या काळी,
ते खटकले.

सजना है मुझे सजना के लिये, गाणं ऐकताना गोड वाटलेलं, प्रत्यक्ष पडदयावर म्हशिशि साधर्म्य राखणारी पद्मा खन्ना पाहुन निराशा झालि.
आणि अमिताभ कसला चिपचिप्या वाणि टाइप दिसतो, त्याच्यासाठी काय ते सजायचे? ईईईई

अमिताभचा तो सौदागर चित्रपट होता ज्यात सजना है मुझे.. गाणं आहे. बहुधा ही त्याची एकमेव भुमिका ज्यात त्याने कॅरेक्टरसमान दिसण्याचा थोडाफार (आणि तुम्हाला तो चिपचिप्या/वाणि टाईप दिसला त्यावरुन यशस्वीही) प्रयत्न केला आहे. ताडीपासून गुळ बनवण्याचा व्यवसाय करणारा एक सामान्य खेडूत अशी व्यक्तिरेखा आहे त्याची सौदागरमधे. (नुतन-अमिताभ यांच्या अप्रतिम भुमिका आहेत यात. इव्हन पद्मा खन्नाचेही काम चांगले होते.) खूपदा पूर्ण चित्रपटाचा संदर्भ न घेता नुसतीच युट्युबवर किंवा टिव्हीवर गाणी पाहिली तर गाणी 'समजत' नाहीत असं मला वाटतं.

बाकी एरवी अमिताभ कुली असो की बुटपॉलिशवाला, टांगेवाला कोणीही.. त्याचे हेअरस्टाईल कधीही बदलली नाही त्यामुळ तो फक्त अमिताभच वाटला. एकदा त्याला मुलाखतीत त्यावर विचारले तेव्हा त्याचे उत्तर होते लोक अमिताभला बघायला थिएटरमधे जायचे त्यावेळी. माझ्या केसांची स्टाईल बदलली तर त्यांना मी आवडत नसे दिसायला.
भारतात अ‍ॅक्टर्सना इमेजमधे लोक अडकवतात की ते स्वतःहूनच एक्सपरिमेन्ट्स करायला नाखुश असतात हे कधी न उलगडणारे कोडे आहे. काहीही उत्तर आले तरी ही एकंदरच सिनेमा याबाबतीत दोन्ही पातळ्यांवर आपण बरेच अपरिपक्व आहोत असं म्हणायला लागतं!

ट्यूलिप, हा सिनेमा कथेसाठीच बघायचा. आणि कथा पुर्ण नूतनची आहे.
यातले, अब तो है तूमसे हर खुषी अपनी, छान चित्रीत झालेय की !!!

बहुधा ही त्याची एकमेव भुमिका ज्यात त्याने कॅरेक्टरसमान दिसण्याचा थोडाफार (आणि तुम्हाला तो चिपचिप्या/वाणि टाईप दिसला त्यावरुन यशस्वीही) प्रयत्न केला आहे. >>> बरोब्बर!! आणि सिनेमादेखील अमिताभच्या इतर चित्रपटासारखा तद्दन व्यावसायिक नव्हता.

यातले, अब तो है तूमसे हर खुषी अपनी, छान चित्रीत झालेय की !!!>>> सौदागरमधे??? का पोस्टची काही गल्लत होतेय दिनेश??

नूतन म्हणजे नूतन!! इतका सुंदर अभिनय आणि सौन्दर्य की बास!! "तेरे घर के सामने" मधे इस नशीली रात मे. या गाण्यात नूतन जे काय दिसलिये!! हाय! मी ते गाणं व्हिडेओ कॅसेटवर लावून लावून कॅसेट खराब केली होती!!

तेरे घर के सामने सारखा फ्रेश विषय आजही चालू शकतो.. जर कुणी त्याचा सुन्दर रिमेक करणार असेल तर!!!

>>तेरे घर के सामने सारखा फ्रेश विषय आजही चालू शकतो.. >> अनुमोदन, एका अत्यंत साध्या विषयाचं अतिशय सुरेख प्रेझेंटेशन...

टुलिप, अनुमोदन! कथा खरच वेगळि आणि छान होती. शेवट पण मनासारखाच घेतलाय.
अब तो है तुमसे गाणं , अभिमान मधे आहे.
ते सौदागर मधलच दुसरं गाणं आठवतय का? नुतनच्या तोंडि असलेलं?

सौदागर आणि पद्मा खन्नाचा रोल चांगलाच होता. मुळात सजना है ह्या गाण्यात पद्माने मी म्हशीसारखी नाही, कमसिन आहे, मेरी पतली कमर आहे असला कुठलाही दावा केलेला नाही. तुम्ही काहीही इमॅजिन करून तुमचे व्हिज्युअलायझेशन तिच्यावर कसे लादता बुवा? Proud

इमेजमधे अडकल्याचे दुसरे उदाहरण म्हनजे अकेला मध्ये अमिताभचे डबिंग घसा बसल्यासारख्या आवाजात केलेले होते.कॅरॅक्टरायझेशनचा भाग म्हणून. लोकानी तो पिक्चर आपटवला. त्याना तो अमिताभ पटेनाच. शेवटी पुन्हा मूळ आवाजात डब करून रीलीज केला असे म्हणतात...

पद्मा खन्ना ७० वर्षांची झाली Sad १० मार्च १९४०

दिनेश तुम्हाला 'तेरा मेरा साथ रहे' म्हणायचं आहे का?

नूतन म्हणजे नूतन! >> अगदी! गौतम राजाध्यक्षांच्या मते बॉलीवूडमधला सगळ्यात photogenic चेहरा! चंदेरीमध्ये एकदा त्यांनी नूतनचे photo session केले होते. कसले अप्रतीम फोटो होते ते!

मला ऐकायला फारसे न आवडलेले पण पडद्यावर स्वर्गीय दिसणारे गाणे म्हणजे मुघल-ए-आझम मधले प्रेम जोगन बन गये. अगदी बडे गुलाम अली खां यांनी गायले असले तरी त्यातल्या बाकीच्या गाण्यांच्या तुलनेत ते कमीच वाटते. पण मधुबालाचे close-ups बघताना गाणे ऐकू येतच नाही. सगळे प्राण डोळ्यात गोळा होतात Happy

पण मधुबालाचे close-ups बघताना गाणे ऐकू येतच नाही. सगळे प्राण डोळ्यात गोळा होतात>>> ह्म्म!! अख्खा पिक्चरच मधुबालाचा होता तो!! (आणि पृथ्विराज कपूरचा)

त्यातले मोहे पन्घटपे नंदलाल छेड गयो जी.. गाणे मला खूप आवडते, तिने घातलेली ती मोठी रिंगवाली नथनी नंतर कुणी घातलेली पाहिली नाही. कुणाच्याच चेहर्‍याला शोभणार नाही!! Happy

प्रेम जोगन बन गयि..? जे गाणे मधुबाला-दिलिप कुमारच्या त्या फेमस (पक्ष्याचे पिस वगैरे वगैरे Proud ) ..रोमान्टिक सीनमधले पार्श्वभुमीवर लागलेले असते तेच ना हे गाणे?
आणि त्यात मधुबालाच्या अंगावर ती अशी चादर टाकल्यासारखी फुले टपाटपा पडलेली दाखवलित ती कोणती असावीत नक्की? दिनेश तुम्हीच सांगू शकता. तुम्हाला तरी नक्की आली असतील ओळखता.

मला मोगले आझम मधला मधुबालाचा अभिनयाच्या बाबतीतला अप्रतिम सीन वाटतो- जेव्हा पृथ्वीराज कपूर दाणदाण पावले टाकत आत येतो आणि मधुबाला घाबरलेल्या हरिणीसारखी आधी दरवाजाच्या दिशेने मग परत दिलीप कुमारच्या दिशेने सैरावैरा धावत जाते आणि त्याच्या गळ्यातला हार पकडुन खाली कोसळते तो. काय जबरदस्त चेहर्‍यावर आणि डोळ्यांमधे भेदरलेले एक्स्प्रेशन्स दिलेत तिने!

मधुबाला रॉक्स!!

मोगले आझम माय ऑल टाईम फेवरिट फिल्म.

इमेजमधे अडकल्याचे दुसरे उदाहरण म्हनजे अकेला मध्ये अमिताभचे डबिंग घसा बसल्यासारख्या आवाजात केलेले होते.कॅरॅक्टरायझेशनचा भाग म्हणून. लोकानी तो पिक्चर आपटवला. त्याना तो अमिताभ पटेनाच. शेवटी पुन्हा मूळ आवाजात डब करून रीलीज केला असे म्हणतात...>>>>>>>>>>> हुड तो 'अग्निपथ' होता. (माझ्या आठवणीनुसार.)

त्यातले मोहे पन्घटपे नंदलाल छेड गयो जी.. गाणे मला खूप आवडते, तिने घातलेली ती मोठी रिंगवाली नथनी नंतर कुणी घातलेली पाहिली नाही. कुणाच्याच चेहर्‍याला शोभणार नाही!!>>>>>> नंदिनी हवे तितके मोदक.
त्यातली कव्वालीपणे जबरी आहे.

तिने घातलेली ती मोठी रिंगवाली नथनी नंतर कुणी घातलेली पाहिली नाही. >> दो आँखे बारह हाथ मध्ये संध्याने घातली आहे ना! Happy

रोमान्टिक सीनमधले पार्श्वभुमीवर लागलेले असते तेच ना हे गाणे? >> हो तेच.

Pages