चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक अप्रतिम गाणं 'दिल में बजी गिटार' Proud त्यात गाण्यात कोणी गिटार ऐकली आहे का? ऐकली असल्यास कोणती? जाझ गिटार नाही, बेस गिटार नाही, बॉक्स गिटार नाही इवन हवाईयन गिटारही नाही.
मला तरी सगळं म्युझिक synthवर वाजवल्या सारखं वाटतय आणि तो गिटार सदृश्य पीस ट्रम्पेटवर.
कदाचित नीट ऐकल्यावर कळेलही त्यात गिटार होती म्हणून.
रच्याकने, प्रभातची तुतारीसुद्धा ट्रम्पेटवर होती बहुदा Happy

अरे त्या गाण्यात ईतर वाद्ये सोडून फक्त गिटार दिल मध्ये वाजलिये मग (बाहेर) ऐकू कशी येईल?
थोडं तरी creative freedom द्या ना राव संगीतकाराला Happy

ट्यू, 'ये दुनिया उसी की' पण अ‍ॅड कर त्या यादीत. Happy

रहमानची गाणी, गाणी म्हणून अप्रतिम, पण चित्रपटाला, प्रसंगाला, व्यक्तिरेखेला न्याय देत नाहीत असं मला कित्येकदा वाटतं.

उदा. 'स्वदेस' मधली अंगाई (आहिस्ता आहिस्ता) ही ती दाई मोहनला त्याच्या लहानपणी म्हणत असते असा संदर्भ येतो. त्या काळाचा आणि दाईच्या व्यक्तिरेखेचा विचार करता तिथे एखादी सोपी-सहज (पारंपारिकही) चाल हवी असं वाटतं. दिलेली चाल त्यामानाने फारच कॉम्प्लिकेटेड आहे. शिवाय एकूणच अंगाई ही इतकी तारसप्तकात वगैरे जाऊ नये. (बाळ घाबरून उठायचे चान्सेस जास्त! :P)

तसंच दुसरं उदाहरण 'गुरू'मधल्या 'बरसो रे मेघा' गाण्याचं. ते लोकगीताच्या बाजाचं गाणं असायला हवं - साधा वाद्यमेळ, सोपी पण 'कॅची' चाल - अशा प्रकारचं. हे गाणं सुंदर आहे, पण खूप कॉम्प्लिकेट केलंय असं नाही वाटत?

शम्मी साठी १०० मोदक ट्युला...
माझ्या आईचा, माझा आणि आता माझ्या लेकिचा पण आवडता नायक. काल तिला तिसरी मंजीलची गाणी दाखवली आणि मग काय झोपेपर्यंत "आ आ आजा" चाललेल आमच. Happy

राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, देव आनंद हया लोकांना फक्त एस्.डि.बर्मन, शंकर-जयकिशन, आर्.डि. यांनी जगवलय.>> हा BB बंद करून टाका रे Sad

ह्म... ये बात बराबर है... पण मग राजेंद्र कुमारला संगितकारांनी जगवल हे खरच आहे.
तो खरच मोठ्ठा ठोकळा होता. पण गम्मत म्हणजे त्या काळच्या बर्‍याच जणांन आवडायचा...
त्याला गाणी पण छान मिळाली आणि हिरवीणी पण. Wink

इथली चर्चा वाचून काल बोल ना हलके बघितलं. पाचकळपणाचा कळस आहे.

जोधा अकबर मधलं भजन सुद्धा ऐकुन इतकं १/कॉस सी (शब्दश: अर्थ घेऊ नका Happy ) भजन पहिल्यांदाच ऐकलं असं वाटलं होतं.

मस्त बीबी आहे...
योग, ती अनुराधा आहे, मेरे नसीब वाली.

खालील गाण्यात गायक अनेकवेळा बेसुर झालाय, खास करुन लता समोर अधिकच जाणवते.

http://www.youtube.com/watch?v=aEWj2vaiQtA

Lol आत्ताच बोल ना हलके बघितल. खरच ग पाचकळपणाच आहे. ते बडबडताना असला कॅमेरा फिरवलाय कि मलाच चक्कर आली Wink
असो.... विषय नेहेमीसारखा भरकटतोय.

हे घे http://www.youtube.com/watch?v=nZKENqXoZ0o
youtube वर जाउन गाण सर्च केल कि लगेच येत ग. मलाही सिनेमा माहित नव्हता. झुम बराबर झुम

झुम बराबर झुम मधली शंकर एहसान लॉय ची सगळीच अप्रतिम गाणी चित्रपटात पहाताना कचरा वाटतात ! Sad
'बोल ना हलके हलके' तर एखाद्या जुन्या सिनेमात जास्त चांगल् वाटलं असतं :), एखाद्या जुन्या रोमँटिक जोडी साठी फक्त बॅक्ग्राउंड ला गाणं हव् होतं आणि एखादा सॉलिड रोमँटिक हिरो !
शम्मी कपुर- साधना ???

सायो,
बाकी ठोकळा असत तरी जी 'हवी" ती 'आरपार' एक्स्प्रेशन्स बरोब्बर देतो जॉन !
पहा 'लगी तुमसे मन कि लगन',
http://www.youtube.com/watch?v=RPXay_v53vo
इथे कोणी दुसरा इतका आरपार्‍या चालणार नाही Proud
किंवा 'जिस्म' ची जादू है नशा है, चलो तुमको लेकर चले पहा, director should know what John is made for ! Wink

मस्तच चर्चा चाललीय इथे. थोडी भर मी घालतो.
बसंत बहार मधे, रफिने, दुनिया ना भाये मोहे, अब तो बुलाले, चरणोमे, असे एक सुंदर आर्त गीत गायलेय.
या गाण्याची भाभू ने वाट लावलीय.
याच सिनेमात मन्ना डे ने तोडीमधली, भयभंजना वंदना सुन हमारी, रचना गायलीय, तिचीहि वाटच लावलीय त्याने.
रानी रुपमती मधे, लता रफीचे, ब्रिंदावनी सारंगमधले, झन नन झन, असे छान गाणे आहे, त्याची भाभू आणि निरुपा रॉयने वाट लावलीय. ( हे गाणे ते बसून म्हणताहेत )
अनुराधा सिनेमात, पंडीत रविशंकर ने लताकडून अप्रतिम गाणी गाऊन घेतली आहेत. कैसे दिन बीते, कैसी बीती रतिया, (माज खमाज) जाने कैसे सपनोंमे खो गयी,(तिलंग श्याम ) सावरे सावरे,(भैरवी) यापैकी एकाही गाण्याला नायिका लिला नायडू, न्याय देऊ शकली नाही. सांवरे सांवरे, या गाण्याला तर चक्क रेडीओ दिसलाय पडद्यावर.

'धागे..' पाहिलं.. प्रीती अभिषेकला कूली समजली की काय? Lol अरेरे
पण तरी अभिषेक Blush असो.

डीजे, मला तरी जॉन कायम डेस्परेट किंवा माठ इतकीच एक्स्प्रेशन्स देतो असं वाटतं Lol Nothing personal, don't mind Happy

हे 'मौला..' गाणं पहा.. फारच गोड.. नौहीद काय गोड दिसली आहे- प्रीतीची झाक वाटते..
पण गाण्यात जिथे बासरी आहे, तिथे हीरॉईन (पडद्यावर) बासरी वाजवत नाही, आणि जिथे नाहीये तिथे बरेचदा वाजवते Uhoh http://www.youtube.com/watch?v=2Ss5Nv-mfDU&NR=1&feature=fvwp

किंवा 'जिस्म' ची जादू है नशा है, चलो तुमको लेकर चले पहा, director should know what John is made for !>> I know what he is made for LOL. for shammi kapoor fans there is a good blog.

http://memsaabstory.wordpress.com चान्गले लिहिते व शम्मी वर फार्फार प्रेम.

रानी रुपमती मधे, लता रफीचे, ब्रिंदावनी सारंगमधले, झन नन झन, असे छान गाणे आहे, त्याची भाभू आणि निरुपा रॉयने वाट लावलीय. ( हे गाणे ते बसून म्हणताहेत )

अगदी अगदी... मी जेव्हा हे पहिल्यांदा छायागीतमध्ये पाहिले तेव्हा अवाक झाले. मग निरुपा रॉयच्या जागी वैजयंती असती तर.. असा विचार करुन हळहळत बसले. हे गाणे इतके सुरेख आहे की नाचता न येणारा माणुसही ठेका धरेल, पण पिक्चरमध्ये अगदी झुलागीत गायल्यासारखे दोघेही बसुन गातात.

पण भाभूचा चेहराच तसा त्याला तो तरी काय करणार? मधुबाला 'एक परदेसी मेरा दिल ले गया' असे लाजत लाजत लडिवाळपणे त्याला म्हणते तेव्हा तो 'आली अजुन एक तक्रार, ह्यांचे हरवतात आणि आम्हाला शोधायला लागते' असे भाव चेह-यावर आणुन, हवालदाराच्या आवेशात तिला 'कौन परदेसी तेरा दिल ले गया?' म्हणुन विचारतो.

मला तो गेटवेच्या 'दो घडी वो जो पास आ बैठे' मध्ये जरा बरा वाटलेला. ते गाण्यांच्या ओळी लिहुन एकमेकांकडे देताना जरा हसरे भाव आहेत त्याच्या चेह-यावर...

प्रीती अभिषेकला कूली समजली की काय? अरेरे

<<< अग तितपत humour असता तरी परवडल्, गाण्याची सिचुएशन त्याहून स्टुस्पिड आहे !! Sad
म्हणजे अर्थात अभिषेक आणि प्रीती हे NRI असतात,चोप्रांना शोभेल असा आभिषेक मुळचा भारतीय आणि प्रीती पाकिस्तानी !
दोघही कोणाची तरी वाट पहात लंडन ला एका ट्रेन स्टेशन वर भेटतात, पहिल्याच भेटीत दोघही काहीतरी बाता मारायच्या म्हणून अपापल्या स्वरचित (खोट्या)लव्ह स्टोरीज एका मेकांना सांगून टाकतात , त्या खोट्या लव्ह स्टोरीज मधे आपल्याला पडद्यावर अभिषेक - लारा आणि बॉबी-प्रीती दिसतात Proud
मग स्टोर्‍या सांगून झाल्यावर अभिषेक म्हणतो कि समजा आपण NRI नसतो आणि एखाद्या लहान गावत एका मेकांना भेटलो असतो आणि लव्ह स्टोरी जर आपल्याच दोघांची असती तर वेगळीच स्टोरी बनली असती Biggrin
मग या 'तर' चा स्टुपिड ड्रिम सिक्वेन्स म्हणजे हे सुंदर वाया घालवलेलं गाणं 'बोल ना हलके हलके' !

टुलिप.. खरच काय एक एक मस्त गाणी नमुद केलीस शम्मी कपुरच्या संदर्भात..

खर म्हणजे ५० व ६० च्या दशकाचा काळ मला गाणी कळायच्या आधीचा.. पण माझ्या मते ५० व ६० हा दोन दशकाचा काळ हिंदी गाण्यांसाठी सुवर्णकाळ होता.. काय एक एक संगीतकार होते त्या २० वर्षात.. नौशाद्,सी रामचंद्र,वसंत देसाई,शंकर जयकिशन्,ओ.पी. नय्यर्,एस्.डी. बर्मन्,रोशन,कल्याणजी आनंदजी,मदन मोहन्,सलिल चौधरी,हेमंत कुमार,खय्याम.. मी जर त्या काळात निर्माता-दिग्दर्शक असलो असतो तर संभ्रमातच पडलो असतो यापैकी कोणाला आपल्या मुव्हीकरता संगीतकार म्हणुन निवडायचे?

अर्थात त्यांच्या जोडीला राजेंद्र क्रिशन(हम प्यार मे जलनेवालोंको.., इतना ना मुझसे तु प्यार बढा...,युं हसरतों के दाग्..., ये जिंदगी उसीकी है...,शाम ढले खिडकी तले....,इत्यादी इत्यादी..)साहिर लुधीयानवी(चलो एक बार फिर से. अजनबी..., न तो कारवां की तलाश..,हम आप की आंखो में..,मैं जिंदगी का साथ निभाता..,लागा.. चुनरी मे दाग..., तेरी दुनिया में जिने से... इत्यादी इत्यादी),शकिल बदायुनी(बैजु बावरा,कोहीनुर,आन्,दिदार,चौदवीका चांद,दो बदन,मुगल ए आझम या चित्रपटातील गाणी याचीच्!)मजरुह सुलतानपुरी(तु कहे अगर.. म्हणजे ५० मधल्या अंदाजपासुन ते पेहला नशा.. या ९० मधल्या जो जिता सिकंदर..पर्यंत काला पानी,नौ दो ग्यारह,पेइंग गेस्ट,सुजाता,अभिमान वगैरेतली गाणी याचीच) व शैलेंद्र(बरसात,जागते रहो,बंदिनी,अनारकली,यहुदी,दिल एक मंदिर,मधुमती,गाइड,संगम्,श्री ४२०,अनाडी,ब्रम्हचारी यातली सुपरहिट गाणी याचीच!) असे गीतकार असणे हेही त्या सुवर्णकाळाला तितकेच कारणीभुत होते..

विषयांतराबद्दल क्षमस्व... पण टुलिप.. तुझ्या खास शैलीत या सगळ्या संगीतकार व गीतकारांवर एक एक पोस्ट लिही बघु....:)

असे भाव चेह-यावर आणुन, हवालदाराच्या आवेशात तिला 'कौन परदेसी तेरा दिल ले गया?' म्हणुन विचारतो.>>>>> भाभूच्या चेहर्‍यवरती भाव?? Proud

ट्यु, सुंदर गाणी.
राजेंद्र कुमारला टाका त्या ठोकळा कॅटेगरीत. त्याच्या नशिबाने त्याला गाणी मात्र सगळीच चांगली मिळाली.

Pages