चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलजारजी जैसे गीतकर को उस राखी मे क्या नजर आया
'
लैलाको देखो मजनु के नजरसे असे वाचलेय, ते खरेच असणार.....

दिल से मधली गाणी पण वायाच घालवलीयेत !
'ए अजनबी' तर फुकट घालवलं तर 'सतरंगी रे' मधे पैलवाना सारखं दणाअदणा नाचून मनिषा कोइरालानी आणि शाह रुख दोघांनी वाट लावलीये गाण्याची !

अजून एक- चौदहवी का चांद हो
<< हाहाहा
अतिशय कृर गाणं आहे ते !
का बिचार्‍या सुखानी झोपलेल्या मुलीला उठवायला तिच्या डोक्या पाशी जाउन गाणं गायचं..किती दुष्टपणा!!

मस्त धागा.
यामधे जितेंद्रसायबाचं सारा जहा है मेरे लिये हेपण यायला हवं. आणि हॅपी बड्डे सुनिता ओव्वो हे पण Happy

कांदेपोहे, अम्रुता, " रिमझिम गिरे सावन " हे माझं पण प्रचंड आवडतं गाणं आहे. मला जेव्हा youtube सापडलं तेव्हा मी पहिल्यांदा हे गाणं search केलं. आणि may be माझ्या imagination पेक्षा त्याचं picturisation फारच वेगळं निघालं म्हणून असेल पण खूप निराशा झाली पाहून. ( मी फक्त अमिताभचं, i mean किशोरचं गाणंच पाहिलं आहे. ) गाणं ऐकून माझ्या मनात आलेली situation मैफिलीचीच होती. पण ती थोडीशी " खिलते है गुल यहॉ..." गाण्यातल्या मैफिलीसारखी होती. म्हणजे, रात्रीची वेळ, मोजके मित्र मैत्रिणी एकत्र जमलेत, बाहेर मजबूत पाऊस पडतोय, casuals मधला अमिताभ, साडी आणि मोठ्या अंबाड्याऐवजी थोडे लहान दिसवणारे स्मार्ट कपडे घातलेली मौसमी, आणि नायक नायिकेमधे जबरदस्त पण निशब्द chemistry...
पण " रिम झिम गिरे" मधली ती मैफिल त्या गाण्याला नाही सूट होत.
तो लोफरचा सीन खरंच cute आहे. specially अमिताभ पुढे निघून गेल्यावर मौसमी फार गोड हसलीये.

इथली चर्चा वाचून 'मिलो न तुम तो' बघितले. अरे बापरे राजकुमार एका माकडाला सुद्धा लाजवेल इतका खतरनाक नाचलाय. ]खरे तो लहानपणी एका मूवीत पाहिल्यापासून मला फक्त शेतात पक्षांना दूर ठेवायला असलेले मक्ख बुजगावणे ह्याशिवाय काही नाही असे वाटायचे. Happy

'दिल की गिरह खोल दो' माझं खूप आवडतं गाणं. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मात्र हसुच आलं. बिचारी नर्गिस तिच्यापरीनं नाच करायचा खुप प्रयत्न करते मग नंतर नुसतीच हलत राहते. नर्गिसच्या चाहत्यांनो सॉरी.

'तेरे नाम' मधलं 'लगन लगी' च्या चित्रिकरणानी पण जाम अपेक्षाभंग केला.

अरे केपीने सांगितलेय ना की गाण्यांच्या चित्रीकरणाची चर्चा इथे नको म्हणून? त्यासाठी वेगळा धागा उघडा हवा तर.

बाफ वाचून सगळ्यात आधी प्रियाची आठवण झाली. Happy आणि "तस्वीर तेरी दिल में" या गाण्यात "नैनोंका कजरा पिया तेरा गम" ओळींमधे लताचा आवाज कर्कश वाटतो का यावर केलेली चर्चाही! पाच वर्षानंतरही आता हे गाणं ऐकलं की आधी ते आठवतं. Happy तसंच या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता आणि रफीमधे बिनसलं होतं अशीही वदंता मागे ऐकली होती. खरंखोटं लताच जाणे. असो, गाणं ऐकून बघा. Happy

दुसरं असं एक गाणं म्हणजे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त माझं आवडतं "चैनसे हमको कभी आपने जीने न दिया". पण या गाण्यात वाजणार्‍या वाद्यांचा ताळमेळ नीट जमत नाही असंच राहून राहून वाटतं. इतका की "काश ना आती अपनी जुदाई मौत ही आ जाती, कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती" इथे मधे चक्क थोडं बेसूर झाल्यासारखं वाटतं. पण नीट लक्ष देऊन ऐकलं की वाटतं की आशा सुरातच आहे पण वाद्यांमुळे... ती बासरी आशा कडवी गात असताना नको होती का??? काय चुकतंय ते नक्की कळत नाही पण खटकत राहतं. Sad इतर कोणाला असं वाटतं का?

१०० तल्या ९९ पुरुषांचे जजमेन्ट चुकते त्याला काय करणार? To err is man!

रॉबीनहुड धन्यवाद....

चैनसे आपने हमे

तुम्ही गाणी कुठे ऐकता?? न चुकता चुकीची ऐकता म्हणुन विचारतेय...

इंतकामचं 'आ जाने जा' अप्रतिमच आहे. पण मला सारख वाटत रहाते की कोणा हिंदी न येणार्‍या माणसाला ते गाण्त फक्त ऐकवले तर cabaret म्हणून ते गाणे त्याला पचणे जरा जडच जाईल. हेलनची लाजवाब अदाकारी आणि एल.पी. चे भन्नाट संगीत यामुळे ते डोळ्यांना आणि कानांना एकदम मेजवानी आहे पण तरीही लताचा आवाज - नाही पटत.

आजच सकाळी आठवलं हे- 'मन डोले मेरा तन डोले... ये कौन बजाये बासुरिया..' हे सुमधुर गीत आणि त्यानंतरची अजरामर पुंगी! गाणं मनात ऐकताना, ती पुंगीही वाजली ना लगेच पुढे?

अरे? पण गाण्यात 'बासुरिया' आणि संगीतात 'पुंगी'??? Happy

हे जाणवूनही खटकलं नाहीचे, पण गंमत वाटली! Happy

>अरे? पण गाण्यात 'बासुरिया' आणि संगीतात 'पुंगी'???
good catch! हिंदीत त्या जागी बसणारा पुंगी ला ("बीन" खेरीज) दुसरा शब्द मिळाला नसावा? Happy

हे अजून एकः
नसीब चित्रपटातील "मेरे नसीब मे तू है के नही" हे गाणं लताच्या आवाजात आहे पण त्या आधी एका दृष्यात हेमामालिनी एका जाहिरात कंपनी बरोबर अ‍ॅड(?) करताना ती पहिली एकच ओळ नक्की कुणाकडून गावून घेतली आहे? गायिकेने पण जाम लता सारखा गायचा प्रयत्न केलाय. तो शेवटचा आलाप अगदीच शाळकरी..
(अनुराधा, कविता का साधना सरगम...? अनुराधा वाटतीये). आणि हे असं का केलं असावं? एल्.पि. बंधूंन्ना त्या गायिकेला ब्रेक द्यायचा असावा? का लताच आहे? Sad
(त्या दृष्यात ते कोकीळा ड्रॉप्स प्रकरण भारी आहे... परदेशी शूटींग चे प्रायोजक असावेत बहुदा):)
हे पहा:
http://www.youtube.com/watch?v=PSuZLY2aai4&feature=related
(२:१० पासून क्लिप पहा)

आणि हे मूळ गाणं:
http://www.youtube.com/watch?v=mrKZgT9c89k

हो चाफा. मलाही नेहमीच नैनों का कजरा या ओळींवर लताचा आवाज सुरात गेलाय असं वाटतं. अ‍ॅक्चुअली हे गाणं ऐकताना लताच्या या स्वरांवरच इतकं लक्ष केंद्रीत होतं की बाकी गाणं नीट ऐकलंच जात नाही.
चैन से.. च्या सुरुवातीचा म्युझिकचा तुकडाही विसंगत वाटतो पुढच्या गाण्याला. पण काही असलं तरी गाणं अफाटच आहे हे.

अरे? पण गाण्यात 'बासुरिया' आणि संगीतात 'पुंगी'???

आणि हा पुंगीचा आवाज कल्याणजी शाह ( क-आनंदजीमधले) यानी चक्क हार्मोनियमवर काढला आहे! Happy त्यात पुंगी, बासुरी, क्ले वायोलीन यातले काहीच प्रत्यक्षात वाजत नाही.

Pages