चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर ऐकलं होतं की कल्याणजींनी खरीखुरी पुंगी वाजवली होती ह्या गाण्यात Uhoh

मी तर ऐकलं होतं की कल्याणजींनी खरीखुरी पुंगी वाजवली होती ह्या गाण्यात
>>
मी तर कल्यानजी आनन्दजी यांच्या अनेक आणि हेमन्तकुमारंच्या एखादेक मुलाखतीत ते कल्यानजी यानी वाजवलेले क्ले व्हायओलिन होते असे वाचले आहे.नेटवरही असे सन्दर्भ उपलब्ध आहेत.

लता ने गायलेले हे एकमेव कॅब्रे साँग ...
नाही, दर्दे दिल बढता जाये , सारी सारी रात नीन्द ना आये हे कॅब्रे सॉन्ग बिन्दूवर चित्रीत झाले आहे आणि लताने गायले आहे.बुनियाद मधले गाणे आहे.(लक्षमी- प्यारे) त्यात प्राण , आणि शत्रुघ्न सिन्हा प्रथमच एकत्र आले होते.

मी तर ऐकलं होतं की कल्याणजींनी खरीखुरी पुंगी वाजवली होती ह्या गाण्यात >>> मी कुठेतरी वाचलय (कुठल्यातरी फिल्मी मासिकात) की कल्याणजीनी पुंगीऐवजी दुसरे वाद्य (हार्मोनियम नसेल बहुतेक) वाजवल्यामुळे पुंगी वादकानी मोर्चा काढला होता म्हणून, ख खो कल्याणजी आणि ते पुंगी वादक जाणे!!

तसेच देस परदेस मधील आप कहे और हम ना आये. गाणे छान पण चित्रिकरण भयाण. टीना व देव आनंद. म्हण्जे विजोड जोडी.

दुसरे ऐ शमा मुझे फूंक दे. मध्ये राज कपूर बागेत बागड्त असतो गाणे मात्र मुकेश च्या आर्त सुरात.

ती पुंगी नव्हती, हे मात्र नक्की..... नागिन मध्ये हिरॉइन हिरोची बासरी ऐकून त्याच्या प्रेमात पडते म्हणे.. ती बासरीही कल्याणजीनी वाजवली होती.. ( ती मात्र बासरीच होती.. )

ओके ओके, माझी चूक. शोध घेता, एक मस्त आर्टीकल आणि त्या क्लेव्हायोलिनचा फोटोच मिळाला.. ते म्हणजे जुन्या काळातलं सिन्थेसायजर.. आर्टीकल लांबड वाटेल कोणाला, पण मला आवडलं Happy

http://dr-narasinha-kamath.sulekha.com/blog/post/2002/12/instrumental-i-...

http://squeezyboy.blogs.com/squeezytunes/2006/01/claviolines_on_.html

छान केलेस हे..... क्ले वायोलीन हार्मोनियमसारखेच दिसते. नुसते नावच वायोलीन आहे...

केपी, धन्स. हा धागा सुरु केल्याबद्दल. आणि आंधी च्या त्या गाण्याची सुरुवातीची चर्चाही अप्रतिम.

पूनम, मलाही हीच लिंक सापडली होती आणी पुंगी व बासुरीयाच्या तुझ्या पोस्टला हसायचे रद्द केले. Happy

आशु, धन्स कसले? भर घाल बरं.

'मेरे मेहबूब तुझे, मेरी मुहोबत की कसम' हे गाण मला खुप आवड्त. पण पडद्यावर पहाताना पूर्ण निराशा !

या गाण्याचं शूटींग घेतानाही कंटाळा आला असेल. राजेंद्रकुमारच्या चेहर्यावर काही म्हणजे काही भाव नाहीत.

अश्यावेळी या गाण्यामधला आजुबाजूला जो crowd असतो, त्यांची फार कीव येते. त्यांना फक्त टाय्-सूट घालून, हातात बीयरच्या ग्लास घेउन उभं रहायचं असतं. !

राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, देव आनंद हया लोकांना फक्त एस्.डि.बर्मन, शंकर-जयकिशन, आर्.डि. यांनी जगवलय.

राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, देव आनंद हया लोकांना फक्त एस्.डि.बर्मन, शंकर-जयकिशन, आर्.डि. यांनी जगवलय>> जोरदार आक्षेप!!!

राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, देव आनंद हया लोकांना फक्त एस्.डि.बर्मन, शंकर-जयकिशन, आर्.डि. यांनी जगवलय>>

काहीतरीच......... राजेंद्रचे माहित नाही, पण माझ्या १४ वर्षाच्या मुलीलाही शम्मी आवडतो, त्याच्या पिक्चरच्या सिडी मुद्दाम आणुन पाहते म्हणजे त्याच्यात काहितरी जादु होतीच होती. देव मला अजुनही आवडतो (अर्थात तो जुना पेइंगगेस्ट आणि तेरे घरके सामने वाला Happy )

जंगलीमधला एक सीन आठवा. नायक नायिका वादळात सापडून एका झोपडीचा आश्रय घेतात. नायक नायिकेला एक शेर वाचून दाखवतो. ह्या प्रसंगात शम्मी कपूरचे डोळे इतके intense आहेत की त्या जागी अगदी एखादा मेगा हॉट सीनही फिका पडावा. त्या moment ला त्याला तिच्याबद्दल जे जे काही वाटतंय ते सगळं त्या नजरेत एकवटलेलं आहे.
मी तर शम्मी कपूर, देव आनंद आणि संजीव कुमारची जबरदस्त पंखी आहे.

आपल्याला आवडला शम्मी तो मनोरंजन मधला 'धूपछांव' म्हणून.... इर्मा ला दूस पेक्षाही...>> सही लेकिन वो किस्सा फिर कभी. Proud

शम्मी कपूर इतका 'डान्सिंग सेन्स' आणि र्‍हिदम अजून पर्यंत दुसर्‍या कोणत्याही मेल अ‍ॅक्टरमधे नाही. वेड्यावाकड्या उड्या आणि त्याच्या उछलकुदवाल्या याहू.. गाण्यांमुळे जास्त लक्षात राहिला लोकांच्या हे त्याच्यावर प्रचंड अन्यायकारक ठरले आहे. खरं तर ह्या गाण्यांमधूनही त्याची 'अ‍ॅक्टिंग' त्याचे देखणेपण, रोमॅन्टिक दिसणे, त्याच्यातला र्‍हिदम, डान्स सेन कधीही लपून राहिलेला नाही. चांद सा रोशन, याल्ला याल्ला, ओ हसिना जुल्फोवाली पासून ते आज आजा.. पर्यंत कितीतरी उदाहरणे आहेत. He actually managed to look sexy even while singing sukku sukku type songs.
पण तरीही लोकांनी त्याची फक्त हीच गाणी कां लक्षात ठेवावित कळत नाही.
शम्मीला खरा पहावा तो त्याच्या सायलेन्ट, रोमॅन्टिक सॉन्ग्जमधून.
उदा.- दिवाना मुझसा नही, तुमने मुझे देखा होकर मेहेरबां.. (तिसरी मंझिल),
प्यार की कसम है न देखो ऐसे प्यार से (दिल देके देखो),
जवानियां ये मस्त मस्त बिन पिये (तुमसा नही देखा),
येह दुनिया उसीकी.. जमाना उसीका, कही ना कही कभी ना कभी, दिवाना हुआ बादल, इशारों इशारों मे (काश्मिर की कली)
रात के हमसफर थक के घर को चले (अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस),
एह्सान तेरा होगा मुझपर (जंगली),
दिल के झरोखे में, मै गाऊं तुम सो जाओ (ब्रह्मचारी),
इस रंग बदलती दुनिया में ( राजकुमार) आणि अशी अक्षरशः अ-सं-ख्य गाणी आहेत ज्यांमधे शम्मी कपूरने गाण्याला न्याय दिला की ही गाणी त्याच्यामुळे लक्षात राहिली हा वाद निव्वळ निरर्थक ठरेल. नि:संशयपणे शम्मी कपूर हा रोमॅन्टिक गाणी पडद्यावर उत्कृष्टपणे साकार करणारा एक कलावंत ठरतो. शंकर जयकिशन आणि रफीची अनेक गाणी केवळ शम्मीमुळे 'वेगळी' ठरुन गाजली आणि लक्षात राहिली. त्या दोघांनी स्वतःनीही हे कधीही अमान्य केलं नाही, उलट अनेक मुलाखतींमधून वेळोवेळी सांगितलं.
* शम्मी कपूरला 'कोणत्याही' संगितकाराने जगवलय" ह्या विधानाला अक्षरशः काहीही अर्थ नाही. * पिरियड.

शम्मी कपूरचे लिप सिंगिंग हा आजही अभ्यासाचा विषय आहे. गाण्याच्या रेकॉर्डिंगला उपस्थित राहून तो गायक गाणं कसे म्हणतो याचे निरिक्षण करायचा.

त्याचे ते निळे तरीपण भावुक डोळे, जेल लावलेले केस आणि अंगात जन्मजात असलेला रिदम सेन्स... (कधीकधी ओठाची दिसणारी ते गुलाबी लिप स्टिक :फिदी:) कित्तीतरी सामान्य गाणी त्याने अजरामर केलेली आहेत.
याहू आणि सूक्कू हे तर फक्त शम्मीच करू जाणे. बाकीच्यानी तर विचार पण नको करायला.

ठोकळेबहद्दरामधे राजेंद्र कुमार ठिक आहे, जॉय मुखर्जी, विश्वजीत याना विसरायला नकोच!!

हिंदी चित्रपटातल्या बर्‍याच गाण्यात काळ आणि संगीत याचा मेळ बसत नाही..:)
उदा. झुबैदातलं 'मै अलबेली' १९४०-५० चा काळ दाखवलाय आणि त्यात चक्क इलेक्ट्रॉनिक साऊंड घेतलाय.
अशोकातल्या सगळ्या गाण्यांच संगीत नविन काळानुसार आहे.

त्याले सिनेमॅटिक लिबर्टी मंतेत भौ...
समजा १९४०-५० साली ए आर रहमान असता तर त्याने कशी वाद्ये वाजवली असती त्याचे कल्पनारम्य चित्र आहे ते. आणि त्यानी त्यांची 'पिरियड' फिल्म आहे असा दावाही केलेला नाही....

रामायनाच्या मालीकेत नाही का लोकांच्या हातात घड्याळे अन पायात लिबर्टीचे बूट दिसत. ?
समझ लो यार....

'मै अलबेली' १९४०-५० चा काळ दाखवलाय आणि त्यात चक्क इलेक्ट्रॉनिक साऊंड घेतलाय.
<< अजय देवगण च्या भगतसिंग मधेही 'पगडी संभाल जट्टा' मधे 'तुक तुनु नु तुनु बल्ले बल्ले' य कोरस ओळींना सारखे सारखे इल्क्ट्रॉनिक बिट्स येतात !:)
रेहमान ला मोह आवरत नाही बहुदा Proud

वस्त्रहरण मध्ये धृतराष्ट्र चष्मा घालून स्टेजवर येतो. तात्या सरपंच त्याला झापतो अरे धृतराष्ट्र काय चष्मा घालीत होता काय? जा काढून ठेव. त्यावर धृतराष्ट्र म्हनतो' मग मला स्टेजवर दिसायचा नाय'

Pages