रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे.
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.
मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)
बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.
याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.
आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.
असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..
प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)
खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.
(फोटोचा प्रताधिकार माझाच )
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.
पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!
ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.
प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..
प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.
cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत
प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<
उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )
तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे
प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.
प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,
>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!
ट्रिप्लिकेट ना!
ट्रिप्लिकेट ना!
@मानव पृथ्वीकर
@मानव पृथ्वीकर हा हा हा
उठे सबके कदम नॅन्सी च्या
उठे सबके कदम नॅन्सी च्या पांढऱ्या लाल स्ट्रीप ड्रेस आणि पदमसी बाईंच्या आनंदी एक्सप्रेशन ने सुसह्य होते.शिफ्ट वन पीस ड्रेस ची फॅशन परतून आल्याचा पुरावा.
दिना पाठक चा मधला गाण्याचा पार्ट पण छाने.
पंख होते तो नक्की पहा.कपाळावर हात मारून घ्याल.
पंख होते मधे संध्याच्या बरोबर
पंख होते मधे संध्याच्या बरोबर जी मैत्रीण आहे ती मुमताज आहे
उठे सबके कदम नॅन्सी च्या
उठे सबके कदम नॅन्सी च्या पांढऱ्या लाल स्ट्रीप ड्रेस आणि पदमसी बाईंच्या आनंदी एक्सप्रेशन ने सुसह्य होते.शिफ्ट वन पीस ड्रेस ची फॅशन परतून आल्याचा पुरावा.
दिना पाठक चा मधला गाण्याचा पार्ट पण छाने.>> +११११
उठे सबके कदमचं चित्रीकरण उलट मला ते घरगुती वातावरणात आहे ते जास्त आवडलं
उलट ना बोले तुम ना मैने कुछ कहा हे नायक नायिका दोघंच असताना दिवसा चित्रीत झाले असेल असं वाटायचं (धूपमे खिला है चांद दिनमे रात होगयी
ते तर फुल नाईट क्लबमधलं गाणं आहे 
उठे सबके कदम नॅन्सी च्या
उठे सबके कदम नॅन्सी च्या पांढऱ्या लाल स्ट्रीप ड्रेस आणि पदमसी बाईंच्या आनंदी एक्सप्रेशन ने सुसह्य होते.शिफ्ट वन पीस ड्रेस ची फॅशन परतून आल्याचा पुरावा.
दिना पाठक चा मधला गाण्याचा पार्ट पण छाने.
पंख होते तो नक्की पहा.कपाळावर हात मारून घ्याल ----
उंहु ती दिना पाठक नव्हे तर लीला मिश्रा (शोले मधली बसंतीची मावशी). तिने वर्सोवाला राहत असलेल्या खाष्ट ख्रिश्चन आजीची भूमीका उत्तम वठवली आहे, खरं तर पाच-दहा मिनिटांसाठीच दिसली आहे आणि शेवटी एकदा climax ला आहे.
उठे सबके कदम हे माझेही खुप आवडते गाणे आहे. इकडे त्यावरची चर्चा वाचून तीन-चारदा ऐकले. दूर्दैवाने Youtube वर गाण्याचा official video नाही, संपादीत आहे (कुणास ठाऊक, मला गाण्यांचे official video च बघायला आवडतात, त्यात छेडछाड केलेली नसते). आश्चर्य म्हणजे लीला मिश्राला पर्ल पद्मसीने स्वर दिला असला तरी पर्लला मात्र लतादीदींचा स्वर आहे.
गाण्यात गिटार वाजवत असलेला कलाकार रणजीत चौधरी असून तो पर्ल पद्मसीचाच् (पहील्या पतीचा) मुलगा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरीकेत राहत असलेले रणजीत काही महिन्यांपूर्वी भारतात आले आणि त्यांच्या दातांवर उपचार सुरू होते. तथापि सध्याच्या कोरोना साथीमुळे उपचारांत दिरंगाई झाली आणि त्यातच intenstine मधला ulcer फुटल्याने त्यांना 14 एप्रीलला ब्रीच कँडीला दाखल करून लगेच शस्त्रक्रिया केली गेली; मात्र 15 एप्रीलला त्यांनी जगाचा निरोप घेतला.
उठे सब के कदम चं चित्रीकरण
उठे सब के कदम चं चित्रीकरण मलाही आवडतं!
चित्रीकरण पाहून भ्रमनिरास झाला याचे उदाहरण म्हणजे आँखों में हमने आपके सपने सजाए हैं. यात राजेश खन्ना एकवेळ ठीक आहे पण शबाना आझमीला पाहून एकदम चुकल्यासारखे वाटते! शबाना आझमी ग्रेट अभिनेत्री आहे यात शंका नाही पण सुंदर हिरोईन म्हणून शोभत नाही. मला यात रेखा अमिताभ ही जोडी बघायला आवडली असती.
ओह ओके.
ओह ओके.
मला एकदम दिना पाठक सारख्याच वाटल्या त्या आजी.(फक्त दिना पाठक चे केस जास्त ऑर्डर्ड होते बहुतेक.)
ओह. उठे सब के कदम बहुतेक मलाच
ओह. उठे सब के कदम बहुतेक मलाच खटकलेले दिसतेय. कदाचित अनेक वर्षांनी पाहिल्यामुळे कल्पना आणि चित्रण यातील फरकामुळे असेल.
रणजीत चौधरी यांच्याविषयी वाचून वाईट वाटले.
>> पंख होते तो नक्की पहा.कपाळावर हात मारून घ्याल.
हो. बघितले
यापेक्षा डोळे झाकून ऐकायला छान वाटते.
शांतरामनी अजून एका सुंदर गाण्याचे असेच गमतीशीर चित्रण केले आहे. "तो एक राजपुत्र, मी एक रानफूल" किती गोड गाणे आहे. पण चित्रीकरण फारच बाळबोध वाटले. कदाचित त्या काळात लोकांना आवडून गेले असेल पण आता त्या डान्सच्या स्टेप्स व एकंदर चित्रण पाहताना फार हसायला येते. यात सुद्धा तो जो बालकलाकार आहे तो आता हयात नाही. सुशांत रे, शांतारामांचा नातू.
पंख होते मधली ती प्रत्येक
पंख होते मधली ती प्रत्येक वेळेस केलेली पक्ष्यांची अॅक्शन डोक्यात जाते. अरे समजले आम्हाला तुला पंख असते तर तू पक्ष्यासारखी उडून गेली असतीस तिकडे
पियाकडे. पण बालवाडीच्या गॅदरिंग मधल्या डान्ससारखे ते सतत ठसवायची काय गरज आहे.संध्या असल्याने ही कहानी की माँग असेल की तिने डान्स केलाच पाहिजे.
करेक्शनः रसिया ओ जालिमा कडे.
करेक्शन नोटः हा संबोधन वाला ओ आहे. उर्दू वाला: शान-ओ-शौकत वाला नव्हे.
"तो एक राजपुत्र, मी एक रानफूल
"तो एक राजपुत्र, मी एक रानफूल" > रन्जना कशी दिसत्ये या गाण्यात. खरेतर इतर चित्रपटाच चांगली दिसते.
"तो एक राजपुत्र, मी एक रानफूल
"तो एक राजपुत्र, मी एक रानफूल" >> चानी चित्रपट. तो सुशांत रे ( बनवाबनवी मधला, व्ही शांतारामांचा नातू ) आणि रंजना बहुदा भाऊ बहिण असतात.
ओह.रणजित चौधरी गेले
ओह.रणजित चौधरी गेले
जनरली लहान भावाचे रोल असायचे.खूबसुरत, बातो बातो मे,खट्टा मिठा आणि इतर काही.एका पिक्चर मध्ये पितांबर नाव असते आणि हिरॉइन सारखी पट्टू म्हणत असते.मी हा कलाकार मागे एकदा गुगल करून शोधून काढला होता.
रन्जना कशी दिसत्ये या गाण्यात
रन्जना कशी दिसत्ये या गाण्यात. खरेतर इतर चित्रपटाच चांगली दिसते.>>>
मूळ कादंबरीत असा उल्लेख आहे की चानीची आई एका ब्रिटिश सैनिकाच्या अत्याचाराला बळी पडून त्यातून तिला चानी झालेली असते व चानी बापाच्या वळणावर गेली असल्याने तिचे केस सोनेरी असतात. म्हणून चित्रपटात रंजनाने सोनेरी केसांचा विग वापरलाय जो जरा विचित्र वाटतो. चानी अनाथ असते, तो मुलगा घरदार असलेला असतो पण त्याची तिच्याशी मैत्री होते. नाते नसते.
तो एक राजपुत्र हे गाणंच जरा
तो एक राजपुत्र हे गाणंच जरा मजेशीर आहे. आरती प्रभूंनी लिहिलंय म्हणे. पण ते शब्द कैच्याकैच आहेत. त्याचं म्युझिक मात्र मस्त आहे आणि नाच अत्यंत ऑकवर्ड असला तरी लोकेशन जबरदस्त आहे.
असंच एक मजेशीर गाणं आठवलं ते म्हणजे - कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय. विशेषतः त्यातले ते संवाद. म्हणजे आता मला तो चित्रपट अजिबात आठवत नाहीयेत त्यामुळे त्यातला संदर्भ असेल.
आणखी एक गाणं म्हणजे सौंदर्याची खाण पाहिली. या गाण्याबद्दल मला वाटतं मी इथेच आधी लिहिलंय. याचंही चित्रण विनोदी आहे.
विनोदी चित्रीकरण आठवायचं झालं
विनोदी चित्रीकरण आठवायचं झालं तर मराठी खिचडी पिक्चर मधलं 'प्रेमासाठी झुकले खाली धरणी वर आकाश' गाणं
https://youtu.be/Z7CGFIBcSoQ
विनोदी चित्रीकरण आठवायचं झालं
विनोदी चित्रीकरण आठवायचं झालं तर मराठी खिचडी पिक्चर मधलं 'प्रेमासाठी झुकले खाली धरणी वर आकाश' गाणं>>>> त्या हिरोचा डान्स अगदी अशक्य होता. लहानपणी पाहिला असेन मी. तेव्हा पण जाम हसू आलं होतं. एकंदर पुर्ण पिक्चरमधे त्याचा अभिनयच खतरनाक होता.
सांज ये गोकुळीं हे गाणं इतकं
सांज ये गोकुळीं हे गाणं इतकं सुंदर आहे. पण त्याच चित्रीकरण अगदी बेकार केलेय . गाण्याचा आणि चित्रीकरणचा काहीच संबंध दिसत नाही .
सांज ये गोकुळीं हे गाणं इतकं
सांज ये गोकुळीं हे गाणं इतकं सुंदर आहे. पण त्याच चित्रीकरण अगदी बेकार केलेय . गाण्याचा आणि चित्रीकरणचा काहीच संबंध दिसत नाही .
+१
हे गाण चित्रपटात पण सलग असे वाटत नाही.
चॉंदनी चौक टु चायना चित्रपटात
.
अप्रतिम आणि खटकलेले - ते अख्ख
अप्रतिम आणि खटकलेले - ते अख्ख "क्यूटी पाय" ते "चन्ना मेरेया" ते नंतर ते एका हातात कुंडी उचलून वारंवार आपटणं... बेडरूम... कुंड्या... थोड तरी झाडे, श्वसन, जीवशास्त्र...
आयुष्यावर बोलू काही https:/
आयुष्यावर बोलू काही https://youtu.be/Eybc9rPiChI
च्रप्स +१
च्रप्स +१
>>>>>>>सांज ये गोकुळीं हे
>>>>>>>सांज ये गोकुळीं हे गाणं इतकं सुंदर आहे. पण त्याच चित्रीकरण अगदी बेकार केलेय . गाण्याचा आणि चित्रीकरणचा काहीच संबंध दिसत नाही .>>>>>> + १०
>>>>>>>सांज ये गोकुळीं हे
>>>>>>>सांज ये गोकुळीं हे गाणं इतकं सुंदर आहे. पण त्याच चित्रीकरण अगदी बेकार केलेय . गाण्याचा आणि चित्रीकरणचा काहीच संबंध दिसत नाही .>>>>>> + १०
>>>>मैत्रिणी सोबत नाक फेंदारत
>>>>मैत्रिणी सोबत नाक फेंदारत, चित्र विचित्र नृत्य कौशल्य दाखवण्यास हे गाणे म्हणते, हे पाहून केवढा विरस झाला.>>>> मुमताज आहे का ती मैत्रीण? मला वाटतं. मी फार पूर्वी पाहीलय ते गाणं अर्थात.
मैं ना भूलुंगा च्या डिफेन्स
मैं ना भूलुंगा च्या डिफेन्स मध्ये थोडेसे: त्या दिव्यांच्या माळा ७० एम एम पडद्यावर फार सुरेख दिस्ल्या होत्या.
हिरो व हिरॉइन हे गरीब किंवा अगदी सुशिक्षित व घरची बेताची परिस्थिती असे असतत. हे गाणे ते दोघे रेडिओसाठी गातात तेवढेच जास्तीचे पैसे मिळतील म्हणून. त्यात त्यांची तेव्हाची जीवनाची स्वप्ने आहेत. घर गाडी आर्थिक सुस्थिती आजच्या घडीला हे माबो वरील सर्वांकडे आहे पण बॅक इन द सेवंटीज क्लास डिफरन्स खूप होता व हे खरेच सुखाचे मार्कर होते. , ते म्हातारे जोडपे वगैरे हिरो च्या मनात आपणही असेच एकत्र म्हातारे होउ असे असते म्हणून आहे. शे वटी झीनत पैशासाठी प्रेमाची कुर्बानी देते.
पुढे ती अश्या लग्नात अडकलेली असताना हेच गाणे सॅड स्वरूपात आहे. जेव्हा तिच्या कडे घर गाडी दागिने आहेत पण प्रेम नाही.
हिरो तर और नही बस और न्ही फेज मध्ये जातो पुढे.
आयुष्यावर बोलू काही ह्याच
आयुष्यावर बोलू काही ह्याच व्हिडिओ आहे हे माहित नव्हत.
गाणे अप्रतिम पण चित्रीकरण
गाणे अप्रतिम पण चित्रीकरण खटकलेल्या यादीत हे पहिल्या क्रमांकावर येईल बहुधा:
Fulale Re KShaN Maajhe
https://www.youtube.com/watch?v=5oLF3BUJvl0
एकेक कॉमेंट वाचा. खुद्द अपलोड करणाऱ्यांना सुद्धा खटकले आहे.
सुशांत रे
सुशांत रे
म्हणजे शांताराम ह्यांचा नातू
म्हणजे बनवाबनवी मधला 4 पैकी 1
म्हणजे बाजीगर मधला इंसपेक्टर - छुपाना भी नही आता
लवकर मेला, 40 व्या वर्षी,
सुशांत नावाचे हीरो लवकर का मरतात ?
Pages