चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन निश्चल नाचला? Lol
अगदी असेच "गोमु संगतीनं माझ्या तु येशिल काय" हे गाणे बघतांना मला थोडे विचित्र वाटते.

मला हा धागा आठवतच नाहिये. कुणी खणून वर काढल्याबद्दल धन्यवाद. प्रस्तावना वाचूनच निवांतपणाने अस्वाद घेत घेत वाचावा लागेल असं वाटतंय.

नवीन निश्चल असा काही नाचला आहे की वाटावे याने भान्ग घेतल्यावर विन्चु चावला आहे >>> Lol आई आई गं, हसुन हसुन पोट दुखायला लागलयं

हा धागा निवांत वाचण्यात येईल. वर आणल्याबद्दल थँक्स, केपी>>>> +१

या गाण्यावर नवीन निश्चल असा काही नाचला आहे की वाटावे याने भान्ग घेतल्यावर विन्चु चावला आहे>>>:D

लोकहो इथे कृपया चित्रीकरणापेक्षा गाण्यात कुठेतरी एखाडा रिदम चुकला आहे किंवा गाण्यातले बोल व संगीताचा मेळ बसत नाही किंवा प्रसंगाला साजेसे गाणे नाही, एखादा पिस ज्या वाद्याने वाजवला आहे असे वाटते ते वाद्यच वापरलेले नाही. या पध्दतीची चर्चा केली तर जास्ती मजा येईल.

उदा: गाण्यात बासरीची बोल आहेत गिटाराचे बोल आहेत पण संगीतात बासरी गिटार नाही. नागीणम्धली पुंगी वगैरे.

‘कुदरत’ या हिंदी चित्रपटातील ‘दुःख सुख की हर माला’ हे गाणे खूप गाजले. मोहम्मद रफी आणि गाडगीळ यांनी या गाण्याला आवाज दिला होता. यापैकी एलपीवर चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजातले गाणे आहे ते सिनेमामधे ते महंमद रफीच्या आवाजात आहे. http://www.youtube.com/watch?v=OTouKGENuIw

मला खटकलेले आणखी एक गाणे म्हणजे दिल एक मंदिर मधले 'दिल एक मंदिर है' गाणे. यातील प्रसंग आठवत नाही पण गाण्याच्या सुरुवातीला रफिच्या आर्त स्वरात "जानेवाले कभी नही आते जाने वालोंकी याद आती हे" हे ऐकले की एकदम कुणीतरी नुकतेच निधन पावले आहे असे वाटते.

याउलट पुढे सुमन कल्यानपूर एकदम "दिल एक मंदिर है! दिल एक मंदिर है!" गायला लागल्या की झेपत नाही.

हे गाणे चित्रपटात बहुतेक शेवटाला येते जेव्हा राजेंद्रकुमारचे निधन झालेले असते आणि खडखडीत ब-या झालेल्या राजकुमारला मीनाकुमारी घरी घेऊन जात असते. त्यामुळॅ चित्रपटात हे गाणे बरोबर जागी आहे.

आल्बम मधली अप्रतीम पण चित्रीकरणामुळे खटकणारी गाणी
१. राधा ही बावरी
२. आयुष्यावर बोलू काही (ही मोटारबाईकची जाहिरात वाटते!)
३. नसतेस घरी तू जेव्हा
४. हे भलते अवघड असते.
५. सरीवर सर

वर ओ हंसिनी ह्या गाण्याचा उल्लेख आहे....फार छान आहे ते गाणे..किशोरदांनी हळुवार, तरल पणे गाउन ज्या गाण्यांचे सोने केले आहे...त्या मधील एक हे गाणे...
फक्त, मजरुह साहेबांनी लिहिलेल्या गाण्यातील काही ओळी मला जाम खटकतात... उदा. देर से लहरों में कमल संभाले हुए मन का..जीवन ताल में भटक रहा रे तेरा हंसा. ज्याम फनी वाटते मला तरी ही ओळ. मुळात मौशमी ताई "हंसिनी" च्या ऐवजी चांगल्याच"मोटवानी" दिसतात त्यात, आणि त्या मानानी तो ऋषी कपुर अगदिच चम्या वाटतो, म्हणजे मोठ्या ताई च्या वर्गातली पोरगी पटवल्या सारखे दिसते ते Happy Wink
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व, पण अगदिच राहवले नाही.... Lol

गुलजार हे माझे आवडते गीतकार आहेत परंतु त्यांची अनेक गीते खटकतात. उदाहरणार्थ -

सारे के सारे गामा (पैलवान नव्हे) को लेकर गाते चले|
पापा नही है धानी सी दीदी, दीदी के साथ है सारे||

त्या मुलांचे वडील वारलेले असून मुले मोठ्या बहिणीच्या सोबतीने सहलीला असतात हे चित्रपटातले वास्तव असले तरीही त्यांचे वडील नाहीत आणि सोबत ताई आहे हे इतके आनंदात गाण्याची काय गरज आहे?

इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें||

रस्ते सुस्त आणि राहे तेज असे का? खरे तर उलट असायला हवे ना?

जब भी यह दिल उदास होता है (सीमा - १९७१) या गीतात तर

आईना देखता है जब मुझको एक मासूम सा सवाल लिए

ही ओळही अशीच अतर्क्य वाटते. आरसा आपल्याला पाहणार की आपण आरशाला?

लहान मुलांकरिता केलेले गीतलेखन तर कैच्याकै आहे.

जंगल जंगल बात चली है, पता चला है|
चड्डी पहन के फुल खिला है|

फुल चड्डी कशाला नेसेल?

चिपकली के नाना है, चिपकली के है ससूर|
दानासूर दानासूर दानासूर||

डायनासॉर हा पालीचा आजोबा आणि सासरा दोन्ही कसा असेल?

आनंद बक्षी तर अजूनच भारी. बर्‍याच गाण्यात ओढून ताणून चुटकीभर सिंदूर टाकल्याशिवाय यांच्या गाण्यांचा साजश्रुंगार पुर्ण होतच नसे. तसेच रंगरलिया हा शब्दही चिकार वेळा वापरून गाणी भिकार करून टाकलीत बक्षींनी.

तीनच शब्द पुन्हा पुन्हा फिरवून गाण्याचं लांबलचक धृवपद बनवण्याचं यांचं कसंबही वाखाणण्याजोगं..

यह दिल दीवाना है, दिल तो दीवाना है, दीवाना दिल है यह; दिल दीवाना||

केवळ चांगले संगीतकार लाभल्यामुळे गुलजार व आनंद बक्षी यांची अनेक गाणी मी सहन करु शकतो.

केवळ चांगले संगीतकार लाभल्यामुळे गुलजार व आनंद बक्षी यांची अनेक गाणी मी सहन करु शकतो.>>>> Uhoh

चेतन...
गुलजार म्हणजे शब्द महाप्रभु हो....शब्दच्छल कसा कराव हे त्यांच्या पसुन शिकावे एखाद्याने..
सारे के सारे गामा (पैलवान नव्हे) को लेकर गाते चले|
पापा नही है धानी सी दीदी, दीदी के साथ है सारे||
ह्या गाण्यात त्यांनी भरपुर शब्दच्छल ही केलाय आणि सरगम पण उलगडली आहे.
सारे के सारे = everybody at the same time सा रे = सरगम ची सुरुवात गामा नव्हे गा मा = हिंदी मधे गंधार व मध्यम ला गा व मा म्हणतात.
आता तुम्ही म्हणता प्रमाणे त्या मुलांचे वडील वारलेले असून मुले मोठ्या बहिणीच्या सोबतीने सहलीला असतात हे चित्रपटातले वास्तव असले तरीही त्यांचे वडील नाहीत आणि सोबत ताई आहे हे इतके आनंदात गाण्याची काय गरज आहे? बरोबर आहे, पण आधी वाह्यात म्हणवली गेलेली कार्टी, त्या रवी च्या येण्याने सुधरतात, नाचतात गातात सहलीला जातात आणि वडिल नसल्याचे दु:ख क्षण्भर का होईना विसरतात म्हणून
"पापा नही है धानी सी दीदी, दीदी के साथ है सारे||" आता पुन्हा "पापा" = पंचम आणि "धानि" = it is again धा (धैवत) आणि नी (निषाद). बंगाली भाषेत धानि चा एक अर्थ short tempered dwarf person असा ही होतो. चित्रपटात जयाजी जरी short tempered नसल्या तरी परिस्थिती मुळे त्या पण खोडकर आणि कोडग्या झालेल्याच असतात. आणि त्या नंतर पुन्हा सा रे !!

गुलजारांची गाणी नुसती ऐकुन सोडुन नाही देता येत.....
ती घोट घोट..एक एक सिप घेत घेत जसे एखादे उंची मद्य घशा खाली उतरवतो ना तशी आपल्या मधे भिनवुन घ्यावी लागतात, मग त्यांची नशा हळु हळु चढत जाते !! Happy

जंगल जंगल बात चली है, पता चला है|
चड्डी पहन के फुल खिला है| >>>> चेतन इथे उल्लेख झालेल फुल हे झाडावर उमलणार फुल नसुन कथानायक मोगली आहे...

गुलजारांची गाणी नुसती ऐकुन सोडुन नाही देता येत.....
ती घोट घोट..एक एक सिप घेत घेत जसे एखादे उंची मद्य घशा खाली उतरवतो ना तशी आपल्या मधे भिनवुन घ्यावी लागतात, मग त्यांची नशा हळु हळु चढत जाते !! स्मित >>>> सोला आणे सच बात प्रसन्न

प्रीत ये कैसी बोल री दुनीया
प्रीत ये कैसी बोल
बोल रे दुनीया बोल

गाणे सुंदरच आहे - शब्द भावपूर्ण आहेत आणि लताने ते जीव ओतून गायलेत. म्हणजे गाणं सुंदर होणारच Happy

पण शंकर जयकीशनचे संगीत साफ गंडलय. गाणे दु:खी मूडचे आहे आणि चालही त्याला अनुसरूनच आहे. पण त्यात जी वाद्ये वाजवली आहेत आणि ती ज्या पध्दतीने वाजवली आहेत त्यातून दु:ख जराही व्यक्त होत नाही. गाण्याच्या सुरवातीला जो संगीताचा तुकडा वाजतो त्यावरून एक आनंदी, खेळकर मूडचे गाणे ऐकायला मिळेल असे वाटत असताना शब्द येतात - प्रीत ये कैसी बोल री दुनीया.

सगळ्यात जास्त विसंगती दुसर्‍या कडव्यात आहे -
डूब गया दिन शाम हो गई
जैसे उम्र तमाम हो गयी

या शब्दांनंतर जे वाद्य वाजते (बहुतेक क्लॅरीनेट असावे) ते तर खूपच आनंदी भाव निर्माण करते मनात. आणि मग शब्द येतात - मेरी मौत खडी है देखो अपना घुंघट खोल.

त्या काळात संगितकार चाल बांधून वाद्यसंयोजन अ‍ॅरेंजरला द्यायचे. तेंव्हा काही तरी विसंवाद घडला असावा आणि चुकीचे वाद्यसंयोजन झाले असावे. पण लताने त्यात इतके जीव ओतून गायले आहे की तिच्या आवाजातून ते दु:ख आपल्यापर्यंत पोहचतेच.

डायनासॉर हा पालीचा आजोबा आणि सासरा दोन्ही कसा असेल?

देशस्थ असेल तो...त्यांच कुठलही नातं किमान चार बाजूंनी सांगता येतं..!!

तु इस तरहा से हे गाणे रफी बरोबरच अन्वरने गायले नसुन माझ्या कल्पनेप्रमाणे मनहरने गायले आहे..

बाय द वे, "लाखो है यहां दिलवाले" सारखं महेंद्र कपुरचं सुरेख गाणं.. विश्वजीतने गिटारचा वापर एखाद्या हत्यारासारखा करत गाण्याचे बारा वाजवले आहेत. तो स्वतः इतका हलतो कि गाणं एकीकडे आणि विश्वजीत साहेब भलतीकडे असा प्रकार वाटतो.

लताच्या "मेरा वतन जापान" इतकं कंटाळवाणं गाणं दुसरं नसेल. मला ती उच्चारत असलेले जपानी शब्द आजवर कळलेले नाहीत.

"चंदा कि किरनों से लिपटी हवायें" किशोरचं एक अतिशय सुंदर गाणं बलदेव खोसा लुंगी लावुन गातो. इतकं सुंदर गाणं म्हणताना काय घालावं याला काही मर्यादाच नाही Happy

रफीची क्षमा मागुन, पण त्याचं अत्यंत गाजलेलं क्या हुवा तेरा वादा हे मला अत्यंत उबवलेलं गाणं वाटतं.

जिहाले मिस्किन मकुन बा रंजीश मध्ये मिथुन डफ वाजवण्याऐवजी डफावर हाताने चोळल्यासारखे करतो. त्या मानाने "सरगम" मध्ये ऋषी कपुरने डफली बर्‍यापैकी वाजवल्याचा अभिनय केलाय.

आठवेल तसं लिहेन येथे. मस्त धागा Happy

>> त्या मानाने "सरगम" मध्ये ऋषी कपुरने डफली बर्‍यापैकी वाजवल्याचा अभिनय केलाय.>>
अतुल जी, अक्खे कपुर खानदान च त्या साठी प्रसिद्ध आहे..हे लोकं जेव्हा वाद्या समोर असतात, तेव्हा ते वाद्य अगदी कोळुन प्यायल्या सार्खा वाजविण्याचा उत्तम अभिनय करतात्...
अपवाद राज कपुर चा, कारण त्याला खरोखर च बरीच वाद्ये उत्तम वाजविता यायची..आता आठवुन बघा शम्मी कपुर !! तो पियानो च्या मागे फक्ता अर्धा दिसतो बर्याच गाण्यांमधे...पण त्या वाद्या वर असे काही हात फिरवताना दिसतो जसे काही तो ते वाद्य जन्मा पसुन वाजवितो आहे Happy सहज अभिनय म्हणतात तो हाच

'सरगम' चित्रपटासाठी ऋषी कपूरने डफली वाजवायचे खास प्रशिक्षण घेतले होते.

प्रसन्न,
गुलजारांची गाणी नुसती ऐकुन सोडुन नाही देता येत.....
ती घोट घोट..एक एक सिप घेत घेत जसे एखादे उंची मद्य घशा खाली उतरवतो ना तशी आपल्या मधे भिनवुन घ्यावी लागतात, मग त्यांची नशा हळु हळु चढत जाते !! स्मित>>> या पूर्ण पॅरेग्राफला अगदी ताटभरून मोदक. Happy

देशस्थ असेल तो...त्यांच कुठलही नातं किमान चार बाजूंनी सांगता येतं..!!>>>> स्वप्नान्ची राणीचा निषेध! चावट कुठली.:फिदी:

अरेच्या..बराचश्या पोस्ट चित्रिकरणावर पण आहेत... Uhoh
प्रसन्न.. अनुमोदन! आपण छान एक्स्प्लेन केले आहे.
आणि
<<गुलजारांची गाणी नुसती ऐकुन सोडुन नाही देता येत.....
ती घोट घोट..एक एक सिप घेत घेत जसे एखादे उंची मद्य घशा खाली उतरवतो ना तशी आपल्या मधे भिनवुन घ्यावी लागतात, मग त्यांची नशा हळु हळु चढत जाते !! स्मित>> +१००

अच्छा तो हम चलते है ( लता - किशोर, / राजेश खन्ना - आशा पारेख ) या गाण्यात यही, यहाँ कोई आता जाता अब नही अशी ओळ आहे. यात लताला जाता आणि अब मधे अवकाश मिळालेला नाही बहुतेक. कारण मला तरी ते आताजाताब असे ऐकू येते. लताचे असे कधी होत नाही.

गुलाबी आंखे जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया
इथे "गुलाबी आंखे" हा काय प्रकार आहे? पण हे गाणं मात्र माझं आवडतं आहे.

जो तुमको हो पसंद वोही बात कहेंगे... तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे...
बिनकण्याच्या लाचारीची किती हद्द आहे हे गाणं म्हणजे.

आणि उर्मटपणाची हद्द म्हणजे "मान मेरा एहसान अरे नादान के मैने तुझसे किया है प्यार"

आणि उर्मटपणाची हद्द म्हणजे "मान मेरा एहसान अरे नादान के मैने तुझसे किया है प्यार" >>>

अगदी, अगदी!

त्यातलीच पुढची ओळ तर कहरच ' मेरे नजरकी धूप न भरती रूप तो होता हुस्न तेरा बेकार' Sad

Pages