चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही 'तेरे बीना' हे गाणे आहे तसेच आवडते. इतकी सवय झाली आहे की ते ड्वायलॉक काढले तर अपुर्ण वाटेल.

सुनो आरती, ये जो फुलोंके बेले नजर आती है ना
दरअसल ये बेले नही, अरबी मे आयते लिखी हुई है
इसे दिन के वक्त देखना चाहीये, बिलकुल साफ नजर आती है
दिन के वक्त ये पानी से भरा रहता है, दिन के वक्त ये फुवारे....

क्यो दिन की बाते कर रहे हो..SS:kyon din ki baaten kar rahe ho
कहा आ पाऊंगी मे दिन के वक्त?

ये जो चांद है ना, इसे रात मै देखना
ये दिन मे नही निकलता

ये जरुन निकलता होगा

हां, लेकिन बीचमे अमावस आ जाती है
वैसे तो अमावस पंद्रह दिनोंकी होती है लेकिन इस बार बहूत लंबी थी

नौ बरस लंबी ना?

क्या बात है.. ९ वर्ष विरहानंतर फक्त रात्रीच भेटू शकेन अशा प्रेयसीला चंद्राची उपमा देऊन ये दिनमे नही निकलता म्हणले आहे. त्यात परत अमावस्या येतेच, ९ वर्ष तिला भेटलो नसल्याने आयुष्याची अमावस्या झालीय. वाह!!

तुम जो कह दो तो आजकी रात, चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो
रात कि बात है, और ज़िंदगी बाकी तो नहीं

थांबवुन ठेव हा क्षण... मला तर त्या डायलॉगमुळेच जबरदस्त पंच वाटतो गाण्यात. Happy

अनुमोदन... ती वाक्य काहींना त्रोटक वाटत असतील... पण ज्यांनी प्रेमविरह सहन केला असेल, त्यांना नक्कीच कळला असेल...

येस केपी! अगदी!
मला तो अमावसचा डायलॉग तर प्रचंड भावतो! आणि नंतरच्या त्या ओळी Happy गुलजार आणि पंचम द ग्रेट! Happy

सलाम किजीये हे गाणं का चांगलं नाही आहे? चांगलं च आहे ते. खरे तर ते पोलिटिकल सटायर आहे. चित्रपट राजकीय पार्श्वभूमिचा असल्याने गाण्यात औचित्य आहे.प्रत्येक गाणे 'गाणेच' असले पाहिजे असे नाही. इथल्या निवडणुकीत तर हल्ली अशी उपरोधिक गाणी बरीच येतात .पॅरोडी सॉन्ग म्हणून . आणि गम्मत म्हणजे ती इतकी इन्टरेस्टिंग असतात की त्याच्या रचनेला देखील दाद द्यावीशी वाटतात. सलाम कीजीय, आली जनाब आये है. ये देने पांच सालका हिसाब आये है हे गाणे त्या चित्रपटातील सर्वाधिक 'रेलेव्हन्ट गाणे आहे असे माझे मत्त हाये....

तेरे बिना... हे अतिशय आवडतं गाणे. शब्द तर खुप सुंदर.

मला तर ह्या गाण्यातील डायलॉग हे असे दर्शवते की नौ वर्षाच्या गॅपमूळे निर्माण झालेली दरी इतकी आहे की, आता फक्त पुर्णपणे मन व्यक्त करताना देखील अश्या उपमा किंवा उदाहरण सुचवून सांगावे लागते की जीवनात बघायला गेले तर कमी'च' होती पण वरवर बघता ठिक आहे. डायलॉग नंतर चालू झालेले गाणे हे खरे तर त्यांच्या(दोघांच्या) मनातील अव्यक्त केलेल्या फक्त खर्‍या भावनाच आहेत....
खास करून ती जेव्हा कापत म्हणते, नौ बरस लंबी थी ना... मग सुरु झालेले कडवे.. जी मे आता है तेरे बाहों मे...
नायिका ह्या कडव्यातून हेच सांगते की आज ह्या क्षणी निर्माण झालेल्या दरार मूळे मी मनात असताना सुद्धा तुला मिठी मारून रडू शकत नाही का मन व्यक्त करू शकत नाही इतकी का दूरी निर्माण झालीय असे प्रश्ण आहेत तिच्या डोक्यात.(ती अलगद पणे हे कडवे चालू असताना थोड्या वेळ त्याच्या खांद्यावर डोके ठेवून लगेच दूर जाते)

खरे तर ते पोलिटिकल सटायर आहे.>> हूड अनुमोदन. तसेच दुसरे चान्गले गाणे मेरे अपने तील हालचाल ठीक ठाक है.

आँधीतील माझे आवड्ते गाणे इस मोड से जाते है. दोघे प्रेमात पड्तात व नंतर एकमेकांपरेन्त पोचायच्या वाटाच
हरवून जातात. हाय क्या दर्द है. ऐसा हसीन दर्द किस्मत से मिलता है. संजीव काय दिसतो. मान लिया हरिभाइ.

'तो' पॉज नाही खटकत.. ते अवघडलेपण, संवादामधली दरी, तरी पूल सांधायचा प्रयत्न.. वा वा! उलट आजच्या काळातल्यासारखं डीजीटाईज करून ते स्मूथ केलं असतं, तर कृत्रिम वाटलं असतं.. हे एकदम अस्सल, रॉ आणि चपखल वाटतं.
'अमावस'चं बोलणंही.. टेक्निकली चूक आहे (१५ दिन लंबी), पण ते जे नातं जगत आहेत, आठवत आहेत, पुन्हा जुळेल का ही चाचपणी करत आहेत, त्या वेळी थोडं चाचपडायला होणारच ना..

टेक्निकली आणखी ही चूक आहे Happy "ये दिन मे नही निकलता" चांगला निकलतो की महिन्यातील बरेच दिवस भर दिवसा! (खुलासा: मला किशोर्-लता ची तीन्ही (वरती उल्लेख केलेली दोन व 'तुम आ गये हो नूर आ गया है') आवडतात. 'सलाम कीजिये' ऐकल्याचे आठवत नाही)

काही कळेना.. ....
>>>
पावनं, मायबोलीवं नवं दिस्त्यात जनू. वाइच बसा . तमाखू खा. टेका. पघा. हळू हळू डोक्याचा गोयन्दा कसा हुतोय त्ये बगा जरा... Proud

kp,
चांगले काम केलेस.. धन्यवाद! शिवाय ते संवाद व त्या अनुशंगाने आलेले गाण्यातील तिसरे कडवे, त्यातला पंच ही छान मांडलायस.
अर्थात, तो पंच तसा तिथे आहे आणि त्याने ते गाणे जास्तीच भिडते हे माझेही मत. Happy
तरिही, एक कुतुहल वाटते की (कदाचित मूळ प्रश्ण असा विचारायला हवा होता):
जेव्हा हे गीत, संगीतबध्ध केले गेले अन त्याला पुन्हा दृष्य स्वरूप दिले गेले तेव्हा हे संवाद आधी लिहीलेले होते का, का नंतर एकंदर सिचुएशन नुसार घातले गेले? मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तो ब्रेक (संवाद नव्हे) मला खटकतो अन गाण्याचा फ्लो तुटल्यागत वाटतो.
पंचमची अशाच ईतर गाण्यांची उदा. कुणी देवू शकेल का ज्यात असाच संवाद्पूर्ण ब्रेक गाण्यात मध्येच आहे?

असो.
असेच एक अतीशय सुंदर पण सुरुवातीलाच खटकणारे गीतः
हुजुर ईस कदर भी ना इतराके चलिये (मासूम).
(अरे पुन्हा एकदा, गुलजार, पंचम जोडी?)
खटकते कायः सुरुवातीलाच भूपिंदर ने म्हटलेल्या ओळी जेव्हा संपूर्ण म्युझिक चालू व्हायचे असते
"हुजूर ईस कदर भी ना ईतराके चलिये"
किती किती वेळा या पहिल्या ओळी ऐकल्या तरी प्रचंड बेसूर वाटतात. गम्मत म्हणून बर्‍याच वेळा त्या बरोबर पेटी वर वाजवून पाहिले आहे अन हमखास सूर उतरले आहेत. (सिन्थ वर वाजवताना ट्रान्स्पोज वगैरे करून सूर मेच होतात, फक्त त्या पहिल्या दोन ओळींसाठी) विशेषतः जेव्हा वाडकर महाशय त्याच ओळी पुन्हा गातात तेव्हा तर भूपिंदर चा सूर "उतरलेला" अधिक जाणवतो.
कुणाला हे जाणवले आहे का? माझ्या कानांचा दोषही असू शकतो.

भूपिंदर बद्दल मला आकस नाही पण तितका तो सकसही वाटला नाही . अपवाद गाणे " नाम गूम जायेगा" Happy

असेच एक अजरामर गीतः
दो दिवाने शेहेर मे (घरोंदा)
यात हे ड्युएट गीत ईतक्या खालच्या पट्टीत गावून घेतले आहे (बहुदा फिमेल सिंगर साठी ही तड्जोड केली असावी) की भूपिंदर ने गायलेल्या ओळीतला पंच हरवून निवांत छान रविवार दुपारचे जेवण झाल्यावर ढेकर द्यावी तसा काही आळसटलेला फील येतो.. एक अर्धी पट्टी तरी वर चढवायला हवं होतं राव Sad

तेच की हुडा. अजुन दुसरी फळी यायची आहे.

जागो, फक्त हे गाणे नाही. तुम्हाला खटकलेले दुसरे एखादे गाणे पण चर्चेला घेऊ शकता. कारणे दाखवा नोटीशीसह. Proud

योग, काहीतरी वेगळे देणे हीच तर पंचमची खासीयत आहे. Happy हुजुर इस कदर परत एकदा ऐकायला हवे. बाकी भुपींदरचे म्हणशील तर 'दिल ढूंढता है, करोगे याद तो, किसी नजर को तेरा, जिंदगी मेरे घर आना आना जिंदगी' अशी अप्रतिम गाणी आहेतच. असो. तो विषय नाहीये. मधे एकदा कुठल्यातरी कार्यक्रमात ऐकले होते, पंचमने एक बॅकग्राऊंडचा पिस (एक माणुस मरतो व गॅसवरुन दुध उतु जाते. बहूतेक शर्मीला टॅगोर आहे) वेगळा इफेक्ट यावा म्हणुन टेप करुन उलटा वाजवला होता.

आता हे खटकते म्हणा किंव्वा तक्रार म्हणा पण सागर चित्रपटात रिशी ला सर्व गाण्यांसाठी किशोरदांचा आवाज दिलाय पण "जाने दो ना.. पास आओ ना..." या ईतक्या ऊत्कट गीतात मात्र शैलेंद्र(?) चा वापर केला आहे.
विशेषतः बाकी सागर मधली गाणी ऐकल्यावर अचानक या गाण्यामधे बॉबी चित्रपटातला रिशी डोळ्यापूढे येतो (शैलेंद्र आवाज आणि बॉबी चा ईफेक्ट).
काय कारण असू शकेल? या चित्रपटा दरम्यान किशोरदांची तब्येत खराब होती, हार्ट प्रॉब्लेम होता म्हणून असावे कदाचित?
गाणे तर "झक्कास" आहे यात वाद नाही, पण ऐन वेळी राणि साहेबा येवून पार गाण्याच्या क्लायमॅक्स चा बट्ट्याबोळ करतात हेही खटकते (रिशी ला ही खटकले असेल) Happy

प्रत्येक गाणे 'गाणेच' असले पाहिजे असे नाही. >> एकदम मान्य. पण cassette च्या जमान्यात जेंव्हा इतक्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी एक मस्त मूड तयार व्हायचा तो या गाण्याने खराब होउन जायचा. तेंव्हा playlist सारखे पर्याय नव्हते ना.

असेच मला खटकलेले गाणे म्हणजे साहब बीबी और गुलाम मधलं भवरा बडा नादान है| इतके नितांत सुंदर गाणे गाताना जेंव्हा वहिदाला पाहिले तेम्व्हा अगदी हिरमोड झालेला माझा. गाण्यातल्या भावना १/१०० ने पण सादर नाही करू शकलेली वहिदा. मी ते गाणे पुन्हा कधीच नाही पाहिले फक्त ऐकतोच ते आता Happy

तसे अभिमान मधे अजून एक नाही पटत - जया करता कायम लताचा (तो अनुराधा बाईंनी गायलेला श्लोक वगळता) आवाज पण अमिताभकरता मात्र वेगवेगळे आवाज वापरले आहेत. गायकाच्या भुमिकेकरता तरी एकच पार्श्वगायक वापरायला हवा होता हे माझे मत. शेवटी गायकाकरता 'मेरी आवाज ही पेहचान है' हे वास्तव असते.

अमोल.. तुझ्याकडुन मला या बीबीवर भारत भुषणच्या गाण्यांचा उल्लेख अपेक्षित होता... या बीबीवर तुला व श्रद्धाला त्याच्या गाण्यांविषयी लिहायला फार मोठा स्कोप आहे..:)

भारत भुषणची गाणी अप्रतिम! तरीही ती खटकायचे कारण म्हणजे महम्मद रफी तिथे जिव तोडुन गाणे गात आहे पण या ठोकळ्याच्या चेहर्‍यावरची माशीही हलत नाही.. उदा: ये इश्क इश्क है ये इश्क.. ही कव्वाली! आणि कहर व हे गाणे खटकायचे कारण नंबर २ म्हणजे या नेहमी रडका व एरंडेल घेतल्यासारखा चेहरा असलेल्या ठोकळ्याची हिरोइन कोण म्हणे तर... मधुबाला! हे म्हणजे जरा अतीच झाल!

अजुन एक खटकणारे जुने गाणे म्हणजे... मिलो ना तुमको हम घबराये.. हे हिर रांझा मधले राजकुमार- प्रिया राजवंश वर चित्रित केले गेलेल गाणे! गाणे ऐकायला इतके मस्त वाटते.. पण पडद्यावर राज कुमारने जो नाचाचा(?) प्रकार केला आहे तो पाहुन एवढे चांगले गाणे विनोदी वाटु लागते..:)(कोणीतरी इथे या गाण्यांची लिंक द्या रे प्लिज!)

मुकुंद,
असे अनेक वीर ठोकळे आहेत हिंदी सिनेमामधे, ज्यांना कायम चांगली गाणी मिळायची...
भारतभूषण, जॉय मुखर्जी (हेमंतदा), विश्वजीत पासून किशन कुमार (सोनू निगम) ते इम्रान हश्मी (केके) पर्यंत ही यादी येते...

बाकी चर्चा मस्त चालली आहे....
मधे कुणीतरी पार्ल्यात म्हणालं होतं तसं गुलजार हे हळूहळू चढत जाणारं व्यसन आहे...
आणि त्यात कॉकटेलमधे जर आरडी अथवा रेहमान हा फॅक्टर असेल तर मग स्वर्गीय नशा....

पण पडद्यावर राज कुमारने जो नाचाचा(?) प्रकार केला आहे तो पाहुन एवढे चांगले गाणे विनोदी वाटु लागते..>>

Biggrin

गुलजार हे हळूहळू चढत जाणारं व्यसन आहे... फॅक्टर असेल तर मग स्वर्गीय नशा....
>>
अगदी अगदी ..

हमने देखी है उन आंखोकी महकती खुशबू,
हाथसे छूके इसे रिश्तोंका इल्जाम ना दो,
सिर्फ एहसास है रूहसे महसूस करो...
प्यार को प्यारही रहने दो कोइ नाम ना दो....

वाह वाह...

हीर रांझा चित्रपटाचे संवादही अगदी काव्यमय आहेत. बोलताना गाण्याच्या ओळीच बोलताहेत असे वाटते. पण ते सुंदर संवाद पडद्यावर बोलणारे कोण? तर राजकुमार आणि प्रिया राजवंश... Sad चेह-यावर आणि आवाजात जराही दिसत नाहीत ते संवाद.

मिलो ना तुमसे , तो हम घबराये...

मिलो ना तुमको हम घबराये..

मिलो ना तुम तो हम घबराये, मिलो तो आंख चुराये, हमे क्या हो गया है.....

खूप पूर्वी आशा भोसले च्या मुलाखतीत वाचल् होत् कि तिनी गायलेलं तिच् खूप आवडत् पण पडद्यावर प्रचंड निराशा झालेलं असं गाणं म्हणजे 'भवरा बडा नादान' !
म्हणून जेंव्हा दूरदर्शन वर लागला होता 'साहब बिवि...' तेंव्हा लक्ष देउन पाहिलं ते गाणं !
खरच अतिशय ओढून ताणून अल्लडपणा करायचा प्रयत्न करत विचित्र हाव भाव करत केलय वहिदा रेहमान नी ते गाणं:(.

मीही आशा भोसलेचे हे मत वाचलेय... Happy आशा मुद्दाम पाहायला गेली होती हे गाणे आणि मग प्रचंड निराश झाली होती.

हीर रांझाचे संवाद चेतन आनन्दने कैफी आझमी कडून मुद्दाम लिरिकल लिहून घेतले होते. मात्र प्रिया राजवंश या त्याच्या दुखर्‍या कोपर्‍याला चित्रपटात घ्यायचा मोह तो टाळू शकला नाही. ही बाई कोणत्या अंगाने हिरॉईन होती हे शेवटपर्यन्त कळले नाही.... तिला 'मै आ रही हूं सारखे निरुपद्रवी डायलॉगही बोलता येत नसत...

खरच अतिशय ओढून ताणून अल्लडपणा करायचा प्रयत्न करत विचित्र हाव भाव करत केलय वहिदा रेहमान नी ते गाणं:(.

>>
याचा दोष तुम्ही दिग्दर्शक गुरुदत्तला का देत नाही? अभिनेत्याला/नेत्रीला अ‍ॅक्शनचे स्वातन्त्र्य असते काय?

ही बाई कोणत्या अंगाने हिरॉईन होती हे शेवटपर्यन्त कळले नाही....

चेतन आनंदलाच विचारा ना... फक्त तोच बोलु शकेल ह्या विषयावर... (अर्थात आता बोलणे शक्यच नाही त्यामुळे त्याने आत्मचरित्र वगैरे काहीतरी लिहिले असेल तर आपल्यालाही कळतील तिच्यातले कलागुण )

ती फक्त एकाच भुमिकेत फिट्ट बसली असती --- सोनिया गांधीच्या.

याचा दोष तुम्ही दिग्दर्शक गुरुदत्तला का देत नाही? अभिनेत्याला/नेत्रीला अ‍ॅक्शनचे स्वातन्त्र्य असते काय?

<<< गाणी कोरिओग्राफर बनवतात ना ?
अर्थात त्या गाण्यात माहित नाही कोरिओग्राफर होता कि अ‍ॅक्चुअल डिरेक्टर नी करून घेतलं ते!
असो, पण मुळात एखाद्याच्या चेहर्‍याला अल्लाडपणा-खोडकर हावभाव अजिबात शोभत नाहीत , मग कोणी का डिरेक्टर असेना, मूळात पर्सनॅलिटीच तशी नसेल तर कोण काय करणार्(जसं नव्या मधे माधुरी नेनेंना अल्लडपणा प्रकार मुळीच कधी शोभला नाही/शोभणारही नाही :फिदी;).

Pages