चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संध्याचा सर्वोत्तम अभिनय बहुतेक नवरंगमधे त्याच्या बायकोच्या (काल्पनिक प्रेयसीच्या नाही) भूमिकेत असेल. तो त्यातल्या त्यात सहज आणि नैसर्गिक होता.

परछाई चित्रपटात शांताराम नायक होते आणि नायिका त्यांच्या दोन्ही पत्नी जयश्री आणि संध्या. जयश्रीबाईंनी बराच सुसह्य अभिनय केला आहे त्यात आणि दिसतातही छान. चित्रपटातली गाणी ऐकायला अतिसुंदर 'मोहब्बत चीज ना समझे', 'कटते है दुख मे ये दिन', 'अपनी कहो कुछ मेरी सुनो' पण पडद्यावर बघणं म्हणजे डोळ्यांवर अत्याचार आहे. विशेषतः शेवटचे गीत ज्याच्यात शांताराम आणि संध्या आहेत.

काय भयंकर आढळले हो तुम्हाला यात?? विश्वजित बबितापेक्षा गोड दिसतो/लाजतो/ठुमके मारतो/आणि बरेच काही>>> याला सहमत Happy पण बबिताही या गाण्यात आवडली आहे.

कटते हैं दुख में ये दिन आणि मोहब्बत ही न जो समझे ही दोन्ही गाणी खूप आवडती आहेत. ही व्ही शांताराम यांच्या चित्रप टातली आहेत हे माहीत नव्हतं. अपनी कहो हे ही खूप गोड आहे. सी रामचंद्रंचा स्टँप आहे या गाण्यांवर.

दो आंखे , बारा हाथ सिनेमा आवडला होता मला. कर्मा कि तशाच कुठल्यातरी थीम च्या हिंदी सिनेमापेक्षा खूपच परिणाम्कारक आहे. त्यात शांताराम दिस्तात पण छान. पण एकुणच भालजी पेंढारकर आणि शांताराम या मावस भावंडांच (संदर्भ : नाच ग घुमा) स्त्रियांबद्दल च मत फारसं काही उदात्त नसावं , आणि त्यांची एकापेक्षा जास्त लग्न हे अगदी खटकतं.

आज बऱ्याच वर्षांनी छुपाना भी नही आता चा व्हिडीओ पाहिला.गाणं सुंदरच आहे.विनोद राठोड च्या सूट वर भयंकर चंदेरी वेलबुट्टी आहे.शाहरुख च्या सूट च्या लॅपेल वर मांजर ओकल्या सारखे किंवा जपानी मधली 3 अक्षरे वाटतील असे डिझाइन आहे.टॉप ऑफ चार्ट म्हणजे सुशांत रे चा टाय आहे.त्यावर रंग रंग रांगोळी खेळासारखे भरपूर रंग आहेत.शिवाय हे कमी पडलं म्हणून कॉलेजातला सुशांत पांढऱ्या आणि रंगीत प्रिंट च्या स्वेटर वर जांभळा प्रिंटेड स्कार्फ घालून दाखवला आहे.गाणं सुंदर आहे पण ते कपडे अगदीच बघवत नाहीयेत.काजोल चा पांढरा सोनेरी घागरा तेवढा चांगला वाटतो.

तेव्हाच्या बऱ्याच पिक्चर्समधले कपडे आता चमत्कारिक वाटतात.
मराठीत धूमधडाकामधे निवेदिता जोशी ज्या कपड्यांंत टेनिस की badminton खेळून येते त्याच कपड्यात झोपून उठताना दाखवली आहे.

त्या काळात अधिक लग्ने अलवूड होती

शांतारामनि विमल , जयश्री अशी दोन लग्ने केली होती , दोघी प्रेमाने रहात होत्या

मग संध्याशी सूत जमले , तिच्याबरोबर लग्न करायलाही दोघी बायकांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण दागिन्यांवरून जयश्री व शांताराम चे भांडण झाले

तेंव्हा हिंदू घटस्फोट कायदा नुकताच पास झाला होता, त्याच्या आधारे त्यांचा घटस्फोट झाला, भारतातील पहिल्या काही हिंदू घटस्फोटातील हा एक आहे, जयश्री x शांताराम

द्वि भार्या प्रतिबंध कायदाही लागू होणार होता, म्हणून त्याच्या आधी काही दिवस शांताराम व संध्या ह्यांनी पटकन लग्न केले, संध्या x शांताराम

विमलबाई व संध्याही एकत्रच राहिल्या, शांतारामानी दुसऱ्या विवाहानंतर नसबंदी केल्याने संध्याला मुले झाली नाहीत, आधीच्या सात मुलांना त्यांनी आपले मानले. त्यांना ह्याची कल्पना होती,

हिंदू घटस्फोट कायदा व द्वि भार्या प्रतिबंध कायदा ह्यांच्या अगदी सीमारेषेवर घटस्फोट व लग्न झाले आहेत

मराठीत धूमधडाकामधे निवेदिता जोशी ज्या कपड्यांंत टेनिस की badminton खेळून येते त्याच कपड्यात झोपून उठताना दाखवली आहे. >> Biggrin

त्या काळात अधिक लग्ने अलवूड होती > हो बरोबर. पण नवरंग मध्ये नायिकेला नवरा दुसरीच्या नादी लग्ला आहे हा संशय अस्तो म्हणून ती माहेरी जाते ; आणि जेव्हा ती दुसरी म्हणजे कवीकल्प्नेतली आपण् च आहोत असा साक्षात्कार झाल्यावर खूश होते. म्हणजे चित्रपटात दाखवताना व्यवस्थित कळत होत , पण प्रत्यक्षात मात्र वेग्ळंच Sad

अलवूड होते आणि ह्यांच्या तिन्ही लग्नात इतर बायकांची परवानगीही होती
आणि 1,2 आणि 1,3 एकत्रही राहिल्या

शिवाय , प्रत्येक पुढची पत्नी पूर्वीच्या पत्नीपेक्षा तरुण होती , तरीही एकमेकींत दुस्वास नव्हता

एकुणच भालजी पेंढारकर आणि शांताराम या मावस भावंडांच (संदर्भ : नाच ग घुमा) स्त्रियांबद्दल च मत फारसं काही उदात्त नसावं , आणि त्यांची एकापेक्षा जास्त लग्न हे अगदी खटकतं.>>>

पेंढारकरांचे माहीत नाही, त्यांचे बहुतेक चित्रपट शिवकालीन होते पण शांतारामानी स्त्रीप्रधान चित्रपट बनवले आणि तेही चांगले चित्रपट बनवले. व्यक्तिगत आयुष्यात तीन लग्ने केली पण जबाबदारी टाळली नाही. शेवटी तेही एक कलाकार होते. पहिली पत्नी घरेलू होती, जयश्री सुशिक्षित व बुद्धिमान होती. त्यामुळे तिच्याकडे आकर्षित झाले असतील. त्यांच्या पहिल्या बायकोच्या मुलीने लिहिलेल्या चरित्रातही तिने हेच लिहिलेय की संध्या आयुष्यात आल्यावर जयश्री दूर झाली. तिला मंजूर नव्हते म्हणून घटस्फोट झाला तरी दोघांनीही एकमेकांना शेवटपर्यंत मिस केले. केवळ तीन लग्ने केली म्हणजे स्त्रियांबद्दल मत चांगले नव्हते असे नाही.

जयश्रीचे संध्याबद्दल मत चांगले नव्हते. संध्याची पार्श्वभूमी चांगली नसल्यामुळे ती शांतारामांचा उपयोग समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी करतेय असा तिचा समज होता. गम्मत म्हणजे त्या तिघांचा एकत्रित चित्रपट परछाईची हीच कथा आहे. शांताराम व जयश्री प्रेमात असतात, काही कारणांमुळे शांतारामची दृष्टी जाते. संध्या व जयश्रीच्या आवाजात साम्य असते. त्याचा फायदा घेऊन संध्या जयश्रीला दूर करते व तिची जागा स्वतः घेते. परत बघायला हवा, गाणी व कामे दोन्ही सुंदर आहेत.

अलवूड होते आणि ह्यांच्या तिन्ही लग्नात इतर बायकांची परवानगीही होती
आणि 1,2 आणि 1,3 एकत्रही राहिल्या>>>>>

1,2 एकत्र नव्हत्या. शांताराम 2 सोबत वेगळे राहात होते. संध्याने मात्र पहिल्या पत्नीसोबत सगळेजण एकाच घरात राहुया हा हट्ट धरला व ती शेवटपर्यंत एकत्र कुटुंबात राहिली.

आता आधीच खूप अवांतर झालंय म्हणून 2 आणे माझे पण,
मला खरं तर दोन बायकासोबत एकत्र राहण्याच्या पद्धतीचं खूप विशेष वाटतं, तो एक नवरा दोघींना कसा ऍडजस्ट करत असेल, (हे लिहिताना मला खूप अवघड वाटतंय )विशेषतः रात्री?
आज हिच्यासोबत,उद्या तिच्यासोबत असे नंबर लावत असतील की आठवडा वगैरे वाटून घेत असतील?
नव-याचा दुसरी सोबतचा turn असताना पहिलीला नक्की कसं वाटत असेल???

गम्मत म्हणजे त्या तिघांचा एकत्रित चित्रपट परछाईची हीच कथा आहे. शांताराम व जयश्री प्रेमात असतात, काही कारणांमुळे शांतारामची दृष्टी जाते. संध्या व जयश्रीच्या आवाजात साम्य असते. त्याचा फायदा घेऊन संध्या जयश्रीला दूर करते व तिची जागा स्वतः घेते. परत बघायला हवा, गाणी व कामे दोन्ही सुंदर आहेत.>>>
गाणी अप्रतीम आहेत, जयश्री चांगल्या दिसतात आणि अभिनयही बराच चांगला आहे, नाटकी नाही. शांताराम नायक म्हणून फारसे आवडत नाहीत पण त्यांचं underacting सुसह्य आहे. पण त्याची कमी संध्याने तिच्या overacting ने भरून काढली आहे. सुरवातीला बरी वाटली होती पण मग ते स्प्रिन्गच्या बाहुलीसारखं डोकं आणि मान फिरवणं सुरु झालं आणि असह्य झालं Sad

"याद किया दिल ने कहा हो तुम"

गाण छान आहे पण देव आणि उषा हातात हात घालुन म्हणतायेत!
अर्थात तेव्हा चालायचं

आँ??? नायिका (रेखा) किती छान गाणे गात आहे, आपकी आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आणि नायक (विनोद मेहरा) तिच्या तोंडावर सिगारेट चा धूर सोडतोय? Uhoh अरे काय दिग्दर्शकाची बुद्धी भ्रष्ट झाली होती कि काय? तसेही या एकूण गाण्यातच विनोद मेहराचा प्रेझेन्स दिग्दर्शकाने ज्याप्रकारे दाखवलाय, अजिबात आवडला नाही.

अजून एका गाण्यात नायक (बहुतेक नसिरुद्दीन शहा) नायिकेला (बहुतेक रेखाच) पायाने ढोसलताना दाखवलाय. हाताने कोपरखळी मारावी तसेच पण हा पायांने मारतोय. लिंक सापडली कि देतो. काय च्या काय दाखवत होते नी लोकसुद्धा बघत होते.

किशोरकुमार व लताजी यांनी गायिलेले छेडो ना मेरी जुल्फे सब लोग क्या कहेंगे गाणे आताच थोड्या वेळापूर्वी बघितले. गाणे यापूर्वी अनेकवेळा ऐकले होते अर्थातच. पण माझी कल्पना होती कि चित्रीकरण बागेत किंवा बाहेर कुठेतरी झाले असेल. जिथे आसपास लोक असतात, कळत नकळत पाहतात वगैरे. म्हणून सब लोग क्या कहेंगे. पण नाही. बंद बंगल्यात हे दोघेच, किशोरदा आणि कुमकुम, असतात. आता असे असताना जुल्फे छेडली तर कोण कशाला काय म्हणेल?

बाकी, हा भाग सोडला तर मात्र गाणे खूप मस्त चित्रण. किशोरदा आणि कुमकुम दोघेही खूप खूप ग्वाड ग्वाड Blush Blush

रेखाला सिगरेट आवडत असेल, त्यामुळे त्या वेळच्या 'सांकेतिक' प्रणयानुसार ते धूम्रचुंबन असावे (आपकी आंखो में कुछ)

आँ??? नायिका (रेखा) किती छान गाणे गात आहे, आपकी आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आणि नायक (विनोद मेहरा) तिच्या तोंडावर सिगारेट चा धूर सोडतोय? Uhoh अरे काय दिग्दर्शकाची बुद्धी भ्रष्ट झाली होती कि काय? तसेही या एकूण गाण्यातच विनोद मेहराचा प्रेझेन्स दिग्दर्शकाने ज्याप्रकारे दाखवलाय, अजिबात आवडला नाही. >>>
अगदी अगदी. गाणं किती छान आहे. महके हुए राज म्हणजे त्या सिगारेटच्या धुराची महक आहे का? Sad

किशोरकुमार व लताजी यांनी गायिलेले छेडो ना मेरी जुल्फे सब लोग क्या कहेंगे गाणे आताच थोड्या वेळापूर्वी बघितले. गाणे यापूर्वी अनेकवेळा ऐकले होते अर्थातच. पण माझी कल्पना होती कि चित्रीकरण बागेत किंवा बाहेर कुठेतरी झाले असेल. जिथे आसपास लोक असतात, कळत नकळत पाहतात वगैरे. म्हणून सब लोग क्या कहेंगे. पण नाही. बंद बंगल्यात हे दोघेच, किशोरदा आणि कुमकुम, असतात. आता असे असताना जुल्फे छेडली तर कोण कशाला काय म्हणेल>>> +१११

यासारखंच देव आनंद -नूतनचं 'छोड दो आन्चल, जमाना क्या कहेगा', सुदैवाने त्याचे चित्रीकरण बाहेर बगिच्यात आहे पण आजूबाजूला चिटपाखरूही नाही मग कोण काय म्हणायला येईल. नूतन प्रचंड आवडते पण या गाण्यातील तिची केशभूषा, कुरळे केस अजिबात नाही आवडले, चित्रपटात ती गरीब घरातील दाखवली आहे त्यामुळे ही स्टायलिश केशभूषा नाही तेवढी शोभत.

गुलजार आणि आखोंकी महक याचं काहीतरी नातं असावं.
डोळ्यात याला महके हुए से राज दिसतात, महकती खुशबू दिसते ..डोळे आणि सुवास हे समीकरण biologically अनाकलनीय असलं तरी Happy

घर मध्ये रेखाला सिगरेट च्या धुराचा वास आवडत असतो असे ती विनोद मेहराला सांगते असा एक सीन आहे. त्याच्या संदर्भाने असे चित्रिकरण करण्यात आले असेल गाण्याचे.

>> गुलजार आणि आखोंकी महक

वाह! काय जबरी निरीक्षण आहे Happy खरंच कि, अशी शब्दरचना आली आहे त्यांच्या काही गीतांत. वेगळं जग असतंय त्यांच्या गीतात. जे न देखे रवी ते देखे कवी.

>> रेखाला सिगरेट च्या धुराचा वास आवडत असतो

य्यो! हा ॲंन्गल असू शकतो कल्पना केली नव्हती. पण हो, घडते असे. आपण अल्बम बघितल्यासारखे फक्त गाणे बघतो. सिनेमातले संदर्भ माहित नसल्यास विचित्र वाटते काही वेळा.

Pages