चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट मला फारसा आठवत नाहीये, पण लेखक दिग्दर्शक काहीतरी वेगळे दाखवायच्या प्रतत्नात होते, पण त्यांना ते नीटसे जमले नाही असे मला आता चित्रपटाबद्दल विचार करताना वाटते. एक हरवलेली हिंदु मुलगी एका मुल नसलेल्या मुस्लिम दांपत्याला मिळते आणि ते तिची हिंदु ओळख लपवुन तिला स्वतःची मुस्लिम म्हणुन वाढवतात, तर त्याच वेळी एका हिंदु घरात एका मुस्लिम मुलाला मात्र मुस्लिम म्हणुनच वाढवले जाते. मग त्या मुस्लिम मुलीची ह्या हिंदु घरातील हिंदु मुलाशी झोपेत ओळख होते, प्रेम होते. पण लग्न मात्र ह्या हिंदु घरातील मुस्लिम मुलाशी ठरते.

धन्यवाद साधना, आर्या अधिक माहितीबद्दल.

यातच रफीचे 'कही एक मासुम नाजुक सी लडकी, बहुत खुबसुरत मगर सांवलीसी' हेही आहे. हे सुद्धा ऐका. अतिशय सुंदर आहे..>>>>> मला तर फक्त हि दोनच गाणी माहित होती Sad
आजच शोधतो आणि ऐकतो Happy

योगेश असं बर्‍याचदा होतं की गाणं आपल्या अतिशय आवडीचं असतं म्हणून आपल्याला वाटतं की व्हिडीओ पण बघावा. पण निराशा पदरी पडते. म्हणून मी माझ्यापुरता ह्यावर तोडगा शोधलाय तो म्हणजे आवडत्या ऐकलेल्या गाण्यांचे व्हिडिओ बघायचेच नाहीत. मग गाणीपण मनातून उतरतात. उदाहरण द्यायचं झालं तर 'ऑंखो में हमने आपके सपने सजाए है, बस आप आप आप ही मुझमें समाए है', किंवा 'होंठो से छू लो तुम'.

मुस्लिम मुलीची ह्या हिंदु घरातील हिंदु मुलाशी झोपेत ओळख होते, प्रेम होते. पण लग्न मात्र ह्या हिंदु घरातील मुस्लिम मुलाशी ठरते.>>>>अच्छा म्हणुन चित्रपटाचे नाव शंकर हुसेन. Happy

'ऑंखो में हमने आपके सपने सजाए है, बस आप आप आप ही मुझमें समाए है'>>>>मेघना हे गाणे खरच नितांतसुंदर आहे (ऐकायला:)). ह्या चित्रपटातील सगळीच गाणी सुंदर आहेत. "बरसे पुहार ....कांच कि बूंदे बरसे जैसे..." हे माया अलग वर चित्रित झालेले अजुन एक मस्त गाणे चित्रपटात नाहि आहे Sad

साधना,योगेश,
कमाल अमरोहीच्या आत्मचरित्रामध्ये (ईश्काचा जहरी प्याला या पुस्तकात) 'शंकर हुसेन' हा सिनेमा तयार होत असताना आलेल्या अडचणींचा उल्लेख आहे.

शंकर हुसेन काय किंवा पाकिजा काय,कमाल अमरोहीचा नेहमीच असा कटाक्ष असे की त्याच्या सिनेमातली गाणी ही ईतरांच्या सिनेमातल्या गाण्यांपेक्षा हटके असावीत. त्यात तडजोड करणे त्याला मंजुर नसे.

पाकिजा रखडला तरी त्यातली बहुतेक गाणी संगीतकार गुलाम मोहमंदनेच केली होती. पाकिजा रिलीज व्हायच्या आधीच गुलाम मोहमंदचं निधन झालं होतं. त्यातल्या सगळ्या गाण्याचं श्रेय कमाल अमरोहीने त्यालाच दिलं होतं, नौशादने फक्त पाकिजाला पार्श्वसंगीत दिलं.

कमाल अमरोहीच्या आत्मचरित्रामध्ये (ईश्काचा जहरी प्याला या पुस्तकात) 'शंकर हुसेन' हा सिनेमा तयार होत असताना आलेल्या अडचणींचा उल्लेख आहे.

मला काहीच माहिती नाहीये या चित्रपटाविषयी.... गाणी मात्र आहेत अगदी हटके. (ऑनलाईन मिळतो बघायला का पाहते आता..)

पण जर ती झोपेत आहे तर इत्के सुन्दर गाणे कसे म्हणते

काय हे मामी?? असले काहीतरी डोक्यात येतेच कुठून?? Happy

चित्रपटात रस्त्यावरची भिकारीणही लताच्या आवाजात गात असते. मला नेहमी वाटायचे, ही सरळ एचेमव्हीच्या हाफिसात का जात नाही?? लगेच गाणी मिळतील... खुद्द लताचाच आवाज आहे म्हटल्यावर एचेमव्ही नाही म्हणणे शक्यच नाही.

याच शंकर हुसेन मधे, अपने आप रातोंको काँरवे निकलते है, असे लताचेच गाणे आहे. सिनेमातल्या नायिकेच्या सवयीशी (झोपेत चालण्याच्या ) निगडीत आहे ते. त्या सिनेमातले धूसर वातावरण, कठडा नसलेला पूल, नदीतून जाणारी एक स्टीमर असे छान वातावरण आहे.
या सिनेमाच्या विचित्र नावाचा, पण खुलासा आहे सिनेमात.

'कही एक मासुम नाजुक सी लडकी, बहुत खुबसुरत मगर सांवलीसी'>>>> हे (ऐकायला) फार सुरेख आहे गाणं. माझ्या गाडीत नेहेमी लावलेलं असतं.

पण जर ती झोपेत आहे तर इत्के सुन्दर गाणे कसे म्हणते>>>
काय हे मामी?? असले काहीतरी डोक्यात येतेच कुठून??>>>>
इतके सुंदर गाणे त्या झोपाळु नायिकेला का दिले असे तर म्हणायचे नाही ना मामी Happy

बादवे काहि चित्रपटांच्या VCD ("उजाला", "स्वामी" "नई इमारत", आणि मराठीत "नाव मोठं लक्षण खोटं", "संसार" इ.) शोधत आहे त्यात आता हा एक चित्रपट अ‍ॅड Happy
ऑनलाईन उपलब्ध आहेत का हे चित्रपट?

शंकर हुसेन पाहण्याच्या फन्दात पडू नये. कमाल अमरोहीचा तो एक पडलेला आणि रटाळ पिक्चर आहे. खय्याम म्हटल्यानन्तर गाण्याच्या दर्जाच्व्हा प्रश्नच येत नाही. कमाल अमरोहीचे पिक्चर तसेही कधी धो धो चालले नाहीत . त्याचे म्हणजे निवान्त कलाकुसर करीत काम चालायचे. तब्येतीत.... त्यामुळे खूप विस्कळीत पणा .त्याची वेगळीच पठडी होती कृत्रिमतेकडे झुकणारी....

खय्याम म्हटल्यानन्तर गाण्याच्या दर्जाच्व्हा प्रश्नच येत नाही>>>> हे मात्र १००% खरंय.

शंकर हुसेन पाहण्याच्या फन्दात पडू नये.

माझ्या मते एकदा पाहावा. हे झोपेत चालण्याचे नक्की काय प्रकरण आहे ते मला जाणुन घ्यायचेय.. त्याचा शेवटही मला नीटसा आठवत नाही. नायक नायिकेचे शेवटी लग्न होते, मग मुलाचे नाव शंकर हुसेन ठेवले जाते, पण ह्या सगळ्या भानगडीत त्या लहान मुस्लिम भावाचाही काहितरी रोल आहे (कंवलजीत आहे त्या रोलमध्ये).. मला आता बघितल्याशिवाय चैन पडणार नाही. सीडी मिळणे अशक्यच. ऑनलाईन बघते.

योगेश onlinemovies अशी काहितरी एक साईट आहे. मी पाठवते लिंक तुम्हाला. तिथे शोधा आणी सापडले तर मलाही पाठवा लिंक. (माझ्या घरचे नेट सध्या डाऊन आहे, आणि ऑफिसात movie/lyric इ.इ. शब्द असलेल्या साईट्स ओपन होत नाहीत. Sad )

तू बघून इथे रिव्यू टाक. म्हण्जे आमची झोप उडेल ग. Happy कधीकधी चांगली स्टोरी execution मध्ये गड्बड्ते तसे झाले असेल.

आप तो ऐसे न थे या चित्रपटात तू इस तरह सें मेरी झिंदगीमें शामिल है हे गाणे नेमके किती गायकांनी किती वेळा गायले आहे? प्रतिरफी असलेला अन्वर (हमसे का भूल हुई - जनता हवालदार फेम) आणि ओरिजिनल रफी दोघांनी स्वतंत्ररीत्या गायलेले गाणे मी विविधभारतीवर ऐकल्याचे स्मरते.

तसेच दोन गाणी मी नेहमीच विविधभारतीवर ऐकायचो तेव्हा डोळ्यासमोर अशी कल्पना करायचो ही दोन्ही गाणी पियानो साँग्ज असतील म्हणजे पार्टीत भल्या मोठ्या पियानोसमोर बसून त्याचा कीबोर्ड बडवित नायक / नायिका गात असतील आणि इतर पार्टी अ‍ॅनिमल्स माफक नाच करीत असतील. प्रत्यक्षात या गीतांमध्ये न पियानो दिसला न पार्टी न पात्रांची गर्दी. केवळ एक / दोन पात्रे दिसलीत. चित्रीकरण पाहून घोर निराशा झाली.

जब भी यह दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है? - सीमा (१९७१)

आशिकी में हर आशिक होता है मजबूर, इसमें दिलका, इसमें दिलका, इसमें दिल का क्या कसूर?

लहान असताना दूरदर्शनवर बरेच वेळा लागणारे गाणे

चित्रपट : सावन भादों

आए हाय, कान में झुमका, चाल में ठुमका, कमर पे चोटी लटके
हो गया दिल का, पुरजा-पुरजा, लगे पचासी झटके, हो तेरा
रँग है नशीला, अंग-अंग है नशीलामलहसावन भादों
आए हाय, कान में झुमका, चाल में ठुमका, कमर पे चोटी लटके
हो गया दिल का, पुरजा-पुरजा, लगे पचासी झटके, हो तेरा
रँग है नशीला, अंग-अंग है नशीला

या गाण्यावर नवीन निश्चल असा काही नाचला आहे की वाटावे याने भान्ग घेतल्यावर विन्चु चावला आहे

नवीन निश्चल नाचला? Lol आयुष्यातल्या हालचालींचा कोटा तेव्हाच पूर्ण केला असेल मग.

या गाण्यावर नवीन निश्चल असा काही नाचला आहे की वाटावे याने भान्ग घेतल्यावर विन्चु चावला आहे

Happy Happy

त्या चित्रपटातलं दुसरं गाणं ' सुन सुन सुन ओ गुलाबी कली, तेरी मेरी प्रीत अब आगे चली', नवीन निश्चल आणि रेखा यांनी नाचून वाट लावली आहे. पण दोन्ही गाणी ऐकायला सही आहेत एकदम !!

चित्रपट : गुलामी
गीतकार : गुलज़ार
संगीतकार : लक्ष्मीकांत -प्यारेलाल
गायक : लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार

जिहाल-ए -मिस्कीन मकुन बरंजिश , बेहाल-ए -हिजरा बेचारा दिल है
सुनाई देती है जिसकी धड़कन , तुम्हारा दिल या हमारा दिल है

मिथुन चक्रबोर्ती आणि अनीता राज़, बसच्या छतावर चित्रित झालेले गाणे
मधेच मिथुन " कोई शक़ " म्हणताना बघवत नाही
बाकी गाणे अप्रतिम आहे

चित्रपट : चलते चलते (१९७६)
संगीतकार : बप्पी लाहिरी
गायक : किशोर कुमार

चलते चलते, मेरे ये गीत याद रखना
कभी अलविदा ना कहना

सीमी गरेवाल आणि विशाल आनंद वर चित्रित झालेले गाणे ऎकायला चांगले आहे पण बघितल्यावर रसभंग होतो

चित्रपटातलीच गाणी का अल्बममधली पण चालतील?

ऋतू हिरवा या आशाबाईंच्या अल्बममधील गाण्यांचं भयानक चित्रीकरण आणि डोळे पांढरे करणारा अभिनय पाहून त्या काम करणार्‍यांना तोफेच्या तोंडी द्यावं किंवा पोकळ बांबूचे फटके द्यावेत असं वाटतं!

'सिमटी हुई ये कलियाँ'

धोत्रातला राजकुमार आणि स्वतःभोवती घेतलेली गिरकी ते मौसमीचे पाय पकडणं.... Proud

राजकुमारने फक्त 'जानी' संवाद म्हणावेत. त्याला इतकं तरल गाणं का दिलं तो तो दिग्दर्शक जाणे.

Pages