Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या टॅलंटचं भरघोस पीक
सध्या टॅलंटचं भरघोस पीक आल्याने तीव्र झालेली स्पर्धा ! >> भाऊ याच कारण काय?. तर क्रिकेट मधे पैसा आला म्हणून खेळाडू जास्त प्रोफेशनल झाले. फिट्नेस कडे लक्ष देऊ लागले.
"क्रिकेट मधे पैसा आला म्हणून
"क्रिकेट मधे पैसा आला म्हणून खेळाडू जास्त प्रोफेशनल झाले. फिट्नेस कडे लक्ष देऊ लागले." - ह्याच्या बरोबरीनं, अनेक संधी उपलब्ध झाल्या (ए टूर्स, एज ग्रूप क्रिकेट ला मिळणारी प्रसिद्धी, आयपीएल) ज्यातून ह्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याचं एक्स्पोजर मिळालं - असं मला वाटतं. टॅलेंट / गुणवत्ता होतीच, पण आता त्या गुणवत्तेला वाव मिळाला.
फिट्नेस कडे लक्ष देऊ लागले >>
फिट्नेस कडे लक्ष देऊ लागले >> मला ह्याचा वाटा अधिक वाटतो. ऑव्हरऑल फीटनेस लेव्हल वाढल्यामूळे मूळच्या उपजत गुणवत्तेला भरघोस धुमारे फुटलेत.
ह्या टीम मधे फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर हि एकमेव जागा सध्या मोकळी आहे. आयपील मधे लक्ष ठेवा ह्यावर. अन्यथा पांड्या फीट झाला कि सरळ सरळ वॉक इन असेल. दुबे ने निराशा केली साफच
"अन्यथा पांड्या फीट झाला कि
"अन्यथा पांड्या फीट झाला कि सरळ सरळ वॉक इन असेल. दुबे ने निराशा केली साफच " -+१११
सद्ध्या तरी पांड्या ला काही काँपिटीशन दिसत नाहीये. डोमेस्टीक मधे सुद्धा चांगला ऑल-राऊंडर जलज सक्सेना -म्हणजे स्पिनर ऑलराऊंडरच आहे.
पांड्या , दुबे, शंकरं,
पांड्या , दुबे, शंकरं, सांगवान -- man take your pick.
"पांड्या , दुबे, शंकरं,
"पांड्या , दुबे, शंकरं, सांगवान -- man take your pick." - proves my point - सद्ध्या तरी पांड्या ला काही काँपिटीशन दिसत नाहीये.

(No subject)
ह्याच्या बरोबरीनं, अनेक संधी
ह्याच्या बरोबरीनं, अनेक संधी उपलब्ध झाल्या (ए टूर्स, एज ग्रूप क्रिकेट ला मिळणारी प्रसिद्धी, आयपीएल) ज्यातून ह्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याचं एक्स्पोजर मिळालं - >> हे पण आहेच. खर म्हणजे बीसीसीआयची ब्लू प्रिन्ट इतर खेळाम्साठी वापरली तर भारत इतर खेळात पण यशस्वी ठरेल याची मला खात्री आहे. मी जी टूर्नामेंट शाळेत असताना खेळायचो , तीच माझा मुलगाही खेळला आणि नातवंडेही खेळतील.
त्यामुळे नुसती प्रसिद्धी नाही तर ओर्गनायझेशनही खूप महत्वाचे.
बोकलत
बोकलत
अंडर 19 - पाकिस्तान 170 ऑल
अंडर 19 - पाकिस्तान 170 ऑल आउट !
अंडर 19 - भारताचा दणदणीत विजय
अंडर 19 - भारताचा दणदणीत विजय!! कार्तिक त्यागी ची बॉलिंग पाहून घ्या. स्पीड, सीम पोझिशन, स्विंग सगळच मस्त आहे. खूप प्रॉमिसिंग वाटतोय. यशस्वी जैस्वाल ने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. पृथ्वी शॉ चा डोपिंग बॅन चा हा एक वेगळाच फायदा झाला भारतीय क्रिकेट ला.
यशस्वी जैस्वाल नि त्यागी
यशस्वी जैस्वाल नि त्यागी दोघेही सात्यत्याने खेळले आहेत खरे. जैस्वाल ने इनिंग्स पण मस्त पेस्ड केल्या आहेत. यंदाची आय पील एकदम मह्त्वाची ठरेल त्याच्यासाठी.
वन डे मधे ओपनर म्हणून एकदम अग्रवाल फास्ट ट्रॅक झाला शॉ बरोबर. अग्रवाल पेक्षा गिलला संधी मिळायला हवी होती असे वाटतेय. राहुल बिचारा किपिंग करणार नि मग पाचव्या क्रमांकावर खेळणार. थकून जाईल आय पील संपायच्या आतच.
"राहुल बिचारा किपिंग करणार नि
"राहुल बिचारा किपिंग करणार नि मग पाचव्या क्रमांकावर खेळणार. थकून जाईल आय पील संपायच्या आतच." - ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये म्हणतात, त्याची आठवण होतेय मला. राहूल ने विकेटकिपींग करण्याचा प्रयोग टी-२० मधे यशस्वी ठरला, पण तो काही दीर्घ मुदतीचा पर्याय नसावा. राहूल टॉप ऑर्डर बॅट्समन आहे. विकेटकिपींग मधे पंत नसेल, तर सॅमसन, इशान किशन सारखे पर्याय आहेत.
एखाद दुसरी चुकार सिरीज ठीक
एखाद दुसरी चुकार सिरीज ठीक आहे. सध्या पांड्या नसल्यामूळे (नि दुबे फारसा प्रभावी न ठरल्यामूळे) बाहेर ऑल राऊंडर हा रोल भरण्यासाठी राहुल ला किपर कम बॅट्समन बनवलय (अशी आशा धरूया). एक मोकळी जागा होते तिथे एक स्पिनर किंवा पांडे घुसवता येतोय. राहुल मात्र पर्पल फॉर्म मधे आहे हे नक्कीच. मिडल ऑर्डरमधल्या त्याच्या इनिंग्स पण जबरदस्त होत्या.
कसोटी मालिकेत घरच्या
कसोटी मालिकेत घरच्या मैदानांवर इंग्लंडकडून १-३ असा दारूण पराभव स्वीकारलेल्या आफ्रिकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. फाफडू ऐवजी आता डी कॉक कर्णधार आहे. केपटाऊनमध्ये डी कॉकने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व इंग्लंडला ५० षटकांत २५८/८ वर रोखल्याने चांगलाच यशस्वी ठरला. पाठलाग करताना आफ्रिकेने ३६ षटकांत २०२/२ धावा करून विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. डी कॉक ११३ चेंडूत १०७ धावा करून बाद झाला.
राजदीप सरदेसाईनी डेमोक्रसी'ज
राजदीप सरदेसाईनी डेमोक्रसी'ज एलेव्हन नावाचे पुस्तक २/३ वर्षांपुर्वी लिहिले होते. त्यात भारतीय क्रिकेटचा प्रवास राजा-महाराजांपासून सुरु होऊन पुढे उच्च/मध्यमवर्गीय पार्श्वभुमीच्या काही मर्यादित शहरी केंद्रांमधल्या खेळाडूंपुरता सिमीत (मुंबई,दिल्ली,बंगलोर) राहून आता छोट्या शहर/गावातून येणार्या गरीब/अतिगरीब खेळाडूंपर्यंत कसा पोचला आहे या सिद्धांताभोवती मांडला.
भारताचा या वर्षीचा १९वयोगटातला संघ या सिद्धांताचे मुर्तिमंत उदाहरण आहे. क्रिकइन्फो व इंडियन एक्स्प्रेसमध्ये या संघातील खेळाडूंच्या प्रवासावरचे जे लेख येत आहेत ते वाचून अचंबित व्हायला होत आहे.
अथर्व अंकोलेकर मुंबईतील निम्न मध्यमवर्गीय बेस्ट कर्मचार्याचा मुलगा, शाळेत असतानाच वडलांचे छत्र हरपले. शिकवण्या घेऊन कसे बसे आईने कोचिंगचा खर्च पेललेला. (https://www.espncricinfo.com/story?id=28478938&_slug_=how-atharva-ankole...)
रवी बिश्नोई राजस्थानातील जोधपूर इथला, एका मुख्याध्यापकाचा मुलगा. फार वशिला नाही, सातत्याने शाळा/एज ग्रुप क्रिकेटमध्ये डावलणे हे पचवलेला. आपल्या कोचबरोबर स्वतः घाम गाळून पिच बनवून मग खेळायला सुरुवात केलेला. (https://indianexpress.com/article/sports/cricket/ravi-bishnoi-u-19-crick...)
यशस्वी जैसवाल उत्तर प्रदेशातून वडिलांबरोबर मुंबईत आलेला, आधी काकाच्या घरात आणि मग आझाद मैदानावर ग्राउंड्समनच्या तंबूत मुक्काम. कोचिंगनंतर गाड्यावर पाणीपुरी विकणारा. (https://www.espncricinfo.com/story/_/id/27860416/selling-pani-puris-smas...)
याहू ... १० विकेट्सने जिंकलो
याहू ... १० विकेट्सने जिंकलो !! कमाल !! आता फायनलही जिंकली पाहिजे अशीच आरामात.
टवणे सर, तुम्ही म्हणता ते लेख छान आहेत. त्या संघातीलच वीर म्हणुन गोलंदाजही पुण्याजवळील वीर गावचा आहे.
राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक एकदा वाचायला म्हणुन ठीक आहे. पण मला फार आवडलं नाही. कदाचित पुस्तक वाचायच्या आधी प्रसिद्धीकार्यक्रमातील त्याची बडबड ऐकुन वाचताना कलुषित मनाने वाचले गेले असावे.
आज मॅच जातीय. न्यूझिलंडनी
आज मॅच जातीय. न्यूझिलंडनी त्यांच्या सध्याच्या पद्धतीनुसार आपल्याला बहाल केली तरच जिंकू अस दिसतय.
किवी सहज जिंकतील असे चित्र
किवी सहज जिंकतील असे चित्र आहे!
फिरकी पुर्ण निष्प्रभ!
सँटनर ने चांगली बोलिंग केली आपल्या जडेजा कुलदीप पेक्षा...
इंदू vs बानू पाहत नाही का
इंदू vs बानू पाहत नाही का कोणी?
बॉलिंगमध्ये वाईड टाकले नसते
बॉलिंगमध्ये वाईड टाकले नसते तर जिंकलेही असते
यशस्वी जैस्वाल, रवि
यशस्वी जैस्वाल, रवि बिश्नोईच्या कथा टाइम्समध्ये वाचल्या होत्या. खूप इन्स्पायरिंग वाटतात मला अशा स्टोरीज. या मुलांचं कौतुक वाटतं.
(त्याचवेळी हे देखील मनात येतं की थोडक्यात संधी हुकलेले यांच्याच तोडीचे आणखी कितीतरी असतील.)
बाकी, काल आणि सेमिफायनलला उन्मुक्त चंद स्टुडिओत एक्सपर्ट म्हणून आला होता. २०१२ साली अन्डर-१९ फायनलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरी केली होती; पण लहान वयात मोठं यश पेलता आलं नाही त्याला; पुढे कुठेच फारसा दिसला नाही. राहुल द्रविडच्या एका मुलाखतीत त्याने याचं उदाहरण दिलं होतं.
दिवसीय मालिकेत बुमराहसह
दिवसीय मालिकेत बुमराहसह संपूर्ण गोलंदाजी पुर्ण निष्प्रभ!
३-० ची सफेदी!
आपण काहिही म्हणत असलो तरी
आपण काहिही म्हणत असलो तरी वर्ल्ड कप मधील पराभव फ्लूक नव्हता हे न्युझिलंडने दाखवून दिले. पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत मधली फळी स्थिरावू देण्याची व्यवस्था शास्त्री आणि कंपनी करेल अशी आशा.
क्लीन स्वीप थोडासा
क्लीन स्वीप थोडासा आश्चर्यकारक होता हे खरे असले तरी रोहित ची अनुपस्थिती हे एक मुख्य कारण असावे असे मला वाटते. पूर्ण सिरीज मधे पहिल्या तिघांनी फारसे काही केले नाही. बुमराह पण थोडा बॅड पॅच मधून जातोय असे वाटले.
अजूनही वेळ गेलेली नाही.
अजूनही वेळ गेलेली नाही. रोहितला कॅप्टन बनवला तर वर्ल्डकप आपलाच.
इंग्लंड विरूद्ध ट-२० सामन्यात
इंग्लंड विरूद्ध ट-२० सामन्यात आज डेल स्टेन खेळतोय. आफ्रिका २० षटकांत १७७/८.
पूनम यादव ! शेवटी भारताला
पूनम यादव ! शेवटी भारताला आपला हक्काचा शेन वाॅरन महिलांच्या संघात गवसला !! लेगस्पिनची सारी जादूई नजाकत अनुभवली तिची गोलंदाजी बघून !! अभिनंदन, शुभेच्छा ....व धन्यवाद !
पहिली टेस्ट ही टिपिकल पहिल्या
पहिली टेस्ट ही टिपिकल पहिल्या टेस्ट सारखी चालू आहे. पहिल्या इनिंग्ज मधे कोलॅप्स, मग विरुद्ध टीमची जबरी बॅटिंग, आणि दुसर्या इनिंग्ज मधे पहिले पाढे पंचावन्न...
एक ऑब्जर्वेशनः
पाचही टी२० सामन्यांमधे आपण ५ रेग्युलर आणि १ पार्ट टाईम बोलर वापरला अन पाचही सामने जिंकलो.
पूर्ण वनडे सिरीज आपण ५ रेग्युलर बोलर्सच्याच जिवावर खेळलो. पहिल्या वनडे मधे ३१-४० ओवर्समधे सगळे बोलर्स मार खात असतानाही सहाव्या बोलरचा (केदार टीममधे होता) पर्याय वापरावासा विराटला वाटला नाही. पुढे सिरीजमधे कधीही डोईजड पार्टनरशिप तोडायला सहावा पार्ट टाईम बोलर वापरावा असं काही प्लॅनमधे असल्यासारखं दिसलं नाही.
पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंग्जमधेही हीच चूक परत झाली. चारच रेग्युलर बोलर्सनी ढोरमेहेनत केली. विहारीला काही बोलिंगचा चान्स मिळाला नाही. अन आपल्या शेवटच्या ५ विकेट्सनी केलेल्या (३३) रन्सपेक्षा जास्त रन्स कीविजच्या दहाव्या जोडीनी केल्या (३८).
फक्त रेग्युलर बॅट्समननीच रन्स करायच्या अन फक्त रेग्युलर बोलर्सनीच बोलिंग करायची असा रिजिड अप्रोच घेऊन खेळलं तर अवघड आहे.
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/sports/cricket/praveen-kumar-former-me...
Pages