क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाउ, दोन्ही चित्र भारी. सैनी आणि शमी डेथ ओव्हर्स साठी योग्य आहेत. दीपक चहर कुठे गेला. जखमी आहे काय?. त्याला का नाही घेतला न्युझिलंडच्या दौर्‍यासाठी.

आपण मधली फळी कुमकुवत आहे असे म्हणतो पण मनोज तिवारी, मनिष पांडे, करूण नय्यर यांच्या कडे दुर्लक्ष केले हे अगम्य आहे. आता मयांकला बसवला पृथ्वी साठी . काय लॉजिक? शुभनम गीलला सुद्धा नीट हाताळले जात नाहीये. परदेशी दौर्‍यात ६मधल्या फळीतील फलंदाज घेउन जाण योग्य होइल आहे असा आपला परफॉर्मन्स असतो.

दीपक चहर कुठे गेला. जखमी आहे काय?. >> तो नि भुई दोघेहि जखमी आहेत.

आता मयांकला बसवला पृथ्वी साठी . काय लॉजिक? >> मयांक सध्या टेस्ट मधे एव्हढा सुंदर खेळतोय की मला त्याला लिमिटेड सामन्यांमधे न खेळवल्याबद्दल बरे वाटतेय. शॉ दणाकून खेळतोय नि तेही NZ मधे NZ-A विरुद्ध ही गोष्ट त्याच्या बाजूने गेली असावी.

तिवारी पांडे नायर बोअर प्लेअर आहेत.
शुभमन गिल एक टॅलेंट आहे. तो येईल स्थिरावेल खेळेल तर छान होईल. त्याचा संजू सॅमसन बनून राहू नये हीच ईच्छा.

वर्ल्डकप २०-२० अकराचा संघ साधारण असा असेल.

शर्मा
राहुल
कोहली
अय्यर
पंत / धवन (मग राहुल कीपर)
पांड्या / दुबे
जडेजा
चहल / कुलदीप
बुमराह
आणि खालीलपैकी आणखी २ वेगवान
भुवी, शमी, दिपक चहर, सैनी

*संघवर्ल्डकप २०-२० अकराचा संघ साधारण असा असेल. * -
संघ निवडताना ऑस्ट्रेलियातलं ऑक्टो. - नोव्हें. मधलं हवामान ,खेळपट्टयांचं सर्वसाधारण स्वरूप व ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव इ. इ.ही लक्षात घ्यावं लागेल. वेगवान गोलंदाजीवर थोडा अधिक भर द्यावा लागेल, असं वाटतं.

भाऊ चहल किंवा राहुल चहर ला घेऊन गावस्कर ने जे शिवा ला घेऊन केले होते बेन्सन अँड हेजेस मधे तसे करायचा प्रयत्न होईल का ?

वेगवान गोलंदाजीवर थोडा अधिक भर द्यावा लागेल,
>>>
बुमराहला पकडून तीन वेगवान आहेत की अकरात. चौथा पांड्या. तो सुद्धा फिट असेल तर चांगला पेस जनरेट करतो. मागच्या आयपीएलला शॉर्ट बॉल हे त्याचे हत्यार झालेले.
आता यापेक्षा जास्त वेगवान खेळवले तर तो भारतीय फिरकी गोलंदाजीचा अपमान होईल Happy

*बुमराहला पकडून तीन वेगवान आहेत की अकरात. चौथा पांड्या. *- मान्य.
असामीजी, मला नेमकी आठवत नाही गावसकरची व्यूहरचना. पण आतां आपल्याकडे चाःगले वेगवान गोलंदाज आहेत व आतां फिरकी खेळण्यात इतर देशातील खेळाडू अधिक वाकबगार झालेत, हा फरकही लक्षात घेणं योग्य.

गावस्कर ने जे शिवा ला घेऊन केले होते बेन्सन अँड हेजेस मधे >> शिवा आणि शास्त्री. Happy
कुलदीप आणि चहल दोघेही विकेट टेकर आहेत. जडेजाला बसवल तरी हरकत नाही.
बोलर- बॅटस्मन पाहिजे असल्यास ठाकुर पण एक चांगला ऑप्शन आहे.

तिवारी पांडे नायर बोअर प्लेअर आहेत> सेमी फायनलला मनिष पांडे/अजिंक्य रहाणे असता तर चित्र जरा वेगळे दिसले असते.

फिरकी खेळण्यात इतर देशातील खेळाडू अधिक वाकबगार झालेत, हा फरकही लक्षात घेणं योग्य.>> बरोबर आहे भाउ. हा आयपीएलचा परिणाम. आणि उलट आपण विसरलोय. रोहित विराट झंपाला चाचपडत खेळत होते. अगदी ढुंढो ढुंढोरे साजना चालल होत कधी कधी. अगर पण अवघड.
आपली मंडळी स्पिन पेक्षा आता फास्ट बॉलिंग चांगली खेळतात. (भारतात. Happy )

फक्त ईतर देशातील लोक फिरकी चांगले खेळतात हे कारण नसावे... आपले फिरकी गोलंदाजपण पुर्वी पेक्षा कमी दर्जेदार झाले असावेत का?
फलंदाजांपैकीतर मला वाटते पुजारा सोडुन बाकी सर्व दर्जेदार फिरकीसमोर चाचपडतातच. धडाधड मारुन सुटका करुन घ्यायचा प्रयत्न करतात.
पुजारा एकटाच शांतपणे २ सेशन खेळुन काढु शकेल असे वाटते.

भारतीय फलंदाज फिरकीपुढे चाचपडताना पाहून अत्यंत दु:ख होतं. शर्मा, कोहली, रहाणे सारख्या कसलेल्या फलंदाजांना लेग स्पिन समोर चाचपडताना पाहिलं की फार वाईट वाटतं. हा टी-२० चा अतिरेक म्हणायचा की डोमेस्टीक क्रिकेट मधे दर्जेदार स्पिनर्स चा अभाव ते माहीत नाही. ९० च्या दशकात शेन वॉर्न भारतात आला होता तेव्हा पहिल्या प्रॅक्टीस मॅच मधे मुंबईच्या अमित पागनीस ने त्याची पिसं काढली होती. झंपा, रशिद खान हे चांगले बॉलर्स आहेत ह्यात शंका नाही पण भारतीय बॅट्समेन गूगली हातातून ओळखत नाहीत वगैरे पहाताना त्रास होतो. असो.. हे सुद्धा बदलेल. ह्या बॅटींग लाईन-अप चा हेवा करावा असा दर्जा आहे.

बॉलिंग मधे भूवी अजून यायचाय. मला वाटतं तो पण टी-२० वर्ल्डकप च्या स्क्वाड मधे असेल (फिट असेल तर).

"U19 वर्ल्ड कप लाइव्ह टेलीकास्ट आहे का टीव्ही वर?" - भारतात स्टार स्पोर्ट्स, इंग्लंड मधे स्काय टीव्ही आणी अमेरिकेत विलो टीव्ही वर आहे.

* डोमेस्टीक क्रिकेट मधे दर्जेदार स्पिनर्स चा अभाव ते माहीत नाही. * - धोनीचा फिरकीपेक्षा फास्ट वर भरवंसा होता, असं मला जाणवायचं ( चूकीचंही असेल माझं हें जाणवणं ) . अशा गोष्टींचाही नकळत फिरकी गेलंदाजीच्या दर्जावर परिणाम होत असावा .

सेमी फायनलला मनिष पांडे/अजिंक्य रहाणे असता तर चित्र जरा वेगळे दिसले असते.
>>>>>
हे जर तर नंतर बोलायला सोपे वाटते. म्हटले तर पुजारा असता तेव्हा तर असेही म्हणू शकतो. पण म्हणून पुजाराची एकदिवसीय संघात जागा बनत नाही. आणि तेव्हाही हे खेळतीलच हे जर तरच आहे. शंभर टक्के खात्री नाहीच. कोहली होताच ना संघात. तो ही त्या सामन्यात फेलच गेलेला. आणि शर्माच्या तंत्रालाही अंडरएस्टीमेट करू नका वनडेमध्ये, आठवा वर्ल्डकपचा आफ्रिकेचा सामना. सर्वोत्तम खेळी होती ती एक वर्ल्डकपमधील.

नकोच त्या सामन्याच्या दुखद आठवणी...
पण नडला तो ईगो. कोहली आणि शास्त्रीचा. धोनीला एवढ्या लेट पांड्यानंतर पाठवले. आजही या कृत्याचे आकलन होत नाही Sad

*९० च्या दशकात शेन वॉर्न भारतात आला होता तेव्हा पहिल्या प्रॅक्टीस मॅच मधे मुंबईच्या अमित पागनीस ने त्याची पिसं काढली होती.* - पागनीसच्या त्या फलंदाजीला कमी लेखण्याचा उद्देश नाही पण माझं एक निरीक्षण-
नांवाजलेलया फिरकी गोलंदाजांचे बरेचसे बळी त्यांच्या लौकीकाचा फलंदाजांवर असलेल्या दबावामुळे त्याना मिळत असावेत. May be, batsman tries to read too much in their every delivery and consequently loses the wicket to even an ordinary delivery. शक्यता आहे कीं वाॅरनचा त्यावेळीं दबाव निर्माण करणारा लौकीक नव्हता किंवा पागनीसने तसा दबाव स्वत:वर येवूं दिला नव्हता.

*पण भारतीय बॅट्समेन गूगली हातातून ओळखत नाहीत वगैरे पहाताना त्रास होतो * - पूर्वी बर्याच 'नेट प्रॅक्टीस 'मधे असा दंडक असे कीं लेगस्पिनरला खेळतांना त्याच्या हातातून सुटणारा चेंडू गुगली असेल, तर त्या क्षणी फलंदाजांने तो ओळखून,तसं मोठयाने ओरडून मगच तो चेंडू खेळायचा. त्यामुळे, फलंदाज व गोलंदाज दोघानाही आपलं कसब पारखता येत असे. ( अजून ती पद्धत आहे का माहित नाहीं)

फलंदाजांपैकीतर मला वाटते पुजारा सोडुन बाकी सर्व दर्जेदार फिरकीसमोर चाचपडतातच. धडाधड मारुन सुटका करुन घ्यायचा प्रयत्न करतात. >> हे लिमिटेड ओव्हर्स साठी जास्त लागू होतेय. टेस्ट मधे आपण (पुजारा, कोहली, राहुल) अजूनही बर्‍यापैकी मॅनेज करतोय स्पिन. एखाद दुसरे अपवाद वगळता वेळ हाती असेल तर चांगले खेळतो आपण स्पिन टेस्ट मधे. तुम्ही त्या आधीच्या बॅच शी तुलना कराल तर मात्र कमतरता मात्र नक्कीच जाणवेल. आणित्याचे मुख्य कारण आधीसारखे पदलालित्य वापरून स्पिनर्स ना खेळणे कमी झालय. त्याऐवजी स्वीप चा वापर वाढलाय.

शिवा आणि शास्त्री. >> बरोबर, पिचच्या बाउन्सी नेचरचा फायदा उठवून मुख्यत्वे लेग स्पिनरचा अ‍ॅग्रेसिव्ह वापर करून गावस्कर मोक्याच्या विकेट घेत होता.

फे फ, अमित पागनीस बद्दल गोंधळ होतोय बहुधा तुझा. सचिन ने मुंबई कडून ३ दिवसीय सामन्यामधे वॉर्न ला दिलेला मार आठवतोय मला - दिडशे कि दोनशे केले होते. मुंबई रणजी चँपियन ( गेले ते दिवस Sad ) असल्यामूळे ऊसी ज विरुद्ध खेळले होते. पुढे बहुधा अध्यक्षिय संघा विरुद्ध खेळताना कानेटकर ने ठोकले होते.

"अमित पागनीस बद्दल गोंधळ होतोय बहुधा तुझा." - स्कोअरकार्ड मिळालं तर टाकतो. तूर्तास, हे सापडलं. "When Australia toured India, he hammered Shane Warne's bowling for 30-ball 50 runs in a warm up match with India. He danced down the pitch on square turning balls and did it. It was done at Sachin Tendulkars instructions, who was captaining Mumbai team then. It setup India team well on that Aussie tour - premiere Aussie bowler was rendered ineffective."

पागनीसचे लक्षात नव्हते पण जबरी मॅच होती ती. अडीच दिवसांत धुतले होते ऑसीजना. पुढे कसोटीमधे (९८ ची ती सिरीज)सचिनइतकीच सिद्धूनेही वॉर्न ची बोलिंग चांगली खेळली होती.

भारतात स्टार स्पोर्ट्स, इंग्लंड मधे स्काय टीव्ही आणी अमेरिकेत विलो टीव्ही वर आहे.
Submitted by फेरफटका

धन्यु फेफ...

शेन वार्न च्या दृष्टीने तेंव्हा शास्त्री अत्यंत डेंजर फलंदाज होता. असे एकदा मुलाखतीत बोलला होता तो.

आजचा सामना फलंदाजीच्या नंदनवनात ठेवल्यागत झाला.

दोन्ही बाजूचे गोलंदाज प्रभाव नाही पाडू शकले!

"पागनीस ने पन्नास नि सचिन ने २०० काढले आहेत. तू हेच म्हणत असावास बहुतेक" - बरोबर. त्या वेळी असं काहीसं वाचलं होतं की सचिन च्या सूचनेवरून पागनीस ने ओपनिंग ला येत वॉर्न वर हल्ला चढवला होता आणी नंतर सचिन ने मोठी इनिंग खेळली होती. वॉर्न ला निष्प्रभ करायच्या स्ट्रॅटेजी चा तो भाग होता. असो.

कालची मॅच जबरदस्त झाली असं स्कोअरकार्ड बघून वाटलं. बघता आली नाही. पण अय्यर आणी राहूल दोघंही कमाल खेळले. न्यूझिलंड मधे
लहान ग्राऊंड्स, ड्रॉप-इन पिचेस मुळे लिमिटेड ओव्हर्स (टी-२० / वन-डे) मधे बॅट्समेन चं वर्चस्व असतंच. त्यातही बुमराह - शामी ने शेवटच्या ओव्हर्स चांगल्या टाकल्या. पंत ला प्लेयिंग ११ मधे स्थान मिळणार नसेल तर त्याला तिथेच असलेल्या 'ए' टूर मधे खेळवता येईल.

दुबे नि ठाकूर दोघे मिळून २-३ ओव्हर्स चांगल्या टाकतील तर शमी किंवा एखाद्या स्पिनर ला जेंव्हा मार पडेल तेंव्हा त्यांचा बॅकप कोण असणार ह्याचा विचार करायला लागणार आहे. असो.

आजची अय्यरची इनिंग जबरदस्तच होती. साउठी शी नुसता खेळत होता असे वाटले.

सलग दोन मॅचेस - सलग दोन सुपर ओव्हर्स - सलग दोन भारताचे विजय!!

पांडे आणी शार्दूल ठाकूर जबरदस्त खेळले. संजू ने चमकावं असं फार वाटतं. he is too talented to fail .

कोहली ने सामना संपल्यावर कौतुक केले त्याचे. त्यामूळे अजून एक सामना तरी असेलच. मागच्या सामन्या चे दोन्ही हिरो - शमी नि रोहित नसतानाही आज जिंकलो हे कौतुकास्पद आहे. फिल्डींगच्या जोरावर किवीज च्या विरुद्ध जिं़ऊ हे अजून धक्कादायक Happy

"फिल्डींगच्या जोरावर किवीज च्या विरुद्ध जिं़ऊ हे अजून धक्कादायक" - Happy खरय! एके काळी, न्यूझिलंड, झिंबाब्वे वगैरे टीम्स च्या नुसत्या फिल्डींग चा सुद्धा दबदबा होता. आता आपली फिल्डींग तोडीस तोड आहे.

* आता आपली फिल्डींग तोडीस तोड आहे.* * संजू ने चमकावं असं फार वाटतं he is too talented to fail .* - या दोन्हीच कारण एकच असावं - सध्या टॅलंटचं भरघोस पीक आल्याने तीव्र झालेली स्पर्धा !

Pages