Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याला इतिहासात इंटरेस्ट आहे
त्याला इतिहासात इंटरेस्ट आहे म्हणूनच त्याला बघायला जायचे आहे.-> +१
सणव तुम्ही जो जोक टाकला आहे
सणव तुम्ही जो जोक टाकला आहे त्यात तथ्य असेल बहुतेक. मोहिमेवर एकटे गेले कि असं होते म्हणून कदाचित नंतर बायका देखील मोहिमेवर जाऊ लागल्या म्हणजे आणखी एक मस्तानी नको पुण्यात..
खिल्जि मलिक गफुर
खिल्जि मलिक गफुर
>>पण या भाऊ च्या चेहर्यावरचे
>>पण या भाऊ च्या चेहर्यावरचे भाव पाहिले तर हा फार फार तर सुजाता कोल्ड्रिंक मधली मस्तानी घेउन येइल असे वाटते
कमरेला एक एक मस्तानीचा कप
कमरेला एक एक मस्तानीचा कप आहेच की चित्रात लावलेला!
सुजाता मस्तानीच आहे तिघांकडे-
सुजाता मस्तानीच आहे तिघांकडे- ते केशरी पांढरे कप्स त्यांचे ब्रँड कलर्स आहेत.
मोहिमेवर एकटे गेले कि असं होते म्हणून कदाचित नंतर बायका देखील मोहिमेवर जाऊ लागल्या म्हणजे आणखी एक मस्तानी नको पुण्यात..)))
एकूणात पेशव्यांच्या बायकांची स्थिती सॅडच होती फार. बाजीरावला लाथ मारून काशी अमेरिकेत जाऊ शकत नव्हती जोनासांची धाकटी सून बनायला.
नव्हे अंगवस्त्र ही प्रथा
नव्हे अंगवस्त्र ही प्रथा किंवा प्रघात खूप आधीपासूनच होता
शहाजी राजांपासून
त्यांची कुटुंबशाळेपासून झालेले पण शूर होते आणि नंतर शिवाजी राजांच्या बाजूनं लढले
फक्त शिवाजी आणि संभाजी राजांना अंगवस्त्र असल्याचा उल्लेख कुठेही नाही
पण नंतर बालाजी विश्वनाथ याना होती आणि नंतर पहिल्या बाजीरावांना देखील
आणि मस्तानी ला तोच दर्जा दिला असता तरी लोकांना चालणार होते
अडचण होती तिला लग्नाची बायको म्हणून स्वीकारण्याची
'लोकांना' काय चालणार किंवा
'लोकांना' काय चालणार किंवा नाही चालणार याचा काय संबंध इथे? इथे मी काशीबाईबद्दल लिहिलंय की प्रतारणा करणाऱ्या नवऱ्याला टाकून देण्याचा , दुसरा पुरुष सहचर मिळवण्याचा अधीकार तिला बिचारीला नव्हता. त्या काळातील पेशव्यांच्या बायकांची स्थिती वाईटच होती.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/panipat-the-great-betrayal-movi...
लोकसत्ता मध्ये पानिपत चा रिव्हवू आलाय.
4 स्टार दिलेत.
हा मार्केटिंग फंडा आहे की genuine रेव्हवू ते त्यांनाच माहिती.
तेच सांगतोय वाईट स्थिती फक्त
तेच सांगतोय वाईट स्थिती फक्त पेशव्यांच्या नव्हे तर खूप आधीपासूनच सगळ्याच बायकांची होती
निदान पेशव्यांच्या बायका ठामपणे काही निर्णय घेऊ शकत होत्या
आता नवऱ्याने रंग उधळले म्हणून बायकोला पण मिळायला हवे होते ही स्थिती भारत स्वतंत्र होईपर्यंत आणि त्या नंतरही कित्येक वर्षे नव्हती उगाच नाय तिथे कशाला गळे काढता
बायका रंग उधळीत नव्हत्याच हे
बायका रंग उधळीत नव्हत्याच हे कशावरून?
रंग उधळण्याचं स्वातंत्र्य हवं
रंग उधळण्याचं स्वातंत्र्य हवं असं मी कुठे लिहिलंय? बायकोची पर्वा नसलेल्या, प्रतारणा करणाऱ्या नवऱ्याला सोडून देण्याचं, दुसरा चांगला जोडीदार मिळवण्याचं स्वातंत्र्य स्त्रीला हवं असं लिहिलंय. असं स्त्रीने करणं म्हणजे तिने रंग उधळले का?
बाकी इथे विषय पेशव्यांच्या स्त्रियांचा चालला होता म्हणून त्यांच्याबद्दल लिहिलंय. ओव्हरॉल सर्वच स्त्रिया कमी जास्त प्रमाणात पण अन्याय ग्रस्तच होत्या इंग्रज येईपर्यंत हे खरंच आहे.
इंग्रज येईपर्यंत?????
इंग्रज येईपर्यंत?????
किती खरं खोटे माहिती नाही पण
किती खरं खोटे माहिती नाही पण काशीबाई यांनी बाजीरावांना महालात येण्यास मनाई केली होती, तसेच बोलणे देखील टाकले होते
पार अगदी रावरखेड लाच त्यांच्यात बोलणे झाले
इतकं स्वातंत्र्य आजही किती स्त्रियांना आहे याबद्दल शंका आहे
"किती खरं खोटे माहिती नाही पण
"किती खरं खोटे माहिती नाही पण - " या वाक्याने सुरुवात करुन काहीही पुड्या सोडता येतात. त्याची दखल घ्यायची पध्दत नाही. आणि समजा आपण मानलं की काशीबाईने बोलणं टाकलं तरी बाजीरावला त्याने काय फरक पडला...त्याला तसंही मस्तानीचा सहवास पेशवेपदापेक्षाही जास्त प्रिय होता!
इथे खूपच अवांतर होतंय पण आज ६ डिसेंबर पण आहे सो बेसिक्स- प्रतारणा करणार्या पुरुषाला लीगली घटस्फोट देण्याचा, त्याला सोडून एकटं व स्वावलंबी राहण्याचा, एकल पालकत्वाचा, ताठ मानेने दुसरं लग्न करण्याचा अधिकार आज घटनेनुसार सर्व हिंदू स्त्रियांना आहे. असा प्रतारणा करणारा पुरुष मेल्यावर केशवपन करण्याची, अपशकुनी विधवा म्हणून उंबर्याबाहेर न पडण्याची विकृत सक्ती आजच्या स्त्रीला नाही. किंवा मूलबाळ वगैरे जबाबदारी नसल्यास त्या पुरुषाच्या चितेसोबत तिच्याकडून सती जाण्याची अपेक्षा समाज करत नाही.
यातलं एकही स्वातंत्र्य काशीबाईला नव्हतं.
हे मूलभूत माणूसपणाचे हक्क बाबासाहेबांनी घटनेत लिहून ठेवले(हिंदू कोड बिल). हे माणूस म्हणून जगण्याचे हक्क- मग ते स्त्रियांचे असोत वा दलितांचे- तळागाळापर्यंत आजही पोचलेले नाहीत पण ती प्रोसेस सुरु राहणार. उतरंडीतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत हक्क पोचले नाहीत याचा अर्थ स्त्रिया किंवा दलितांची स्थिती पेशवाईत आजच्यापेक्षा चांगली होती असा होत नाही.
सणव तुम्ही जो जोक टाकला आहे
सणव तुम्ही जो जोक टाकला आहे त्यात तथ्य असेल बहुतेक. मोहिमेवर एकटे गेले कि असं होते म्हणून कदाचित नंतर बायका देखील मोहिमेवर जाऊ लागल्या म्हणजे आणखी एक मस्तानी नको पुण्यात.. >>>>>>>>> तो डायलॉग चित्रपटात आहे. तो डायलॉग कापायला पेशवेघराण्याचे वन्शज सान्गत आहे अस कुठेतरी वाचलय.
एकूणात पेशव्यांच्या बायकांची स्थिती सॅडच होती फार. >>>>>>> माबोवरच्याच एका धाग्यावरुन कळलय की गोपिकाबाई आणि आनन्दीबाई ह्याच स्रिया स्वतन्त्र वृतीच्या होत्या.
शहाजी राजांपासून
त्यांची कुटुंबशाळेपासून झालेले पण शूर होते आणि नंतर शिवाजी राजांच्या बाजूनं लढले >>>>>>>> कुटुंबशाळा?
पानिपतचा निगेटिव्ह रिव्ह्यु:
https://www.bollywoodlife.com/reviews/panipat-movie-review-ashutosh-gowa...
काशीबाई ला नव्हते मग? त्या
काशीबाई ला नव्हते मग? त्या काळात कुठल्याच स्त्री ला नव्हते हे अधिकार, हे आता स्वातंत्र्यनंतर आलेले आहेत आणि अद्याप मला शंका आहे सगळ्या स्तरावरच्या स्त्रियांना हे अद्याप मिळाले आहेत
उतरंडीतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत हक्क पोचले नाहीत याचा अर्थ स्त्रिया किंवा दलितांची स्थिती पेशवाईत आजच्यापेक्षा चांगली होती असा होत नाही.>>>>>
या वाक्याचा अर्थ उलगडून सांगणार का?
कारण मी जे काही वाचलं त्यानुसार तरी दलितांची स्थिती पेशवाई मध्ये अत्यंत भयानक होती, सावलीचा विटाळ होणे, कानावर मंत्र पडले तर कानात उकळते शिसे ओतणे असे रम्य प्रकार सहजपणे होत असत
स्त्रियांची परिस्थिती तुम्हीच वर्णन केली आहे
मग या वरच्या वाक्याचा काही अर्थ लागला तर मलाही सांगा
मलाही तुमचा मुद्दा कळला
मलाही तुमचा मुद्दा कळला नाहीये. आधी घटनेने माणूस म्हणून जगण्याचे दिलेले मूलभूत अधिकार या गोष्टीला तुम्ही 'रंग उधळण्याचे' अधिकार असं म्हणालात. निदान ते तसं नाहीये हे तुम्हाला आता कळलंय असं समजू ना?
बाकी जर पेशव्यांच्या बायकांची स्थिती खूप सॅड होती हे माझं स्टेटमेंट तुम्हाला मान्य आहे असं तुमच्या लेटेस्ट पोस्टवरुन दिसतंय तर मग विषयच मिटतोय की!
मला माझ्या सर्व स्टेटमेंट्समधून इतकंच म्हणायचं आहे.
अशक्य आहात, मी काय बोलतोय,
अशक्य आहात, मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय याचा काही ताळमेळ लागतोय का
लेटेस्ट पोस्ट कशाला, मी आधीपासून तेच बोलतोय, पण तुमच्या एकंदर गुंत्यात तुम्हालाच कळत नाहीये ते
पेशव्यांच्या बायकांची स्थिती वाईट होती असे म्हणालात त्यावर मी म्हणालो फक्त पेशवेच का सगळ्याच काळात बायकांची स्थिती वाईट होती, निदान त्या काळातल्या बाकी बायकांपेक्षा त्यांना अधिक मोकळीक होती, हातात काही अधिकार होते
त्यावर पुन्हा मग मानवी अधिकार, दलित यांचं दळण दळलत
'रंग उधळण्याचे अधिकार' ही
'रंग उधळण्याचे अधिकार' ही चुकीची भाषा अकारण वापरलीत, ती मागे घेणार का? असोच!
पेशव्यांच्या बायकांची स्थिती वाईट होती असे म्हणालात त्यावर मी म्हणालो फक्त पेशवेच का सगळ्याच काळात बायकांची स्थिती वाईट होती, निदान त्या काळातल्या बाकी बायकांपेक्षा त्यांना अधिक मोकळीक होती, हातात काही अधिकार होते>>>
येस! त्यावर मी लिहिलंय की- "बाकी इथे विषय पेशव्यांच्या स्त्रियांचा चालला होता म्हणून त्यांच्याबद्दल लिहिलंय. ओव्हरॉल सर्वच स्त्रिया कमी जास्त प्रमाणात पण अन्याय ग्रस्तच होत्या इंग्रज येईपर्यंत हे खरंच आहे."
अॅमीशी यावर छान चर्चा झाली होती. तिने माझे बरेच चुकीचे विचार करेक्ट करुन दिले होते! पेशव्यांच्या बायकांना अधिक मोकळीक किंवा अधिकार नव्हते पण शनिवारवाड्याच्या चौकटीच्या आत त्या सुरक्षित होत्या , प्रोटेक्टेड होत्या हे मान्य आहे. (आय मिन- जो काही अन्याय व्हायचा तो घरच्या पुरुषांकडूनच. बाहेरच्या जगाशी संबंध नव्हता. )
केशवपन, सती हे पेशवे वगैरे लोकांत जास्त प्रस्थ होतं. इतर समाजात बाईला इतकंही अघोरी टॉर्चर केलं जात नसे. इतर समाजात अन्याय करणारा नवरा सोडणं, पुनर्विवाह करणं (पाट लावणं?) हे निदान काही केसेसमध्ये शक्य होत होतं.
दुसरीकडे पेशव्यांचे बॉसेस म्हणजे भोसले किंवा कलीग्ज म्हणजे होळकर यांच्या घरची उदाहरणं बघितली तर ताराराणीसाहेब, अहिल्याबाई यांनी राज्यकारभार सांभाळला, मराठेशाहीसाठी योगदान दिलं. त्यांना त्या विधवा असतानाही त्यांच्या समाजाने नेतृत्व म्हणून स्वीकारलं. पेशव्यांच्या बायका मात्र नवरा मेला की एकतर चितेवर किंवा मग केशवपन करुन घरातील आतल्या खोलीत विद्रुप करुन ठेवलेल्या.
'रंग उधळण्याचे अधिकार' ही
'रंग उधळण्याचे अधिकार' ही चुकीची भाषा अकारण वापरलीत, ती मागे घेणार का?
हो घेतो की, मी ती पेशवे रंग उधळत त्याला अनुसरून वापरली होती. तुमच्या एकंदर पोस्टवरून असेच वाटले होते की पेशवे जसे मस्तानी आणू शकत होते तसे काशीबाई करू शकत होत्या का, आता मस्तानी ही बाजीरावांनी पत्नी म्हणून आणली असली तरी समाज नाटकशाळा, रंगढंग म्हणूनच पाहत होता.
दुसरीकडे पेशव्यांचे बॉसेस म्हणजे भोसले किंवा कलीग्ज म्हणजे होळकर यांच्या घरची उदाहरणं बघितली तर ताराराणीसाहेब, अहिल्याबाई यांनी राज्यकारभार सांभाळला >>>>
त्यात अजून एक महत्वाचे उदाहरण म्हणजे जिजामाता. पण ही फारच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे झाली, या स्त्रिया मुळातच प्रचंड कतृत्ववान होत्या. तसे अधिकार पेशव्यांच्या स्त्रियांना मिळालेच नाहीत हे खरे आहे, पण त्या तोलाची, महत्वाकांक्षी अशी फक्त आनंदीबाई होती आणि तिने आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. ती देखील सती गेलीच नाही. त्यांनतर नारायणरावांची पत्नी देखील सती गेली नाही आणि सवाई माधवरावांची माता आणि पेशव्यांचे अधिकार तिच्या अंकीत होते, अर्थात तिचे राजकारण हे नाना आणि बापू यांच्या सल्ल्याने चालत होते. त्या आधी गोपिकाबाई देखील सती गेल्या नाही. काशीबाई गेल्या नाही. या सगळ्या फक्त अंधाऱ्या खोलीत नशिबाला दोष देत बसून नव्हत्या तर आपल्या पेशवे पुत्राला खडसावण्याचे, प्रसंगी काही निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना होते. मुळात रमाबाई सोडल्या तर अन्य प्रमुख पेशवेस्त्रीया सती गेल्याचे फारसे दाखले नाहीत.
त्यानंतरचे दुसऱ्या बाजीरावाचे दत्तकपुत्र नानासाहेब - त्यांची पत्नी काशीबाई देखील मोकळपणाने निर्णय घेत असे.
पेशव्यांमुळे झाले एकच की ब्राह्णण समाज अधिक कर्मठ आणि अन्यायी झाला आणि त्यांनी सर्वसामान्य बहुजन वर्गाला प्रचंड पीडीत केले.
हो घेतो की, मी ती पेशवे रंग
हो घेतो की, मी ती पेशवे रंग उधळत त्याला अनुसरून वापरली होती. तुमच्या एकंदर पोस्टवरून असेच वाटले होते की पेशवे जसे मस्तानी आणू शकत होते तसे काशीबाई करू शकत होत्या का, आता मस्तानी ही बाजीरावांनी पत्नी म्हणून आणली असली तरी समाज नाटकशाळा, रंगढंग म्हणूनच पाहत होता.
मस्तानी 'पत्नी' होती याची काही अधिकृत नोंद सापडत नाही. अन्यथा भव्य वेडिंग दाखवण्याची संधी भन्सालीनेही सोडली नसती. इतकं पॅशन, एकमेकांसाठी वेडंपिसं होणं, झुरणं- हे सगळं मॅरिड जोडप्यात कुठून येणार?
बाकी आनंदीबाई काही कर्तबगार नव्हती. ती फक्त नवर्याला सत्ता मिळावी यासाठी कारस्थान करत होती. बाकीच्या पेशवे बायकांना विधवा झाल्यावर मुलगेही धड विचारत नव्हते. बाजीरावने मस्तानीसोबत राहायला लागून राधाबाईशी संबंध तोडले होते. माधवराव गोपिकाबाईंचं काहीही ऐकत नसत. या बायकाना काहीही स्वतंत्र अस्तित्व किंवा सत्ता नव्हती.
आदरणीय ताराराणीसाहेब किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्थानाशी, योगदानाशी दूरदूरपर्यंत तुलना होऊ शकत नाही. म्हणजे पेशव्यांच्या बायका हुशार, कर्तबगार नव्हत्या असं नाही पण संधीच मिळाली नाही.
आंनदीबाई अखेर वेडी झाली
आंनदीबाई अखेर वेडी झाली,
पेशवाईतील स्त्रिया यावर इथे महा पानिपत आहे,
https://www.maayboli.com/node/32852
ओके, हा धागा फारच भरकटत चालला
ओके, हा धागा फारच भरकटत चालला आहे
पेशवेकालीन विषयावर चर्चा करण्यापेक्षा मी माघार घेतो आणि माझे दावे, शब्द आणि वाद देखील
क्षमा असावी
पण या भाऊ च्या चेहर्यावरचे
पण या भाऊ च्या चेहर्यावरचे भाव पाहिले तर हा फार फार तर सुजाता कोल्ड्रिंक मधली मस्तानी घेउन येइल असे वाटते Happy
>>>>फारएण्डा
स्ट्रेंजर थिंग्ज नंतर आता
स्ट्रेंजर थिंग्ज नंतर आता वंडर वुमन पण ८०ज मध्ये गेलेली आहे !!
https://www.youtube.com/watch?v=sfM7_JLk-84
https://youtu.be/kXVf-KLyybk
https://youtu.be/kXVf-KLyybk छपाक
Deepu rocks !!
छपाक! भारी.
छपाक! भारी.
छपाक! भारी.-> मेघना गुलजार चा
छपाक! भारी.-> मेघना गुलजार चा आहे.. छानच असणार.
येस.
येस.
Pages