चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित तुमचा प्रतिसाद वाचुन ट्रेलर बघितला..>>>+१ Happy
बाबारे! बाघी३ चा ट्रेलर महान आहे._/\_>>>+१
त्याने तर गदरच्या सनी देओलला पण मागे टाकले.

बाघी३ चा ट्रेलर बघुन "बाबा रे ! तुझ जग वेगळ माझ वेगळ" अस पुलच्या नाथा कामतच वाक्य आठवल... एवढा त्र्यलोकावर विजयधारी टायगरने चेहर्‍यावरची एकही रेष काही हलु दिली नाही त्याबद्दल त्याच खरतर कवतिकच करायला पाहिजे.

छान आहे बागीचा ट्रेलर. ज्यांना तान्हाजी पिक्चर म्हणून आवडला त्यांनी जरूर हा सुद्धा फर्स्ट डे फर्स्ट शो बघावा.

चित्रपट नाहि आहे पण सु.शिं. च्या समांतर कांदबरी वर नवीन वेब सिरीज येतेय . मला खूप आवडलेली हि कांदबरी. राजवाडे आहे दिग्दर्शक
https://www.youtube.com/watch?v=N8Oy3XiITik

alt balaji / झी ५ सारखी>>>>>>> म्हणजे पेड असेल बहुतेक. बघते. समांतर बघावीशी वाटतेय कारण.

फुकट आहे समांतर पण डालो नाही करता येत, ऑनलाईन बघावी लागते. छोटे भाग आहेत. मी चार बघितले. स्वजो बारीक झालाय आणि बराच सुसह्य आहे. आताशा त्याला चांगले आणि वेगळे रोल मिळत आहेत किंवा तो रिस्क घेत आहे पण त्याला जमतंय.

मलाही आवडली.जयंत(त्या काकांचे नाव काय) ज्योतिषी पात्र पण मस्त अभिनय केलाय.ते नेहमीच छान अभिनय करतात.स्वप्नील जोशी पण सिरीयस चांगला अभिनय करतोय.
समांतर ची स्टोरी पॉवरफुल आहे.ती मांडायला स.रा. सारखाच माणूस पाहिजे.या कथेवर आत्माराम भेंडे यांचं एक जबरी नाटक होतं जुनं.

Pages