नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत पुस्तक वाचताय ते नाव आणि पुढे समीक्षा थोडक्यात टाकत जा.... म्हणजे थोडक्यात आम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही. Lol

@अप्पा - धन्यवाद!
@सिद्धी - नक्कीच! आणि समीक्षा शब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy

अरे वा...मस्तच...परीक्षणाची वाट पाहू...

मी काही पुस्तके वाचली आहेत...तर रिलेट करणं सोप्प जाईल...

सगळ्यांचे धन्यवाद!

कालपासून दोन पुस्तके वाचली आहेत.

१. लुचाई -

पाश्चात्य हॉरर जगतातील सर्वात जास्त लोकप्रिय कन्सेप्ट वर आधारित हे पुस्तक धारपांनी अस्सल मराठी बाजात लिहिलंय. हे पुस्तक सुरुवातीपासूनच मनाची जी पकड घेतं, ती कुठेही सहन होतं नाही.
प्रत्येक छोट्यातल छोट कॅरेक्टर डोळ्यासमोर उभं राहतं.
थोडक्यात कथा म्हणजे जयदेव व्यास उर्फ गोपाळ आंग्रेकर आपल्या आयुष्यातील एक दुःखद घटना विसरण्यासाठी त्याच्या जुन्या गावी, दुर्गापूरला आलेला असतो. इथेच लहानपणी त्याच्या आयुष्यात एक अतिशय विचित्र घटना घडलेली असते. जयदेव आल्यापासून गावात अनेक विचित्र घटना घडू लागतात. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो नाईकांचा वाडा!!!
लुचाईचा आवाका प्रचंड मोठा आहे. अनेक कॅरेक्टर त्यात आहेत. संपूर्ण पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं, आणि भीतीही अस्सल वाटत राहते. पुस्तकातील शब्द, प्रसंग माणसाच्या मनाची सुरुवातीपासून जी पकड घेतात, ती शेवटपर्यंत सुटत नाही. काही प्रसंग तर अगदी हादरवून सोडणारे आहेत, उदा. केरकर गुरुजींचा अधःपतनचा प्रसंग, लहान जयदेवचा नाईकांच्या वाड्यातील प्रवेश इ.
मात्र शेवट गुंडळल्यासारखा आणि सपक वाटला. अजूनही काही ट्विस्ट असता तर अजून मजा आली असती.

रेटिंग - चार

२. माणकाचे डोळे, हे छोटुस पुस्तक फारच लवकर संपलं. हा एक कथासंग्रह आहे.
कथांची रेटिंग खालीलप्रमाणे.

१. माणकाचे डोळे - अत्यंत प्रेडीक्टबल आणि सपक. मानकांच्या डोळ्यांच्या चोरीवर आधारित कथा.
रेटिंग - १

२. कवठीचे वळण - एक अनपेक्षित वळणावर संपणारी कथा, मात्र खूप ताणल्यासारखी वाटते. दोन मित्रांनी (पाटील आणि भगत) घेतलेल्या एका चॅलेंजची कथा.
रेटिंग -२

३. उंबरठा - ही कथा वाचताना मला लुचाईची आठवण झाली. चांगली कथा. स्वतःला जाणवणाऱ्या संवेदनाचा शोध घेणारी कथा. कुलकर्णी आणि कोठारीनी घेतलेली कुलकर्णीच्या क्षमतेची परीक्षा!
रेटिंग - ३

४. तांबडी आजी - अप्रतिम, मानवी भावभावनांचा गुंता, आणि त्यावर येणारी अमानवीयची झालर. शांताबाई, ताराबाई आणि मोहन आणि त्याच्या आजीची कथा.
रेटिंग - ५

५. झपाटलेलं घर - अप्रतिम. एकटेपणात शोधलेला स्वत्वाचा जीवघेणा आधार. वंदनाचा एकटेपणा आणि शोधलेली सोबत.
रेटिंग - ५

६. मुकनायिका - प्रेडीकटेबल आणि सपक. एक मित्राच्या घरी मुक्कामात आलेला अनुभव.
रेटिंग १

७. छाया प्रकाशाचा खेळ - उत्कृष्ट कथा. निओ नोयर जेनर. एका चित्रपटगृहात घडणारी अमानवीय घटना.
रेटिंग - ४

रेटिंग - ★★★★
असे लिहिले तर छान वाटेल / दिसेल

आणि ह्यातील काही कथा / कथासंग्रह ऑनलाइन फ्री / पीडीएफ उपलब्ध असतील तर लिंक दिली तर बरे !

मला रत्नाकर मतकरी आणि सु.शी. च्या डिटेक्टिव्ह आणि भयकथा आवडतात.

धारपांचे नाव खूप ऐकले आहे, पण वाचले नाहीत बहुदा.

त्यांच्या भय कथांचा शेवट तंत्रमंत्रविद्येने होते असे ऐकले होते.
बाकी कोणती कथा/पुस्तके वाचायलाच हवीत, चुकवू नका या कॅटेगरी मध्ये येतात ते ही समराईज करून सांगावे. Happy

(मला माहित आहे इथे आगाऊपणा करणे ही माझी जागा नाही पण तरी)
मराठी साहित्य, ते वाचणारा वाचकवर्ग हा लहान आकडा आहे.त्यात ते 'विकत घेऊन/किंडल/बुकगंगा वर वाचणारा वाचकवर्ग' हा अजूनच लहान आकडा आहे.मराठी साहित्य बनत राहावं असं वाटत असेल तर व्हाईट(विकत घेतलेल्या) बुक्स आणि इ बुक्स चा आग्रह धरा. कोणीतरी टाकलेली पीडीएफ वाचणं हे टॉरेंट किंवा इतर ठिकाणून नुकताच रिलीज आणि लीक झालेला पिक्चर बघण्या इतकंच त्या इंडस्ट्री च्या पोटापाण्यासाठी मारक आहे.

मी अनू प्लस वन. धारपांचा एक डेडिकेटेड फॅन क्लब आहे. लिहा तुम्ही समीक्षण. बरीच पुस्तके मला किंडल वर सापडली रु. ९९ ला प्रत्येकी उपलब्ध आहेत. धारपांच्या लेखनाचा एक गुण म्हणजे अत्यंत चित्रदर्शी वर्णन. सर्व कथांवर आधारित शॉर्ट फिल्म्स, सीरीअल्स, चित्रपट नक्की बनवता येतील. धाग्यातला उपक्रम सखाराम गटणे परीक्षणे लिहून आणतो वहीत त्या स्वरुपाचे वाट्ते आहे.

धारपांची पुस्तके वाचकांनी स्वतः अनुभवावीत. येथील समीक्षणाचा आधार घेउन पुढे स्वतः एंजॉय करावे.

लुचाई, चेट कीण जबरी आहेत.

मस्त..मी माणकांचे डोळे वाचलंय..मला तरी शेवटपर्यत खिळवुन ठेवलं होतं त्या पुस्तकाने.. परत माइंड फ्रेश करुन वाचायला हवं.. Happy

अज्ञाचा login ला प्रॉब्लेम आल्याने त्याने हा प्रतिसाद मला पोस्ट करायला लावला होता.
पण एक यशस्वी नाच्या उलथल्याने प्रतिसाद एडिट करतेय.

अले बापले किती ती सावरसावर, बुंद से गयी वो हौद से नही आयेगी Rofl पण तुम्ही पुरुष असून बाईचा दु आयडी का घेतलात.

अरे सायको माणसा, अज्ञाच्या आयडीला प्रॉब्लेम येतोय, म्हणून त्याने मला प्रतिसाद पोस्ट करायला लावला होता.
एक काम कर
mahashweta.bhosale@gmail.com या मेलवर मला इमेल कर. बघू कोण डु आयडी आहे ते.
बाकी कुणालाही शंका असेल, त्यांनी प्लिज माझ्या इमेलवर मेल करावा!

अहो महाश्वेता ताई जर तुम्ही म्हणताय की अज्ञातवासी याने तुम्हाला प्रतिसाद टाइप करायला लावला तर आता तुम्ही तो एडिट का केलात? आणि महत्वाचं म्हणजे असं जर खरोखर असतं तर तर तुम्ही प्रतिसादाच्या सुरवातीला सांगितलं असतत की आज्ञा चा लॉगिन प्रॉब्लेम झालाय म्हणून मी प्रतिसाद देते. पण तुम्ही ती कमेंट एडिट केलीयेत. सगळ्यांनी या रे या धाग्यावर बघा एकाच बिंग फुटलंय. Rofl Rofl Rofl

सप्रस,

इग्नोअर करत होते, पण आता जास्त झालंय खूप.
श्वेताच्या मागे लागणे बंद कर.
एकतर, ती डु आयडी नाहीये आणि अज्ञातवासीसुद्धा ओरिजीनल आयडी आहे.

त्यामुळे बास कर आता. अति होतयं हे. Angry

धारप किंगची कॉपी करायचे ना? मग विकत घेणारच असाल तर इंग्रजी वाचता येणार्यानी सरळ किंगचीच पुस्तक विकत घ्या की! Wink

रत्नाकर मतकरी आणि सु.शि. पण कॉपी करायचे का? कोणाची?

मायबोलीकरच ठरवतील आता काय ते, मी तर हा सूर्य हा जयद्रथ केलंय. तुम्ही एव्हडी बाजू घेताय म्हणजे तुम्ही पण त्यांचा डू आयडी नाहीत ना? Rofl

सप्रस मुर्खा मी प्रतिसादाच्या शेवटी ते टाकणारच होते.
मात्र तो सेव्ह झाला, आणि एडिट करायला गेले तर तुझा प्रतिसाद दिसला.
अजून गोंधळ नको म्हणून एडिट केला.
प्लिज मेल मी, मेलवर बोलूयात...

सप्रस,

आमच्या भांडणात तूही आग लावली होतीस ना? मग आम्ही डु आयडी कसे असू? निदान विचार करं काही खरडण्याआधी.

आणि तसा गैरसमज करून घ्यायचा असेल कर खुशाल करून घे. अज्ञातवासीचे लिखाण आणि महाश्वेताचा कणखरपणा मलाही आवडतो. त्यामुळे तुला वाटत असेल की ते माझेच आयडी आहेत, तर मला वाईट वाटण्याचे कारण नाही. या अनपेक्षित शक्यतेच्या लिखाणाबद्दल धन्यवाद!
Happy

ऍमी, नुसती वर्ड टू वर्ड कॉपी नाही कस्टमायझेशन पण भरपूर होतं.
आम्ही लोक त्या कस्टमायझेशन चे चाहते आहोत.
आता भारतात जेन्यूईन खरंखरं चायनीज चवीचं चायनीज मिळतं.
पण तरीही आम्ही इंडियन कस्टमाईझड चायनीजच आवडीने खातो तसंच आहे हे.(स्मायली द्यायचा होता पण मोबाईलवरून स्मायली दिला तर माझा प्रतिसाद सेव्ह होत नाही.)

Pages