नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लुचाई सालेम्स लॉट चे रूपांतर आहे. >> मी वाचलेले नसल्यामूळे कल्पना नव्हती. कळपबद्दल पण धन्यवाद.

IT वर शपथ बेतलेले आहे, स्वाहा वेगळे होते बहुतेक. शपथ मधे ४-५ मुले असतात - टीनपाट मेजर वगैरे.

अ‍ॅमी, कॉपीराईट बद्दल धारपांनी पत्रव्यवहार करून परवानगी घेतली होती कि नाही हे माहित नाही असे दिसतेय त्यामूळे संशयाचा फायदा द्यायचा कि नाही ?

अज्ञातवासी जी, आभास नंतर आता अघटित, साठे फायकस, अत्रारचा फास, अंधारातील ऊर्वशी, प्राध्यापक वाईकरांची कथा.. होऊन जाऊ दे..
चेटकीण मध्ये हातातील सफरचंद ज्या एका सात्विक तरीही भयंकर अशा तिडीकीने सोनाली (हेच नाव आहे ना) त्या वाईट शक्तीवर फेकून मारते, तो क्षण वाचायला फार आवडतो.
>>>
प्राचीन धन्यवाद. स्वाहा नंतर बहुतेक अत्ररचा फास वाचायला घेईन, आणि हळूहळू तुम्ही सुचवलेली टायटल वाचेनच. Happy

@अमा - मला चेटकीणचा शेवट प्रचंड आवडला होता. सोनालीच ट्रान्सफॉर्मेशन कम्प्लेट झाल्यासारखे वाटलं.

@श्रद्धा - इंटरेस्टिंग. वाचावं लागेल.

@धीरज -
स्पोईलर अलर्ट
शेवटी गौतम, कलार, वज्रे गुरुजी आणि बंगल्यातले सर्व निवासी त्या अदृश्य शक्तीवर हल्ला करतात, आणि एक वीज त्या शक्तीवर पडून तिचा नायनाट होतो.

मला स्वाहा हे it वर बेतलंय असं वाचलेलं (की ऐकलेलं) आठवतंय.
Nvm स्वाहा नंतर शपथ वाचावं लागेल.

मीदेखील धारप आणि किंग दोन्ही वाचले नाहीयत. म्हणूनच दोन्ही वाचलेल्या अनुचे मत महत्वाचे आहे. ती म्हणतेय की "कॉपिराइटचा भंग नक्कीच आहे".
दोन्ही वाचलेल्या इतरांनीदेखील सांगावे की धारपनी
१. शब्दशः भाषांतर केल आहे की
२. स्वैर अनुवाद केला आहे की
३. फक्त कल्पना उचलून बाकी सगळी रंगरंगोटी स्वतः केली आहे
तुलना करताना तो ऐसी वरचा लेखदेखील वाचून घ्या एकदा. ३ असेल तर कॉपीराईटचा भंग केला म्हणता येणार नाही.
===

> अॅमी, कॉपीराईट बद्दल धारपांनी पत्रव्यवहार करून परवानगी घेतली होती कि नाही हे माहित नाही असे दिसतेय त्यामूळे संशयाचा फायदा द्यायचा कि नाही ? > परवानगी घेतली असेल तर ती पुस्तकात मेन्शन केली असती/असायला हवी.

इथे लोकांनी धारप भारतीयिकरण करत होते , त्यांची स्वतःची स्टाईल होती ,असं लिहिलंय त्यावरून मला वाटलं की हा तिसऱ्या केटेगरीतील प्रकार असावा (किंवा समवेअर बिटविन टू अँड थ्री). जसं काही लोकांना फ्रेंड्स पेक्षाही हाऊ आय मेट.. जास्त आवडतं तसं.

बाकी 'चिराबाजारात बर्फ पडत होता' टाईप भाषांतर असेल तर तुझा मुद्दा बरोबरच आहे.

@ॲमी - माफ कर पण हा धागा नारायण धारपांची पुस्तके कशी वाटली, त्याविषयी विचार मांडण्यासाठी आहेत. किंवा समीक्षण करण्यासाठी. सुरुवातीला ते कॉपीराईट वगैरे विषयाला धरून वाटलं, पण आता तेच तेच बघून धाग्याचा मूळ गाभा हरवत चाललंय असं वाटतंय.
तू कॉपीराईट इशुसाठी वेगळा धागा का काढत नाहीस? तिथे तुला धारप काय, सगळ्या लेखकांची चर्चा करता येईल.

कॉपीराईटचा विषय या धाग्यावर मी काढला आहे का?

ज्या कायद्याचा वापर करून, ज्या लेखक-वितरकांचे हक्क तुम्ही डालवताय वगैरे आरोप ज्यांच्यावर केले गेले त्यांच्या बाजूने मी बोलतेय.
त्या कायद्यानुसार तेच लेखक-वितरक जास्त मोठे गुन्हेगार आहेत आणि तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ते गुन्हेगार नाहीचेत.
∆ हे एवढंच सांगायचय मला.

तो कुणीही काढलेला असू दे, पण त्यावर चर्चासत्र घडवण्याची ही जागा योग्य नाही असं मला वाटतं.
जर कुणी स्टीफन किंग आणि धारप वाचून त्यांची तुलना करत असेल (मी अनुसारखं) तर तेही विषयाला धरून होईल. पण तू स्वतःच म्हणतेय मी दोन्हीही वाचले नाहीत, आणि तुला तेच मुद्दे उगळायचेत तर त्यात काय हशील?
जर तुला फर्स्ट हॅन्ड एक्सपेरियन्स घ्यायचाच आहे, तर तुसुद्धा it आणि शपथ वाचून बघ. मग तुला तुझ्या १.२.३. मध्ये कुठे फिट होईल हे ठरवता येईल.
आणि वेगळा धागा काढला तर अतिउत्तम. धारप काय, सगळ्याच लेखकांची कॉपीराईटच्या अनुशंगाने चर्चा होईल.
आणि further, तुला कायदेशीर लढाई वगैरे करायची तेही तू करू शकतेस. योग्य वादी, प्रतिवादी बघून, म्हणजे तुला वाटणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षाही फर्मावता येईल.

> तो कुणीही काढलेला असू दे, पण त्यावर चर्चासत्र घडवण्याची ही जागा योग्य नाही असं मला वाटतं. > ठिकय.

> आणि तुला तेच मुद्दे उगळायचेत तर त्यात काय हशील? > मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरं देतेय मी. नाहीतर अनुने कॉपीराईट भंग आहे हे मान्य केल्यानंतरचा कालचा माझा Submitted by ॲमी on 16 October, 2019 - 09:54 हा प्रतिसाद शेवटचा होता.

> आणि further, तुला कायदेशीर लढाई वगैरे करायची तेही तू करू शकतेस. योग्य वादी, प्रतिवादी बघून, म्हणजे तुला वाटणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षाही फर्मावता येईल. > हा उगाच फालतूपणा आहे.

ओके सॉरी. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन झाली असतील, तर आता हा विषय बंद होईल अशी आशा करूयात.
बादवे हे मुद्दे मनावर घेच.
१. जर तुला फर्स्ट हॅन्ड एक्सपेरियन्स घ्यायचाच आहे, तर तुसुद्धा it आणि शपथ वाचून बघ. मग तुला तुझ्या १.२.३. मध्ये कुठे फिट होईल हे ठरवता येईल.
२. वेगळा धागा काढला तर अतिउत्तम. धारप काय, सगळ्याच लेखकांची कॉपीराईटच्या अनुशंगाने चर्चा होईल.
३. तुला कायदेशीर लढाई वगैरे करायची तेही तू करू शकतेस. योग्य वादी, प्रतिवादी बघून, म्हणजे तुला वाटणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षाही फर्मावता येईल.

<< चोरट्यांच्या घरात चोरी करण्यापेक्षा राजवाड्यातून काही रत्न उचलली तर राजाला फार नुकसान होत नाही. >>
<< ज्या कायद्याचा वापर करून, ज्या लेखक-वितरकांचे हक्क तुम्ही डालवताय वगैरे आरोप ज्यांच्यावर केले गेले त्यांच्या बाजूने मी बोलतेय. >>
पायरेटेड पुस्तके वाचणार्‍यांनीच, त्या पुस्तकाच्या लेखकाची बाजू घ्यावी, हे गमतीशीर आहे. छान छान.

हा उगाच फालतूपणा आहे.
>>>>
एक मिनिटं, हा उगाच फालतूपणा काय? तुला वाटतायेत ना गुन्हेगार, मग गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं तुला वाटत नाही. मग कॉपीराईट कायद्यानेच शिक्षा होणार, त्यासाठी न्यायालयात जायला नको.????

> सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन झाली असतील, तर आता हा विषय बंद होईल अशी आशा करूयात > पुढे यावर काही प्रश्न विचारू नका अशी इतरांना देखील विनंती कर.

> ३. तुला कायदेशीर लढाई वगैरे करायची तेही तू करू शकतेस. योग्य वादी, प्रतिवादी बघून, म्हणजे तुला वाटणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षाही फर्मावता येईल. > Unnecessary provocation!As if I was/am deliberately trying to derail this thread.

> एक मिनिटं, हा उगाच फालतूपणा काय? तुला वाटतायेत ना गुन्हेगार, मग गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं तुला वाटत नाही. मग कॉपीराईट कायद्यानेच शिक्षा होणार, त्यासाठी न्यायालयात जायला नको.???? >

ज्या कायद्याचा वापर करून, ज्या लेखक-वितरकांचे हक्क तुम्ही डालवताय वगैरे आरोप ज्यांच्यावर केले गेले त्यांच्या बाजूने मी बोलतेय.
त्या कायद्यानुसार तेच लेखक-वितरक जास्त मोठे गुन्हेगार आहेत आणि तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ते गुन्हेगार नाहीचेत.
∆ हे एवढंच सांगायचय मला.

हा प्रतिसाद वाचला आहेस का? काय अर्थ आहे त्याचा?

No you are not unnecessarily derailing the thread or no one is provoking you.
But, you don't dharap, you don't read king still you want to debate on whether dharap is stealing kings work or not? That's why please read king, read dharap, compare them and then come back with some solid conclusion 'Yes' or 'No'

> पायरेटेड पुस्तके वाचणार्यांनीच, त्या पुस्तकाच्या लेखकाची बाजू घ्यावी, हे गमतीशीर आहे. छान छान. > नोप्स. पायरेटेड पुस्तक वाचणारे कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हेगार नाहीचेत हे सांगतेय.

मग मी तेच सांगतोय ना, तू सगळ्या लेखक, वितरक, प्रकाशक जेवढे जेवढे स्टेकहोल्डर असतील ना, त्यांना न्यायालयात खेचू शकतेस. एकदा ते झालं, आणि निकाल तुझ्या बाजूने लागला, की सगळी पुस्तके प्रताधिकार मुक्त होतील, किंवा मग किंग साहेबांना लॉटरी तरी लागेल.

नोप्स. पायरेटेड पुस्तक वाचणारे कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हेगार नाहीचेत हे सांगतेय.
>>>>>>>>
To be precise, नारायण धारपांची पायरटेड पुस्तके वाचणारी मंडळी कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हेगार नाहीयेत असं तुला म्हणायचंय का?
की उद्या कुणी The Circe टोरेंटवरून डाउनलोड केलं तरी तुझं हेच मत असेल???

<<< पायरेटेड पुस्तक वाचणारे कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हेगार नाहीचेत हे सांगतेय. >>>
Legal reference please.
Tip: You may also be tried under Computer Fraud and Abuse Act.

अज्ञातवासी , हा विषय इथे नको म्हणून तुम्हीच तो वाढवताय असं नाही वाटत?
वर अ‍ॅमींच्या शेवटच्या प्रतिसादानंतर जवळपास २४ तासांनी इथे यावर लिहू नका, असंही म्हणताय. आणि हा विषय पहिल्या पानावरच सुरू झालेला आहे.

तुम्ही स्वतः च्याच धाग्यावरचे प्रतिसाद नीट वाचलेले दिसत नाहीत.
पहिल्याच पानावर धारप कथा ऑनलाइन, फुकट असतील तर लिंक द्याव्यात अशी एक सूचना / विनंती आलेली आहे.
त्यावर मराठी साहित्य विकत घेऊन वाचलं जावं असा एक मुद्दा आला.
यावर अ‍ॅमीं चा मुद्दा आहे की मुळात धारपांनीही कोणाचं कॉपी करून, श्रेय न देता , परवानगी न घेता , प्रेरणा घेऊन, रूपांतरित केलं असेल तर त्यांना (त्यांच्या वारसदार - प्रकाशकांना) अशा पायरटेड (ऑनलाइन फुकट) पुस्तकांवर आक्षेप घेण्याचा (नैतिक ?) अधिकार नाही.
म्हणजे इथे त्या अशी पायरटेड पुस्तकं वाचू इच्छिणार्‍यांच्या बाजूनेच बोलत आहेत.

भरतजी तुम्ही माझा एमिला दिलेला आधीचा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाहीये.

@ॲमी - माफ कर पण हा धागा नारायण धारपांची पुस्तके कशी वाटली, त्याविषयी विचार मांडण्यासाठी आहेत. किंवा समीक्षण करण्यासाठी. सुरुवातीला ते कॉपीराईट वगैरे विषयाला धरून वाटलं, पण आता तेच तेच बघून धाग्याचा मूळ गाभा हरवत चाललंय असं वाटतंय.
तू कॉपीराईट इशुसाठी वेगळा धागा का काढत नाहीस? तिथे तुला धारप काय, सगळ्या लेखकांची चर्चा करता येईल.
Submitted by अज्ञातवासी on 17 October, 2019 - 07:30

यातून मी आधी का काही बोललो नाही, हे स्पष्ट ध्वनित होतंय असं वाटतंय.
दुसरी गोष्ट म्हणजे, म्हणजे मी धाग्यावर २४ तास खरंच लक्ष ठेवू शकत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रतिसाद टाकतो
एमिजीनी २४ तासानंतरही प्रतिसाद लिहिलेला दिसतोय. पण असो, धाग्याचा तो विषय नाही.
आणि जरी एक मत आलं, तरी त्यावर प्रवाद न करता विषय थांबवता येतोच की.

नोप्स. पायरेटेड पुस्तक वाचणारे कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हेगार नाहीचेत हे सांगतेय.
>>>>>>>>
To be precise, नारायण धारपांची पायरटेड पुस्तके वाचणारी मंडळी कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हेगार नाहीयेत असं तुला म्हणायचंय का?
की उद्या कुणी The Circe टोरेंटवरून डाउनलोड केलं तरी तुझं हेच मत असेल???

आता यावरही मला मुद्दा कळलेला नाही का?
Still it's fine. पण कुणाला चोर ठरवताना, गुन्हेगार ठरवताना (धारप आणि प्रकाशक) ते प्रुव्ह करण्यासाठी कायदेशीर सन्मार्गही वापरायला हवा की नाही.
पण खरंच, आता मीच स्टॉप करतो, आणि स्वाहाच्या हाफ पुस्तक परिक्षणावरून मूळ धाग्यावर येतो.

स्वाहा - अर्धपुस्तक परीक्षण!

स्वाहा हे पुस्तक मी it वरून बेतलंय, या भ्रमात होतो. पण ते शपथ आहे असं कळलं. आता ३० ३५ पाने वाचून झाल्यावर मागे फिरणं शक्य नाही, म्हणून पुढेच चालत राहिलो.

स्वाहा हे मलातरी आतापर्यंत वाचलेल्या सगळ्या पुस्तकांमधील एक वेगळंच पुस्तक वाटतंय. स्वाहामध्ये धारपांनी एक वेगळाच प्रयोग केलेला दिसतोय. म्हणजे बाकीच्या पुस्तकात तरी २० २५ पानातच मुख्य विलन कोण आहे, कसा आहे, त्याची कल्पना येते. मात्र स्वाहा अर्ध वाचून झालं तरी लुगड्यावली बाई आणि फेट्यावाला माणूस यापुढे मलातरी काही समजलं नाही.
अजून एक प्रयोग म्हणजे, सुरुवातीलाच ज्या व्यक्तिरेखा victim ठरणार आहेत, त्याविषयी नकारात्मक मत बनतं. (की बनवण्याचा प्रयत्न केलाय?)
स्वाहामध्येही काही दचकवणारे पॉईंट आहेत. उदा. सुनीलला झोपवताना विनिता गुड नाईट म्हणण्यासाठी त्याच्यावर वाकली, नशीब त्याचे डोळे बंद होते, पण तिची आकृती बघून नक्कीच तो घाबरला असता. इथेच आपली कल्पनाशक्ती नेमकी कशी आकृती होती, ते शोधू लागते.
आतापर्यंत तरी मला वेगळेपण जाणवतंय, बघूयात पूर्ण पुस्तक वाचल्यावर काय होतंय ते.

जाऊ द्या भरत कुठे या डुआयड्याच्या नादी लागलाय. जर याची पोलखोल नसती केली तर तर आतापर्यंत महाश्वेता या डुआयडीने तुम्हाला उलट सुलट बोलला असता.

स्वाहा सॉलिडच आहे.
ती भीती वाचताना पसरत जाते.अगदी शेवट च्या क्षणापर्यंत.
स्वाहा काय, लुचाई काय,सैतान काय सावकाश बसून शेवट पर्यंत वाचायची आणि दृश्यं डोळ्यासमोर आणायची पुस्तकं आहेत.
सैतान मधल्या बिहारीलाल बाहुलीवाला ला मी डोळ्यांनी रेल्वे लाईन क्रॉस करून गाडीत चढताना बघू शकते.पुस्तक वाचून 25 वर्षं झाली असतील.
तसंच किंग च्या सालेम्स लॉट मध्ये कोरे एक्सप्रेशनस वाला फादर कॉलाहान एका निर्मनुष्य गावात अंधाऱ्या रात्री 'कोणत्याही बस चं शेवटच्या ठिकाणापर्यंतचं तिकीट' मागताना कसा दिसत असेल तेही.

सप्रस पोराचा जीव घेणार का आता . माफ करून टाका की .
इथे तरी अज्ञात यांचा मुद्दा बरोबर वाटत आहे . अँमी उगाच वाद घालतायत .
मश्वेता आयडी उडवला गेला का ?

आताच 'स्वाहा' वाचून झालं.
एकाच शब्दात सांगायचं झालं, तर 'अप्रतिम!!!!!'
श्रीधरची बहीण विनिता अमेरिकेहून येऊन एका बंगल्यात पती यशवंतराव व मुलगा सुनील यांच्याबरोबर राहायला जाते. तिथे सुनीलचा रहस्यमय मृत्यू होतो, व विनिता आणि यशवंतराव गायब होतात.
श्रीधर या सर्व प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करतो, आणि समोर येते एक वर्षानुवर्षे चालत आलेली अमानवीय मृत्यूची साखळी.
स्वाहा खरंच वेगळं पुस्तक आहे. या पुस्तकात भीतीचा चेहरा समोर येत नाही, अगदी शेवट शेवट पर्यंत येत नाही, मात्र तिची छाया पुस्तकभर जाणवत राहते. इथे दृश्य स्वरूपात काहीही समोर येत नाही, पण ते आहे, याचा परिणाम पुस्तकभर जाणवतो.
स्वाहा मध्ये धारपांनी कुठेही घाई केलेली नाहीये, सुरुवातीला एक भीतीचा अंश मनात शिरतो, आणि हळूहळू तो शेवटाला अवकाश व्यापून टाकतो. शेवटाला क्षणक्षणाला काळजाचा ठाव चुकतो.
माणसाला दृश्य भीतीपेक्षा अदृश्य, ठाव न लागणाऱ्या गोष्टींचीच भीती जास्त असते, हे स्वाहाने माझ्यासाठीतरी सिद्ध केलंय.
रेटिंग - ★★★★★★

अवांतर:
स्वाहाच्या शेवटी शेवटी 'काजळमाया' शब्द आला, आणि खरंच मन हलल्यासारखं झालं.
आता सर्व सोडून काजळमाया वाचायला बसतो.
शेवटी दैवताला विसरून भागत नाही.

यावर अ‍ॅमीं चा मुद्दा आहे की मुळात धारपांनीही कोणाचं कॉपी करून, श्रेय न देता , परवानगी न घेता , प्रेरणा घेऊन, रूपांतरित केलं असेल तर त्यांना (त्यांच्या वारसदार - प्रकाशकांना) अशा पायरटेड (ऑनलाइन फुकट) पुस्तकांवर आक्षेप घेण्याचा (नैतिक ?) अधिकार नाही.

यावरच मी लिहिलं आहे की लीगली हा युक्तिवाद चालणार नाही. त्यासाठीच हाऊ आय मेट युअर मदर मालिकेचं उदाहरण दिलं- कॉपी असूनही त्या कंटेंटचं फुकट स्ट्रीमिंग करता येत नाही. तसंच सत्यघटनेवर आधारित किंवा ऐतिहासिक पुस्तक/मुव्हीबद्दलही असं म्हणू शकत नाही की सगळ्यांना माहित असलेलीच गोष्ट तुम्ही सांगताय तर कंटेंटवर तुमचा अधिकार काय.
असोच. विषयांतराबद्दल क्षमस्व.

धागा वाचत आहे पण भयकथा फार आवडीचा प्रकार नसल्यामुळे धारप वाचलेले नाहीत.

Pages