नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लहान पणा पासून फोन वर किंवा ऑनलाइन पुस्तके येइ परेन्त कागदी छापलेलीच मासिके पुस्तके वाचलेली आहेत सो आय अँम डन विथ पुस्तका चा वास वगैरे. जन संपर्क व्हावा व नवी पुस्तके विकत घ्यायला लागून नयेत म्हणून इथेच ज्येना लाय ब्ररी लावली. पण कामाच्या धबडग्यातून तिथे जायला वेळ मिळत नाही. तिथे एक भलामोठा जिना व टायमिंग वगिअरे वेळेत परत नाही केले तर फाइन. मग तीन महिन्यात ते नाटक बंद केले. वरील सर्व पुस्तकांच्या हार्ड कॉपी आहेत पण इथे वाळवीचा खूपच प्रोब्लेम आहे. पुस्तकांना कपड्यांना चट कन वाळ वी लागते त्यामुळे हार्ड कॉपी पुस्तके, व संगीत ( सीडी कॅसेट स्वरुपातले) हे जसे ऑनलाइन उपलब्ध होउ लागले तस तसे फिझिकल वस्तु संग्रह फार कमी करत आणला आहे. आपल्या माघारी फार आवरायला लागू नये हे पण एक कारण आहे. त्यामुळे किंडल वर धारपांची पुस्तके मिळणे माझ्या साठी एक सुखद धक्का होता. मी एकेकच घेत आहे. पुरवून पुरवून वाचणे ह्या साठी. जी एंचे काजळ माया पण आहे पण डालो होत नाहीये. मराठी सेक्षन मध्ये ग्रेट लेखक मध्ये सुधा मुर्ती पहिल्या क्रमांकावर बघितल्यावर कपाळ बडवती योग झाला. मग मेहता प्रकाशनाची अनुवादित पुस्तके. ही तर कुठेही भाराभर असतातच.

नवे लेखन ट्राय करताना रिव्यु वाचूनच पैसे टाकते. एक ब्रीफिन्ग म्हणून अ‍ॅप आहे त्यात बुक सेक्षन मध्ये चांगले रिव्यु असतात. फुक ट मिळालेले मला काही लाभत नाही त्यामुळे परवडेल तेच करते.

धारपांची पुस्तके फिल्मीकरण करायला मला पण आवडेल. मी स्क्रिप्टिं ग डोक्युमेंटरी लेखनात काम केल्याने कोनते पण कथानक मी आटोमाटिकली हं ऑडिओ व्हिज्युअल असा ब्रेक अप करून रंग भरू लागते. गौरी देशपांड्यांच्या कथा पण अशाच कोणीतरी सीरीज करण केले पाहिजे हे मा वै म.

लुचाई हा शब्दच मला जरा लाडीक वाटतो. व्हेंपायर चा डेडली भयानक पणा त्यात नाही. बाकी कथे बद्दल काही ऑब्जेक्षन नाही.

भुकेली रात्र आताच वाचून संपवली. हा एक कथासंग्रह आहे.
१. भुकेली रात्र - मदनला बोलवणाऱ्या समुद्राची कथा. मानवी मनाचा ठाव त्याला त्याच्या मुळांपर्यंत कसा घेऊन जातो याची कथा. प्रचंड बोरिंग वाटली.
रेटिंग -★ एक
२. शाप - अप्रतिम भयनिर्मिती आणि वातावरणनिर्मिती, मानवाच्या श्वापदी रूपांतरणाला दिलेली विज्ञानाची जोड.
रेटिंग -★★★★★ पाच
३. कवटीतला कैदी - एक वेगळीच कथा, एका जोडप्याचा अंतर्गत संघर्ष, आणि उलगडत जाण्याऱ्या नात्यांच्या खपल्या, आणि भयाण शेवट.
रेटिंग - ★★★★★ पाच
४. त्रिकोण -
मानवी नातेसंबंधांचा एक वेगळाच त्रिकोण. रूढ अर्थाने भयकथा नाही.
रेटिंग -★★★
५. तीस वर्षांपूर्वी -
एक भयकथा, आणि तिला दिलेली विज्ञानाची जोड. अप्रतिम
रेटिंग -★★★★

माणकाचे डोळे पेक्षा हा कथासंग्रह मला जास्त आवडला.

पुढील पुस्तक कोणतं घ्यावं कळत नाहीये.

उत्तररंग नावाचे एक पुस्तक आहे धारपांच, आजिबात भयकथा वगैरे नाही तर एकट्या जेष्ठ नागरिकांचा विवाह अशी संकल्पना आहे

@Shraddha , काळगुंफा कुठे मिळालं? ते तर out of print आहे ना? मला प्लिज प्लिज नक्की सांगा. मला वाचायचंय हे पुस्तक.

दस्त वाचताना आतापर्यंत मला सगळ्यात जास्त भीती वाटली असेल. एक वेगळंच वातावरण दस्त निर्माण करते, पण एकसंध परिणाम जाणवत नाही.
गोविंदराव आणि गोडे गुरुजीमधील द्वंद्व जबरदस्त रंगलय...

रेटिंग - ★★★★

थांबा थांबा लवकरच अद्यातवासी येतील आणि तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं ते सांगलीत. त्यांच्या लॉगीनला प्रॉब्लेम असेल तर महाश्वेता ताईंना ते मेसेज करतील मग त्या तो मेसेज इथे सांगतील.

अमा मी काळी जोगतीण वाचलंय पूर्वी, त्यामुळे सगळ्यात शेवटी ते वाचायला ठेवलंय.
४४० चंदनवाडी चांगलं वाटतंय, ते वाचायला घेतो.

अनाहूत...
हा नारायण धारपांचा कथासंग्रह आहे.....
एकुण आठ कथा आहेत.....

रेटींग - ***

Rmd मोहिनी या कथासंग्रहात काळगुंफा नावाची कथा आहे पण तीच ती का माहीत नाही मुळात काळगुंफा कादंबरी आहे की कथासंग्रह माहीत नाही .. जर कथासंग्रह असेल तर ही तीच कथा असू शकते कदाचित .

पण धारप वाचण्याचे एक वय असते. नंतर ती पुस्तके फारशी आकर्षीत करत नाहीत. मी धारपांचे एक पुस्तक वाचून इतका भारावलो >>> मनकी बात , शाली!

मोठा हात मारला सप्रस .>>>>> धारप आले धावून मदतीला नाहीतर एव्हडं मोठं गूढ कुठे उकललं असतं. Rofl

४४० चंदनवाडी -
हे पुस्तक आताच वाचून संपवलं, आणि बिलीव मी, हे धारपांच्या वाचलेल्या सगळ्या पुस्तकांपैकी सर्वोत्कृष्ट असेल, असं मला तरी वाटतंय.
४४० चंदनवाडी ही रूढ अर्थाने क्षणाक्षणाला जंप स्केर टाकून घाबरवणारी भयकथा नाही. यात जुने पडके वाडे, विहिरी वगैरे काहीही नाही. यात क्षणाक्षणाला आसपास वावरणारी भीती नाही.
ही कथा शहरातच घडलीये, तीही एका प्रशस्त बंगल्यात. आणि सदावर्ते नावाचे एक गृहस्थ त्या बंगल्यात राहत असतात, त्यांच्या मुलीला त्या बंगल्यात गेल्यावर एक अमानवीय अनुभव येतो, आणि तिथून सुरू होते एक साखळी, अशी साखळी, की जिने अनेक घरांना ग्रासलेलं असतं.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कुणी अमानवीय व्यक्तीरेखा नाही, तर एक नकारात्मक ऊर्जा अथवा शक्ती आहे, आणि ती शक्ती या घरातच बांधली गेली आहे. तसेच या कथेला कुणी एकमेव हिरोही नाही. इथे ह्या सगळ्या साखळ्या जोडणारा गौतम, मांत्रिक कल्हार, वज्रे गुरुजी, सगळेच हिरो आहेत.
ही कथा काहीशी संथगतीने चालू होतं असली, तरीही प्रत्येक गोष्टीमागची वैज्ञानिक कारणमीमांसा करत एका अत्युच्च शेवटाला पोहोचते.
इतकं भारी पुस्तक सुचवल्याबद्दल प्राचीन यांचे आभार, आता त्यांनीच सुचवल्याप्रमाणे अकल्पित शोधतो. Lol
रेटिंग - ★★★★★★

Btw कुणाला त्या गोष्टीचे नाव माहीत आहे, ज्यात तळघरातील पिंजर्‍यात एक म्हातारा असतो?
मला नाव आठवत नाहीये.

Btw कुणाला त्या गोष्टीचे नाव माहीत आहे, ज्यात तळघरातील पिंजर्‍यात एक म्हातारा असतो?
मला नाव आठवत नाहीये.

नवीन Submitted by @Shraddha on 15 October, 2019 - 22:13>>>>>>>
यो अस्मान द्वेष्टी नाव आहे त्या कथेचे बहुतेक..

Pages