नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

FORWARD:

नारायण धारप यांच्या एकूण प्रकाशित कादंबर्‍यांची यादी.
या यादीत नारायण धारप यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबर्‍यांची संपूर्ण यादी द्यायचा प्रयत्न केला आहे. ही यादी ९९% पूर्ण आहे. जर काही नावे नजरचुकीने वगळली गेली असतील तर कळवावे. ती नावे यादीत समाविष्ट केली जातील.
(समर्थ सिरीज मधील कादंबर्‍यांची नावे या यादीत नाहीत)
याच बरोबर धारपांनी एक नाटक लिहिले होते ज्याचे नाव ‘ चोवीस तास’ हे आहे. हे नाटक त्यांच्याच ‘उभे आडवे धागे’ या कादंबरीचे नाटकात केलेले रुपांतर आहे.
नारायण धारप यांच्या कादंबर्‍या

१. ४४० चंदनवाडी (भय)
२. आनंदमहल (भय)
३. चेटकीण (भय)
४. चंद्राची सावली (भय)
५. चंद्रविलास (भय)
६. दस्त (भय)
७. देवाज्ञा (भय-रहस्य)
८. काळी जोगीण (भय)
९. कुलवृत्तांत (भय)
१०. लुचाई (भय)
११. मृत्यूद्वार (भय)
१२. नवे दैवत (भय)
१३. न्यायमंदिर (स्वैर कल्पनाविलास (फॅंटसी)
१४. परिसस्पर्श (भय)
१५. प्राध्यापक वाईकरांची कथा (भय)
१६. रावतेंचा पछाडलेला वाडा (धनंजय २०१० दिवाळी अंक) (भय)
१७. स्वाहा (भय)
१८. सैतान (भय)
१९. संक्रमण (भय)
२०. शपथ (भय)
२१. शोध (भय)
२२. वेडा विश्वनाथ (भय)
२३. अमृत झाले जहराचे (विज्ञानिका)
२४. अरिष्ट अंगारक (विज्ञानिका)
२५. अवकाशाशी जडले नाते (विज्ञानिका/ अनुवाद)
२६. ऐसी रत्ने मेळवीन (विज्ञानिका)
२७. बहुमनी (विज्ञानिका)
२८. द्वैत (विज्ञानिका)
२९. जिद्द (विज्ञानिका)
३०. कपटी कंदार (कुमार साहित्य/ विज्ञानिका/भय-रहस्य)
३१. कंताचा मनोरा (विज्ञानिका)
३२. काळगुंफा (विज्ञानिका/भय-रहस्य)
३३. मृत्यूच्या सीमेवर (विज्ञानिका)
३४. नेनचिम (विज्ञानिका)
३५. पाठलाग (विज्ञानिका)
३६. साठे फायकस (विज्ञानिका)
३७. सुवर्णाचे विश्व (विज्ञानिका)
३८. स्वप्नमोहिनी (विज्ञानिका)
३९. अंगारिका (भय)
४०. फ्रॅंकेन्स्टाईन (विज्ञानिका/ अनुवाद)
४१. वासांसि नूतनानी (भय-रहस्य)
४२. युगपुरूष (विज्ञानिका)
४३. विश्वसम्राट (विज्ञानिका)
४४. सरिता (सामाजिक)
४५. कात (सामाजिक)
४६. छाया (सामाजिक)
४७. कृष्णा (सामाजिक)
४८. शिवराम (सामाजिक)
४९. देवकी (सामाजिक)
५०. उत्तररंग (सामाजिक)
५१. उभे आडवे धागे (रहस्य)
५२. काळोखी पौर्णिमा (रहस्य/थरार)
५३. बहुरूपी (रहस्य/थरार)
५४. ग्रहण (कूट)
५५. गोग्रॅमचा चितार (चितार आणि पुनरागमन एकत्रित) (कुमार साहित्य/ विज्ञानिका)
५६. चक्रावळ (विज्ञानिका)
५७. दुहेरी धार (भय-रहस्य)
५८. विधाता? आणि महावीर आर्य (विज्ञानिका/भय-रहस्य)
५९. पानघंटी (भय-रहस्य)
६०. चेतन (चक्रवर्ती चेतन आणि कर्दनकाळ चेतन) (रहस्य/थरार)
६१. कृष्णचंद्र (झपाट आणि अझाथोथ) (भय)

माटी कहे कुमहारको हा एक कथासंग्रह आहे, आणि हा मला आतापर्यंत वाचलेल्या कथासंग्रहामध्ये बेस्ट वाटला.

१. भारलेले घर - अंजली तिच्या आजीच्या घरात राहायला येते, आणि विचित्र घटना घडतात. सोबतच समोर येतं एक रहस्य!!
रेटिंग - ★★★★1/2

२. दगडखाई - जनार्दन शिरवेच्या वडिलांचा लहानपणी रहस्यमय मृत्यू होतो, आणि तेच रहस्य आता त्याची पाठ सोडायला तयार नसतं.
रेटिंग -★★★★★

३. बंद दार - अप्रतिम! यशोदाबाई व तिच्या पतीची कथा. सायकॉलॉजीकल थ्रिलर
रेटिंग -★★★★★★

४.घसरण - कमलाबाईना होणारे भास आणि त्यावर कमलाबाईची प्रतिक्रिया
रेटिंग - ★★★★★

५.काचेचा पिंजरा - अजून एक मास्टरपीस! सायकॉलॉजीकल थ्रिलर! नरहर शेवडे एका काचेच्या चित्रात गुरफटत जातो.
रेटिंग - ★★★★★★

६. भ्रांती - एक वेगळीच कथा, एका व्यक्तीचं विचारमंथन.
रेटिंग -★★★★★

७. कॅमेराच्या लेन्समधून - एका फोटोची कथा
रेटिंग -★★★★★

८. जहागीरदारांचा वाडा - वाड्याची आणि त्याच्या मालकिणीची कथा
रेटिंग - ★★

९. माटी कहे कुमहारको - अनुने शरदचा घेतलेला अमानवीय बदला. क्लास
रेटिंग -★★★★★★

ओव्हरऑल रेटिंग - ★★★★★ (जहागिरदारांच्या वाड्याने भ्रमनिरास केला तरी.)

कोणी ग्रहण नाही का वाचत?
मी नारायण धारपांचं एवढं एकच पुस्तक वाचलंय. तेही ती मालिका पाहिल्यावर. पुस्तकाबद्दल काही आठवत नाही. मालिकेच्या धाग्यावर लिहिलं असेल.

मालिका बघून ग्रहण वाचायचं मन होत नाहीये, म्हणून ती सगळ्यात शेवटी वाचेन.
आता चंद्राची सावली वाचायला घेतलंय.

माटी कहे हा जबरदस्त संग्रह आहे.बंद दार ही एकाचवेळी पथेटिक आणि जबरदस्त कथा आहे.
ग्रहण ही एक गुडीगुडी समांतर विश्व कथा आहे.पण मालिकेमुळे आवडू शकते वाचायला.

@मी अनु - बंद दार या कथेतून एक जबरदस्त सायकॉलॉजीकल थ्रिलर तयार होऊ शकेल. या कथेने सुरुवातीपासून जी पकड चित्रपट घेतली, ती शेवटपर्यंत सुटली नाही. (वाचताना न जाणे का, हिचकॉकच्या सायकोची पुसटशी आठवण आली.)

चंद्राची सावली वाचतोय. काळगुंफा नंतर गोसावी हवालदार जोडीची ही दुसरी कथा. (प्रीक्वेल?)

अज्ञा , तुम्हाला विपु केलाय. वाचा

बादवे, स्पन्दन ऑनलाईन दिवाळी अन्कात एका अज्ञातवासीने नारायण धारपान्वर आधारित लेख लिहिलाय. अजून वाचला नाहीये. ते तुम्हीच आहात का?

धारप पुर्वी कधी वाचले नव्हते, पण ग्रहण शिरेल आल्यापासुन काही पुस्तके वाचली त्यांची, जसे ग्रहण, चेटकीण, शपथ अन कृष्णचंद्र. बरी वाटली, शपथ अन चेटकीण बर्यापैकी आवडली सुद्धा. मग शिरेल संपली अन धारप वाचायची ईच्छा सुद्धा.

अज्ञातवासींचा हा धागा वाचुन परत एकदा धारपांची पुस्तके वाचाविशी वाटली अन म्हणुन ७ पुस्तके किंडलवर विकत घेतली पण.

त्यापैकी ४४० चंदनवाडी अन स्वाहा वाचुन झाली. दोन्ही छान आहेत पण मला स्वाहा जास्त आवडली, बर्याच जागी स्वाहा वाचताना असे वाटते की श्रीकांत असे का वागतोय, असे का करत नाही अन बरच काही. तरी सुद्धा ते पुस्तक मला खुप खुप आवडले ( ते वाचायच्या नादात दोन स्टेशन पुढे जाऊन परत यावे लागले तरीसुद्धा Proud )

अज्ञातवासी , छान आहे हा धागा. ह्या धाग्याबद्दल अन तुम्ही मला दिलेल्या काही धारप पुस्तकांसाठी आभारी आहे Happy .

मीही या धाग्यामुळे धारपांची चेटकीण, स्वाहा आणि लुचाई ही पुस्तकं किंडलवर विकत घेऊन वाचली. चेटकीण आणि स्वाहा आवडली. लुचाई काही काही ठिकाणी जरा कृत्रिम वाटलं.

@VB - धन्यवाद. माझी ग्रहण सिरीयल बघूनच पुस्तके वाचायची इच्छा गेली होती, पण आता वाचतोय. ग्रहण वाचेन तर सगळ्यात शेवटी वाचेन.
440 चंदनवाडी आणि स्वाहा माझ्या ६ स्टार रेटिंगची पुस्तके आहेत.

@वावे - धन्यवाद. लुचाई कृत्रिम वाटण्याच कारण माझ्या मते vampire ही संकल्पना असू शकते, जी मुळात भारतीय नाहीये.
स्वाहा आणि चेटकीण तर जबरदस्त आहेत....

चंद्राची सावली -

चंद्राची सावली हे छोटेखानी पुस्तक संपवायला मला बराच वेळ लागला, कारण म्हणजे can't get connected. बे पुस्तक वाचताना मी कुठेही याच्याशी रममाण झालो नाही, किंवा भीती म्हणावी अशी वाटली नाही.
ही कथा गोसावी व हवालदार यांची आहे, जे छतारिया इस्टेटवर कामाला जातात. तिथे त्यांचा एका अमानवीय शक्तीशी सामना होतो.
या पुस्तकात भीती आहे का? तर आहे. पण खरं सांगायला गेलं तर वर्णनांचा अतिरेक, जो धारप कधीही करत नाहीत, तो इथे झालाय. प्रत्येक गोष्ट इतकी डिटेलवार समोर येते, की त्यांची कल्पना करण्यात मजा निघून जाते. आणि सामनाही एकतर्फी होतो.
हे एक सपाट पुस्तक आहे, भीतीदायक तर आहेच, परंतु नावीन्य बिलकुल नाही.
रेटिंग -★★

दरवाजे हा कथासंग्रह वाचला. भारी आहे.

ताईत - एक चांगली कथा, एक ताईत माणसाच्या तीन कथा पूर्ण करतो, मात्र कशा रीतीने, ते सांगता येत नाही.
★★★

मध्यस्थ - जबरदस्त! मानवी भावभावनांच्या गुंत्याचा खेळ, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अमानवीय गोष्टी. अजूनही मला शकूविषयी वाईट वाटतंय.
★★★★★★

दरवाजे - जबरदस्त सायकॉलॉजीकल थ्रिलर! देशमुखांचा दरवाज्यातून होणारा प्रवास आणि त्यांचा शेवटी होणारा निर्णय
★★★★★★

चुकलेली वाट - सरळधोपट, जुन्या अमानवीय ग्रंथांच्या अभ्यासाने होणारा परिणाम.
★★★

एक बहुरूपी नावाचे पुस्तक किंडल वर घेतले होते. हे नुसती रहस्य कथा आहे. पन अतिशय सुमार दर्जाची आहे. साधी शैली आहे. एक ही ट्विस्ट नाही. फक्त एक गंमत . ह्यातले एक कॅरेक्टर पळून एका ठिकाणी जाते. तर हिरो त्याला शोधत तिथे जातो. हे एक साधे गाव आहे किरी म म्हणून. आपल्या राखेचा मधले घर आहे तसे. आणि तिथे एक पन्नाशीची बाई असते शेवंता म्हणून ती कथेतल्या राजेसाहेबांची मिस्ट्रेस!!! एकदम आकेरीतल्या शेवंताचा ओरिजिन सापडला त्यामुळे मजा वाटली.

मी हे बहुरूपी पुस्तक संपवायचे कश्ट पण घेतलेले नाहीत. माझ्यातर्फे अर्धा स्टार.

Happy Birthday अज्ञातवासी!!!
खूप दिवस वाचनमात्र राहिले, पण तू वर लिहिलेली बरीच पुस्तके वाचली आहेत.
तू अजून सैतान वाचली नसशील तर नक्की वाच! धारपांच बेस्ट वर्क आहे...

धारपांचे मला आवडलेल पुस्तक म्हणजे परिसस्पर्श.
एव्हडी वर्ष झाली वाचून पण अजून गारुड आहे.
पण परिसस्पर्श एव्हढ चर्चेत का नाही ?
तुम्हाला मिळाल तर वाचा आणि जरूर लिहा

समर्थ कथा अजून वाचल्या नसतील तर वाचा ... समर्थ धारपांचं सगळ्यात वाचकप्रिय पात्र आहे .. 3 मोठ्ठे संकलित कथासंग्रह पुन्हा नव्याने प्रकाशित झाले आहेत ..

हॅप्पी बर्थडे अज्ञा !!!! आणि पुस्तकान्बद्दल धन्स.

'अनोळखी दिशा' नावाने एक सिरियल आली होती महेश कोठारेची स्टार प्रवाहवर. धारपान्च्या कथान्वर आधारित होती. पण फ्लॉप झाली होती

3 मोठ्ठे संकलित कथासंग्रह पुन्हा नव्याने प्रकाशित झाले आहेत >>> राधानिशा, प्लीज नावं सांगाल का?

धारपान्च्या कथान्वर आधारित होती. पण फ्लॉप झाली होती >>> माहिती बरोबर आहे पण खरी गोष्ट अशी आहे की अगदी थोड्याच कथा धारपांच्या वापरल्या त्यात. बाकी सगळ्या कोठारेच्या होत्या. शिवाय टेकिंग भंगार होतं. फ्लॉप होईल नाहीतर काय! Proud

रत्नाकर मतकरींंच्या कथांवर आधारित गहिरे पाणीचे सगळे एपिसोड झी मराठी युट्यूब चॅनेलने हल्लीच अपलोड केले आहेत .. खूप ग्रेट नाही - त्याकाळचं तंत्रज्ञान लक्षात घेता .. पण मतकरींनी स्वतः दिग्दर्शित केले असावेत किंवा पार्शली सहभाग असावा कारण ते दर एपिसोडच्या सुरुवातीस 2 ओळीत कथेची ओळख करून देतात ... त्यामुळे महेश कोठारेंनी जे भंगार दिग्दर्शन केलं आहे त्याहून हजारपट चांगले आहेत . मराठीतील प्रसिद्ध कलाकारांनी कामं केली आहेत .

रत्नाकर मतकरी उत्तम लिहितात.
त्यांचे 'निजधाम' वाचले. काय कथानक.... काय लिखाणशैली...... अप्रतिम! मस्त!
अगदी खिळवून ठेवते ते पुस्तक वाचकाला! Happy

@वेडोबा - अनोळखी दिशाचे तीन खंड आहेत, त्यामुळे ते उशिरा वाचेन. धन्यवाद!
@श्रद्धा - थँक्स! Happy
@अमा - बहुरूपी वाचणार होतो, पण आता वाचायचं की नाही या संभ्रमात पडलोय! तरीही वाचेनच! Happy
@श्वेता - थँक्स Happy (तुला मेल केलाय) सैतान सगळ्यात शेवटी वाचणार आहे, कारण तिची महती खूप ऐकलीय!
@पॅपिलॉन - थँक्स! परिसस्पर्श नक्की शोधून वाचेन!
@ राधानिशा - समर्थ, अनोळखी दिशा आणि सैतान हे सगळ्यात शेवटी वाचायला ठेवलेत. उत्सुकता म्हणून!!!
बादवे जयदेव, गोसावी आणि महंत समर्थांएवढे फेमस दिसत नाहीत.
@सुलू ८२ - धन्यवाद! आणि आभार काय?? इट्स माय प्लेजर!
@rmd - कोठारे, कुठे फेडाल हे पाप! Happy
मात्र धारपांच्या साहित्यावर मालिका/चित्रपट।बनवणं खरंच अवघड आहे. कारण म्हणजे धारपांनी काही कथांमध्ये अशी काही सिच्युएशन निर्माण केलीये, की ती आपण ठरवूनही डोळ्यासमोर आणू शकत नाही.
उदा. दंडी, तळघरातला म्हातारा वगैरे!!!!
गहिरे पाणी बघावी लागेल.
@मधुरा - निजधाम शोधावी लागेल!!

तळघरातला म्हातारा सुहास भालेकरांनी छान साकारला असता ते असते तर , असंभवमध्ये सोपान आजोबा हे पात्र साकारलं आहे त्या धर्तीवर .. आणि थोडासा मेकअप आणि स्पेशल इफेक्ट्स अर्थात ..

राधानिशा, तो म्हातारा मला खूपच आधी सापडला होता. आणि त्याने लहानपणी माझी बरीच रात्रे झोप उडवली होती.
खाली पोस्ट केलेली चित्रे एका खरया व्यक्तीची आहेत.
IMG_20191031_010407.jpgIMG_20191031_010123_0.jpgIMG_20191031_012252.jpg

Pages