नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! अंजली पुस्तक वाचून नक्की तुमचे विचार कळवा.
आता शपथ वाचतोय. Feeling excited.
It आणि शपथचं कंपारीजन नक्की करेन!

दस्त आजच आणली होती ग्रंथालयातून.....
आजच संपवली पण.....
भारीये एकदम.....

पुस्तकांच्या हार्ड कॉपी घेणे चार वर्षांपुर्वीच बंद केले आहे त्यामुळे धारप किंडलवर शोधले. अनेक पुस्तके मिळाली नाहीत. मिळतील ती किंडलवर व जी मिळणार नाही ती मित्राकडून घेणे काही पटले नाही. त्यामुळे सगळीच मित्राकडून घेतली. त्याने जवळ जवळ ३५ पुस्तके टेलेग्रामवर पाठवलीत. आजपासुन वाचायला सुरवात करेन. सुरवात 'ऐशी रत्ने मेळवीन' या पुस्तकाने करेन व येथे अभिप्राय देईन.
(पुस्तकदाता सुखी भव!)

@मी अनामिक - दस्त छोटीशीच आहे, पण भारीच आहे. तुम्हीही वाचताय ऐकून मस्त वाटलं.

@अप्पा, तुम्हाला खजिनाच मिळाला. मला एखादं सापडलं नाही तर नक्की कळवेन. आणि तुम्ही नक्की अभिप्राय लिहा.

पुस्तकाचे नाव -
प्रकाशन वर्ष -
पृष्ठसंख्या -
वाचल्याची तारीख -
रेटिंग -
(हरकत नसेल तर या सगळ्यापुढे कंसात स्टिफन किंगच्या पुस्तकाबद्दलची तीच माहिती)
विचार/समीक्षा -

अशा एका स्टँडर्ड फॉरमॅटमधे आतापर्यंतचे आणि यापुढचेदेखील सगळे प्रतिसाद मूळ धाग्यातच अपडेट कर आणि महिना संपला की दुसरा धागा काढ (तुला योग्य वाटत असेल तर).

गटणेबद्दल माहित नाही>> यहीं तो मार खा गया इंडिया.... आता हा संवाद कोणाचा आहे ते विचारू नका. बाफ काढायचे मार्क पण जातील.

गटणेबद्दल माहित नसल्यामुळे इंडियाने मार खाल्ला?
की गटणे स्टायलचा वापर करून गुडरीड्ससारखी साईट काढण्याऐवजी गटणे म्हणून हिणवत बसल्याने मार खाल्ला? Lol

जे काय आहे ते असो. आता थांबते. नाहीतर धागाकर्ते परत मला कोर्टात जा म्हणतील Wink

गटणे म्हणून हिणवत बसल्याने मार खाल्ला>> अहो पहिल्या पासून हिणवले नाहीचे. असे एक्सेल शीट मधले परीक्षण हे सेम टू सेम त्याने केले होते तसे आहे. इतकेच लिहीले आहे. तलवार म्यान करून ठेव बरं

एमी तुला कोणत्याही कारणावरून कशाला मी कोर्टात जायचा सल्ला देईन? असं झालं तर तू मलाच कोर्टात खेचशील. Wink
असो, तुझा फॉरमॅट नक्कीच चांगला आहे, आणि खरंच अशा रीतीने डॉक्युमेन्टेशन झालं तर खरंच वाचकांनाही सोयीचं होईल, म्हणून ते केलं तर खरंच मस्त होईल.

अज्ञातवासी, mi_anu,

Plz मेल चेक करा.

अवांतराबद्दल क्षमस्व!

@ॲमी - तुझ्या फॉरमॅटमध्ये लिहायला गेलो आणि मला परीक्षण जमलंच नाही, म्हणून माझ्याच फॉरमॅटमध्ये शेवटी लिहितोय.

शपथ या पुस्तकाचे परीक्षण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं, बऱ्याच कारणांमुळे! एकतर मला it या पुस्तकावर बेतलेला चित्रपट प्रचंड आवडला होता, आणि दुसऱ्या भागाने तेवढंच निराश केलं होतं.
दुसरं म्हणजे नारायण धारप आणि स्टीफन किंग यांच्या लिखाणात नेमकं काय साम्य आणि काय वेगळेपण आहे हे जाणून घ्यायचं होतं.
तर सगळ्यात आधी शपथच परीक्षण देतो, त्यानंतर it च, आणि शेवटी तुलनात्मक परीक्षण देतो.
पण त्याआधी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे.
शपथ it वर बेतलेलं आहे?
हो.
दोघांमध्ये जाणवण्याइतका साम्य आहे?
हो.
वर्ड टू वर्ड लाइन टू लाइन कॉपी केली आहे?
नाही.
धारप मराठीकरणात यशस्वी झाले आहेत?
पूर्णपणे.

शपथ -

स्वतंत्रपणे बघायला गेलं तर शपथ हे नारायण धारप यांच्या बऱ्याच पुस्तकांपैकी एक वेगळं पुस्तक. शपथ ही सात मित्रांची कथा आहे. (सहा मित्र आणि एक मैत्रीण) हे सर्व लोक मायगाव नावाच्या गावात राहत असतात, तिथे काही विचित्र घटना घडतात, आणि त्यांच्यासमोर एक वेगक्याच जगातील शक्ती येते.
शपथचा प्रवास दोन कालखंडात घडतो. बालपण, आणि त्यानंतर तारुण्य ओसरण्याचा कालखंड. मात्र या दोन्ही कालखंडाची दरी साधण्यात धारप पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. कुठेही आपण कथानकाशी डीस्कनेक्टेड होत नाही, कुठेही पुस्तक उत्सुकता कमी पडू देत नाही, आणि पुस्तकाचा वेगही कमी होत नाही. घटना पटापट घडत जातात. भय हा इलेमेंट धारपांच्या इतर कथांपेक्षा बराच कमी आहे, पण यातल्या थरारासाठी सर्वार्थाने योग्य अशी बांधणी धारपांनी केलीये.
रेटिंग : ★★★ 1/2

It

हे स्टीफन किंगचे चे पुस्तक. याची कथा सेम आहे. पण कथेची बांधणी जरा विस्कळीत आहे. पुस्तक एका संथ लयीत चालतं. किंगसाहेबांनी कुठेही घाई केलेली नाही, उलट पुस्तक जरा जास्तच रमतगमत चालतं. अजून एक गोष्ट म्हणजे डिटेलिंगचा अतिरेक. प्रत्येक गोष्टीच स्पष्टीकरण दिलंच पाहिजे, तिची माहिती दिलीच पाहिजे वा तिला स्पेस मिळालाच पाहिजे असा किंगचा अट्टहास वाटतो.
पुस्तकात थरार आहेच, आणि किंबहुना किंगने वाढत्या वयाच्या मुलांच्या भावविश्वला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यामुळे अश्लील वाटतील, इतकी वर्णने येतात. आणि काही तर अतिशयोक्तीपूर्ण वाटतात, आणि साडे अकराशे पाने वाचून माणूस पुस्तक खाली ठेवतो.

रेटिंग - ★★1/2

अमा Lol मला असं वाटलं की गटणे टर उडवून हसायला वापरला जातो.

अनु, हो गटणेबद्दल थोडीफार कल्पना आहे मला. पुलं, साहित्याशी एकनिष्ठ रहा वगैरे...

अज्ञातवासी, तुला जमेल तसं लिही रे. ती फक्त सुचवणी होती Happy
बादवे It मी अर्धवट वाचलं आहे. > पुस्तक जरा जास्तच रमतगमत चालतं. अजून एक गोष्ट म्हणजे डिटेलिंगचा अतिरेक. प्रत्येक गोष्टीच स्पष्टीकरण दिलंच पाहिजे, तिची माहिती दिलीच पाहिजे वा तिला स्पेस मिळालाच पाहिजे असा किंगचा अट्टहास वाटतो.> याच्याशी सहमत. एवढी हजार+ पानं वाचायचा पेशन्स असेल तर गॉन विथ द विंड, टॉल्स्टॉय वगैरेच वाचा सरळ.

थँक्स एमी. Happy

आता शपथ आणि it च्या तुलनात्मक परिक्षणाकडे वळूयात.

शपथ एक रोलर कोस्टर राईड आहे. इथे कुठेही धारप मुलांचं भावविश्व वगैरे रेखाटण्याच्या जास्त फंदात पडत नाहीत, आणि ते भयरसाशीच एकनिष्ठ राहतात. इथे क्षणाक्षणाला धक्के बसतात, फ्लो खालीवर होत राहतो आणि कुठेही मंदावत नाही. मात्र हे धक्के कोणत्या तीव्रतेने घ्यायचे, ते वाचकांच्या कल्पनाशक्तीवर ठरतं. धारप फक्त त्या अस्तित्वाची एक पुसटशी ओळख करून देतात, आणि मग आपल्या डोळ्यासमोर येतं काळं, तोंडाचा जबडा वासलेलं आणि पांढरशुभ्र धोतर नेसलेल 'ते.'

It मात्र एका संथ आगगाडीसारखं चालतं, ना कुठली घाई, ना कोणत्या निष्कर्षपर्यंत पोहोचण्याची उत्सुकता. मध्येच एखादं वळण येतं, चढउतार येतो, पण त्याचं इतकं अतिवर्णन होतं, की त्यातली उत्सुकता निघून जाते, आणि गाडी निवांत पोहोचते, तेव्हा प्रत्येकाला उतरण्याची घाई होऊन प्रवास संपला, असा सुस्कारा सोडला जातो.

शपथ कुणासाठी?
ज्यांना क्षणाक्षणाला धक्के हवेत, वेगवान कथानक हवंय, आणि फक्त भय अथवा थ्रिल हवंय.

It कुणासाठी?
एक तर भरपूर वेळ आहे, ज्यांना खोल तपशीलवार वाचण्याची आवड आहे, आणि ज्यांना अतिरंजित वर्णन आवडतात, त्यांच्यासाठी. तसंच लहान मुलांच विश्वही किंगने अप्रतिम रंगवलंय.

आता श्रद्धाने सुचवल्याप्रमाणे काळगुंफा सुरू करतोय.
त्यानंतर प्राचीन यांनी सुचवल्याप्रमाणे अत्ररचा फास चालू करेन.
थँक्स फॉर सजेशन!

शपथ च्या छानशा परीक्षणासाठी अज्ञातवासी तुमचं अभिनंदन.
"आपली शपथ आठवा, मायगावी परत या" हा निरोप म्हणजे एक थरारक साद आहे. अजुनही तिचा पडसाद मनात उमटतो आठवल्यावर. खरंच वाचनीय आहे शपथ.

धन्यवाद प्राचीन!
"आपली शपथ आठवा, मायगावी परत या" हा निरोप म्हणजे एक थरारक साद आहे. >>>>>
अगदी अगदी! त्यात एक जरब आहे, निर्वाणीचा इशारा आहे.

शपथ छान आहे माझ्याकडे आहे हार्ड कॉपी. त्यांचे एक म्हणणे मला नेहमी पटत आले आहे. लहान वयात किंवा फार फार पूर्वीच्या काळी अर्ली
हिस्ट री बॅबि लोनिअन संस्कृ ती, आफ्रिकन आदिवा शांची संस्कृती ह्यात भय हे नेहमी जास्त अनकं ट्रोल्ड होते व त्याला उत्तर म्हणून तयार केलेली दैवते पण तशीच सुपर पॉवर फुल होती.

एक त्यांची कथा आहे हिरवे फाटक म्हणून. ह्यात एक माणूस हिरवे फाटक उघडून कुठल्यातरी वेगळ्याच जगात जातो. परत येतो. पण एकदा जो जातो तो गेलाच. त्याची बॉडी सापडते तिथे जवळच एक साधे हिरवे फाटक असते. पण त्याचा सिग्निफिकन्स कोणाला माहीत नसतो. ही वाचल्यावर मी किती दिवस असे फाटक शोधत होते कुठेतरी दिसेल म्हणून. मस्त कथा आहे.

एकीत एक अपंग बेड रिडन मुलगा दोरीने खेळत असतो. त्यात तो एक कंकण सारखे बनवतो व त्यातून दुसृया जगात जातो जिथे तो अपंग नस्तो. एके दिवशी नाहिसाच होतो व बेड वर ते दोर्‍याचे विणलेले कंकण सारखे खेळणे पडलेले असते. ही ही छान आहे.

अमा शपथ मध्ये भीती, त्यामागची कारणे आणि त्यांचा अंत कसा होतो, हे व्यवस्थित समजावून सांगितले आहे. त्या गोट्यांच्या शक्तीमागील भावना सगळंच.
तुम्ही वर दिलेल्या दोन्ही कथा वाचायची उत्सुकता आहे. बघू केव्हा वाचल्या जातात.

काळगुंफा -

काळगुंफा या पुस्तकाविषयी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे ही भयकथा नसून सायन्स फिक्शन आहे, व तिला भयाची किनार आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला जिन्यावरून दण दण आवाज करत येण्याचं जे उदाहरण आहे, ते अंगावर धडकी भरवत, मात्र नंतर भयाचा इलेमेंट कमी होत उरते एक रोमांचक विज्ञानकथा, जिथे समांतर विश्वाच्या प्रवासाचा उलगडा होत जातो.
वेग आणि डिटेलिंग, या गोष्टी कथेत तरी परस्परविसंगत असतात. जर वेग असेल कथेत, तर कधीकधी स्पष्टीकरणे कमी पडतात आणि स्पष्टीकरण देत बसलं, तर वेग मंदावतो. मात्र या पुस्तकात प्रचंड वेग आणि तितकीच डिटेलिंग, या दोन्ही गोष्टी साध्य होतात.
गुरुनाथ या पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे. ते म्हणतात की दया, क्षमाशिलता, सहिष्णूता या हजारो वर्षांनी उत्क्रांतीत मानवी समाजात आलेल्या भावना आहे, मात्र आदिम समाजात एकच भावना होती म्हणजे कसंही करून स्वतःच रक्षण, एखाद्या अनामिक भीतीपासून, अथवा धोक्यापासून आणि जेव्हा हा धोका संभवतो, तेव्हा मानवाचं मूळ रूप उघड होतं. (असंच काहीतरी)
या एका वाक्यात धारपांनी मानवाच सत्यच मांडलंय.

रेटिंग - ★★★★

Pages