नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा अकल्पित मिळत नाहीये, म्हणून मी आता आभास वाचायला सुरुवात केली,
आणि नेमका तो म्हाताऱ्याचा संदर्भ आला. Happy
आभास - तळघरात कोंडलेला म्हातारा!

आभास - तळघरात कोंडलेला म्हातारा!>> पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हा काही दिवस मला ते चित्रण आठवून फार भिती वाटायची.
Happy

लुचाई, शपथ, दस्त, आनंदमहल, वेडा विश्वनाथ ह्या माझ्या मते धारपांच्या बेस्ट नॉन समर्थ कादंबर्‍या ठराव्यात. नंतर त्यात रिपीटेशन यायला लागले. ह्या सगळ्या स्टींफन किंगच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टींवर आधारीत असल्या (लुचाई वगळता) तरी त्यांचे जे देशी करण धारपांनी केले आहे त्याला पर्याय नाही. एकदम परफेक्ट उतरले आहे. एक लेखक म्हणून फक्त भाषांतर न करता भावार्थ उचलून त्याची खास धारपांच्या शैली मधे उतरंड मांडली आहे. एक मतकरी वगळता त्यानंतर आलेल्या बर्‍याच जणांनी त्यांच्या ह्या शैलीची कॉपी केली आहे हे सहज लक्षात येते.

> ह्या सगळ्या स्टींफन किंगच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टींवर आधारीत असल्या (लुचाई वगळता) तरी त्यांचे जे देशी करण धारपांनी केले आहे त्याला पर्याय नाही. एकदम परफेक्ट उतरले आहे. एक लेखक म्हणून फक्त भाषांतर न करता भावार्थ उचलून त्याची खास धारपांच्या शैली मधे उतरंड मांडली आहे. > हे अशाच अर्थाचं मागील पानांवर काहीजणांनी लिहलं आहे. म्हणून परत माझा प्रश्न विचारते -
• धारप यांनी स्वतः कॉपीराईट कायदा भंग केलेला आहे की नाही?
एका शब्दात उत्तर अपेक्षीत.

- केवळ radhanisha ने उत्तर दिलं आतापर्यंत
> नाही . स्वैर अनुवाद केलेले आहेत , तिथे कॉपीराईटचा संबंध येत नाही . >> किंगची परवानगी घेतली आहे का? त्याला श्रेय दिलं आहे का? भावार्थ/कल्पना उचलताना/स्वैर अनुवाद करताना परवानगी घ्यायची असते का नाही? परवानगी न घेता किंगच्या कॉपीरायटेड साहित्याचा वापर करून पैसे कमावणे हे कॉपीराईट कायद्याचा भंग करणेच आहे ना?

कल्पनेवर वा विचारावर कुणाचा कॉपीराइट असू शकत नाही तो फक्त कलाकृती (in some material form) वर असतो.

Poirot सारखी डिटेक्टिव्ह कथा लिहायला कॉपीराइटचा प्रॉब्लेम नाही Poirot चे नाव वापरून लिहायला असू शकतो.

उदाहरणार्थ, Uber ची बिझनेस आयडिया बघून ओला किंवा लिफ्टने बिझनेस उभा केला तर त्यात कुठल्याही कायद्याचा भंग होत नाही ते कायदेशीर आहे.
पण ओला किंवा लिफ्टने Uber चा प्रोग्राम किंवा बिझनेस मॉडेल संदर्भातील कागदपत्रे किंवा तो प्रोग्राम लिहिणारी माणसे चोरून बिझनेस उभा केला असे सिद्ध झाले तर तो कॉपीराइट कायद्याचा भंग असेल आणि असे करणे बेकायदेशीर ठरेल.

Copyrights protect expression and creativity, not innovation.... Neither copyrights or patents protect ideas.

लुचाई वगळता?
लुचाई सालेम्स लॉट चे रूपांतर आहे.
कॉपीराईट चा भंग नक्कीच आहे, पण त्या काळी कायदे किती कसे होते माहीत नाही.रॉयल्टी परवडली असती का, संपर्क साधण्याची साधनं होती का हे मुद्देही असतील.धारप आता नसल्याने या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण आहे.
गुप्ते केस मध्ये मात्र हे उल्लेखनीय ठरावं कारण आता संपर्क साधनं जास्त आहेत.किंग शी खुद्द फेसबुक फॅन ग्रुप वर संपर्क साधता येतो.
गुप्ते यांनी यावर काही स्पष्टीकरण दिले असेलच, कधी वाचले नाही.
(हा कायदा माहीत नसताना मी पेट सीमेटरी चं रूपांतर केलं होतं.पण ते अति भरकटलेलं आणि टुकार असल्याने फार कोणी वाचलं नाही आणि काही वाद बिद झाले नाहीत.'चांगल्या' लेखकांनी केलेले, प्रसिद्ध झालेले अनुवाद/रूपांतर आणि मूळ लेखक परवानगी हा कळीचा मुद्दा आहे.एव्हरेज लेखकांनी रूपांतर केल्यास विशेष प्रॉब्लेम येत नसावा.)

जे लुचाई किंडल वर उपलब्ध आहे आजच्या घडीला त्यात सालेम्स लॉट चे बरेच संदर्भ काढलेलेच आहेत. मला कायम वा टत राहिए होते. काहीतरी मिसीन्ग आहे. कारण लहान पणी वाचले त्यात गावा जवळ विमान अपघात होतो व ते मेलेले लोक लुचाई होतात मग दंडी वगैरे आहेच असे होते.
लहान मुलीची जळकी भावली व इतर सामान अपघा ताच्या तिथे साप डलेले असते. कदाचित प्रकाशकांनी हे बदल केले असतील.

> कॉपीराईट चा भंग नक्कीच आहे, > हम्म.

> पण त्या काळी कायदे किती कसे होते माहीत नाही.रॉयल्टी परवडली असती का, संपर्क साधण्याची साधनं होती का हे मुद्देही असतील.धारप आता नसल्याने या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण आहे. > अमेरिकन कॉपीराईट कायदा १९७६ मधे अपडेट केलेला आणि त्याआधी १९०९मधे. किंगची बहुतेक पुस्तकं १९७६ नंतरची आहेत.

धारपना रॉयल्टी परवडली असती का हा प्रश्न आणि मराठी वाचकांना पुस्तकं विकत घेणं परवडतं का हा प्रश्न 'सारखा' आहे का Proud

किंगची पुस्तक मिळवता येत असतील तर किंगशी पत्रव्यवहार करता येणं 'इतकं काही' अवघड नसावं.

> गुप्ते केस मध्ये मात्र हे उल्लेखनीय ठरावं कारण आता संपर्क साधनं जास्त आहेत.किंग शी खुद्द फेसबुक फॅन ग्रुप वर संपर्क साधता येतो.
गुप्ते यांनी यावर काही स्पष्टीकरण दिले असेलच, कधी वाचले नाही. > २०१८ गुप्त्यांनी लोकसत्तेत उत्तर दिलं आहे.

> (हा कायदा माहीत नसताना मी पेट सीमेटरी चं रूपांतर केलं होतं.पण ते अति भरकटलेलं आणि टुकार असल्याने फार कोणी वाचलं नाही आणि काही वाद बिद झाले नाहीत.'चांगल्या' लेखकांनी केलेले, प्रसिद्ध झालेले अनुवाद/रूपांतर आणि मूळ लेखक परवानगी हा कळीचा मुद्दा आहे.एव्हरेज लेखकांनी रूपांतर केल्यास विशेष प्रॉब्लेम येत नसावा.) > तू रूपांतर करताना मूळ लेखकाला श्रेय दिलं होतं का? त्या रूपांतरतून तू काही पैसा मिळवला होता का? उत्तरं अनुक्रमे हो आणि नाही असतील तर तू धारपपेक्षा कमी गुन्हेगार आहेस Lol

अमा, तुम्ही लुचाई ला सैतान या एपिक कादंबरी बरोबर कन्फ्युज करताय
(सध्या लोक सैतान च्या रिपब्लिकेशन ला वाटेल ती किंमत द्यायला तयार आहेत इतकी ती दुर्मिळ आहे.)
सैतान सारखी भयंकर कथा आजवर झाली नाही.

आताच आभास वाचून संपवली. आभास मधील मुख्य पात्र हे जयदेव हे आहे.

१. जयदेव - मोहन हा एक अब्जाधीश असतो, पण त्याच्याकडे वंशपरंपरागत एक वारसा चालत आलेला असतो. तो वारसा म्हणजे तळघरात पिंजऱ्यात असलेला म्हातारा, मोहन त्याच्याविरुद्ध बंड करू बघतो, आणि पुढील घटना घडतात.
रेटिंग -★★★★★

२. जयदेव आणि उन्मार्गी -
एका म्हाताऱ्याला त्याच्या पणतुचा वापर करून अमानवीय शक्ती जागृत करायच्या असतात, व त्याचा वारसा पुढे द्यायचा असतो.
रेटिंग - ★★★

३. जयदेव आणि पुतळा -
निलाचा दोन महिन्याचा मुलगा वारलेला असतो. एका जत्रेत तिला त्या पुतळ्यात तिचा मुलगा दिसायला लागतो.
रेटिंग - ★

४. जयदेव आणि -
जयदेवांचा मिती नसलेल्या अमानवीय शक्तीशी संघर्ष
रेटिंग - ★

सुरुवातीची कथा अप्रतिम रंगली, मात्र पुढच्या फीलर म्हणून टाकल्यात का अशी शंका यावी.

पुढचं पुस्तक कोणतं घ्यावं? Lol

@मी अनु - तुम्ही पेट सीमेट्रिचा अनुवाद केलेला मी वाचलेला आठवतोय. एका कॅरेक्टरच गणपतराव की काहीतरी नाव होतं ना?
बादवे सैतान ही नारायण धारपांची कादंबरी का?

बऱ्याचशा प्रतिसादाना उत्तरे द्यायची राहीलीत ती देतो.

धारप किंगची कॉपी करायचे ना? मग विकत घेणारच असाल तर इंग्रजी वाचता येणार्यानी सरळ किंगचीच पुस्तक विकत घ्या की! Wink
रत्नाकर मतकरी आणि सु.शि. पण कॉपी करायचे का? कोणाची?
Submitted by ॲमी on 13 October, 2019 - 11:59
>>>>>>>
मी किंगचीही पुस्तके वाचली आहेत, पण धारपांच्या गोष्टी आपल्या वाटतात, यात आपल्याला रोजच्या जीवनात कॉमन असलेली पात्र, स्थळे येतात, त्यामुळे ती अजून प्रभावशाली वाटतात.
उदा, चर्चमधील पवित्र जल शिंपडून त्याचा अंत झाला पेक्षा अधःपतन झाल्याने गोमुखाच्या पाण्याखाली केरकर गुरुजींचा अंत झाला हे भयंकर इफेक्तीव वाटतं.

ऍमी, नुसती वर्ड टू वर्ड कॉपी नाही कस्टमायझेशन पण भरपूर होतं.
आम्ही लोक त्या कस्टमायझेशन चे चाहते आहोत.
आता भारतात जेन्यूईन खरंखरं चायनीज चवीचं चायनीज मिळतं.
पण तरीही आम्ही इंडियन कस्टमाईझड चायनीजच आवडीने खातो तसंच आहे हे.
>>>>
+१११११११
इंडियन चायनीज Lol

तसेच समर्थांनी एखादे अमानवीय शक्तीचे निराकरण केले की त्यातील प्रसंगांचे कार्यकारण भाव मित्राला सांगत. ते जरी काल्पनीक असले तरी इतके वास्तव असत की अंगावर काटा येई. मस्तच!
>>>>>>
+११११११ अप्पा

मी अगदी एक टी राहते त्यामुळे आता भीती वाटेल मग वाटेल असे वाटले होते पण काहीच त्रास झाला नाही. उलट राखेचा, मानबा मालिका मधील त्रासदायक कथानके बघून जास्त त्रास होतो.
>>>>
हे मात्र अगदी खरंय.

धारपांच्या कथा दृश्य स्वरूपात उतरवणं खूप कठीण आहे कारण नीट निरखून वाचलं तर लक्षात येईल की धारप वातावरण निर्मिती आणि दुष्ट शक्तींचं ढोबळ वर्णन करून सोडून देतात. बाकी सगळे रंग आपण आपल्या मनातले भरतो.
म्हणूनच तुंबाड अफाट होता. धारपांची सृष्टी (जरी कथा वेगळी असली तरी) अचूक पकडली आहे. आणि म्हणूनच हस्तरचं दर्शन हा थोडासा अ‍ॅन्टिक्लायमॅक्स होतो. कारण आपल्या मनातले हस्तर वेगळेच असतात.
>>>>
जवळजवळ पाच पुस्तके वाचून झालीत, आणि माझ्या मनात जे चालुये, तेच तुम्ही शब्दात सांगितलंय.
धारपांनी कुठेही व्यक्तीचित्रणाचा अतिरेक केलेला मला दिसत नाही. ही ढोबळ व्यक्तिरेखा देऊन ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
उदा. लुचाईमध्ये दंडी हा कसा दिसतो, याचं काही केल्या स्पष्ट होत नाही. तो अंधारात वावरतो, क्षणार्धात गायब होतो.
आणि जी गोष्ट विचार करूनही डोळ्यासमोर येत नाही, तिची भीती जास्त वाटते. Happy

पुस्तके विकत घेऊन वाचावीत की pdf, फुकट वाचावीत या वादात मी 'कशी का होईना पुस्तके वाचावीत' या मताचा असल्याने कॉपीराईट विषयी जास्त भाष्य करणार नाही.

@श्रद्धा - मला आता कलगुंफा सुरू करावंसं वाटतंय.

चेटकीण कडक! बाकी कॉलेजात असतांना खूप वाचलीत, पण नावं लक्षात नाही राहिली.
किंडलवर आहेत का?
>>>>
बरीचशी आहेत.

फक्त सुशि च वाचले आहेत. हा धागा वाचून धारप ही वाचायची इच्छा होत आहे. बघू कधी योग येतो.

Submitted by अथेना on 14 October, 2019 - 21:59
>>>
धन्यवाद अथेना.
आणि मी फक्त धारपच वाचतोय, बघूयात सुशी वाचण्याचा योग कधी येतो ते. Happy

> ऍमी, हो आणि 'नाही, > गुड!
> अगदी इच्छा असली तरी शक्य नाही' > Lol Lol परवानगी न घेता (पण मूळ लेखकाला श्रेय देऊन) केलेलं भाषांतर सोडून दे पण ओरिजनल लिखानासाठी पैसे मिळू शकतील तुला.
===

या सगळ्या प्रतिवादातून सांगायचा उद्देश हा कि
"कॉपीराईटचा मुद्दा धारप, सुशि सारख्या लेखकांनी काढू नये. ते स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणे होईल."

आणि सल्ला
• ज्यांना परवडत आणि इंग्रजी वाचता येतं त्यांनी किंगच विकत घ्यावा.
• ज्यांना विकत घ्यायची इच्छा नाही, चोरी करण्यास नैतिक मज्जाव नाही त्यांनी किंगच चोरी करावा. चोरट्यांच्या घरात चोरी करण्यापेक्षा राजवाड्यातून काही रत्न उचलली तर राजाला फार नुकसान होत नाही. वर ऐसीची लिंक दिली आहे त्यातला रेड बुल चा प्रतिसाद वाचा. पायरेटेड सॉफ्टवेअर, पुस्तकं, इतर मिडिया कंझ्युम करणे याबद्दल कायदा काही बोलत नाही असं ते म्हणताहेत. डिस्टरीब्युट करणे हा गुन्हा आहे.
• भारतीय चायनिज वगैरे मला पटलं नाही पाककृती कॉपीराईट खाली येत नाहीत.
• आणि तरीही ज्यांना धारपच हवेत, आवडतात त्यांनी ते वाचावे (विकत/फुकट) माझी काही हरकत नाही Proud

अमा, तुम्ही लुचाई ला सैतान या एपिक कादंबरी बरोबर कन्फ्युज करताय
(सध्या लोक सैतान च्या रिपब्लिकेशन ला वाटेल ती किंमत द्यायला तयार आहेत इतकी ती दुर्मिळ आहे.)>> सैतान ही धारपांची आहे का? माझ्यावर
पन त्या कादंबरीचा अति शय परि णाम झालेला एकेकाळी. वाढत्या वयात वाचून व कल्पना शक्ती भारी स्वप्न रंजनात रमायची सवय त्यामुळे पुस्तकात इंटेंडेड असेल त्यापेक्षा किती तरी जास्त इंपॅक्ट मी करून घेतला होता.

उदा, चर्चमधील पवित्र जल शिंपडून त्याचा अंत झाला पेक्षा अधःपतन झाल्याने गोमुखाच्या पाण्याखाली केरकर गुरुजींचा अंत झाला हे भयंकर इफेक्तीव वाटतं.>> हो हो अगदी बरोब्बर. चेटकीण मध्ये पण फारशी पूजा न झालेलं ( आजी वारल्यानंतर) देवघर त्यातल्या मूर्ती ती नवी हिरवीण आल्यावर समर प्रसंगी कश्या एकदम लखलखीत होतात . हे इतके मस्त वाट्ते वाचायला. मी ते गोमुखाच्या पाण्याखाली बसलेली गुरुजींची मूर्ती अगदी इमॅजिन केलेली आहे. स्पीलबर्गच्या सिनेमात कसे ( इंडियाना जोन्स व लास्ट क्रोसेड) एक माणूस चुकीच्या कप मधून पाणी पितो व त्यामुळे अमरत्व मिळायच्या ऐवजी तो लगेचच फास्त फॉरवर्ड म्हातारा होउन नष्ट्च होतो तसा इफेक्ट. अर्धी जळलेली शरीर कुडी पण मुक्त व परत पवित्र झालेला त्यांचा आत्मा. मुळात प्रायस्चित्त घ्यायला किती धैर्य लागले असेल. असे असा विचार केलेला.

हो अमा, ते गोमुख वालं मी पण इमॅजिन केलं होतं.
सर्वात वाईट चेटकीण मध्ये वाटतं शेवटी. एखाद्या देशातच तात्पुरता आलेला माणूस अचानक एका लहानश्या गावातल्या लहानश्या वाड्यात घडणाऱ्या घटनांमध्ये इतक्या खोलात खेचला जातो आणि काही टोकाचे निर्णय घेतो.
ऍमी, तुझ्या मुद्द्यांवर मीही विचार करतेय, म्हणजे लॉजीकली वाचले तर बरोबर आणि तरीहि मनात ऍप्पल्स टू ऑरेंजेस ची घंटा वाजतेय असे काहीतरी.
(धारपपुत्र फेसबुकवर माहीत आहेत, फार ओळखीचे नाहीत.सुंदर चित्रं काढतात.त्यांना व्यक्तिगत निरोप टाकून या धाग्याची लिंक दिली होती.यावर फर्स्ट हँड मत मिळावे म्हणून.पण त्यांनी वाचला नसावा निरोप.)

चेटकीण मध्ये अ‍ॅक्चुअली मला शेवट सपक वाट्तो. जसे बिल्ड अप केले आहे त्याचा क्लायमॅक्स अजून परि णाम कारक हवा होता. हिच्या बाजूने आजीचा आजीच्या बाबांचा आत्मा पण फाइट मध्ये सपोर्ट ला येतो असे दाखवता आले असते व्हिजुअली. पण ती फक्त जाळून संपवते. सामना असा होतच नाही. मला ते घर व लोकेशन फार आव डते.

किंडल अन किंडल अनलिमीटेड मध्ये काय फरक आहे??

किंडाल मध्ये एकदा विकत घेतलेले पुस्तक त्या अकाऊंटमध्ये कायम असते का? अन किंडल अनलिमीटेड मध्ये ते फक्त एक वर्षासाठी असते असे काही आहे का??

अज्ञातवासी जी, आभास नंतर आता अघटित, साठे फायकस, अत्रारचा फास, अंधारातील ऊर्वशी, प्राध्यापक वाईकरांची कथा.. होऊन जाऊ दे..
चेटकीण मध्ये हातातील सफरचंद ज्या एका सात्विक तरीही भयंकर अशा तिडीकीने सोनाली (हेच नाव आहे ना) त्या वाईट शक्तीवर फेकून मारते, तो क्षण वाचायला फार आवडतो.

तो क्षण वाचायला फार आवडतो.>> त्या आधी यु डेव्हिल्स स्पॉन म्हणते. कारण ती अमेरि केतून आलेली आहे देशी संस्कार नाहीत.

धारपांच्या सायन्स फिक्षन स्वरूपाच्या कथा पण मनो रंजक आहेत. भयकथांपेक्षा वेगळे. नवल विचित्र विश्व, अमृत वाचणार्‍या वाचकांना अश्या कथा आवडत. माज्या फे वरिट आहेत. एक ज्यात आकाशात डोळा दिसू लागतो. ती कथा, दुसरी एक बारका दगड असतो त्यात आत आत छोटे लोकांचे असे एक पूर्ण विश्व असते व्हिलन हिरो हिरवीन सर्व आहे. त्यातून बारके दगड तपासायची सवय लागली.

अजून एक ज्यात इंटर गॅलेक्टिक चेस गेम चालू आहे व त्यातला एक योद्धा प्लेयर अचानक नॅरेटर च्या हातात पडतो. कथेच्या शेवटी. ही फार फेवरिट.

दुसरी एक बारका दगड असतो त्यात आत आत छोटे लोकांचे असे एक पूर्ण विश्व असते व्हिलन हिरो हिरवीन सर्व आहे
>>सुवर्णाचे विश्व

It - chapter 2 चित्रपट रिलीज झाल्यावर मी स्टीफन किंगच पुस्तकही वाचून काढलं होतं.
आता स्वाहा वाचतोय.
नेमकी तुलना तरी करता येईल.

किंडल अन किंडल अनलिमीटेड मध्ये काय फरक आहे??

किंडाल मध्ये एकदा विकत घेतलेले पुस्तक त्या अकाऊंटमध्ये कायम असते का? अन किंडल अनलिमीटेड मध्ये ते फक्त एक वर्षासाठी असते असे काही आहे का??

Submitted by VB on 16 October, 2019 - 11:45
>>>
VB मी अजून किंडल अनलिमिटेड सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्यामुळे मला नेमकं सांगता येणार नाही.
मात्र किंडल मध्ये बुक्स कायम असतात.

अ‍ॅमी,
मी धारप आणि किंग दोन्ही वाचत नाही.
पण वर्ड-टू-वर्ड अनुवाद/कॉपी आणि थीम वरुन इन्स्पायर होणे यात लीगली (कॉपिराईटच्या दृष्टीने) फरक असतो ना. फ्रेंड्स वर आरोप होतो की साईनफेल्डवर बेतलंय. हाउ आय मेट युअर मदर तर फ्रेंड्सची कॉपीच समजलं जातं. पण फ्रेंड्स किंवा HIMYM स्ट्रीमिंगचे पैसे वाजवून घेतात. अमेझॉन प्राईमवाले HIMYM वाल्यांना म्हणू शकत नाहीत की आम्ही फुकट कंटेंट वापरु, तुम्ही कॉपिराईटचा मुद्दा काढूच नका, पायावर धोंडा मारुन घेताय वगैरे. HIMYM ला तर अवार्ड्स पण भेटली आहेत.
गॉन गर्लच्या लेखिकेनेही पुस्तक/मुव्हीमध्ये कुठेही उल्लेख केला नाही की कॅलिफोर्नियातील सत्यघटनेवर आधारित आहे. पण तिच्या पुस्तकाचा लीगल कॉपिराईट तिच्याकडे आहे(च).

Pages