नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत - किती भरकटणार तुम्ही... सांगा कि हो त्यांनी काही कथांचे अनुवाद केले आहेत त्यात काय लपवायचे

किंडल अनलिमिटेड वर फ्री>>>हे नक्की काय आहे,30 दिवसांचा फ्री ट्रायल पिरियड आहे असे दिसतंय ,पण म्हणजे खरोखर 30 दिवस फ्री असतात की 30 दिवसांनी पैसे कट होतातच,
Plz सांगा

'बलिदान' मागवून वाचले.(आवडले नाही.त्यामुळे वाईट वाटले.याच पैश्यात सैतान मागवून परत वाचता आले असते.शिवाय पुस्तकाच्या पानांच्या मानाने किंमत जास्त आहे.)
माझे 2 स्टार.
IMG-20200130-WA0001.jpg

तळलेला माणूस आणि त्याच्या आधीची कथा रूपांतरित आहेत.(शेवटी मूळ कथा आणि लेखकाचा स्पष्ट नामनिर्देश आहे)
तळलेला माणूस खूप जास्त गोरी(इंग्लिश मधली) आहे.इतके बीभत्स वर्णन हॉरर मध्ये मी वाचू शकत नाही.
त्यातल्या त्यात बलिदान कथा वाचण्या सारखी आहे.
हे पुस्तक वाचताना मला धारपिय फील आला नाही.बहुतेक त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या कथा कोणीतरी पूर्ण करून छापल्या आहेत.(महावीर आर्य ही त्यांची शेवटची अपूर्ण कथा आहे.ती वाचकांना वस्तुस्थितीची स्पष्ट कल्पना देऊन तशीच ओपन एंडेड विकली जाते.)

अज्ञातवासी तुम्ही कटप्पा म्हणजे ऋन्मेष हे प्रूव्ह कराल तेंव्हा कराल . तुम्ही ड्यू आयडी ते देखील स्त्रियांचे घेऊन प्रतिसाद वाढवता याचे प्रूफ या धाग्यावर आहे . सप्रस यांनी स्क्रिन शॉट टाकलेला आहे प्रतिसादाच्या पहिल्या पानावर .
गेट वेल सून . लवकर बरे व्हा . अज्ञातवासी उर्फ महाश्वेता उर्फ आणखी बरेच स्त्री आयडी अर्थात तुमचेच ड्यू .

सैतान आणि देवाज्ञा किंडल वर वाजवी दरात
मिळाले
बलिदान ची हार्ड कॉपी लठ्ठ किमतीत घेऊन घश्यात गेलेले दात आधी सांगितलेच आहेत.
त्यामुळे सध्या फक्त किंडल पुस्तके.
सैतान ऑल टाईम ग्रेट आहेच.मी लहानपणी वाचले त्यात एक भाग सैतान आणि दुसरा भाग बिहारीलाल बाहुलीवाला ची वेगळी कथा होती.आताच्या पुस्तकात फक्त सैतान असते.मजा आली.
देवाज्ञा खूप प्रभावी पुस्तक आहे.वेगळीच कल्पना.जरा हॉलिवूड फिक्शन पिक्चर पाहिल्याचा मस्त फील आला.

@ मी अनु - बिहारीलाल बाहुलीवाला!!! ही कथा कितीदा शोधली गणती नाही.. पण मलाही सापडली नाही... Sad
खूप जुनी कॉपी शोधावी लागेल असं दिसतंय.

तुम्ही ड्यू आयडी ते देखील स्त्रियांचे घेऊन प्रतिसाद वाढवता याचे प्रूफ या धाग्यावर आहे . सप्रस यांनी स्क्रिन शॉट टाकलेला आहे प्रतिसादाच्या पहिल्या पानावर .>>> भयानक आहे हे सगळं. माणसं कोणत्या जातील भरोसा नाही.

चांगला धागा.
किंडलवर कुठली अवेलेबल आहेत. मला पुस्तक मागवणे अवघड आहे. सगळ्यांंना आहे हा प्रश्न.... सुचवा प्लीज.
धन्यवाद .

किंडल वर जवळजवळ सर्व अव्हेलबल आहेत
सुरुवात स्वाहा किंवा लुचाई पासून करा
अनोळखी दिशा मिळाली तर तिन्ही भाग सोडू नका
समर्थांचा विजय , सैतान पण बघा
किंडल अनलिमिटेड घेतला तर बरीच स्वस्त पडतील
https://www.amazon.in/s?k=narayan+dharap+kindle+books&sprefix=narayan+dh...
अंधारातली उर्वशी बऱ्याच वर्षांनी आलंय
इच्छुक लोकांनी किंडल एडिशन विकत घ्या.

धन्यवाद mi_anu.
अमेरिकेत नाही चालत Amazon.in आणि माझ्या इथल्या Amazon account ने अनलिमिटेड असूनही दोन पुस्तक फक्त सापडली. Sad कुलव्रुत्तांत आणि अंधारातली उर्वशी तेवढी वाचते. फोन नंबरशी संलग्न असल्याने अवघड आहे.

माझी टॉप ४ ची लिस्ट द्यायची ठरलीच तर!

१. सैतान
२. स्वाहा
३. ४४० चंदनवाडी
४. लुचाई

जर कुणाला बिहारीलाल बाहुलीवाल्याची कथा सापडली तर मला कळवा प्लिज _/\_

पडछाया
4.5 स्टार
यात या कथा आहेत:
पडछाया
मुक्ती
तो कोण होता
मन मोहाचे घर
तितु
मोहन किरपेकर
चेटकीण
बळी
चौरस्ता

सर्व कथा पैसे वसूल आहेत.तुंबाड चित्रपटाचे दोनपैकी एक प्रेरणास्थळ म्हणून बळी नक्की वाचा.अंगावर काटा येईल.
मन मोहाचे घर आणि चेटकीण अंगावर शहारा आणतील.ही चेटकीण कथा आणि स्वतंत्र चेटकीण कादंबरी या दोन्ही पूर्ण वेगळ्या आहेत.
अनाहूत आणि मुक्ती डोळ्यात पाणी आणतील.
चौरस्ता आणि मोहन किरपेकर या वेगळ्या स्टाईल च्या कथा आहेत.
शीर्षककथा चांगली आहे पण वाचायला मोठी.

एक स्वगत
किंडल बुक ना अनुक्रमणिका नाहीत.वाचकाला सरप्राईज देणे, किंडल रिडींग लेआऊट मध्ये वाचतात त्यामुळे पान नंबर निरुपयोगी ठरणे हे उद्देश असतील.पण वाचकांनी जुन्या आवृत्ती ची तुलना करून 'अमुक अमुक कथा या पुस्तकात आता का नाहीत' विचारू नये हाही उद्देश कधीकधी जाणवतो.

देवाज्ञा
4.5
सलग कादंबरी आहे.निअर डेथ एक्सपिरियन्स वर आधारित.वेगळी संकल्पना आहे.

@ mi anu...
हाच प्रतिसाद दुसरा पार्ट काढलाय, त्यात टाकाल का?
म्हणजे मी हेडर मद्धे अपडेट करेन.

आत्ता पडछाया वाचत होते, बळी कथा वाचून तुंबाड पिक्चर आठवला.
सगळ्याच कथा एक से बढकर एक आहेत. अजून शेवटची एक कथा बाकी आहे वाचायची.

Pages