नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळगुंफा वाचल..
माझ रेटींग 3 stars.. कारण मला स्वतःला विज्ञानकथा फारश्या आवडत नाहीत..
पण भीती मनात शेवटपर्यत तशीच राहते..

पुढच कुठलं घेऊ?? देवाज्ञा कस आहे??
जाणकारांनी मार्गदर्शन करा.

समर्थांची ओळख , समर्थांना आव्हान , समर्थांचा विजय .. >>> थँक्यू राधानिशा! ही वाचली आहेत बहुधा. मला वाटलं अजून नवीन पण आलीत की काय म्हणून विचारलं होतं. ही पुस्तकं बेस्टच आहेत.

मात्र धारपांच्या साहित्यावर मालिका/चित्रपट।बनवणं खरंच अवघड आहे. कारण म्हणजे धारपांनी काही कथांमध्ये अशी काही सिच्युएशन निर्माण केलीये, की ती आपण ठरवूनही डोळ्यासमोर आणू शकत नाही. >>>
अगदी अगदी! केशवगढीतले काळे तंतू, मृत्युजाल मधलं हिरवंपिवळं 'ते', गंगाधररावांच्या गोष्टीतले पातळ आकार आणि दस्त मधलं खोलीतलं खडूने चितारल्यासारखं काहीतरी... हे सगळं स्क्रीनवर दाखवणं चॅलेंजिंग आहे.

पुढच कुठलं घेऊ?? देवाज्ञा कस आहे??>>>
देवाज्ञा चांगलं आहे. मला तरी आवडलं होतं. पण अगदी परफेक्ट भयकथा वगैरे नाहीये ती. मला वाटतं भगत आहेत का त्यात? आता आठवत नाही. तुम्ही 'कुलवृत्त्तांत' वाचलंय का? ते छान आहे.

'कुलवृत्त्तांत' वाचलंय का?? ते छान आहे.> >>> >>>
थँक्स rmd.दोन्हीही वाचलेली नाहीयेत.. देवाज्ञा नंतर कुलवृत्तांत घेईन वाचायला..

कोण नारायण धारप? पुस्तके लिहतात कि अनुवाद करतात ?>>>> अमानवीय धाग्यावर कॉपी पेस्ट केल्याचे परिणाम.

थँक्स rmd.दोन्हीही वाचलेली नाहीयेत.. देवाज्ञा नंतर कुलवृत्तांत घेईन वाचायला.. >>> संक्रमण वाचलं आहे का? ते पण छान आहे.

मी सांगते
एक वज्रे आडनावाचा माणूस अचानक थोडे पैसे मिळतील अश्या परिस्थितीत येतो आणि आतांपैश्याची विवंचना नसल्याने स्वतःचा कुलवृत्तांत शोधण्याच्या मागे लागतो.या प्रयत्नात त्याच्यासमोर वेगळंच काही वाढून ठेवलंय.

हे पुस्तक फार घाबरवणारं नाही.पण मांडणी चांगली आहे.

परफेक्ट, मी_अनु! Happy खरं सांगू का, मला खूप मस्त वाटतं तुमच्या पोस्ट्स पाहून. माझ्यासारखंच खूप धारप साहित्य वाचलेलं कोणीतरी आहे इथे अजून हे पाहून भारी वाटतं.

Rmd, माझा धारप,सुशी, मतकरी व्यासंग बराच आहे हे (माजोरडे पणा न करता) नम्रपणे कबूल करते.
यात किंडल आणि डेलीहंट चा महत्वाचा वाटा आहे.

धारपांची बरीचशी पुस्तक 8वी- 9वीत असताना अधाश्यासारखी वाचलीयेत.. पण आता नेमकी कुठली वाचलीयेत आणि कुठली नाहीत हेच आठवत नाही. Lol
त्यामुळे संक्रमण लिस्टमधे ऍड करते. Happy

देवाज्ञा वाचलय याआधी.. आता परत वाचतीये. त्यावेळी जितक आवडलेल तितकच आत्तासुद्धा आवडतंय..
धारपांच्या लेखनाची जादु हीच असावी. Happy

'अवकाशाशी जडले नाते' स्कॅन्ड / पीडीएफ / फोटो स्वरूपात कोणी उपलब्ध करून देऊ शकेल का ? खूप काळ आउट ऑफ प्रिंट आहे . ज्यांना वाचनालयातुन मिळू शकतं अशी एखादी व्यक्ती ....

ग्रेट! खरंच! मी मतकरी खूप नाही वाचलेत. पण त्यांच्या हॉरर स्टोरीज मात्र सगळ्या वाचल्या आहेत. सुशि आणि धारप व्यासंगाबद्दल मी पण नम्रपणे वगैरे वगैरे Proud ऑल्दो, धारपांचं पडछाया माझं वाचायचं राहून गेलंय. मला मिळालं नाही ते.

माझ्यासारखंच खूप धारप साहित्य वाचलेलं कोणीतरी आहे इथे अजून हे पाहून भारी वाटतं. >> पण तुम्ही धारपांचं खूप साहित्य वाचलं आहे आणि तुम्हाला ते खूप आवडतं ह्यात नवल ते काय Wink (pun intended)

बर्गा, का गरीबाची खिचाई करतोस रे? Proud आणि 'तुम्ही' कधीपासून म्हणायला लागलास मला?

मी_अनु, थँक्स अ लॉट! मी बघते मला कसं काय इकडे मागवता येतंय हे.

'तुम्ही' कधीपासून म्हणायला लागलास मला? >> ते तुम्ही आदरार्थी नसून अनेकवचनी आहे Proud बेकरीची सवय अजून काय Lol

बोकलत काका हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही .... तुम्हाला विचारलाय काय तुम्ही सांगताय काय ...

अमानवीय धाग्याची वाट लावल्याचा परिणाम का ?

Rofl अजून कॉपी पेस्ट करा थोपु कायप्पावरच्या कथा अमानवीय धाग्यावर म्हणजे साक्षात धारपच येऊन तुमच्याशी गप्पा गोष्टी मरतील आणि आशीर्वाद देतील.

भरत, मी वाचलं ग्रहण . Happy

सिरियलीचे सुरुवातीला काही एपिसोड बघितले होते . पुस्तकापेक्षा पूर्ण वेगळीच आहे सिरीयल . सारंगची आई सिरियलीत एकदम व्हिलन दाखवलीये तर पुस्तकात एकदम सोज्वळ ! कायच्या काय बदल केलेत

अघटित हा कथासंग्रह वाचला, चांगला असा म्हणावा लागेल. हा कथसंग्रह संपूर्णपणे व्यक्तीच्या मानसिक अवस्थांवर आधारित कथांवर आहे.

१. माझ्या लाडक्या, माझ्या लाडक्या - एक चांगली कथा, एक अमानवीय आकर्षण व्यक्तीच्या शरीराचा ताबा कसा घेते, त्याची कथा!
रेटिंग - ★★★★

२. अघटित - दोन व्यक्तींच्या जुळलेल्या मनाच्या द्वंद्वाची कथा. नाईस, पण शेवट लवकर उरकल्यासारखा वाटला.
रेटिंग - ★★★

३. तिरंदाज - जबरदस्त कथा, एका मानसिक बुद्धिबळाची कथा
रेटिंग - ★★★★★

४.भीमाक्का - ट्रॅडिशनल भयकथा
रेटिंग - ★★

५. माधव मालिनी - चांगली कथा आहे, एका फ्रेंडने सुचवल्याप्रमाणे कोठारेंच्या सिरीयध्येही ही कथा होती. हिप्नॉतीजमवर आधारित कथा!
रेटिंग - ★★★

६. जागवा - पुन्हा एक ट्रॅडिशनल भयकथा, अमानवीय शक्तींच्या परिणामाची कथा
रेटिंग - ★★

७. चित्रछाया - एका अमानवीय फोटोची कथा.
रेटिंग - ★★

ओके.
पुस्तकाबद्दलचा अभिप्राय मालिकेच्या धाग्यावर दिला होता.
तो इथे चिकटवतो.
Spoiler alert
.
.
.
.
ग्रहण कादंबरी वाचून संपवली.
समांतर विश्व , त्यात बदलेल्या घटना, एका विश्वातल्या वसुधाला सगळे ओळखतात पण ती कोणालाच ओळखत नाही ; तर दुसर्‍या विश्वातली स्नेहा अनेकांना ओळखते पण तिला ओळखणारं कोणीच नाही. तिचं अस्तित्वच तिथे नाही. (म्हणजे ती आणखी तिसर्‍याच विश्वातून आलीय की काय? ) ही मध्यवर्ती कल्पना कळली.
मलपृष्ठावर हृषिकेश गुप्तेंनी धारपांच्या साहित्याचं आणि भाषेचं जे वर्णन केलं त्यातलं काहीही जाणवलं नाही. एकच पुस्तक वाचून काही निष्कर्ष काढणं योग्य नाही, याची कल्पना आहे.
अनेक संवाद वाचकांना स्पष्टीकरण मिळावं या हेतूने आणले आहेत, हे सहज कळतं. लक्ष्मण लोंढेंच्या कथेत सुरुवातीला अगदी एक दोन वाक्य किंवा कवितेच्या ओळी असत, किंवा एक चीनी म्हण आहे असं म्हणून ते कथेची मध्यवर्ती कल्पना मांडत. इथे जरा स्पून फीडिंग, खरं तर स्ट्रॉ फीडिंग वाटलं.
पोलीस नावाची संस्था /यंत्रणा अस्तित्वातच नाही,(हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी उचलायची पावलं डॉक्टरच घेतोय) असं म्हणावं तर स्नेहाचा भाऊ पोलिसात आहे आणि स्नेहाबद्दलचा रिपोर्ट त्याच्यापर्यंत बर्‍यापैकी लवकर पोचलाय. वसुधा आत्महत्येचा प्रयत्न करते, त्याची पोलीस केस होत नाही. गर्भपात करावा लागतो, तेव्हा कोणीतरी फसवल्याचीही नाही.

वसुधाचा भूतकाळ काय, तिला नातलग आहेत की नाही, याचं कोणालाच काही पडलेलं नाही.

एका विश्वातून दुसरीकडे जाताना तिचे कपडे बदलले आणि मंगळसूत्रही आलं.
स्नेहाच्या आयुष्यातले तिघे जण नवरा, मुलगा ,मुलगी हे तीन वेगवेगळ्या विश्वांत असावेत. उंची साडी नेसणारी बाई मुलांना बेबी आणि मुन्ना म्हणेल हेही ऑड वाटलं. मुलांची नावं खूप उशिरा, तीही एकदाच आलीत.
बँकेत नोकरी लागलेल्यांना प्रशिक्षण बाहेरच्या संस्था त्याही परस्पर देतात आणि अमुक व्यक्ती ट्रेन झाली की नाही, हे तोंडी परीक्षा घेऊन ठरवतात, हे वाचून हे कोणत्या काळातलं कथानक असा प्रश्न पडला. कथानकात बँकांत कॉम्प्युटरचा वापर वाढलाय आणि ते शिकवणारे क्लासेसही निघालेत .

पुस्तकाच्या इतक्या आवृत्त्या निघाल्यात पण प्रकाशक/लेखकांपैकी कोणाला हे पुढचं तपासावंसं वाटलेलं नाही.
प्रकरण ६. सारंगची आई स्नेहाला शेखरच्या हॉस्पिटलमधून घरी न्यायला येते, तिथे शेखर सारंगशी बोलताना दाखवलाय. पण सारंगच्या घरी संध्याकाळी तो ऑफिसातून परत येताच स्नेहाला केव्हा आलात असं विचारतो. (गूढकथा आहे, तेव्हा नीट लक्ष देऊन वाचावं म्हटल्यावर हे दिसलं पटकन).
वसुधाचा फोटो पाहून सुरेखा खरे प्रथम डॉक्टर शेखरना त्यांच्या नर्सिंग होममध्ये भेटते, ते तिच्या घरी येऊन जातात, तरीही वसुधा जेव्हा तिच्या घरी राहायला येते तेव्हा डॉक्टर कोण असा प्रश्न तिला पडलाय.
वसुधा नेवरेकर प्रकरणाबद्दल आणि ताज्या प्रसंगाबद्दल सारंगला एकट्याला सांगते. तुमच्या आईसमोर कसं सांगणार म्हणते. तरीही पुढे सारंग तो प्रकार आईला माहीत झाला म्हणतो.

र्अरविंदचं प्रकट होणं तिच्यापासून प्रोअ‍ॅक्टिव्हली दूर जाणं हे कथानक संपवण्यासाठी मुद्दाम केल्यासारखं वाटतं. स्वतःचा भूतकाळ, नातेसंबंध, ओळख हरवलेली बाई दहा दिवसांत दुसर्‍या माणसाशी लग्न करते हा गोड शेवट अपरिहार्य वाटला नाही. भावाचं लग्न जुळवण्याचा प्रकार म्हणजे पाकात घातलेल्या जिलबीवर पिठीसाखर आणि मध.
femme fatale = फेमी फाटाले deja vu - देया व्ह्यु
ब्लर्बमध्ये कमीत कमी संवाद म्हटलंय, पण इथे एकीकडे घडलेला प्रसंग दुसर्‍याला पुन्हा सविस्तर वर्णन करत सांगणारे संवाद आहेत, हे सहज टाळता आले असते.

कादंबरीवरून मालिकेकडे जाताना त्याला भूत, अमानवी शक्तींचा अँगल दिला होता, तो शेवटपर्यंत टिकवायला हवा होता. शेवटी अनंत भावेंनी रंगवलेल्या व्यक्तीकरवी दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे फसलेली सारवासारव आणि असं काही नसतं, असं सांगायचा प्रयत्न वाटला.

---
आत्ता मला पुस्तकाचं काहीही आठवत नाहीये.
कथानक इ. मालिका मात्र अजून आठवतेय. अर्थात तिला खूप जास्त वेळ दिलाय आणि दृश्य परिणाम आहेच.

मी म्हटलं ना, ग्रहण ही प्रचंड गुडीगुडी कथा आहे.ग्रहण मुळे धारप पुस्तकांना पुन्हा डिमांड आली(म्हणजे डिमांड होतीच पण दुकानदारांना ती ठेवावी असे कळू लागले).पण क्षणोक्षणी 'काय फेकताय राव' होतं.तिचं बँक मध्ये लगेच नोकरी मिळून नोकरी करणं तर अजिबात पटत नाही.

@मन्याS - तुमची रेटिंग वर ऍड केली आहे.
@भुत्यभाऊ - तुम्हीही एखादं वाचून बघा, मग मेबी तुम्हाला कळेल, नेमकं काय लिहितात धारप!
पण एक सांगतो, ते कॉपी पेस्टची कामे नक्कीच करत नसत Lol

नोकरी नव्याने मिळाली नव्हती .. बँक अधिकाऱ्यांना ती पूर्वीचीच कर्मचारी वाटत होती .. समांतर विश्वातून आलेली वगैरे प्रकरण त्यांना माहीतही नव्हतं - समजलंही नसतं किंवा त्यांनी विश्वासही ठेवला नसता . किंवा ही आपल्या कर्मचारीची हमशकल तोतया नोकरी बळकवण्यासाठी आली आहे असाही काही संशय त्यांना आला नव्हता .

ठराविक वर्षं काम केलेल्या कर्मचाऱ्याला काही अपघात होऊन स्मृतिभ्रंश झाला पण शैक्षणिक / काम करण्याची / शिकून घेण्याची क्षमता ती व्यक्ती गमावून बसलेली नाही . अशा परिस्थितीत कुठलीही चांगली संस्था पुन्हा काम शिकून कामावर रुजू होण्याची संधी देईल ... मला यात काही विसंगत जाणवलं नाही .

10 दिवसात जुनं आयुष्य विसरून नवीन आयुष्याला , नवीन लग्नाला तयार होणं किंवा तिने समांतर विश्व वगैरे सहज चटकन स्वीकारणं हे जास्त खटकलं ..

बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबद्दलचे तपशील खटकले होते.
ते इन हाउस किंवा संलग्न संस्था देईल.
कोचिंग क्लाससारखा क्लास असणार नाही.

सुट्टीचे कमी दिवस राहिलेत, आणि आजच्यासारखी निवंतता मिळणार नाही, म्हणून धरणाच्या काठावर येऊन बसलोय.
'सैतान' वाचण्यासाठी

Pages