कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.
★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)
मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!
१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★
इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2
जुने धागे नारायण धारपांच्या
जुने धागे
नारायण धारपांच्या कथा आणि कादंबऱ्या
नारायण धारप यांच्या भयकथा !!!
चेटकीण
अप्पा वरच्या यादीत
अप्पा वरच्या यादीत काळगुंफासुद्धा टाका.
थँक्स!!
आता अत्ररचा फास वाचायला घेतोय.
शपथ कुणासाठी?
शपथ कुणासाठी?
ज्यांना क्षणाक्षणाला धक्के हवेत, वेगवान कथानक हवंय, आणि फक्त भय अथवा थ्रिल हवंय. >>>>>>> मला शपथ वाचायला आवडेल. बादवे, परीक्षण छान होत.
मला काळगुंफा आणि
मला गुढात्मा , काळगुंफा आणि विश्वव्यूहाचा भेद ही पुस्तकं देऊ शकाल का प्लीज ? मृत्यूजाळ नावाची समर्थ कादंबरी आहे का ? कारण ती कथा त्या नवीन छापलेल्या तीन समर्थ कथासंग्रहांपैकी कुठल्यातरी एका पुस्तकात आहे - काशीनाथपंत बारकू देवकाते वकील वगैरे .. ऑनलाइन transaction जमत नाही .. नाहीतर फुकट मागितली नसती .. वरच्या यादीत नसलेली आणि सध्या आऊट ऑफ मार्केट असलेली काही पुस्तकं मी इबुक स्वरूपात तुम्हाला देऊ शकेन ... अर्थात तुम्हाला ती दुसरीकडेही सहज मिळू शकतील लायब्ररीत वगैरे .. पण मला ही पुस्तकं लवकर मिळणं कठीण आहे , जवळपासच्या सगळ्या लायब्रऱ्यात शोधून झाली आहेत .. सो , जर दिलीत तर मी तुमची ऋणी राहीन .
@radhanisha, tumhala
@radhanisha, tumhala sanparkatun mail kelay, plz reply.
छान परीक्षण केलंय.
छान परीक्षण केलंय.
मी मृत्युजाळ वाचतेय सध्या. बघू कधी पूर्ण होतं..
श्रद्धा मी अत्ररचा फास सुरू
श्रद्धा मी अत्ररचा फास सुरू केलय, बघूयात कस आहे ते!
अत्ररचा फास मी आताच वाचून
अत्ररचा फास मी आताच वाचून पूर्ण केलं. हा एक कथासंग्रह आहे.
१. केशवगढी - एका पुरातन गढीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाने माणसावर होणाऱ्या बदलाची कथा.
रेटिंग - ★★★
२. सूड - तीन बहिणींची कथा. भयंकर आहे. वाचताना अंगावर काटा आला.
रेटिंग - ★★★★★
३. सुवर्णा - एक वेगळीच कथा. सुवर्णा नटी होण्यासाठी एक करार करते.
रेटिंग -★★★
४. वासना - अप्रतिम! मानवी शरीर सोडलं, तरी त्याच्या वासना अतृप्त राहतात, त्याची कथा
रेटिंग - ★★★★★
५. काजळी - एक वेगळी कथा. सुर्वेना एक काळी आकृती जवळ येताना दिसते, आणि हळूहळू सुर्वेचा गर्व गळत जातो.
रेटिंग -★★★
६. अत्रारच फास - एक प्राचीन काळाची आताच्या काळाशी सांगड.
रेटिंग - ★★
सरासरी रेटिंग - ★★★1/2
सखाराम गटणे!https://youtu.be
सखाराम गटणे!
https://youtu.be/knZueiyKM9U
खरंच, मी फॅन झालोय आता गटणेचा!!!


आणि त्याच्या बापाचाही!!!
झिंदाबाद.
झिंदाबाद.
इथल्या चर्चेमुळे प्रभावित
इथल्या चर्चेमुळे प्रभावित होऊन मी धारपांचं चेटकीण हे पुस्तक किंडलवर घेतलं आणि वाचलं. मस्त आहे. आवडलं
अज्ञा, तुमचा पुस्तक
अज्ञा, तुमचा पुस्तक वाचण्याचा झपाटा कमालीचा आहे. कमी वेळात जास्त पुस्तके वाचून होतात तुमची. आमच तर ' हे वाचायच राहिलय, ते वाचायच राहिलय' अस होत.
सखाराम गटणे सुपर्ब. व्यक्ती आणि वल्ली वाचलय.
@वावे - मस्त!
@वावे - मस्त!
@सुलू - धन्यवाद! इथे बऱ्याचदा गटणेचा उल्लेख येत होता, म्हणून म्हटलं बघूयात तरी काय प्रकार आहे. साक्षात पुलंच्या तोंडून गटणेची महती कळाली.
सध्या बराच वेळ आहे म्हणून पुस्तक वाचतोय, नाहीतर माझीही बरीच वाचायची राहिलीत.
वेडा विश्वनाथ -
वेडा विश्वनाथ -
वेडा विश्वनाथ ही छोटेखानी जवळजवळ दीडशे पानांची कादंबरी.
विश्वनाथ हा लहानपणी मेंदूत ज्वर गेल्याने मतिमंद झालेला असतो. पण एके रात्री त्याला एक अमानवीय सावली चंद्रात दिसते, त्यानंतर तो झपाटल्याप्रमाणे वागू लागतो, आणि अमानवीय घटनांची साखळी घडत जाते.
वेडा विश्वनाथही काहीही वेगळी कादंबरी नाही, एक अमानवीय शक्ती एका व्यक्तीला झपाटते, आणि त्याद्वारे आपलं कार्य करून घेते, ही ढोबळ संकल्पना. धारपांच्या कथेत आतापर्यंत मला न आढळणारा बीभत्सपणा यात आढळला. भयापेक्षा त्या बीभत्सपणाने मनात एक भीती निर्माण होते.
वेग जबरदस्त आहे, आणि कथानकदेखील उत्कंठावर्धक.
अजून एक निरीक्षण, वेडा विश्वनाथमधील काही गोष्टी आपण डोळ्यासमोर इमाजिन करू शकत नाही. त्या कशा इमाजिन कराव्या, याच्यात गफलत होते. उदा विश्वनाथचं ट्रान्सफॉर्मेशन डोळयांसमोर आणताना कस लागतो. त्यामुळे यावर एखाद्याला चित्रपट वगैरे काढावसा वाटला, तर त्याचा कस नक्कीच लागणार.
रेटिंग - ★★1/2
मी चेटकीण वाचलं ( शालीदा
मी चेटकीण वाचलं ( शालीदा धन्यवाद ).
बऱ्यापैकी सस्पेन्स आहे . वेळ पटकन निघून गेला .
अज्ञातवासी , तुम्हालाही धन्यवाद . धारपांच विशेष काही वाचलं नव्हतं . गूढ/ भयकथाबाबतीत मतकरी फेवरीट्स आहेत.
या बाफ़मुळे धारपांच साहित्य वाचून काढेन ..
धन्यवाद जाई!
धन्यवाद जाई!
तुम्हाला पुढील पुस्तके कशी वाटलीत नक्की कळवा!
आता पुढची कोणती कादंबरी
आता पुढची कोणती कादंबरी वाचावी, या संभ्रमात सापडलोय.
जाणकारांनी मार्गदर्शन करावे!
गो ग्रामचा चित्तार, काळ्या
गो ग्रामचा चित्तार, काळ्या कपारी, अनोळखी दिशा, कॄ ष्णचंद्र.
आता पुढची कोणती कादंबरी
आता पुढची कोणती कादंबरी वाचावी, या संभ्रमात सापडलोय..........या पेक्षा पुढची कादंबरी कुठे वाचायची? याचा विचार कर. रात्री एक दिड वाजता नदीच्या घाटावर पाण्याच्या जवळ असलेल्या पायरीवर बसून पुढची कादंबरी वाच.
कोणती वाचत होतो आठवत नाही पण धारपांची कादंबरी वाचताना रात्रीचे साडेबारा एक झाले असतील. आई साडेदहानंतर पुस्तके वाचू देत नसे त्यामुळे टेरेसव वाचत होतो. अगदी निरव शांतता होती. आणि अचानक दोन मांजरे मोठ्याने ओरडली. भांडणारी किंवा प्रेम करणारी मांजरे फार कर्कश्श ओरडतात. त्यावेळी मला काळीज लक्ककन हलने म्हणजे काय ते समजले.

अप्पा भारीच की.
अप्पा भारीच की.
मी शक्यतोवर रात्री १२ नंतरच दुसरी कादंबरी चालू करतो. त्याआधी वेळच मिळत नाही.
बंगल्याच्या बाहेर, मस्त नारळाच्या झाडाखाली एकदा जीन अंथरून पडलं, की अशी वातावरणनिर्मिती होते, की ज्याचं नाव ते!!!
पण तुमचं ऐकून असं वाटतंय, की गंगेच्या घाटावर रात्र काढावीच, पुस्तक वाचता वाचता!
न्यायमंदिर -
न्यायमंदिर -
न्यायमंदिरला फक्त हॉरर न म्हणता, हॉरर - फँटसी अशी कादंबरी म्हणता येईल.
एका अपरात्री नीलम पार्टीहून परतत असताना तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न होतो, पण त्यातून तिला शरीर पूर्ण काळ्या रंगाने झाकलेली एक आकृती वाचवते. त्यानंतर तिचा त्या आकृतीशी संबंध येत जातो, व नवीन रहस्य उलगडली जातात.
ही अजून एक वेगळीच कथा. कथा प्रचंड वेगवान आहे. भय आणि उत्कंठा या दोन्हीने ओतप्रोत भरलेली. काही वर्णने, प्रसंग बघून मला दचकायला झालं.
उदा. क्राटाटानिम्र चा आकार बदलून तिचे होणारे प्रेमकांशी चाळे.
शेवटची फाईट, न्यायमंदिराचा प्रसंग, सगळंच जमून आलंय. त्याची मानवी सिविलायझेशनशी सांगड थक्क करते.
एक मसालेदार भयकथा + फॅन्टसी वाचायची असेल, तर नक्की वाचा.
रेटिंग -★★★★
बादवे यात समर्थ या कॅरेक्टरचा उल्लेख येतो, आणि त्यांचे मित्र अप्पा यांचीही छोटीशी भूमिका आहे. धारपाना आताच्या काळात ट्रेंडिंग असलेलं स्पिन ऑफ, क्रॉस ओव्हरचं तंत्र त्याकाळीही जमलं होतं असं म्हणायला हरकत नाही.
आता माटी कहे कुमहारको वाचतोय!
आता माटी कहे कुमहारको वाचतोय!!!!
छान... मी वाचलंय आधी पण आता
छान... मी वाचलंय आधी पण आता आठवत नाही

@अज्ञातवासी पु.ल. च
@अज्ञातवासी पु.ल. च व्यक्ती आणि वल्ली पुस्तक वाचा.भारी आहे.
तुमच्याकडे धारपान्ची पुस्तके फु़कट मिळतात म्हणे.
व्यक्ती आणि वल्ली वेळ काढून
व्यक्ती आणि वल्ली वेळात वेळ काढून वाचेन.

आणि असं कोण म्हटलं? त्याला पाठवा बरं माझ्याकडे
पण तुम्हाला एखादं पुस्तक हवं असल्यास सांगा, माझ्याकडे असल्यास नक्की देईन.
धारपांची बरीच पुस्तके किंडल वर नाहीत. अशावेळी हा वाचन यज्ञ चालू ठेवण्यासाठी अनेक दात्यांनी भरभरून अनेक दुर्मिळ पुस्तके पाठवलीत, त्याबद्दल त्यांचे आभार
अप्पांच्याच भाषेत, पुस्तकदाता सुखी भव!!!
अज्ञातवासी तुमचे परीक्षण छान
अज्ञातवासी तुमचे परीक्षण छान आहे.. मी मायबोलीवर खूप कमी प्रतिसाद देते... मी पण धारपांच्या कथांची चाहती आहे.. माझ्याकडे बहुतेक सर्व पुस्तके आहेत त्यांची पण कलगुंफ वगैरे दुर्मिळ पुस्तके नाहीयेत.. तुम्ही share करू शकाल का?
आज शपथ वाचून संपवले. छान आहे.
आज शपथ वाचून संपवले. छान आहे.
जुई मला संपर्कातून मेल कराल
जुई मला संपर्कातून मेल कराल प्लिज?
आणि वाचकांना एकच विनंती, प्लिज कुणालाही एखादं पुस्तक हवं असल्यास मला संपर्कातुन मेल करा. धाग्यावर नको. (विनाकारण adminला इश्यू व्हायचा)
अप्पा एवढंच? तपशीलवार लिहा की
अप्पा एवढंच? तपशीलवार लिहा की!
Pages