नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा

Submitted by अज्ञातवासी on 12 October, 2019 - 13:35

कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.

★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!

१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★

इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयडी आणि ड्यु आयडी ओळखण्या वाल्या मुलांनो, इथे नका ना चालू होऊ.परत भरपूर भांडण प्रतिसाद ओलांडून मूळ विषयाकडे यावं लागतं.
प्रतिसाद कोणाचाही असो, कंटेंट पटला.

शेरलॉक आणि डॉ. वॅटसन यांच्या प्रमाणेच धारपांनी समर्थ हे पात्र छान रंगवले होते. समर्थाच्या मित्राचे नाव लक्षात नाही. पण शेरलॉक जेंव्हा पुर्ण केस सोडवल्यानंतर त्यातील गोष्टीचे विश्लेषन वॅटसनकडे करत असे तसेच समर्थांनी एखादे अमानवीय शक्तीचे निराकरण केले की त्यातील प्रसंगांचे कार्यकारण भाव मित्राला सांगत. ते जरी काल्पनीक असले तरी इतके वास्तव असत की अंगावर काटा येई. मस्तच!

पण धारप वाचण्याचे एक वय असते. नंतर ती पुस्तके फारशी आकर्षीत करत नाहीत. मी धारपांचे एक पुस्तक वाचून इतका भारावलो आणि घाबरलोही होतो की विचारु नका. पण नुकतेच ते पुस्तक पुन्हा वाचण्यात आले आणि मला आश्चर्य वाटले की या पुस्तकाने त्यावेळी मला एवढे का झपाटले होते.

काहीही असो. नारायण धारपांनी एकेकाळी प्रचंड प्रभाव टाकला होता हे नक्की.

मी पण लुचाई पहिल्यांदा वाचले तेव्हा पुस्तकात एकनाथ मुलगा आहे साधारण त्याच वयाची होते. तेव्हा आता इतके मेंटल स्टि म्युलेशन उपलब्ध नव्हते त्यामुळे फारच घाबरून घेतले होते. परवा फोन वर किंडल वर वाचले. तेव्हा त्यातले क्राफ्ट अ‍ॅप्रिशीएट ़ केले. छोट्या जुन्या गावातले वातावर् न तो दंडी व मुजामे.. शेवटचा दंडीचा खातमा करायचा सीन व त्यातले सूर्या स्ता चे वर्णन अजूनही लक्षात होते ते तसेच परिं णाम कारक आहे. संक्रमण नावाचे पण वाचले त्यात अति जुन्या जुन्या व त्यातल्या त्यात नव्या म्हणजे ८० ९० मधील अशी स्पॅनिन्ग कथा आहे. ते वाचायला फार मस्त वाट्ते. फार हिं सक नाही व सर्व प्रॉप्स आहेत जुने घर माळा त्यातले श्वापद. एक मदत करणारे एका बाईची दैनंदिनी. हे सर्व आहे.

मी अगदी एक टी राहते त्यामुळे आता भीती वाटेल मग वाटेल असे वाटले होते पण काहीच त्रास झाला नाही. उलट राखेचा, मानबा मालिका मधील त्रासदायक कथानके बघून जास्त त्रास होतो.

काळ्या कपारी, व इतर पुस्तके पण किंडल वर आहेत. थोड्या मुद्रित शोधनाच्या चुका आहेत. पर चालसे. हम तो पहलेसे फॅन है और रहेंगे.

धारपांची मीही डेडिकेटेड फॅन. लुचाईपुढे मला स्टीफन किंगची मूळ कादंबरी सपक वाटली होती - तो मातृभाषेचा प्रभाव असावा Proud
मला समर्थांचे पुनरागमन हा कथासंग्रह आठवला. पुनरागमन, हेळामात्रे सृष्टी रचिशी (याच ओळी लक्षात आहेत, मूळ नाव वेगळं आहे काहीतरी. एका अंथरुणाला खिळलेल्या अपंग मुलाचं आकस्मिक गायब होणं ही थीम आहे), नातूंचं आगर, आणि सेलवारची शक्तीदेवी (का असंच काहीतरी) अशा चार गोष्टी आहेत. मला चारही आवडतात.
समर्थांचा सहायक अप्पा.
धारपांच्या कथा दृश्य स्वरूपात उतरवणं खूप कठीण आहे कारण नीट निरखून वाचलं तर लक्षात येईल की धारप वातावरण निर्मिती आणि दुष्ट शक्तींचं ढोबळ वर्णन करून सोडून देतात. बाकी सगळे रंग आपण आपल्या मनातले भरतो.
म्हणूनच तुंबाड अफाट होता. धारपांची सृष्टी (जरी कथा वेगळी असली तरी) अचूक पकडली आहे. आणि म्हणूनच हस्तरचं दर्शन हा थोडासा अ‍ॅन्टिक्लायमॅक्स होतो. कारण आपल्या मनातले हस्तर वेगळेच असतात.

हा धागा वाचणार नियमितपणे.

धारपांची पुस्तके वाचकांनी स्वतः अनुभवावीत. >११
चेटकीण, समर्थकथा आणि अशीच चढती भाजणी आहे. मला दस्त सगळ्यात जबरदस्त वाटते.
आणि पुन्हा वाचावीशी वाटणारी धारपांची बरीच पुस्तकं आहेत..

> प्रतिसाद कोणाचाही असो, कंटेंट पटला. > +१

ज्यांना विकत घेणे परवडते/वर्थ इट वाटते त्यांनी पुस्तकं विकत घ्यावीत.
ज्यांना परवडत नाही त्यांनी इतर मार्ग वापरावेत.
इतरांनी इतर मार्ग वापरू नयेत असं वाटणाऱ्यानी बल्कमधे पुस्तकं विकत घ्यावीत आणि जागोजागी वाचनालये चालू करावीत.
ज्यांच्या घरी खाजगी कलेक्शनभरपूर आहे त्यांनी घरातून वाचनालय चालवावे. नवीन सदस्यत्व फी, दरमहा फी वगैरे हिशोबात पडायचं नसेल तर दुर्मिळ नसलेली पुस्तक मागायला कोणी आला तर mrp रक्कम ठेऊन घेऊन ती त्याला देऊन टाकावीत. पुस्तक परत दिले की mrp-१०₹ परत करावेत.

(ऍमी प्रतिसाद तुला किंवा कोणालाही व्यक्तिशः लागू नाही.जनरल मध्ये मनातला वैताग आहे.)
दुर्मिळ पुस्तकं/जी पुस्तकं आऊट ऑफ पब्लिकेशन आहेत ती/जी मिळवायचा कोणताही मार्ग नाही ती पीडीएफ/स्कॅन करून फक्त आपल्या मित्रमंडळात शेअर करणं हे (त्यातल्या त्यात) चालू शकेल.पण किंडल वर 99 रु ला/पुस्तकांच्या दुकानात योग्य किमतीत सहज उपलब्ध असलेली पुस्तकं स्कॅन करून पीडीएफ करून फेसबुकवर/प्रचंड व्हॉटसप ग्रुप वर फिरवणे/आपण दानशूर कर्ण असल्याचा आव आणून त्याची जाहिरात करत राहणे, कोणी 'असं का करतो आहेस,किमान सर्क्युलेट करू नकोस' विचारल्यास आक्रस्ताळेपणा करणे,विचारणाऱ्याला ग्रुपबाहेर काढून त्या ग्रुपवर पीडीएफ फिरवत राहणे,सतत फेसबुक ग्रुप्स वर फ्री पीडीएफ/फुकट वाचायला पुस्तकं मागत राहणे(ही मंडळी गरीब वगैरे नाहीत) हे अजिबात पटत नाही.जे पुस्तक 99/सेल मध्ये 50 रु खर्चून/लायब्ररी फी भरून घेण्याइतकंही महत्वाचं तुम्हाला वाटत नाही ते वाचण्याचा अट्टहासच का?धारप/मतकरी/मंगला गोडबोले/वपु यांच्या पुढच्या पिढीला जर खरंच 'ते काय नाय पैसे बियसे काय नाय लेख व्हॉटसप वर व्हायरल झाला पाहिजे' वाटलं असतं तर त्यांनीच नसतं का सगळं व्हॉटसप फेसबुकवर पोस्ट केलं?आपली नोकरी सांभाळून फेसबुकवर चांगल्या पोस्ट लिहिणे, लोकप्रिय होणे, त्या व्हॉटसप वर फिरणे आणि पुस्तक लेखन/प्रकाशन उत्पादनाचं मुख्य साधन म्हणून सातत्याने चालू ठेवण्यात खूप फरक आहे.

पुन्हा वाचावीशी वाटणारी धारपांची बरीच पुस्तकं आहेत..+111111111
परत एकदा काळगुंफा आणि सुवर्णाचे विश्व वाचायला घेतलंय.

mi anu , तुमचं थोडं पटतं बरंचसं नाही .. मराठी साहित्य, ते वाचणारा वाचकवर्ग हा लहान आकडा आहे >> खरं आहे .. त्यातही विकत घेऊन वाचणारे त्याहूनही कमी आहेत . हल्ली अमुक वाचनालय वाचकांच्या अभावी बंद पडलं अशा बातम्या येत असतात .. मोठी वाचनालयं जोरात चालत असतीलही .. पण फी परवडणे या प्रश्नापेक्षा राहत्या जागेपासून मोठं वाचनालय लांब असेल जाणेयेणे - वेळेचं गणित , प्रवासखर्च , या सगळ्या दृष्टीनी सगळ्यांनाच सोयीस्कर असेल असं वाटत नाही . शिवाय तरुण पिढीला पुस्तकं जपून वापरणे , वेळेत परत देणे या गोष्टीही कदाचित त्रास वाटू शकतात .. एका तासात वाचून होणाऱ्या पुस्तकासाठी कितीजण वाकडी वाट करून , एखादी ट्रेन / बस बदलून लायब्ररीत जात असतील ...
किंडलच्या मोबाईल वर ( सगळ्यांकडे किंडल रीडर नसतात असं गृहीत धरून ) वाचायच्या पुस्तकावर 99 रु खर्च करणं लोकांना अति वाटू शकतं ... पेपरचं पुस्तक आपल्याकडे राहणार असतं , आपण ते कधीही वाचू शकतो - सॉलिड - प्रत्यक्ष वस्तू असते .. किंडल वरचं पुस्तकही कधीही वाचता येण्यासारखं असलं तरी ती किंमत काहींना अन्याय्य वाटू शकते / परवडणार नाही अशी वाटू शकते ... बघा हॉटेलात 200 रु खर्च झाले तरी काही वाटत नाही पण मोबाईल बॅलन्स मधून 50 रु जरी चुकून कट झाले तरी काही लोक जास्त अस्वस्थ होतात ... आमच्या शाळेत एकदा एक शिक्षिका दुसऱ्या सहकारी शिक्षिकेशी बोलत होत्या काहीतरी 100 रु वगैरे गेले बॅलन्स मधले .. मी मनाशी म्हटलं यांना एवढा 25 - 30 हजार रुपये पगार आहे , 100 रु साठी कशाला एवढ्या चुकचुकताहेत .. पुढे खूप वर्षांनी स्वतःच्या हातात मोबाईल आल्यावर समजलं .. पैसे गेले ह्यापेक्षा आपली लूट / फसवणूक होत आहे / झाली हे फीलिंग त्रासदायक असतं ... मोबाईल वरच्या / व्हर्च्युअल गोष्टी कमीत कमी खर्चात / फुकट पदरात पाडून घेण्याची प्रवृत्ती जास्त असते ... बरं एक वेळ वाचायच्या पुस्तकासाठी , जे खरं संग्रही पण ठेवता येणार नाहीये त्यासाठी 99 रु जास्त वाटू शकतात .

पेपरच्या पुस्तकात प्रकाशकाचा जो काही खर्च झालेला असतो , तो इथे झालेला नसतो अपवाद लेखकाच्या कुटुंबाला दिलेली रॉयल्टी वगळता ... त्यामुळे पेपरचं पुस्तक चोरून त्याचं 150 - 200 रुपयांचं नुकसान करत आहोत असा काही फील येत नाही .

प्रदर्शनात 50 रु ने विकतात पण प्रदर्शनं किती ठिकाणी लावतात ? बरं प्रदर्शनात 50 रुने विकतात तेच पुस्तक ऑनलाइन कॅश ऑन डिलिव्हरी 190 - 200 -250 ने का विकतात , 50 नेच का नाही विकत ? जे पुस्तक 50 ने विकणं त्यांना परवडतं ( रॉयल्टी वगैरे सगळं धरून ) त्याचीच किंमत 190 रुपये म्हणजे प्रकाशक रीजनेबल किंमती लावत आहेत का तुम्हीच बघा .. समर्थ सिरीजमधल्या एका पुस्तकाची किंमत 450 ते 550 रु आहे ... ती न परवडणाऱ्यांना फुकट पीडीएफ वाटणारे दानशूर वाटले तर नवल नाही ... मग प्रकाशक रीजनेबल - प्रामाणिक वागत नाहीत तर वाचकांकडून त्याची अपेक्षा करणं गैर ...

माझ्याकडे धारपांची बहुतेक पुस्तकं खरेदी केलेली आहेत पण सगळ्यांनी खरेदी करूनच वाचावीत असा आग्रह अजिबात नाही ... ज्यांना जेव्हा परवडतील आणि आपल्या संग्रहात ठेवण्यासाठी पैसे खर्च करून विकत घेण्याएवढं हे पुस्तक वर्थ आहे असं वाटेल तेव्हा ते लोक घेतील ...

जे पुस्तक पैसे खर्च करून वाचावंसं वाटत नाही ते वाचण्याचा अट्टाहासच का ? >> अहो आजच किती लोकं , तरुण मुलंमुली - शाळकरी मुलं सापडतील जी पुस्तक फुकट दिलं तरी वाचणार नाहीत / त्यात रस नाही / गती नाही ... माझे कजिन्स इंग्लिश मिडीयम - हवी तेवढी पुस्तकं खरेदी करायची आर्थिक स्थिती आहे , वाचनात इंटरेस्ट शून्य . तेव्हा कुणीतरी फुकट मिळतं म्हणून का होईना वाचत राहिलं तर ही भाषा - साहित्य त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे ... आज फुकट वाचतील , त्यातून आवड तरी लागेल / वाढेल - उद्या स्थिरस्थावर झाले , स्वतःचा संग्रह करावासा वाटला की घेतील की विकत ... लेखकांच्या पुढच्या पिढ्या चरितार्थासाठी रॉयल्टीच्या पैशावर अवलंबून असतील असं अजिबात वाटत नाही .. अशी कितीशी पुस्तकं खपत असतील आणि कितीसे पैसे मिळत असतील रॉयल्टीचे .. जणू काही 5000 लोकांनी पुस्तक खरेदी न करता डाऊनलोड केलं .. ते फ्री उपलब्ध नसतं तर 100 % त्यांनी जाऊन 250 रु चं पुस्तक खरेदी केलच्चं असतं ... फ्री मिळतं म्हणूनच वाचणारे जे आहेत ते खरेदीच्या भानगडीत शक्यतो पडत नाहीत ... आणि जे खरेदी करणारे असतात ते फ्री मिळालं म्हणून खरेदी करायचे राहत नाहीत ... निदान जे संग्रहासाठी पुस्तकं खरेदी करतात ते लोक तरी ... उदा सुशि / धारप यांची एकूण एक पुस्तकं स्वतःच्या वैयक्तिक संग्रहासाठी शोधून खरेदी करणारे लोक आहेतच ना ...

बरं एखाद्या वेगळ्या लेखकाचं पुस्तक डाऊनलोड करून वाचलं आणि वाटलं खरेदी करण्यावढं काही चांगलं नाही हे - असाही निर्णय ते घेऊ शकतात ... किंवा इतकं छान पुस्तक खरेदी करून खऱ्या पुस्तकांच्या संग्रहात ठेवलंच पाहिजे असाही . तरी लेखकाच्या पुढच्या पिढ्यांचं थोडंसं आर्थिक नुकसान होतं असं मानून चाललं तरी जुन्या ( कैलासवासी ) लेखकांची चांगली पुस्तकं फुकट सर्क्युलेट करून मराठी संस्कृतीला लॉंग टर्म मध्ये फायदाच होणार आहे ... आजच्या पिढीला जरा दर्जेदार मराठी साहित्य वाचू दे की - फुकट का असेना .. सध्याच्याच पिढीतली मुलं who's pula म्हणून विचारत आहेत .... पुलंचा विनोद त्यांच्या डोक्यावरून जातो .. मुळात कोणीतरी मराठी पुस्तकं वाचत आहे हीच प्रोत्साहन देण्याची गोष्ट आहे ... सरकारने वाचनालयं कशासाठी बांधली ? लोकांनी वाचावं , लोक घडावेत नुसतेच वाढू नयेत , संस्कृती जोपासली जावी , त्यातून समाजासाठी काहीतरी चांगलं आउटकम निघावं म्हणूनच ना ... आता वाचनालयं असुविधेची झालेल्या / उपलब्ध नसलेल्या लोकांना कुठल्या का मार्गाने मराठी पुस्तकं उपलब्ध होत आहेत आणि ते ती वाचत आहेत ही आनंद मानण्याचीच बाब आहे ... जर ती वाचून त्यांच्या मनावर वाचनाचे संस्कार झाले तर जेव्हा त्यांना परवडतील तेव्हा ते नक्की खरेदी करतील पुस्तकं .

> लेखकांच्या पुढच्या पिढ्या चरितार्थासाठी रॉयल्टीच्या पैशावर अवलंबून असतील असं अजिबात वाटत नाही .. अशी कितीशी पुस्तकं खपत असतील आणि कितीसे पैसे मिळत असतील रॉयल्टीचे . > मराठीच माहीत नाही पण इंग्रजी लेखकाला किमतीच्या ५ ते १०% इतकीच रॉयल्टी मिळत असते.

पण धारप यांनी स्वतः कॉपीराईट कायदा भंग केलेला आहे की नाही?

नाही . स्वैर अनुवाद केलेले आहेत , तिथे कॉपीराईटचा संबंध येत नाही .

<<धाग्यातला उपक्रम सखाराम गटणे परीक्षणे लिहून आणतो वहीत त्या स्वरुपाचे वाट्ते आहे.>>

अगदी....

आणि

"आमी आज दाढी करनार न्हाई " हे गटण्याच्या बापाचे वाक्य !!!! - लेखक - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.

सप्रस भाऊ धन्यवाद. सोताला अत्यंत हुसार समजणारा बदनाम कंपू लवकरच गाशा गुंडाळून पळणार आहे ही बातमी समजली. Happy Happy Happy

राधानिशा, मुद्दा तोच आहे
की ज्या मंडळींना पुस्तक विकत घेऊन/किंडल वर पण कुठेही जावे न लागता/लायब्ररी घराजवळ असेल तर खरेदी किमतीच्या नगण्य किमतीत घेऊनही वाचण्याचा उत्साह नसेल, फुकट मिळाले तरी वाचेनच असे नाही असे असेल, असे लोक वाचन विश्वाला काय व्हॅल्यू ऍड आहेत? त्यांनी पुस्तकं न वाचता त्या पुस्तकांवर आलेल्या फिल्म/व्हिडीओ बघाव्यात.'लोक तसेही फुकट पण वाचत नाहीत, वेळ असतो कोणाला, फुकट दिलं तर काय बिघडलं' म्हणून 1 पुस्तक पीडीएफ करून फुकट फिरवायचं. पुढे मागे ज्यांनी फुकट मिळत नाही म्हणून विकत घेतलं असतं त्यांचं विकत घ्यायचं मोटिव्हेशन आयतं पुढ्यात बेकायदेशीर पुस्तक देऊन घालवायचं.
तुम्ही, मी किंवा पुस्तक विकत घेऊन आवडीने वाचणारे मोजके लोक पायरसी पूर्ण बंद करू शकत नाहीत.तसं होईल ही अपेक्षा करणे आदर्शवादी ठरेल.पण तुम्ही, मी किंवा पुस्तकाची आवड असणारे, घेणे परवडणारे किमान मोजके लोक अश्या पीडीएफ मुद्दाम स्कॅन करून करणार नाही, दिसतील तेथे विरोध करतील/शक्य झाल्यास मूळ वारसांना कळवतील, तेही करायचे नसल्यास फुकट मिळणाऱ्या पीडीएफ न वाचता किंडल किंवा बुकगंगा एडिशन मोजक्या पैश्यात एका क्लिक ने विकत घेतील ही अपेक्षा वाजवी नाही का?
धबधब्यात बिसलेरी बाटल्या, लेज ची रिकामी पाकिटं टाकणारे अडाणी लोक अस्तित्वात आहेत.आपल्याला या लोकांना थांबवता येत नाही म्हणून आपण 'धबधब्यात बिस्लेरी किंवा लेज ची पाकिटे टाकणे कसे सोयीचे आणि योग्य, थोडे प्लास्टिक पण फोटोत दिसले, बिअर बाटल्यांच्या काचा पायाखाली आल्या तर काय फरक पडतो, लोक एकतर जास्त ट्रॅव्हल करत नाहीत, या आडगाव च्या ठिकाणी मुद्दाम येत नाहीत असे स्वतःला का समजवावे?
(500 रु घातले आणि पुस्तक रटाळ निघाले हे शक्य आहे.मला फक्त नवीन गुप्ते कादंबरी म्हणून हौसेने घेतलेले दंशकाल अजिबात आवडले नाही.बऱ्याच जणांना बरेच आवडले.याला रिव्ह्यू वाचून मग घेणे, वाचनालयात घेणे, बुकगंगा किंवा अमेझॉन वर 5 पानांचा प्रिव्यु वाचून तो उत्कंठावर्धक वाटल्यासच घेणे हे उपाय आहेतच.)

सकाळी ८.०० ते ८.३० पर्यंत मायबोली इज अंडर मेंटेनन्स मेसेज येत होता, आणि नंतर लॉगिन होत नव्हता.
सगळ्यात आधी तर सॉरी श्वेता तुला प्रतिसाद टाकायला लावला.
श्वेता मी तुझी जाहीर माफी मागतोय.
मधुरा आणि उर्मिला थँक्स. बरं तरी मी सगळ्यांसाठी अज्ञातवासी नाहीये Lol
बाकी एक कुत्रा श्वेताच्या मागावर फिरतोय याची सत्यता पटली!
मूळ धाग्याकडे परत येतो.

आताच चेटकीण वाचून संपवलं. हे माझं तिसरं पुस्तक, आणि एक परिपूर्ण पुस्तक म्हणूनच खाली ठेवलं.
चेटकीणची सुरुवात मनापासूनच मनाचा ठाव घेतं. मध्येच काही ठिकाणी तर तुंबाडचे खोत वाचत असल्याचा भास होतो. वातावरणनिर्मिती अप्रतिमरित्या जमलीये. क्षणाक्षणाला कोकण जाणवत राहतं.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, भीतीचा पगडा थरावर थर साचत राहावेत, असा वाढत जातो.
लुचाई आणि चेटकीण मध्ये मला जाणवलेला मूळ फरक म्हणजे, चेटकीणचा शेवट अतिशय संयत आणि प्रभावी होतो, तर लुचाईचा शेवट सपक वाटला.

रेटिंग - ★★★★★ (पाच)

Mazi vachun zali na chetkin kadambari tevha mi sister in law la dili hoti vachayla ... Bichari 15 divas zopli nahi ... Mla bolli vahini mla na sglikde ti pandhri bubule wali mulgich diste... Great novel...

अहो अद्यातवासी लॉगिन एरर होती ती मान्य आहे, पण ती एरर सकाळी 9 वाजेपर्यंत होती. नन्तर सगळं सुरळीत सुरू होतं.मी जो स्क्रीनशॉट टाकलाय तो 11.30 चा आहे. जनतेला मूर्ख समजू नका. मान्य करा की महाश्वेता तुमचाच डू आयडी आहे ते. किती फसवाल लोकांना अजून. तुमच्या लेखावर ज्याप्रमाणे महाश्वेता डुआयडी प्रतिसाद द्यायचा त्यावरून पालण्यातल्या पोरालाही समजलं असत की ते तुम्हीच आहात.

अनु, मी तुमच्याशी काही प्रमाणात सहमत आहे.

पण माझा एक अनुभव सांगते.
मी काही वर्षांपूर्वी स्तुती ऐकून एका प्रसिद्ध लेखकाचं एक पुस्तक घेतलं. आणि ते अजिबात आवडलं नाही मला. खरतरं ते पुस्तक नाही, जाडजूड कादंबरीच होती. खर्च केलेल्या पैशांच्या मोबदल्यात मी पश्चात्ताप विकत घेतलाय असं वाटलं मला.

आणि दुसरा प्रसंग......
मला एक पुस्तक (लायब्ररीतून घेतलेलं) खूप आवडलं. आणि मी विकत घ्यायला जायचा प्लॅन केला. काही उत्तम पुस्तके संग्रही असायला हवीत अशी इच्छा म्हणून! हवं तेव्हा पुन्हा पुन्हा वाचावं आणि रममाण व्हावं त्यात! पण ते मला online free pdf स्वरूपात मिळालं. आणि आता ते पुस्तक मला Mobile वर वाचावसं वाटतंच नाही.

कारण शेवटी कागदावर वाचण्याची मजा ती कागदावर वाचायचीच! Happy

त्यामुळे पुस्तक आणून वाचणे जास्त छान वाटते, हेच खरे. मोबाईलवर वाचताना डोळे दुखायला लागू शकतात. आणि चूकून लागलाच तर त्याकरता लागणारा चष्मा पुस्तकापेक्षा जास्त महागात पडू शकतो. Biggrin

@Urmila - बापरे.
आता पुढचं पुस्तक कोणतं घ्यावं याच जाणकारांनी मार्गदर्शन करावं.

@मधुरा - अगदी अगदी, तो कागदाचा स्पर्श, त्याचा गंध, वेगळीच फिलिंग येते.
पण मला मोबाईलवरच वाचावं लागतंय, त्यामुळे missing it!
Sad

पुरुष आहेस तर कमीतकमी पुरुषाचा डुआयडी घ्यायचा. स्त्रीचा का डुआयडी घेतला? कमाल आहे बुवा लोकांची गिरे तो भी टांग उपर Rofl

Pages