क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यूझीलँड मधे मालिका जिंकण्यामागे एका माणसाचा हात होता हे विसरुन चालणार नाही..शास्त्रीबुवा नाही.. संजय मांजरेकर ! कारण तो कॉमेंट्रीला नव्हता Wink

इंग्लंडविरुध्द तीन दिवसांत संपलेल्या कसोटीत षटकांचा रेट ( overs' rate) कमी ठेवला म्हणून होल्डरला दंड ! पुढची कसोटी खेळता येणार नाही !!
नियमांच्या केवळ शब्दांवर बोट ठेवून दिलेला हास्यास्पद निर्णय !!!

"नियमांच्या केवळ शब्दांवर बोट ठेवून दिलेला हास्यास्पद निर्णय !!!" - हो ना. आय. सी. सी. चा इंग्लंड ला ब्लॅकवॉश पासून वाचवण्याचा डेस्परेट अटेंप्ट तर नाही ना? Wink

*नियमांच्या केवळ शब्दांवर बोट ठेवून दिलेला हास्यास्पद निर्णय !!!* -

अतिवृष्टीमुळे ऑफिसला कालची सुटटी जाहीर झालीय. तरीही मीं काल कसाबसा ऑफिसला आलो, तर उशीरा आल्याबद्दल मला मेमो ? 20190205_222946.jpg

चांगलंच चोपलंय त्यांनी....केदार ला बाहेर बसवणं बॉलिंग च्या दृष्टीने तरी खराब निर्णय वाटतोय.
आज आपले तिन्ही विकेटकिपर्स प्लेयिंग ११ मधे आहेत..बहुधा असं पहिल्यांदाच झालंय !

एकटा धोनी काय करणार.>>>

२-३ धोनी सुद्धा काही करू शकणार नाहीत!
आधीच एवढ्या धावा दिल्यात!! आणि पंड्या बंधू बॉलींग आणि बॅटिंग दोन्हीत फ्लॉप...
पंतांनी काहीच केले नाही.. ३-३ यष्टीरक्षक ३आयपीएल् कर्णधार तरी एक आयपीएल् कर्णधार आला रजेवर.

पोरांच्या संघा प्रमाणी पोरींचा संघ जिंकत हारत होता
आज पोरींच्या पावलावर पाऊल पोरांच्या संघाचे!!!
पोरींनी तर जिंकत आलेला सामना हारून दाखविला...

भारतीय संघ चतुरस्त्र आहे. तो जिंक तोही दणकून आणि हरतोही सपाटून. जे काही करायचे त्यात १०० टक्के योगदान मग तो विजय असो वा पराभव....

काल क्रिकेट अजिबातच नाहीं पहातां आलं.
*काही करायचे त्यात १०० टक्के योगदान मग तो विजय असो वा पराभव....* इथंही तसंच , टीका असो वा स्तुति, 100टक्के कडक !! Wink

एक विलक्षण योगायोग..

धोनीने टी२० मध्ये जेंव्हा डावात संघात सर्वोच्च धावा केल्या तेंव्हा भारताचा पराभव झालेला आहे!

४८ नाबाद वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी २०१२ (भारताचा ३१ धावांनी पराभव)
३८ वि. इंग्लंड, मुंबई २०१२ (भारताचा ६ गडी राखून पराभव)
३० वि. न्यूझीलंड, नागपूर २०१६ (भारताचा ४७ धावांनी पराभव)
३६ नाबाद वि. इंग्लंड, कानपूर २०१७ (भारताचा ७ गडी राखून पराभव)
३९ वि. न्यूझीलंड, वेलिंगटन २०१९ (भारताचा ८० धावांनी पराभव)

बिच्चारा धोनी... Wink

विदर्भानं सलग दुसर्या वर्षी रणजी करंडक जिंकला. जबरदस्त खेळले. फायनल, फायनल ला साजेशी झाली. पुजारा, उनाडकट, उमेश यादव, वासिम जाफर वगैरे स्टार खेळाडूंमुळे जास्त रंगतदार झाली मॅच. देशांतर्गत स्पर्धांतली, अग्रक्रमांकाची स्पर्धा असलेल्या रणजी ला अजून एक्स्पोजर मिळावं, टेक्नॉलॉजी चा वापर व्हावा, जाहिरात व्हावी असं वाटतं. सर्वात श्रीमंत स्पोर्ट ऑथोरिटी असलेल्या बीसीसीआय च्या ह्या प्रतिष्ठीत स्पर्धेसाठी डीआरएस चा वापर व्हायला हवा. डीआरएस असतं तर कदाचित विदर्भ वि. कर्नाटक फायनल झाली असती. Wink

डीआरएस असतं तर कदाचित विदर्भ वि. कर्नाटक फायनल झाली असती. >> बर झाल मग नव्हती ते. कर्नाटकातले तेच तेच खेळादू बघण्यापेक्षा काही नवीन खेळाडू बघता आले रे. पुजारा ने एकदम निराशा केली फायनम मधे. परत एकदा मस्त चेस करतील असे वाटलेले. सगळे स्टार खेळाडू असलेल्या रणजी फायनल्स आठवतात अजूनही. मुंबई वि. हरयाणा ज्यात वेंगसरकर ने एकहाती चौथ्या डावात सामना जिंकून दिला होता नि शेवटी चेतन शर्मा किम्वा कपिल ने बाजी परतवली नि वेंगसरकर भर मैदानात रडला होता ती माझी फेव्हरीट आठवण. बहुतेक गावस्कर पण खेळला होता तेंव्हा.

जाफर काय उमेदीत मधे अजून रणजी खेळतो देव जाणे ! मानले पाहिजे.

लोखो, अनिल कुंबळे च्या दहा विकेट्सला आज २० वर्षे झाली!

सलग दोन रविवार जबरी क्रिकेट होते त्या वर्षी. आधीच्या रविवारी (३१ जाने.) सचिन ची ती चेन्नई मधली १३६ ची इनिंग आणि तो आउट झाल्यावरची "Tendu. Ten don't" हा बॅनर प्रत्यक्षात सिद्ध करणारी हार. मग बरोब्बर एका आठवड्याने हा विजय.

आपले बोलर्स विकेट घेण्याचे टाळायला बोलिंग करत आहेत असे अनेकदा वाटे. पण अनिल च्या ९ विकेट्स झाल्यावर दुसऱ्या बाजूने श्रीनाथने यावेळेस खरोखरच तसे केले होते Happy

श्रीनाथची मेहनत आठवते आहे. बरेच एकस्ट्रा सुध्दा दिले होते त्याने. पूर्ण टीमनेच मदत केली होती जम्बोला.

पूर्वी 'रणजी'चा रुबाब, प्रतिष्ठा, रोमांस आगळाच होता ! अति आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल व त्याना मिळणारी अमाप प्रसिद्धी हें कारण असावं .

पूर्वी 'रणजी'चा रुबाब, प्रतिष्ठा, रोमांस आगळाच होता ! >>> +१

पोरींनी टी२० गमावली मालिका किवी पोरींसोबत

आता पोरांनी पावलावर पाऊल न ठेवावे म्हणजे मिळविली

नशिब पावलावर पाऊल न ठेवता रस्ता बदलला!
त्यामुळे मालिकेतील चुरस कायम!!
रोहित टी २० मध्ये सर्वोच्च धावा (२२८५), सर्वाधिक शतके (४), सर्वाधिक अर्धशतके(२०)

"बर झाल मग नव्हती ते. कर्नाटकातले तेच तेच खेळादू बघण्यापेक्षा काही नवीन खेळाडू बघता आले रे." - ते ठीक आहे. पण माझा मुद्दा वेगळा होता. रणजी सारख्या प्रतिष्ठीत स्पर्धेला, बीसीसीआय सारख्या श्रीमंत पेरेंट बोर्डनं सपोर्ट करून आणखीन मजबूत बनवायला हवं. राष्ट्रीय संघाचा महामार्ग अजूनही रणजीतूनच जातो. आपल्याला वेगळे खेळाडू बघता यावेत म्हणून चुकीच्या अंपायरिंग डिसीजन्स सपोर्ट करून कसं चालेल? केवळ तो पुजारा होता म्हणून दोन्ही वेळा अंपायर्स ने ढळढळीत निक कडे कानाडोळा केला का, असा मला प्रश्न पडला.

कालची मॅच छान जिंकले. भारतीय टीम चं मोठं यश जर गेल्या काही (गेली १८-१९ वर्षं) वर्षात पहायचं झालं तर हा प्रवास आहे. एखाद-दुसरी मॅच जरी हारले, तरी २०११ चा एक अपवाद वगळता, सातत्यानं अपयश फारसं आलेलं नाही.

पूर्वी 'रणजी'चा रुबाब, प्रतिष्ठा, रोमांस आगळाच होता ! अति आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल व त्याना मिळणारी अमाप प्रसिद्धी हें कारण असावं . >> भाऊ मला वाटते रणजी चा रुबाब ODI च्या वाढत्या मह्त्वाबरोबर (नि तेणे करून टेस्ट च्या उतरत्या पॉप्युलरिटीबरोबर ) कमी होउ लागला. IPL ने तो short circuit केला. पण आता परत रणजी मधले खेळाडू टेस्ट पॉप्युलर होउ लागलेत तसे येऊ लागतील असे धरूया.

फे फे मला तुझा मुद्दा लक्षात आला होता पण केवळ पुजारा होता म्हणून ह्या चूका हायलाईट झाल्या. एव्हढ्या रणजी सामन्यांमधे अशा चूका होतच असणार, पुजारा असल्यामूळे ही बातमी झाली.

पांचाळ नि बंगालचा ईश्वरन असे दोन ओपनर ह्या वेळेस खेळलेत. ह्यातला कोणी तिसरा होईल का ?

"पांचाळ नि बंगालचा ईश्वरन असे दोन ओपनर ह्या वेळेस खेळलेत. ह्यातला कोणी तिसरा होईल का ?" - पांचाळ गेल्या तीन पैकी दोन सीझन्स चमकला आहे. पण आगरवाल त्यापेक्षा जास्त कन्सिस्टंट होता आणी रन्स सुद्धा जास्त होते. सद्ध्या टेस्ट मधे आगरवाल, पृथ्वी शॉ आणी राहूल (भारतात आल्यापासून ए टीम कडून खेळतोय आणी बर्यापैकी मान खाली घालून रन्स करतोय) हेच तिघं असतील असा अंदाज आहे.

दिल्लीकडून यंदा जाँटी सिंग नावाचा खेळाडू खेळला. त्याची बॅटींग ची शैली (आणी देहयष्टी) बरीचशी युवराज सिंग च्या जवळ जाणारी आहे. कन्सीस्टंटली चांगला खेळला तर मजा येईल. विजेत्या विदर्भाकडून राष्ट्रीय संघात येतील असे फारसे प्रॉस्पेक्ट्स दिसत नाहीत. त्यातल्या त्यात त्यांचा ओपनर रामस्वामी संजय चांगला आहे. पण तरी अजून खूप खेळावं लागेल त्याला.

जाँटी सिंग >> Happy यावरून आठवले. नवजोत सिद्धू जेव्हा १९९७ मधे पुन्हा निवडला गेला तेव्हा त्याची फिल्डिंग एकदम सुधारली होती. तेव्हा त्याला जाँटी सिंग म्हणत.

जाँटी सिंग माहित नाही, रितू सिंग माहित आहे उत्त्तर प्रदेशमधला. बहुधा IPL मधे पण उचलला गेलाय हार्ड हिटींगमूळे.

राहूल ओपनर पेक्षा खाली असावा असे मला वाटते. सहावा आकडा जिथे र्हित शर्मा पिंगा घलतो तिथे. विहारी नि राहुल ह्यांना लागेल तसे फिरवायचे.

नवजोत सिद्धू जाँटी सारखा विनोद नसेल रे Happy आज हार्दिक पांड्यासाठी मॅचमधे 'लेके आया क्या' असा बोर्ड लावलेला दिसला Wink

हार्दिक पांड्यासाठी मॅचमधे 'लेके आया क्या' >>> लोल

अरे हो म्हणूनच ते धमाल होते. सिद्धू ती १-२ वर्षे खूप जोरात फिल्डिंग करत होता.

Pages