क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहल ६-४२ ऑस्ट्रेलियात विदेशी फिरकी गोलंदाजाची ही सर्वोत्तम गोलंदाजी .. तर भारतातर्फे ऑस्ट्रेलियात अजित आगरकरने आजवर केलेल्या सर्वोत्तम ६-४२ ह्याची बरोबरी!

7759978274688450130.jpg

आता झंपा काय करतो बघायला हवे!

नवा गोलंदाज विजय शंकर चांगला वाटतोय . बळीं मिळालें नसलें तरी ६ षटकात २३ धांवा म्हनजें चांगलीं किफायती बोलिण्ग केली न त्याने. होतकरूं दिसतो आहे. सिराज, खलील पेक्शा चांगलाच.

धवनला पव्हेलिअन मध्ये काहीतरी अर्जंट काम आहे....>>>>>

धवनचे काम काय हे पहायला रोहित गेला... धवनला थांबायला सांगून....

नाही ठीक चालले आहे.. जबाबदारीने खेळ. धवनचे काम रोहित ने केले वाटते.

कप्तान गेले दोघे काय करायेत पहायला...

आता श्रीमान फिनिशर वर जबाबदारी मोठ्ठी!!

निम्म्या धावा झाल्या निम्म्या बाकी!

जोडीदार दिसत नाही त्यामुळे काळजी.>>> आहे हो..
केदार, कार्तिक, विजय शंकर, जडेजा, भुवनेश्वर एवढे आहेत अजुनी!

धोनीकाकांचे ७० वे अर्धशतक फलकावर!

धोनी ४४व्या शटकात देखिल चेंडू तटवून खेळतो..
केवळ १ धाव घेतली.. सामना अवघड करुन जिंकायचा प्रयत्न का हा?

हुश्श जिंकलो बुवा... जाधव जिंदाबाद. १०० च्या वर रेट असलेला तो एकटाच....

वर्ड कप को जाउंगा मै , घर नही जाउंगा मै --- धोनी

केदार नाबाद ५७ चेंडूत ६१
धोनीकाका नाबाद ११४ चेंडूत ८७
४थ्या गड्यासाठी नाबाद १२१ धावांची भागीदारी..

मालिका विजय २-१

मस्त जिंकले ऑस्ट्रेलियात. सर्व तर्हेने यशस्वी दौरा! काल चहल, धोनी आणी जाधव ने 'आजचा दिवस माझा' म्हणत मॅच काढली. चहल आणी जाधव दौर्यातली पहिलीच मॅच खेळत होते असं वाटलं सुद्धा नाही.

आत्तापर्यंत ट्राय केलेल्या सहाव्या क्रमांकाच्या बॅट्समेन पैकी, (फीट असेल तर) जाधव सगळ्यात प्रभावी वाटतो.

फे फे हे वाचलस का रे ? तुझे आवडते शास्त्री नि धोनी आहेत त्यात Happy
http://www.espncricinfo.com/story/_/id/25792903/no-one-replace-ms-dhoni-...

भाऊ, मी टेस्ट सिरीज च्या आधी ऑस्ट्रेलिया मधे लेग स्पिनर खेळवायला हवा असे म्हणालेलो. शेवटच्या सामन्यामधे का होईना पण खेळवला नि काय बहार आली राव. एकंदर कोणाकडेच effective leg spinner नाहीये टेस्ट मधे खेळवायला. एक जण आला तरी नुसता खोर्‍याने विकेट्स काढेल.

आत्तापर्यंत ट्राय केलेल्या सहाव्या क्रमांकाच्या बॅट्समेन पैकी, (फीट असेल तर) जाधव सगळ्यात प्रभावी वाटतो. >>
जाधव सहाव्यावर असण्यापेक्षा रायूडु बॅकप मधे ढकलून चौथा किंवा पाचवा (situation प्रमाणे धोनीशी swap करायचे - for that matter, आल्या आल्या उचलाउचलीची गरज असेल तर कार्थिक, पांड्या ला पण धोनीच्या पुढे ढकलायला हरकत नाही.) असला तर अजून फिट होईल. त्यामूळे पाठी कार्थिक, पांड्या, जाडेजा येऊ शकतात जे lofty hitting करू शकतील पहिल्या बॉलपासून. That will leave room for 3 pacers and one additional spinner in Chahal or Yadav.

"फे फे हे वाचलस का रे ? तुझे आवडते शास्त्री नि धोनी आहेत त्यात" - वाचलं. शास्त्री चं बोलणं इतकं मनावर घ्यायची गरज नाही ह्या बाबतीत माझं आणी गौतम गंभीर चं एकमत आहे. शास्त्रीबोवा कधी कुठल्या 'तारेत' असतील ते सांगता येत नाही.

बाकी शास्त्री चा खेळ आणी अनाठायी उद्धटपणा (माणूस म्हणून काय नाय ब्वा! ओळख, ना पाळख, उगा कशासाठी कुणाबद्दल वैय्यक्तिक मत बनवायचं?) ऑल-टाईम अखिल भारतीय नावडते संघटनेत फार वरच्या पदावर असला तरी धोनीविषयी असं काही नाहीये. त्याच्याविषयी पॉझिटीव्ह सुद्धा लिहीलय मी.

ऑस्ट्रेलियातले सामने संपले ना? आता कुठे आहेत भारताचे स सामने, न्यू झीलंडमधे?
मग आता जरा दुसरा धागा काढा. हा फार मोठा झालाय्.

धोनीच्या १०००० धावा झाल्या, तश्या क्रिकेट धाग्यांच्याही होऊ द्या. मग धोनीप्रमाणे ह्या धाग्याचीही निवृत्तीची वेळ येईलच. Proud तसंही विश्वचषकासाठी नवीन धागा येईल.

Pages