क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रशियाचः राजघराणं होतं ' झार' आणि धोनी आहे झारखंडचा ! या रशियन कनेक्शनमुळे, इथले 'डावे' त्याच्या बाजूने व 'उजवे' त्याच्या विरूद्ध इतकंच !!20190115_202619_0.jpg

भाऊ, मस्त! Happy

पण धोनी उजव्या हातानी फलंदाजी करतो.. सांप्रताच्या उपलब्ध यष्टीरक्षकात धोनीचे यष्टीरक्षण उजवे आहे अजुनही... Wink

माझ्यापुरत बोलायच तर धोनीबद्दल आपल्याला सॉफ्ट कॉर्नर आहे!
एखादा खेळाडू आवडण्यामागे त्या खेळाडूच्या मैदानावरच्या कामगिरीइतकच (किंबहुना जरास जास्तच) महत्व त्याच्या मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या वर्तणुकीला, एकंदर खेळाडू (आणि माणूस) म्हणून असलेल्या इमेजला आणि एकंदर व्यक्तिमत्वाला देणारी अशी एक चाहत्यांची कॅटेगरी असते ना.... मी त्या कॅटेगरीतला आहे
अगदी ऐन बहरातलाही विनोद कांबळी मला कधी कधीच आवडला नाही, आक्रमक गांगुलीपेक्षा शांत, निश्चयी द्रवीड मला नेहमीच आवडत आलाय, कोहली/रोहित/धवन मंडळींपेक्षा मला रहाणे आवडतो आणि नेहरा/इशांत/शमीपेक्षा भुवी आणि बुमराह आवडतात!
लक्ष्मण, कुंबळे, श्रीनाथ वगैरे जंटलमन साउथ इंडियन मंडळी आवडण्यामागे देखील त्यांच्या मैदानावरील (आणि बाहेरील) एकंदर वावराचा मोठा वाटा आहे
आणि माझ्यामते धोनी देखील त्याच लायनीत बसतो!

आपल्याच रोल मॉडेल्सना त्यांच्या कारकिर्दीच्या उतारावर खड्यासारखे वगळणाऱ्या (Austrelian Cricket सारख्या) विचारसरणीचा मी अज्जिबात चाहता नाही.... क्रिकेट दिमाख से ज्यादा दिलसे देखनेवाले लोगोंमेसे हूं मै!

अर्थात धोनीने त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना काही सिनीअर खेळाडूंबद्दल जो श्रूड निर्णय घेतला तो तेंव्हाही आवडला नव्हता पण त्यामागे त्याने देलेले कारणही पटण्यासारखे होते.... एका वेळेला फिल्डींग करताना लपवावे लागणारे तीन तीन सिनीअर्स कुठल्याही कप्तानासाठी बॅगेजच होते.... आणि संघहितासाठीच त्याने तो निर्णय घेतला होता, त्यात कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ वा आकस नव्हता असे मला तरी वाटते
आता तोच न्याय त्याला लावण्याएव्हढा त्याचा दर्जा/फिटनेस घसरला असता तर शास्त्री/कोहली मंडळींनी त्याला कधीचेच बाहेर बसवले असते!

एक धूर्त आणि जबरदस्त क्रिकेटींग सेन्स असलेला खेळाडू, अतिशय चपळ यष्टीरक्षक, वयोपरत्वे (बॅटींग करताना लागणारे) रिफ्लेक्सेस कमी झालेला पण अजूनही मोठा स्कोअर करण्याची क्षमता असलेला फलंदाज असे एकंदर पॅकेज म्हणून वर्ल्डकपला नेण्यासाठी तो इतर उपलब्ध पर्यायांपेक्षा वरचढ वाटतो.
तो नसेलही आता पुर्वीसारखा फिनिशर पण मग त्याला मधल्या फळीत एक इनिंग बिल्डरच्या रुपात वापरुन बघायला हवे.
त्याला शक्य असते तर ऐन उमेदीच्या काळात वरती बॅटींगला येउन अजुन बऱ्याच धावा स्वताच्या नावपुढे लावून घेता आल्या असत्या पण त्याने नेहमीच संघाची गरज ओळखली आणि त्यानुसार खेळला!

असो!

"फेफ, तू मागच्या पानावर रोहितचं उदाहरण चक्क चांगलं म्हणून दिलं आहेस." - माझं कुणाशी वैय्यक्तिक वैर / राग / लोभ / मैत्री नाहीये रे. माझ्या समजूतीप्रमाणे मी खेळाकडे objectively बघायचा प्रयत्न करतो. रोहित वन-डे आणी टी२० मधे जे करतो ते कौतुकास्पद च आहे.

फेफजी, तुम्ही आक्रमक खेळतां तेंव्हाच तुमचा खेळ बहरतो. तुम्हाला बॅक-फूटवर नेण्याचे प्रयत्न तुम्ही हाणून पाडा ! Wink

काल ऑसी माजी खेळाडू गिलेस्पीने धोनीची वारेमाप स्तुति केलीय. बरं , भारताने धोनीला विश्वचषक सघात घ्यावं म्हणून ऑसीजचे हे डावपेच आहेत म्हणावं, तर गावसकरनेही कालच धोनीचे महत्व वादातीत असल्याचं म्हटलंय. " धोनीसारखया सभ्य गृहस्थाला मोकळं सोडावं व त्याच्या अशाच प्रकारच्या खेळाचा आनंद लुटावा, ही विनंती ", हेंही कळकळीने म्हणतोय गावस्कर!!
(फेफजी, तुमच्या विरूद्ध हा कट तर शिजत नाही ना ! Wink )

भाउ Happy

अरे, मीं तर आशाच सोडली होती ! पण माझ्यावर साॅलीड टीका झाली त्या 'माबो'वर म्हणून झालं माझं सिलेक्शन ! !20190115_202451_0.jpg

"फेफजी, तुम्ही आक्रमक खेळतां तेंव्हाच तुमचा खेळ बहरतो. तुम्हाला बॅक-फूटवर नेण्याचे प्रयत्न तुम्ही हाणून पाडा !" - Happy Happy जित्याची खोड आहे ही. अशी लगेच जाणार नाही. गावसकर, गिलेस्पी ह्यांची जशी मतं आहेत, तसच मी सुद्धा गॅलिलीओ च्या धैर्यानं माझं मत मांडत रहाणार. Wink

आज रात्री / भारतात उद्या सकाळी तिसरा निर्णायक सामना सुरू होतोय. भारतासाठी मोठी डोकेदुखी बॉलिंग ऑप्शन्स ची आहे. पहिल्या सहा जणांत कुणीच बॉलिंग करत नसल्यामुळे आणी पंड्या नसल्यामुळे (प्या अजून कॉफी! मुळात कॉफी वाईट नसते हो. कुणाबरोबर प्यायची ते मात्र नीट ठरवायला हवं. हे वाक्य मी कॉफी पीत - एकटा - कॉफी पीत असताना टाईप केलय Wink ) सहाव्या / सातव्या बॉलिंग ऑप्शन ची मोठी कमतरता जाणवतेय. एके काळी रोहित शर्मा (ऑफस्पिनर म्हणून शालेय क्रिकेट मधे खेळायचा. सिद्धेश लाड च्या वडिलांनी त्याच्यातले बॅटींग चे गुण हेरले), विराट कोहली थोडीफार बॉलिंग करायचे. पण आता ते सुद्धा बोलिंग करत नाहीत. कदाचित रायडू च्या जागी केदार जाधव येईल टीम मधे. पण एकही सामना न खेळता, सिरीज डिसायडर मधे, ऑस्ट्रेलियात तो कसा खेळेल, ते बघणं निश्चितच इंटरेस्टींग असेल.

केदार जाधव आहे ऑप्शन पण त्याला खेळवायचे नाही दिसतेय..
वर्ल्ड कप सरप्राईज म्हणून ठेवायचे दिसतेय धोरण.. Wink

भाऊ, भारीच!! Happy

*मी सुद्धा गॅलिलीओ च्या धैर्यानं माझं मत मांडत रहाणार. * - फेफजी , प्रामाणिकपणे वाटतं तें ठामपणे मांडणं हेंच आत्यंतिक महत्वाचं. कारण, शेवटीं तुम्हीच खरे ठरण्याची शक्यता असतेच. For all you know, you may have the last laugh, and I mean it ! That's the glorious uncertainty of cricket !!

राहुल आणि पंड्याचा कोणीतरी ठरवून गेम केलाय पण, कॉफीचे एपिसोड असे आदल्या दिवशी रेकॉर्ड करून प्रसारित नक्कीच करत नाहीत. कोणाला तरी हे दोघे जड झाले होते आणि योग्य वेळी तो एपिसोड दाखवून योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे..

उद्या केदार जाधवला खेळावयाची शक्यता कमी वाटते आहे, तो फारच इंज्युरी प्रोन आहे. टीम मध्ये खेळण्या पेक्षा टीम बरोबरच जास्त काळ घालवला आहे त्यानी.
जी टीम परवा खेळली तीच उद्या खेळेल, जर कोणी आजरी किंवा दुखापत ग्रस्त नसेल तर.

विजय शंकर ला खेळवतील सहावा बॉलर म्हणून असे वाटते. रायुडु च्या जागी येईल तो असेही वाटते. खलील सिराजच्या जागी परत येईल.

That's the glorious uncertainty of cricket !!>> भाऊ , तुम्ही रवी शास्त्री सारखे का बोलायला लागले आहेत आजकाल ? Lol

भाउ तुम्ही काल म्हनालात कि एडलजी ने कायदेशीर सल्लामसलत केली होती. माझे मत एडलजी च्या exec capability बद्दल फारसे धार्जीणे नाहीये. रमेश पोवर पासून , जोहरीच्या विरुद्ध आलेल्या ट्वीटर पोस्र्ट ते पांड्या पर्यंत प्रत्येक प्रकरणामधे एडलजी ने मांडलेले मत नेहमीच टोकाचे वाटत आलेले आहे. आग्दी गांगूलीने सुद्धा चूका होउ शकतात असे व्यक्त केलय. आजच सुप्रीम कोर्टाने आधी amicus curiae यायला हवा नि मग COA ने ombudsman आणायला हवा असे सांगून हे प्रकरण हवेत ढकललेले आहे. त्यावर एडलजी ने वाचा.
The BCCI legal team had advised the CoA that the process of adjudicating on the players would involve an initial inquiry to be done by Johri, which would then be sent to an ombudsman whose ruling would be final and binding. This issue saw a split between the two members of the CoA - chairman Vinod Rai said if the court did not appoint an ombudsman, he would consult the amicus curiae to pick an ad-hoc ombudsman, while Diana Edulji said that she would not support any hasty inquiry because that would only amount to a "cover up" exercise. Incidentally, Edulji was present in court today along with her legal counsel.

"भाऊ , तुम्ही रवी शास्त्री सारखे का बोलायला लागले आहेत आजकाल?" - असाम्या, you can choose words like Ravi Shastri, but you cannot 'make them sound' like him, nor can you 'look like him' when speaking those. Happy अ‍ॅरोगन्स ची एक वेगळीच प्रजाती आहे रवी शास्त्री.

पोकळ कर्तृत्वाचा बोलबच्चन डोलारा उभा केला, त्याला आतून लांगुलचालनाचा मुलामा आणी बाहेरच्या बाजूला, 'आपण दुनियेला फाट्यावर मारतो' असा दुहेरी कोट लावला आणी पु. लं.च्या 'आपण कोण आहोत, एकंदरीत कर्तृत्व काय, ह्याचा अजिबात विचार न करता मत ठोकून देता यावं' हे जीवनसूत्र बनवलं की रवी शास्त्री नावाचं भारतीय क्रिकेट ला लागलेलं ग्रहण तयार होतं.

सद्ध्या साहेबांनी आपल्याला फर्स्ट चॉईस कोच न बनवल्याचा राग म्हणून जमेल तिथे तेंडूलकर वर तोंडसुख घ्यायचा केविलवाणा प्रयत्न चालवलाय. त्यातूनच मग, ही टीम 'जग्गात भारी' असल्याचा शोध लावणं, ह्या टीम मधे कुणी 'देव' नसण्याच्या वल्गना करणं चालू आहे. असो, रवी शास्त्री ह्या माणसावर ह्यापेक्षा जास्त एनर्जी, वेळ, इंटरनेट वरची स्पेस आणी ऑक्सिजन वाया घालवण्यात अर्थ नाही.

Happy हो रे, मी मस्करी करत होतो.

पण तरीही शास्त्री चे सध्याच्या खेळाडूंचे जमते असे वाटते. कदाचित तो त्यांना "त्यांच्यातला" वाटत असेल कारण तो क्रिकेटर म्हणून त्यांच्या पेक्षा वरचा नाहीये, असलाच तर खालचाच आहे ह्या अंतर्गत जाणिवेमूळे असेल.

*भाऊ , तुम्ही रवी शास्त्री सारखे का बोलायला लागले आहेत आजकाल ? * -
आजकाल ? अहो , रवी शास्त्रीचा उथळपणा, आगाऊपणा व भंपकपणा नसलेली माझी आतां पर्यंतची इथली एक तरी पोस्ट दाखवाल का ? Wink

आणि, एडलजीने कायदेविषयक सल्ला घेतला होता, इतकंच मीं म्हटलं होतं. तिथं मात्र मीं मला कायद्यातलंही सगळं कळतं , असा शास्त्रीपणा केला नव्हता. Wink

भाऊ, शास्त्रीचे नाव काढल्यावर एव्हढ्या रात्री उठलात ? एव्हधे सिरीयसली नका घेऊ हो. तो विशिष्ट कमेंट वाचून शास्त्री आठवला पटकन.

"पण तरीही शास्त्री चे सध्याच्या खेळाडूंचे जमते असे वाटते. कदाचित तो त्यांना "त्यांच्यातला" वाटत असेल कारण तो क्रिकेटर म्हणून त्यांच्या पेक्षा वरचा नाहीये, असलाच तर खालचाच आहे ह्या अंतर्गत जाणिवेमूळे असेल." - जमत असेल आणी तू म्हणतोस तसच त्यांना 'हा कोच बनू शकतो आणी एकंदरीत क्रिकेट वर आयुष्य काढू शकतो, तर आपल्याला तर काळजीचं कारणच नाही' असं वाटण्याचा भाग मोठा असू शकेल. Happy

*एव्हधे सिरीयसली नका घेऊ हो. * - मीं कांहींच सिरीयसली घेत नाहीं, हीच खरी तर माझ्याबद्दल सगळ्यांची सिरीयस तक्रार आहे ! Wink

मीं कांहींच सिरीयसली घेत नाहीं, हीच खरी तर माझ्याबद्दल सगळ्यांची सिरीयस तक्रार आहे >> बघा परत तुम्ही शास्त्रीसारखे बोलायला लागला आहत Happy

'हा कोच बनू शकतो आणी एकंदरीत क्रिकेट वर आयुष्य काढू शकतो, तर आपल्याला तर काळजीचं कारणच नाही' असं वाटण्याचा भाग मोठा असू शकेल. >> Happy असो, वर्ल्ड कप जिंकल्याशी कारण रे.

विजय शंकर, केदार जाधव, चहल खेळणार..
सिराज, रायडू, कुलदीप बाहेर..

पावसामुळे सामना भिजणार बहुतेक..

कधी कुठल्या बॉलरलाच झापलं, कधी कुठल्या फिल्डरला.. आज पाणी आणणार्‍या १२व्या खेळाडूलाच शिव्या घातल्या >>
बॉलर आणि फिल्डरचं म्हणाल तर तो कॅप्टन असल्यापासून सर्कस्टिक बोलतोच; तशा क्लिप्स पण आहेत जाडेजाला वगैरे बोललेलं.

आणि ज्या बाराव्या खेळाडूला शिव्या घातल्या तो निवांतपणे पिचवरून चालत पाणी घेऊन येत होता!

*बाराव्या खेळाडूला शिव्या घातल्या तो निवांतपणे पिचवरून चालत पाणी घेऊन येत होता! * - मग हिंमत असेल तर घाल म्हणावं आज पावसाला शिव्या !! Wink

ऑसीज 228 - 9 !
(बोलण्यासारखं खूप आहे पण मी काहीही बोललों तर ' रवी शास्त्रीसारखं बोलतां ' हा शेरा येणारच ! ) Wink

सर्वबाद २३० हा अविश्वसनीय स्कोअर. आपले बोलर्स त्यांच्या देशांत जाउन ऑसीजच्या डोक्यावर मिर्‍या वाटीत आहेत हे किती आल्हाद दायक दृष्य आहे. ( माझ्या अंगांत भाउ संचारलें आहेंत ). आज चहलचा आंकडा आला Wink

Pages