क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* जंटल्मन गिरी करण्यसाठी नाही.* पण किमान जंटलमनगिरी सगळ्याच खेळाडूंकडून मैदानावर व बाहेर अपेक्षित असतेच , गृहीतही धरली जाते. ताजं उदाहरण आहेच ! Wink

जंटलमनगिरी करायला त्याला ब्रँड अँबेसिडर म्हणून नेता येईल की. उगाच जाता जाता विकेटकिपींग आणी बॅटींग ची अतिरिक्त जवाबदारी नको.

रायडू चं व्हाईट बॉल क्रिकेट कडे लक्ष देण्यासाठी फर्स्ट क्लास क्रिकेट मधून बाहेर पडणं, धवन चं दोन महिने ऑस्ट्रेलियात बसून रणजी न खेळणं आणी धोनी चं किमान मॅच फिट रहाण्यासाठी सुद्धा रणजी न खेळणं ह्या गोष्टी बीसीसीआय ने अमान्य करायला हव्या होत्या. तिघंही चाचपडत होते पहिल्या वन-डे मधे.

विजय शंकर जरी श्रीलंकेत अयशस्वी ठरला, तरी तो पुनरागमन करू शकेल असं वाटतंय. त्याच्या एक दोन रणजी इनिंग्ज बघितल्यावर तो बॅट्समन म्हणून बराच स्टेबल वाटला. शुभमन गिल च्या बाबतीत तर, it was always a matter of time before he broke in the Indian team. श्रेयस अय्यर ला अजून संधी मिळावी असं वाटतं. ह्या रणजी सीझन ला दिल्लीकडून जाँटी सिद्धू नावाचा एक नवीन खेळाडू खेळतोय. मस्त आहे. मला त्याच्याकडे पाहून तरूण युवराज सिंग ची आठवण झाली.

*जंटलमनगिरी करायला त्याला ब्रँड अँबेसिडर म्हणून नेता येईल की. * -
फेफजी , फक्त जंटलमनगिरी करायला कुणालाच संघात घेवू नये . पण कुणीही धांवा काढतो , विकेटस घेतो म्हणून त्याला जंटलमनगिरीची गरजच काय , असंही नाही ना. *संघात लोक धावा काढायला नाहीतर विकेट घ्याय्ला असतात. जंटल्मन गिरी करण्यसाठी नाही.* याने तसं ध्वनित होतं असं वाटलं, म्हणून माझ्या त्या काॅमेंट होत्या.

भाऊ, "कुणीही धांवा काढतो , विकेटस घेतो म्हणून त्याला जंटलमनगिरीची गरजच काय , असंही नाही ना" - सहमत

हात्तिच्या ! साधं कुणी 'जंटलमन' म्हटलं होय तुम्हाला ! तर तुम्हाला वाटतंय ऑस्ट्रेलियातच बोलावून घेतलंय तुम्हाला !!20190114_204333_1.jpg

रायडू चं व्हाईट बॉल क्रिकेट कडे लक्ष देण्यासाठी फर्स्ट क्लास क्रिकेट मधून बाहेर पडणं, धवन चं दोन महिने ऑस्ट्रेलियात बसून रणजी न खेळणं आणी धोनी चं किमान मॅच फिट रहाण्यासाठी सुद्धा रणजी न खेळणं ह्या गोष्टी बीसीसीआय ने अमान्य करायला हव्या होत्या. तिघंही चाचपडत होते पहिल्या वन-डे मधे. >> +१ जेव्हढे लक्ष राहुल-पांड्याकडे देतायेत तेव्हढेच लक्ष इथेही दिले असते तर ....

भाऊ, Lol

४ थ्या क्र. मार्श आणि धोनी हा फरक खूप मोठा पडतोय असे दिसते...

शाॅन मार्श नाबाद शतक ! अभिनंदन !! ऑसीजच्या विश्वचषक संघातला एक खेळाडू नक्की झाला !!
*सिराज देखील खलील च्या पावलावर पाऊल* - तरीही दोघेही ' प्राॅमिसींग' वाटतात . अनुभवाची कमतरता ! कुलदीपचंही आज बॅड लक !

जिंकले की आज चक्क,
उत्तम गोष्ट म्हणजे ज्या काही partanerships झाल्या त्या 40 प्लस धावांच्या झाल्या..

अभिनंदन.
खेळपट्टी संथ , बाऊंडरी कमी अंतरावर यामुळे ऑसीजनी भारतासमोर किमान 320चं लक्ष्य ठेवणं आवश्यक होतं.
धोनी अजूनही 'फिनीशर' किताबाला जागूं शकतो !! Wink

मस्त झाली मॅच. माझ्या मते बॉलिंग मधे भुवनेश आणी शामी ला १००% गुण द्यायला हवे. प्रचंड उन्हाळा (४० डि. से. किंवा १०४ डि. फॅ.), bright, shiny brown म्हणजेच बॅटींग धार्जिणी विकेट, जेमतेम ६० यार्ड स्क्वेअर बाऊंड्रीज अशी संपूर्ण बॅटींग ला अनुकूल परिस्थितीत, सुरूवातीला दोघांनी प्रेशर ठेऊन (फिल्डर्स चा ही मोठा सहभाग) विकेट्स काढल्या आणी २८५/५ (४७ ओव्हर्स) वरून २९८ ला ऑसीज ला रोखलं, तिथेच त्यांनी विजयाचा पाया घातला. ३०० च्या रेंज मधलं टारगेट, efficient बॅटींग करून पार करता येण्यासारखं होतं आणी बॅट्समेन नी ते छान केलं. सगळ्याच बॅट्समेन नी त्यात वाटा उचलला.

"धोनी अजूनही 'फिनीशर' किताबाला जागूं शकतो" - कालच निवडमितीनं 'रिषभ पंत वर्ल्डकप च्या योजनेचा भाग असल्याचं' सुतोवाच केलं होतं. त्यामुळे खेळणं भाग होतं का? Happy असो. पण असे चान्सेस घेण्याची वेळच यायला नको होती. आधीच उपाययोजना करायला हवी होती. टूथपेस्ट सुद्धा दाबून दाबून घेण्याच्या प्रवृत्तीनं भारतीय क्रिकेट मधे असे शेवटी 'जात का नाही हा?' प्रश्न पडायला लागलेले अनेक स्टार खेळाडू झाले आणी ह्यात बदल होण्याची चिन्हं नाहीत. अजून काही वर्षांनी विराट कोहली च्या बाबतीतही हे घडलं तर आश्चर्य नाही. खेळाडू एका ठराविक वयानंतर, शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही म्हणून रिटायर होणं ही काहीतरी 'अब्रूस धक्का लागणारी' गोष्ट मानली जात असल्यामूळे ह्या परिस्थितीत बदल संभवत नाही.

एरवी अतिशय संतुलित लिहणारा फेफ धोनीबद्दल लिहताना काहीसा बायस होतो का? Wink

एनीवेज, पंतला जर वर्ल्डकपमध्ये खेळवायचा विचार असेल तर त्याला इथुन पुढे सगळ्या वनडे खेळवा!

खेळाडू एका ठराविक वयानंतर, शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही म्हणून रिटायर होणं ही काहीतरी 'अब्रूस धक्का लागणारी' गोष्ट मानली जात असल्यामूळे ह्या परिस्थितीत बदल संभवत नाही.
>>
छ्या: छ्या; , रिटायर झाल्यावर जाहिरातीच्या दृष्तीने ग्लॅमर राहात नाही व कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागते ही त्यातली गोम आहे .. जाहीरात दारांच्या दबावाखाली संघात राहणारे खेळाडू नाहीतच असे नाही....

"एरवी अतिशय संतुलित लिहणारा फेफ धोनीबद्दल लिहताना काहीसा बायस होतो का?" - Happy Happy

धोनी विषयी माझं मत - धोनी is no longer the same old Dhoni. तो एके काळी वन-डे मधला मोठा प्लेयर होता. पण आता वयोमानानुसार येणार्या शारिरीक शिथीलतेचा परिणाम, त्याच्या बॅटींग वर जाणवतो. पूर्वी ज्या मॅचेस धोनी शेवटपर्यंत खेचून दहापैकी नऊवेळा जिंकून देऊ शकायचा, ते प्रमाण गेल्या दोन वर्षात झपाट्यानं घटलय. त्याचे स्टॅटिस्टीक्स पण ह्या विधानाशी सहमत असतील बहूतेक, पण ते जाऊ दे.

गेली दोन-एक वर्षं सातत्यानं अपयशी होत असताना, एखाद्या अपवादात्मक इनिंग च्या दाखल्यावर 'धोनी इज बॅक' असं नाही म्हणता येत. विशेष म्हणजे स्वतः कॅप्टन असताना, बर्याच ज्येष्ठ खेळाडूंना ह्या कारणानं बाहेरचा रस्ता दाखवलेल्या धोनी ने, स्वतःवर तीच वेळ आल्यावर अपवादात्मक वागणूकीची अपेक्षा करणं (स्वतःहून रिटायर न होणं), आणी निवड समितीनं - त्याहीपेक्षा शास्त्री ने, वर्ल्डकप मधे धोनी असणारच आहे छाप विधानं करणं, अवाजवी आहे. हा खेळ आहे आणी इथे काहीही घडू शकतं. तुम्ही तुमचे प्लॅन्स असे इतक्या आधीपासून जाहीर करणं हे अपरिपक्वपणाचं लक्षण आहे.

कसोटी मधे तो कधीच फारसा मोठा खेळाडू आणी कल्पक कप्तान नव्हता. त्याला तिथे खूप मर्यादा होत्या. पण तिथे तो रिटायर झाल्यामुळे तो विषय सोडून देऊ.

तुझ्या धोनीविरोधामागे "कॅप्टन असताना, बर्याच ज्येष्ठ खेळाडूंना ह्या कारणानं बाहेरचा रस्ता दाखवलेल्या धोनी ने, स्वतःवर तीच वेळ आल्यावर अपवादात्मक वागणूकीची अपेक्षा करणं (स्वतःहून रिटायर न होणं)" हे मुख्य कारण आहे असे मला बऱ्याचदा जाणवते!

"तुझ्या धोनीविरोधामागे "कॅप्टन असताना, बर्याच ज्येष्ठ खेळाडूंना ह्या कारणानं बाहेरचा रस्ता दाखवलेल्या धोनी ने, स्वतःवर तीच वेळ आल्यावर अपवादात्मक वागणूकीची अपेक्षा करणं (स्वतःहून रिटायर न होणं)" हे मुख्य कारण आहे असे मला बऱ्याचदा जाणवते!" - नाही रे. मला इतकं भूतकाळात रमायला आवडत नाही. तो रेफरन्स इतकाच आहे, की he knows better. माझं काही वैय्यक्तिक प्रेम / राग / लोभ वगैरे पण नाहीये. प्रत्येक खेळाडूचा टीम ला एक उपयोग असतो आणी काही अनवॉन्टेड बॅगेज असतं. जेव्हा ते बॅगेज उपयुक्ततेपेक्षा जास्त होतं, तेव्हा थांबावं.

काल धोनी जरा फस्ट खेळला आणि त्याने फरक पडला. कोहली बरोबर २-३ बरेचदा धावा धावल्यामूळे धावफलक हलता राहिला (जे नेमके र्होत बरोबरच्या भागीदारी मधे दहा ओव्हर्स नंतर होत नव्हते) त्यामूळे धोनीच्या आटोक्यातले टारगेट राहिले. कार्थिकने ऐन मोक्याच्या वेळी २००% च्या strike rate ने सुरूवात केली त्याचाही फायदा झाला.

हलता धावफलक हि गोष्ट धोनी ने नेहमी हायलाईट केली आहे तिचाच त्याला काहीसा विसर पडलाय नि त्याचा परीणाम आटोक्याबाहेरच्या रेट मधे जातो नि धोनी फिनिश करायला गंडतो असे जाणवते.

काल पांड्या राहुलचा episode बघितला. पांड्याची मुक्ताफळे अश्लाघ्य होती ह्यात अजीबात शंका नाही. पण ती मते प्रामाणिक वाटली. आजच्या युथला पूर्ण मुलाखती मधली फक्त तोच भाग मते विचार करून follow करणार्‍यासारखा वाटत असतील तर खरा मुख्य issue पांड्या ची विचारसरणी नसून ह्या युथला नीर क्षीर विवेक शिकवू न शकलेल्या वातावरणाचा आहे. पांड्याही त्याच वातवारणाचे फळ आहे. त्याच बरोबर IPL मधे चीअर लीडर, after parties, celebrities, models हे आणणार्‍या BCCI ने पांड्या आधी स्वःतः आत्मपरीक्षण करायला हवे. नुसते बॅन पेक्षा 'बाहेर कुठे काय नि कसे बोलायचे ?' हे खेळाडूंना शिकवण्याकडे लक्ष दिले तर बरे होईल.

रॉबिन हूड तुझ्या background मूळे तुझ्यासाठी हा प्रश्न माझे कुतूहल शमवण्यासाठी, legal stand point of view, where do BCCI stands when it comes to ban ? BCCI has already banned players pending further inquiry. However, from what I read, there is no clear legal guidelines on what is acceptable speech from BCCI's point of view. Can player challenge (I understand it is no win-win situation) ban in court on that ground and win ?

*where do BCCI stands when it comes to ban ? * डायना एडूलजीने ' कायदेशीर सल्ला घेतल्यावरच बंदी घालायची ' ही भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे, याबाबतीत बीसीसीआय अडचणीत येण्याची शक्यता कमीच.
* धोनी is no longer the same old Dhoni. * - विश्वचषकासाठी धोनी हा एकमेव पर्याय आहे असं समजणं चूक आहे , हें एकदम मान्य. पण धोनी हाही एक उपलब्ध चांगला पर्याय असूं शकतो , यावरच काट मारण्याबाबत मात्र मीं साशंक आहे. वयानुसार त्याच्या फलंदाजीची धार कमी झाली असली, तरीही उपयुक्तता टिकून आहे. यष्टिरक्षक म्हणून तो उत्तमच आहे. वयाच्या मानाने त्याचे 'reflexes' व त्याचा ' fitness , sharpness ' कौतुकास्पद आहे व विश्वचषक तोंडावरच असल्याने त्यात कमतरता येण्याची शक्यताही नाहीं. मोठया स्पर्धांमधे खेळण्याचा प्रचंड अनुभव व मानसिकता तर आहेच आहे. Then , I say, why not !

पहिल्या सामन्यात धोनी स्ट्राईक रोटेट करु शकला नाही. काल कोहलीने पळविले त्यामुळे धोनीच्या धावा होत गेल्या...
शेवटी शेवटी प्रचंड थकलेला दिसला!

वयाच्या मानाने त्याचे 'reflexes' व त्याचा ' fitness , sharpness ' कौतुकास्पद आहे >> काल त्याने केलेले एक स्टंपिंग नेहमी प्रमाणेच जबरी होते.. बॅट्समन च्या लक्षात यायच्या आत बेल्स उडलेल्या असतात. आणि धावपळ करून धावा पण भरपूर काढल्या, पण नंतर हिट मुळे क्रँपिंग पण झाले.

फेफ, तू मागच्या पानावर रोहितचं उदाहरण चक्क चांगलं म्हणून दिलं आहेस. Proud

वर फेफने लिहीलेले धोनी बद्दलचे बरेच मुद्दे पटले. हल्ली 'कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धोनी कोणाच्यातरी "ह्या" वर्तणूकीमुळे संतापला." अश्या आशयाच्या बातम्या अनेकदा वाचण्यात येतात. कधी कुठल्या बॉलरलाच झापलं, कधी कुठल्या फिल्डरला.. आज पाणी आणणार्‍या १२व्या खेळाडूलाच शिव्या घातल्या. हे ही वाढत्या वयाचं लक्षण का?

Pages