क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

seriously मोईन अली ? भारतात spin friendly pitch वर चालला नव्हता. भारताबाहेर काय अशी जादू येते ह्यांच्या बोटांमधे ? लॉयन चे पण तेच.

मला वाटतं सततच्या फास्ट गोलंदाजीला खेळत असतांना मधेच फिरकीला तोंड द्यावं लागलं कीं फंलंदाजाना 'अॅडजस्टमेंट' करावी लागते व त्याचा लाभ भारताबाहेर या फिरकी गोलंदाजांना मिळत असावा .

फंलंदाजाना 'अॅडजस्टमेंट' करावी लागते >> interesting hypothesis. ते त्यांच्या देशामधे बॉलिंगकरताहेय ह्याचा फाअयदा मिळत असावा का ? तिथे जास्त revs द्याव्या लागतात त्याची सवय असणे वगैरे.

असामीजी, आणखी एक शक्यता आहे की बाहेरच्या खेळपटटयांवर 'फ्लाइट ' न देताही फिरकी गोलंदाजांच्या चेंडूला 'बाऊंस' मिळतो.

पुन्हा असामीजी Lol
पण भाऊंचे बरोबर आहे, असामी क्रिकेट बद्दल लिहितातच एवढ्या अधिकारवाणीने की पुढचा आदरार्थी 'जी' आपोआपच आपल्याही नकळत लिहिल्या जातो. Proud

१५० च्या पुढील कोणतेही लक्ष्य गाठावयास कठीण असणार आहे. अजून ७० धावांत इंग्लंडला गाशा गुंडाळायला लावायला हवे.

इंग्लीश समालोचकाच्या म्हणण्यानुसार आज 'glorious sunlight ' आहे. म्हणूनच आपल्या गोलंदाजांसाठी 100-4 स्कोअर कौतुकास्पदच आहे.

@भास्कराचार्य - खरंय तुमचं म्हणणं

रूट नांगर टाकून बसलाय . तो असा खेळायला लागला की शतकाशिवाय थांबत नाही. त्याची विकेट काढायला पाहिजे.

किंवा त्याला राहू दे उभा , दुसऱ्या टोकाला लागु द्या गळती. ते पण चालतंय की Lol Lol

@भाऊ नमस्करजी - आत्ताच उद्या आणि परवाचे हवामान बघितले आणि ढगाळ आहे म्हणताहेत. ही मात्रं धोक्याची घंटा आपल्यासाठी

माझं प्रेडिक्शनः १५० च्या आसपास टारगेट असेल, तर भारताची मॅच आहे, २००+ ला इंग्लंड जिंकेल. १५० ते २०० च्या मधे टारगेट असेल तर it’s anybody’s game.

आघाडी २००च्या वर गेली. खेळपट्टी उलट चांगली होतेय अशी चिन्हे असतील तर ठीक आहे, अन्यथा फार काही आशा नाही.

तशी चिन्हे आहेत, असे आता वाटते आहे. पण तरी २५०चे लक्ष्य रोमहर्षक ठरावे.

माझं प्रेडिक्शनः १५० च्या आसपास टारगेट असेल, तर भारताची मॅच आहे, २००+ ला इंग्लंड जिंकेल. १५० ते २०० च्या मधे टारगेट असेल तर it’s anybody’s game. >> फे फे ने टाय सोडून सगळे बेसेस कव्हर केले आहेत Wink

अश्विन ला फारसे काहीजमले नाही ह्याचा अर्थ खेळपट्टी कमी बॉलिंग धार्जिणी झाली असे असेल तर बरे आहे नाहि तर परत मोईन अली ला पाच विकेट बघणे ह्यापेक्षा यातनादायक काय असणार.

एवढ्या अधिकारवाणीने की पुढचा आदरार्थी 'जी' आपोआपच >> करा भागवत करा माझा Lol

अश्विन ची बॉलिंग बघताना असं नाही वाटलं की विकेट साथ देत नाहीये. तो सहा बॉल्स, सहा वेगवेगळ्या दिशा, टप्पा आणी वेगाचे टाकत होता. जेव्हा जेव्हा त्यानी, हळू आणि फ्लायटेड बॉल्स टाकले, तेव्हा तेव्हा तो भेदक वाटला.

मॅच इंग्लंड च्या बाजूनं झूकल्यासरखं वाटतय. पण चमत्कार झालेला पहायला आवडेल.

वातावरण ढगाळ नसेल, तर या विकेटवर लक्षय गाठणं अवघड जावू नये.
( ' असामी' म्हटलं कीं ' बडी असामी' हे डोक्यात पक्कं बसलेलं, म्हणून ' जी' ! 'हायझेनबर्ग'च इतकं भारदसस्त आहे कीं 'जी' लावण्याची गरजच काय ! Wink )

.

मला फक्त टेन्शन आहे त्या अॅडरसनचं ; तो आतां विकेटससाठी भुकेलेला वाघ आहे आंणि त्याची भूक बकासूराची आहे . वातावरण त्याला अनुकूल झालंच
तर त्याला खूप जपून खेळणं अत्यावश्यक !

भारताने आशियाबाहेर चौथ्या डावात २००+ आजवर ५ वेळा यशस्वीरीत्या केले आहेत. अ‍ॅडलेड २००३ शेवटचं. आता आज बघू काय होतंय!

अश्विनच्या साथीला जडेजा हवा होता असं वाटतंय. डावखुरा फिरकी गोलंदाज, इंग्लंडच्या संघात मोठ्या संख्येने असलेल्या डावखुर्‍या फलंदाजांच्या विरोधात प्रभावी ठरला असता असं आता जाणवतंय !
हिम्सकूल +१

माझी 23 ऑगस्टची पोस्ट -
दोन फिरकी गोलंदाजांऐवजी एकच खेळवणयाचा निर्णयही तर्कशुद्ध वाटला तरीही तयातही धोका आहेच ; आपल्या गोलंदाजांना इंग्लिश वातावरणात गोलंदाजी करण्याची नेमकी लय सापडलो असली, तरीही गेल्या कसोटीत चेंडू नवीन असतांना व वातावरण ढगाळ असताना ते भेदक ठरले आहेत. ( पंडयाच्या 5 विकेटस òver-cast conditios मधल्या होत्या). जर पुढच्या दोन कसोटीत वातावरण swingसाठी तितकंसं पोषक नसेल व विकेट तिसर्या दिवसानंतर फिरकीला कांहीशी पोषक झाली, तर एकच फिरकी गोलंदाज खेळवल्याने गोची होवू शकते . आपल्या पारंपारिक बलस्थानावर विसंबणं अधिक चांगलं , विशेषत: एक कसोटी तरी जिंकणं अत्यावश्यक असताना !
एकच फिरकी गोलंदाज खेळवणं चूक नव्हतं पण त्यात हा धोका अपेक्षित होताच.

कोहली राँग वन चांगला पिक करतोय.

पण हे दोघेही बॉलच्या टप्प्याजवळ का जात नाहीयेत कोण जाणे. पुजाराने ते पहिल्या डावात चांगलं केलं होतं. मला ऑफस्पिनर (आपल्या) फलंदाजांना त्रास द्यायला लागला, की २००२ चा अँडी फ्लॉवर आठवतो. अलीला 'रफ'मध्ये टाकण्यापासून थोडं परावृत्त करायला हवंय असं वाटतंय.

मला कोहली किंवा राहणे पुजारासारखे consistently बॉल च्या पिच पर्यंत जाऊन खेळताना फारसे आठवत नाहीत. पुजारा is rare breed in that aspect. This is not to say Kohali or Rahane are not good players of spin. It is just that their approach has always been different than traditional Indian approach to play spin. Kohli relies more on his subtle wrists while RahaNe prefers using back of the box.

Pages