क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेपटाने आता पर्यंत ७० धावा जोडल्या ही चांगली गोष्ट नाही गोलंदाजांसाठी.. त्यात बुमराह नोबॉल प्रॉब्लेम..
एक मर्यादित षटकांची मॅच गमावली आहे आपण नोबॉल मुळे त्याच्या..

जिंकली एकदाची २०३ धावांनी!!

पण शेवटच्या दोघांनी ७६ धावा जोडल्या ह्या गोलंदाजांच्या मर्यादा दाखवितात!

मला वाटते शेवटपर्यंत लढाऊ धोरण राखणे जमत नाही भारतीय संघाला. महत्वाचे फलंदाज बाद झाले की ते एकदम रिलॅक्स होतात. शेवटच्या तीन चार्‍ जणांनी खूप धावा काढल्या असे आपल्या संघाच्या बाबतीत अनेकदा घडले आहे.

शेवटच्या जोडीच्या बहुतेक धावा आखूड टपयाच्या चेंडूंवर काढण्यात आल्या आहेत . तशीच गोलंदाजी करणं, हा डांवपेचांचा भाग होता कीं स्वैर गोलंदाजीचा, हें सांगणं कठीण. पण कमी अधिक प्रमाणात दोन्ही प्रकार नक्कीच फरसे कौतुकास्पद नव्हते.
विजयाबद्दल , विशेषत: स्वत:ला सांवरून जिद्दीने सुधारलेलया कामगिरीबाबत, खेळाडूंचं मन:पूर्वक अभिनंदन !

कृपया ह्या शाम्पेनच्या येळंला मागच्या दोन म्याचेस चा स्कोअर इच्यारू नये. इच्यारल्यास आपमाण केला जाइल..... Happy

शॉ खेळेल असे वाटत नाही. हणुमा विहारी ला निवडणे चांगली मूव्ह आहे. तो दोन वर्षे इंग्लंड मधे लीग खेळतोय. India A मधून खेळला होता. त्याला १६ वा म्हणून ठेवायला हवा होता आधीच.

दोन्ही सिलेक्शन्स छान आहेत. मयंक आगरवाल misses out. तो ह्या संपूर्ण सीझन मधे जबरदस्त फॉर्म मधे आहे. पण ठीक आहे. सगळ्यांनाच घेता येणार नव्हतं. शॉ ला ग्रूम करायला हवं आणी हनुमा विहारी साठी सुद्धा चांगली संधी आहे. पण कुणी इंज्युअर्ड नसेल तर त्याला प्लेयिंग ११ मधे संधी मिळणं अवघड आहे.

दारूण पराभवानंतर जोरदार पुनरागमन करायची संधी असताना संघात केलेले दोन्ही बदल मला खटकतात. कारण, फलंदाजीत नवोदिताना ( गुणवान असूनही) खेळवणयाचा प्रयोग करण्याची इंग्लंड ही जागा नाही . पंतच्याबाबतीत हा धोका किमान होता कारण तो यष्टिरक्षकही आहे .

थोडं अधिक सविस्तरपणे -
फिरकी गोलंदाजाऐवजी फलंदाज घ्यायचाच तर मुरली विजयलाच आणखी एक संधी देणं मला अधिक तर्कशुद्ध वाटतं; तोच एक खराखुरा मान्यताप्राप्त सलामी फलंदाज मानला जातोय व त्याच्यावरच भरवसा दाखवणं लाभदायक ठरण्याची शकयता मला अधिक वाटते .

भाउ मला वाटते कि विजय च्या जागी शॉ येण्यामागे हि विचारसरणी असावी.

१. विजय आफ्रिकेच्या दौर्‍यापासून झगडत आहे. त्याचा कॉरीडॉर बाहेरचे बॉल सोडून देण्याचा पेशन्स कमी झालेला दिसतोय (किंवा पुजारासारखे स्ट्राईक रेट वाढवण्याचे दडपण येत असेल). कॉरीडॉर मधले बॉल पण इंग्लंड दौर्‍यामधे त्याने मिस केले नि बाद झालाय.
२. हे सगळे out of form and hence low on confidence ह्याचा परीणाम असू शकतो. साहजिक रित्या हा काय technical fault असावा तो तिथे सुधारत बसण्याऐवजी सध्या सुरू असलेल्या aus, RSA A संघाविरुद्ध च्या मॅचेस मधे भारतीय खेळपट्ट्यंवर सुधारण्याची संधी दिली असावी.
३. त्याच्यापेक्षा technically flawed असलेल्या ध्वन नि राहुल ने त्याच्यापेक्षा जास्त धावा पहिल्या दोन सामन्यांमधे केल्या, जास्त बॉल खाल्ले. तिसर्‍या सामन्यामधे त्यांनी प्रचंड सुधारणा दाखवली. हे सगळे बघता चौथ्या सामन्यामधे तेच खेळणार हे नक्की आहे (विजय असला तरी). ते चांगले खेळले तर पाचवा सामनाही तेच खेळणार
४. आता असे समजू की पूर्णपणे विजयच्या level ला येऊन फेल झाले. तरीही एकंदर चार त्यांनी जास्त वेळ घालवला आहे बघता त्यांना संधी देणे अधिक chance घेतल्यासारखे होणार हे साहजिक आहे. धवन चे डावखुरे असणे हे पत्थ्यावर पडते नि राहुल चे slip catching हा एक मोठा plus आहे.
५. injury शिवाय Shaw खेळणार नाही पण नुसता dressing room मधे राहून तो काहीतरी शिकू शिकेल हा विचार प्रवाह तर गेले २-३ वर्षे वापरलेला बघतो आहे. त्यानुसार शॉ ची निवड केलेली आहे.
६. विजय ३३ चा आहे नि अजून २-३ वर्षे खेळू शकेल. पण त्या पुढे काय असा विचार करून promising वाटणार्‍या शॉ ला पुढे आणलेले आहे असे वाटते.

अवांतर : भाउ मागे तुम्ही कोहली कप्तान म्हणून उद्दाम पणे (अहंकारी) मैदानावर वावरतो नि little bit of humility may not hurt असा प्रकारचे पोस्ट केले होते असे आठवतेय. चौथ्या इनिंग मधे बटलर चे शतक झाल्यावर कोहली ने पटकन येऊन त्याचे अभिनंदन केले. तसेच पंतने बटलरचा कॅच सोडल्यावर त्याच्या पाठीवर हसून थाप मारली हे पाहिलेत का ? He seems to be growing असे वाटले ते बघून.

असामीजी, नवोदित फलंदाजाना पहिलीच संधी इंग्लंडमध्ये देणं यांत त्यांचंच खच्चीकरण होण्याची एक मोठी शक्यता असते व म्हणूनच अगदींच पर्याय नसेल तरच तो धोका पत्करावा असं मला वाटतं ; जर इतर फलंदाज दोन सामन्यां नंतर खेळात इतकी सुधारणा करूं शकतात, तर मुरलीकडून आतां तशी अपेक्षा करणं अति आशावादी नाही ठरणार. मी याबाबत दुराग्रही नाही पण मला हें खटकलं एवढंच.
दोन फिरकी गोलंदाजांऐवजी एकच खेळवणयाचा निर्णयही तर्कशुद्ध वाटला तरीही तयातही धोका आहेच ; आपल्या गोलंदाजांना इंग्लिश वातावरणात गोलंदाजी करण्याची नेमकी लय सापडलो असली, तरीही गेल्या कसोटीत चेंडू नवीन असतांना व वातावरण ढगाळ असताना ते भेदक ठरले आहेत. ( पंडयाच्या 5 विकेटस òver-cast conditios मधल्या होत्या). जर पुढच्या दोन कसोटीत वातावरण swingसाठी तितकंसं पोषक नसेल व विकेट तिसर्या दिवसानंतर फिरकीला कांहीशी पोषक झाली, तर एकच फिरकी गोलंदाज खेळवल्याने गोची होवू शकते . आपल्या पारंपारिक बलस्थानावर विसंबणं अधिक चांगलं , विशेषत: एक कसोटी तरी जिंकणं अत्यावश्यक असताना !

मुरलीकडून आतां तशी अपेक्षा करणं >> हे बरोबरच आहे पण पुढचे दोन सामने धवन नि राहुलच ओपन करतील असा निर्णय झालेला आहे असे दिसतय. त्यामूळे विजय ला ठेवन्यापेक्षा नवख्या खेळाडूला dressing room मधे येण्याचा वाव द्यावा असे धोरण दिसतेय. barring injuries I do not see Shaw playing.

आणि असामीजी, कोहलीच्या वागण्यातील बदलाबददल सहमत ; अर्थात, त्याचं श्रेय त्याच्या वैयक्तीक आयुष्यातील बदलाला अधिक जात असावं ! लग्नानंतर फक्त माझ्यासारख्या सामान्यांच्याच नाकात वेसण येतं , असं थोडंच आहे !! Wink

र्थात, त्याचं श्रेय त्याच्या वैयक्तीक आयुष्यातील बदलाला अधिक जात असावं ! लग्नानंतर फक्त माझ्यासारख्या सामान्यांच्याच नाकात वेसण येतं , असं थोडंच आहे !! Wink>>>

Lol

भाऊ, एक नंबर!
एक व्यंचि येऊ द्या ह्यावर! Happy

<<भाऊ, एक नंबर!
एक व्यंचि येऊ द्या ह्यावर!>>
त्रिवार अनुमोदन!

<< एक व्यंचि येऊ द्या ह्यावर!>>आग्रहास्तव एक प्रयत्न -

अहो, कोणाचा विचार चाललाय ! मीं " जरा भिंतीवर खिळा ठोकून द्या ",
एवढंच म्हटलं , " आज लॉर्डसवर शतक ठोकून या " असं नाही !!!
LLORDS.gif

भास्कराचार्यजी, ट्रमपही अमेरिकेचा प्रेसिडेंट होतो म्हणून वाॅशिंगटन, लिंकन , केनेडी, ओबामा इ.इ. यांचही retrospectively अवमूल्यन होतं का ! Wink
अर्थात, व्यंचिपुरतंच बोलायचं तर ' लाॅरडस' ऐवजी कोणताही व्हेन्यू चालूं शकतो.

India's most frequent Top scorers (All innings mentioned in this piece are innings in which the batting team lost at least five wickets.) मधे धवन सहाव्या नंबर वर आहे हे बघून धक्का बसला.

आंकडेवारीचं खूळ इतकं बोकाळलंय कीं वेगवेगळे निकष लावून कोणालाही शिखरावर चढवणं किंवा दरीत लोटणं हे नित्याचंच झालंय .
'ऑल टाईम ग्रेट ' मधल्या ब्रॅडमन नंतर लगेचच आज हाॅकीच्या ध्यानचंद यांचा जन्मदिन! सलाम !!

५ / ८२ - पहिली बॅटींग करा किंवा बॉलिंग, स्विंग बॉलिंगवर परत एकदा गोची झालीच इंग्लंडची पण..

८६/६

Pages