क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

6- 86 !
3-4 स्लिप + गली ठेवून आपले गोलंदाज नेमकी
गोलंदाजी करतांना पहाणं, हाच एक आगळा आनंद ! त्यात पटापट विकेटस म्हणजे दुधात साखर !
तोच संघ कायम ठेवला, हेंही शुभकारक .

3-4 स्लिप + गली ठेवून आपले गोलंदाज नेमकी>>>
प्रथमच असे दृष्य ह्या दौर्‍यात वारंवार दिसले! नाही तर पुर्वी एखादा चौकार बसला की की लगेच ती जागा प्लग करायला स्लीप कमी करीत!

मागच्याच टेस्ट मॅच ची टीम कायम ठेवल्यामुळे, निम्मे मेसेजेस कमी येणार Happy

जबरदस्त सुरूवात आहे. आता हे प्रेशर टिकवून इंग्लंड ला लवकरात लवकर गुंडाळावं आणी पहिल्या इनिंग ला मोठा स्कोअर करावा ही सदिच्छा!

इंग्लंड ला लवकरात लवकर गुंडाळावं >>>

त्या कुर्रन ला पहिल्या कसोटीसारखे कुरण नको द्यायला चरायला!

आवडो न आवडो, पण या कुरनला पुढील बरीच वर्ष चरताना पहावं लागणार आहे आपल्याला ; अतिशय प्राॅमिसींग तरूण खेळाडू !
चेंडू जुना झाल्याने धांवा वाढणं अगदींच अनपेक्षित नाहीं.

सहज मनात आलं , विराटने टाॅस जिंकला असता तर इंगलंडला प्रथम फलंदाजी दिली असती ? (कारण, खेळपट्टी व वातावरण फारसं तेज गोलंदाजीला पोषक नाही वाटत ) May be ,as is said , it was a good toss to lose !

करन 50 !
( त्याच्या नांवाचा उच्चार 'करन' असाच केला जातोय )

'बाय' धांवांचा आंकडा मोठा वाटतो कारण लेग साईडला खूपच "स्विंग' झालेले चेंडू .
18- 0 आपली सुरुवात तर छान झालीय !
शुभरात्री.

कोहली- पुजारा जोडीने छान डाव सांवरला व आतां पुजारा- रहाणे जोडी तेंच करेल असं वाटतंय .
( अश्विन सामनावीर ठरणार असं मला कां बरं वाटतंय त्या मोईनची गोलंदाजी बघून ! )

8-195

बरोबर 2 -142 नंतर ही अवस्था बरोबर इंग्रजांच्या विरुद्ध..
अली हॅट ट्रीकवर..

१९५/८

३४ अवांतर आपण दिल्या, तर १३ त्यांनी दिल्या. आत्ता ह्या घडीला लीड ह्या दोघांच्या वजाबाकीएवढाच आहे.

अली ५ बळी!!

अजुनि १९ धावांचा लीड

पुजाराला ४ धावा हव्यात शतकाला.

३ बाद नंतर अक्षरश: ढेपाळले बाकी फलांदाज आणि ते देखिल स्पिनरसमोर!!!

त्यांनी ६ बाद ८६ नंतर २४६ केल्या आपण ३ बाद १६१ नंतर नांगी टाकली!!

पुजाराचं शतक ! अभिनंदन .
' कसोटीसाठी पुजारा लंबे दौडका घोडा आहे ', हें माझं इथलं पालुपद आतां तरी कंटाळवाणं वाटणार नाही ! Wink

Pages