क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि मॅच संपल्यात जमा.. छपरी लेकाचे, परत एकदा माती खाल्ली, हातात आलेली मॅच गेली ही सुद्धा.. पहिल्या मॅच सारखीच..

I guess it may not be a bad idea to give Shaw chance now in place of Rahul. 3-1, 4-1 who cares !

This loss is on Ashwin big time !

की मोमेंट्सः ६/८६ वरून इंग्लंड ला जवळजवळ २५० करू दिले. पुजारा च्या सेंच्युरी च्या प्लॅटफॉर्म वर मोठा स्कोअर करण्यात आलेलं अपयश आणि अश्विन चं बॉलिंग मधलं अपयश.

काल शेवटच्या सत्रात पंडया व अश्विन अजिबात प्रभाव टाकत नसूनही त्यांनाच कित्येक षटकं अखंड गोलंदाजी देत रहाणं ( केवळ नवीनं चेंडूसाठी इशांत, शामी व बुमरा याना तिघानाही विश्रांती देणयासाठी ) , हाही महत्वाचा contributing factor असावा.

जिंकू शकलो असतो , पण हरलो. Angry

अजून एक फिरकी गोलंदाज हवा होता.

कोहली आणी राहणे अजुन थोडा वेळ टिकले असते तर... इतरांनी प्रत्येकी १०-१५ धावा जास्त केल्या असत्या तर... Sad Sad

सीरिज गेली हे खरं , पण पुढची मॅच जिंकण्याचा पुर्णं प्रयत्न करावा

सध्याच्या भारत वि. इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिके निमित्तं म्हटलं जरा आढावा घेऊ आत्तापर्यंतच्या मालिकांचा...
संदर्भ: ई एस पी एन क्रिकइन्फो स्टॅट

भारत विरुद्व इंग्लंड कसोटी सामन्यांचे आतापर्यंतचे निकाल, सध्याची मालिका पकडून (सगळे आकडे सीरिजचे निकाल दर्शवतात)

एकूण सिरीज ३३
============================
भारत = १० (३४% - ड्रॉ वगळून )
इंग्लंड = १९ (६६% - ड्रॉ वगळून )
ड्रॉ = ४

भारतीय संघं इंग्लंड मध्ये (एकूण सिरीज १८)
============================
भारत = ३
इंग्लंड = १४
ड्रॉ = १

विजयी भारतीय संघाचे कप्तान :
१. अजित वाडेकर १९७१ (१-०)
२. कपिल देव १९८६ (२-०)
३. राहुल द्रविड २००७ (१-०)

इंग्लिश संघं भारतात (एकूण सिरीज १५)
============================
भारत = ७
इंग्लंड = ५
ड्रॉ = ३

विजयी भारतीय संघाचे कप्तान :
१. नरी कॉन्ट्रॅक्टर १९६१/६२ (२-०)
२. अजित वाडेकर १९७२/७३ (२-१)
३. सुनील गावस्कर १९८१/८२ (१-०)
४. मोहम्मद अझरुद्दीन १९९२/९३ (३-०)
५. सौरव गांगुली २००१/०२ (१-०)
६. महेंद्रसिंग धोनी २००८/०९ (१-०)
७. विराट कोहली २०१६/१७ (४-०)

दोनवेळा मालिका जिंकण्याचा पराक्रम फक्तं अजित वाडेकरांनीच केलाय.

अजित वाडेकरांचा इंग्लंडमधला विजय हा मुख्यत: फिरकी गोलंदाजीच्याच जोरावर होता, हा आंकडेवारीतून न दिसणारा
अत्यंत महत्वाचा व कालच्या कसोटीच्या संदर्भातही लक्षात घेण्याजोगा भाग आहे.

भारतात असो वा भारता बाहेर. आपला कायम सिलेक्शनचा एकच प्रॉब्लेम असतो. भारतात असताना कुणाला आत घ्यायच. बाहेर असताना कुणाला आत ठेवायच. Happy

जाउ दे आपलाच (क्रिकेट प्रेमींचा ) भ्रमाचा भोपळा फुटला.

१२-१३ तासात शेवटची टेस्ट सुरू होतीये. भारताला जबरदस्त लढताना बघायला आवडेल. शास्त्रीने 'रेस्ट अ‍ॅश्यूअर्ड' असं म्हणत आपण लढत देणार असल्याचं सुतोवाच केलय. हे करताना, मागच्या कुठल्याही - महान खेळाडूंनी भरलेल्या टीम पेक्षा ही टीम चांगली आहे, हा शेरा अनावश्यक होता. पण ह्या असल्या पिंका टाकण्यात त्याचं करियर घडलेलं असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू.

मिडीया आणी माजी खेळाडूंना ला ऊत आलाय, पण त्यानं काहीही बदलत नाही. टीम मधे नसलेल्या रोहीत शर्मा पासून नवोदित हनुमा विहारी, पृथ्वी शॉ आणी जवळ जवळ विस्मृतीत गेलेल्या सरांपर्यंत सगळ्यांची नावं संभाव्य संघात फिरताहेत. उद्या कुठला संघ मैदानात उतरतो ते बघायला हवं.

२००६ मधे नागपूर ला भारताविरुद्ध पदार्पण करणार्या आणी पदार्पणातच शतक ठोकणार्या अ‍ॅलिस्टर कूक ची शेवटची मॅच. त्यांच्याकडे 'तो एक महान खेळाडू आहे, देशासाठी त्यानं मोठं योगदान दिलय, त्याचं त्यालाच ठरवू द्या, कधी रिटायर व्हायचं ते आदी गोष्टी नाहीत वाटतं. गेला बाजार, 'नेशन वॉन्ट्स टू नो' वाल्या पॅनेल चर्चा पण नाहीत. एव्हढं स्टोक्स प्रकरण झाल्यावर सुद्धा शिमग्यानंतरचं कवित्व उरत नाही - छ्या, मजाच नाही! :).

शास्त्री काय म्हणाला ते हे आहे

"If you look at the last three years, we won nine matches overseas and three series. I can't see any other Indian team in the last 15-20 years who had that kind of run in such a short period and you have some great players in those teams." Shastri said. "So the promise is there. It is just [about] getting tougher mentally. You have got to hurt when you lose such matches, but that is when you look within and come out with the right kind of answers to combat such situations again and get past the finishing line. One day you will, as long as you believe."

माजी खेळाडू हवा तसा सोयीस्कर अर्थ काढून ठोकताहेत त्याला. सहज म्हणून हे बघितले तर २००४ मधे बांग्लादेश नि झिम्बाव्वेला २-०, २-० हरवले होते. त्याचा काय डोम्बलाचा अभिमान धरायचा.
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;home_or...

चेंज म्हणून हनुमा विहारी नि शॉ खेळलेले बघायला आवडतील.

गेल्या ४ वर्षांत ९ ओव्हरसीज मॅचेस जिंकल्या. ५ श्रीलंकेविरुद्ध, २ वेस्ट इंडिजविरुद्ध, १ आफ्रिकेविरुद्ध, १ इंग्लंडविरुद्ध.

३ वर्षे धरायची असतील तर ७ जिंकल्या. ३ श्रीलंका, बाकी सेम.

आता ह्यातल्या कशाचा अभिमान धरायचा आणि कशाचा नाही ते ठरवा. Wink

अजूनही आपला संघ पहिल्या क्रमांकावर आहे हे सत्य आहे. पण म्हणून इंग्लंडमधे समाधानकारक खेळ होत नसताना शास्त्रींनी उगाच उर बडवायला नको.

गेल्या चार वर्षात (डिसेंबर २०१३पासून), आपण खालील देशात कसोटी सामने खेळलो. कंसातील पहिला आकडा आपण जिंकलेले सामने, दुसरा आकडा आपण हारलेले, तिसरा आकडा बरोबरीत सुटलेले
या काळात भारतात अजून मालिका हारली नाही, आणि केवळ एक सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हारला आहे.
मला तरी शास्त्रीची कमेंट पटते. गेल्या चार वर्षात संघ जिंकण्यासाठी खेळतोय आणि त्या उद्देशाच्या जवळ पोचतोय जुन्या संघांच्या तुलनेत. कोहलीने म्हटल्याप्रमाणे शेवटची पायरी ओलांडणे गरजेचे आहे.

साउथ आफ्रिका (०-१-१)
न्युझीलँड (०-१-१)
इंग्लंड (१-३-१)
ऑस्ट्रेलिया (०-२-०)
बांग्लादेश (०-०-०)
श्रीलंका (२-१-०)
वेस्ट इंडिज (२-०-२)
श्रीलंका (३-०-०)
साउथ आफ्रिका (१-२)
आणि आत्ताची चालू (१-३)

आपल्या क्रिकेटर्स किंवा त्यांचे कोचेस ह्यांना कळून चुकलयं की एक सामना हा जिंकला तरी उदो उदो होणार! अगदी ड्रॉ राखला तरी कसे उत्तम खेळले वैगेरे!
आणि आता पुढील आठवड्यात आशियाई कप सुरु होतोय मग तर काय भारत पाकीस्तान सामना जिंकला तरी पुरे!
मग तर काय विचारायलाच नको..
कसोटीचा निकष २०-२० ला पण मग लोकांचा!

अपेक्षेप्रमाणे इंग्रजांनी नाणेफेक जिंकली.

आणि फलंदाजी घेतली हे पण अपेक्षितच!!

जडेजा,हनुमा विहारी आत. अश्विन, हार्दिक बाहेर..

आता ह्यातल्या कशाचा अभिमान धरायचा आणि कशाचा नाही ते ठरवा. >> ह्या विचाराचा . "So the promise is there. It is just [about] getting tougher mentally. You have got to hurt when you lose such matches, but that is when you look within and come out with the right kind of answers to combat such situations again and get past the finishing line. One day you will, as long as you believe." दोन मिनिटे शांतपणे विचार कर नि शास्त्री ने म्हटलेल्या वाक्याकडे ते शास्त्रीचे आहे ह्यापलीकडे जाऊन पूर्ण वक्तव्य वाच, त्यात नक्की काय emphasis केलय हे बघितले की पहिल्या दोन वाक्यांवर उर बडवण्यापेक्षा पुढच्या भागावरअलक्ष देणे मला योग्य वाटते.

कुठलही फळ झाडाची पूर्ण वाढ झाल्याशिवाय धरत नाही. ह्या टीम च्या परफॉर्मन्स मागे, गेल्या कित्येक टीम्स नी केलेली पायाभरणी आहे - स्ट्रॅटेजी, टेंपरामेंट, अ‍ॅटीट्यूड - सगळच. त्यामुळे ह्या टीम चा परफॉर्मन्स असा isolation मधे बघता येत नाही. असो.

करूण नायर ला डावलून विहारी ला घेतल्याबद्दल सुद्धा गदारोळ उठलाय. पीच फ्लॅट असेल, तर अतिरिक्त बॅट्समन पेक्षा, एक अतिरिक्त बॉलर खेळवायला हवा होता का?

इंग्लंड ने भक्कम सुरूवात केलीये. ५००+ स्कोअर होऊ शकतो. भारत कसं रोखणार / प्रत्त्युत्तर देणार ते बघण्याची उत्सुकता आहे.

दोन मिनिटे शांतपणे विचार कर नि शास्त्री ने म्हटलेल्या वाक्याकडे ते शास्त्रीचे आहे ह्यापलीकडे जाऊन पूर्ण वक्तव्य वाच, त्यात नक्की काय emphasis केलय हे बघितले की पहिल्या दोन वाक्यांवर उर बडवण्यापेक्षा पुढच्या भागावरअलक्ष देणे मला योग्य वाटते. >>>

ही अशी वक्तव्यं शिव खेरा वगैरे लोकांच्या पुस्तकांतही भरपूर असतात. ही अशी platitudesने भरलेली बडबड शास्त्री कॉमेंटेटर असतानाही करायचा. शास्त्रीच काय, धोनीही process वगैरे शब्द वापरतच होता की. मुळातच banal, त्यात शास्त्री म्हणाला, अशी कथा असताना ते कोणी म्हटलंय हे टाळून पुढे नाही जाता येत बुवा.

भारतीय खेळाडूंकडे promise नाही अशी स्थिती तर १९७० पासून कधी झाली आहे असं वाटत नाही. त्यामुळे ते तर tautologically निरर्थक विधान आहे. तेंडुलकर कप्तान असताना त्याला मनाजोगती टीम सिलेक्टर्स द्यायचे नाहीत, असे ऐकले आहे, पण इथे स्टार बॅट्समनला हवी तीच टीम आणि हवा तोच कोच, तरी घोडं अडलेलंच आहे.

पाकिस्तानमध्ये आजवर पहिल्यांदाच सिरीज विन करणे (२००३-०४), लिजेंडरी असलेल्या २००३च्या ऑस्ट्रेलियाशी ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज ड्रॉ करणे, इंग्लंडमध्ये १९८६नंतर पहिल्यांदा सिरीज जिंकणे (२००७), वेस्ट इंडिजमध्ये (ब्रायन लारा, चंदरपॉल वगैरे असताना) १९७१नंतर पहिल्यांदा सिरीज जिंकणे (२००६), हे प्रकार २००३ - २००७ ह्या काळात भारतीय संघाने केले. २००७/०८ मध्ये मंकीगेट सिरीजमध्ये सगळा वाद, रडीचा डाव इ. इ. सांभाळून जिद्दीने खेळून पर्थवर ऑस्ट्रेलियाला हरवले. (इन फॅक्ट दॅट सिरीज हॅड अ मच बेटर चान्स ऑफ बीइंग २-१ इन द अदर डिरेक्शन. त्यात अंपायरिंग वगैरे इशूज होते.) थोडे पुढे जायचे तर २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सिरीज विन, २०१०मध्ये आफ्रिकेमध्ये सिरीज ड्रॉ इ. येते. २००१ च्या लिजेंडरी मॅचपासून ही "प्रोसेस" सुरू झाली असे समजले, तर २००३ मध्ये त्याचे रिझल्ट्स दिसू लागले होते. त्यामुळे शास्त्री-बिस्त्रीला फार काही बोलायचा हक्क आहे असं मला तरी वाटत नाही. त्याचा One day कधी येईल हे मला तरी माहिती नाही.

भास्कराचार्य - टोटली सहमत आहे. कदाचित भाऊ तुझ्या १९७० च्या टाइमलाईन वर आक्षेप घेऊ शकतील Wink कारण त्या आधी सुद्धा प्रॉमिस असलेली मर्चंट, लाला अमरनाथ, मंकड, हजारे वगैरे बरीच मंडळी होती.

हो, ते वर्ष एक संदर्भ म्हणून घेतले, त्या सुमारास आपण पहिल्यांदा बाहेर जिंकलो म्हणून. Happy बाकी टोटली सहमत आहे.

एक मिनिट भा तू नक्की कशाबद्दल वाद घालतो आहेस हे तुला जाणवतेय का नक्की ? "So the promise is there. " ह्याचा अर्थ आधी promise नव्हते असा होतो ? तसे असेल तर तुझा मुद्दा निर्विवाद्पणे मान्य.

२०१०मध्ये आफ्रिकेमध्ये सिरीज ड्रॉ इ. येते. >> इथे थोडा विराम घेऊ नि ४-०, ४-०, ३-१ वगैरे आकडे आठवू तेंव्हा पायाभरणी झाली असली तरी वर खाली होणे होत नाही असे म्हणणे मला धाडसाचे वाटते. ह्या सिरीज मधे दोन अतिशय अटीतटीचे सामने हरलो नि एक सपशेल हरलो, अगदी तेंडूलकर , द्रविड भरात असतानाही असे झालेले आहे

'tautologically निरर्थक विधान आहे' म्हटल्यावर त्यावर आणी निरुपण का लिहितोयस ह्याची गम्मत वाटली Lol खर तर तू किंवा मी म्हणण्यापेक्षा कोच असलेल्या व्यक्तीने म्हणणे ह्याला काही तरी अर्थ (वेटेज) असावा नाहितर एव्हध्या माजी खेळाडूंनी नि इथे आपन त्यावर एव्हढे बोललो नसतो.

त्यामुळे ह्या टीम चा परफॉर्मन्स असा isolation मधे बघता येत नाही. असो. > >फे फे हे मान्य आहे पण तोच न्याय त्या वाक्यालाही लावायला हवा असे मला वाटते. मला प्रामाणीकपणे वाटतेय कि शास्त्रीचा उद्देश आधीच्या टीमला कमी लेखण्यापेक्षा 'ह्या संघात कुवत आहे, जिद्द आहे नि त्यांना तो शेवटचा मैल ओलांडून जायची गरज आहे' ह्यावर असावा. हा शेवटचा दगड ओलांडताना तेंडूलकर, द्रवीडच्या संघांची पण दमछाक झालेली आहे तेंव्हा त्यांच्यापेक्षा कमी दर्जेदार (हे माझे मत) पण जिद्दी (इथेही मला नेमका शब्द सुचत नाही पण कोहली च्या खेळात जिंकण्यासाठी वाट्टेल तो असा एक attitude दिसतो त्याला उद्देशून ) खेळाडूंच्या संघाला तो ओलांडून जाणे न जमणे मला आश्चर्याचे वाटत नाही पण बॉलिंग युनिट जसे खेळले ते बघून आपण आधीपेक्षा जिंकण्याच्या अधिक जवळ आलो असे वाटले. नि त्याच बरोबर बॅटींग मधे अजून एक जण थोडा खेळला असता तर अशी चूटपुट पण लागून गेली.

करूण नायर ला डावलून विहारी ला घेतल्याबद्दल सुद्धा गदारोळ उठलाय. पीच फ्लॅट असेल, तर अतिरिक्त बॅट्समन पेक्षा, एक अतिरिक्त बॉलर खेळवायला हवा होता का?

इंग्लंड ने भक्कम सुरूवात केलीये. ५००+ स्कोअर होऊ शकतो. भारत कसं रोखणार / प्रत्त्युत्तर देणार ते बघण्याची उत्सुकता आहे.
>> दुसर्‍या परिच्छेदातल्या अध्याऋत वाक्यातल्या प्रश्नाचे उत्तर पहिल्या वाक्यात असेल का ? Happy

Pages