क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अनुष्काचा चालेल का>>
मी त्या बाईला ओळखत नाही नि ती मलाहि ओळखत नसणार? पण तुम्हीच कळवा तिला. शिवाय वरची कॉमेंटसुद्धा!

एकामागोमाग एक असे इंग्लीश फलंदाज आपल्या मध्यमगती गोलंदाजीवर विकेटमागे झेल देवून तंबूत परतताना व इंग्लीश तेज गोलंदाज इंग्लीश विकेटसवर हताश झालेले पहाणं, यासारखं आपल्याला सुखकारक काय असूं शकतं ! ब्रिटिशांच्या विरूद्ध खेळताना 15 ऑगस्ट एवढा मनाला लावून घेतला असेल आपल्या खेळाडूंनी?

मी त्या बाईला ओळखत नाही नि ती मलाहि ओळखत नसणार? पण तुम्हीच कळवा तिला. शिवाय वरची कॉमेंटसुद्धा! >> कळवले.. पण तिने झक्कींचा महत्वाचा मॅसेज द्यायचा आहे असा ईशारा करताच तुमचा लाडका विराट बॅट टाकून थेट आतमध्येच गेला मॅसेज घ्यायला.
बघा हे असे होऊ शकते, म्हणून मी सांगितलेच होते आधी तुम्हाला पण तुम्ही तरीही 'कळवा' म्हणालात म्हणून कळवले.

मला वाटले मागे कुणि बाईने मैदानावर येऊन कुणा खेळाडूशी प्रेमाचे चाळे केले तसे करते की काय ही बाई!
जाऊ दे कोहलीला. आता १२ धावा झाल्या की (झाल्या तर) आपले ५०० चे टार्गेट चे जमेल. मग लगेच पांड्याला रिटायर करून विश्रांति घ्यायला परत पाठवा. त्याची कुणि अनुष्का आहे का, निरोप देतो.

एकामागोमाग एक असे इंग्लीश फलंदाज आपल्या मध्यमगती गोलंदाजीवर विकेटमागे झेल देवून तंबूत परतताना व इंग्लीश तेज गोलंदाज इंग्लीश विकेटसवर हताश झालेले पहाणं, यासारखं आपल्याला सुखकारक काय असूं शकतं ! >>> टोटली!

कोहली शतक! सही.

पण तिने झक्कींचा महत्वाचा मॅसेज द्यायचा आहे असा ईशारा करताच तुमचा लाडका विराट बॅट टाकून थेट आतमध्येच गेला मॅसेज घ्या >> Lol

त्याची कुणि अनुष्का आहे का, निरोप देतो.>>तुम्ही तुमच्या अनुष्काला निरोप द्या बरं, यंदा मॅनिंग च्या अनुष्काला पण निरोप द्या Wink

काय होऊ शकते ? - इंग्लंड सर्व बाद उद्या चहापानापर्यंत 200, किंवा दिवस अखेर 250, किंवा परवां लंचपर्यंत 325 पर्यंत, असें काहीही होऊं शकते !

काल ईशांत व बुमराह इंग्लंडच्या सलामीचया जोडीला वारंवार ' बीट ' करत होते तें पहातां , आजच्या पहिल्या सत्रात, विशेषत: पहिल्या तासांत , इंगलंड आतां किती टिकाव धरू शकेल हे कळून येईल. अश्विन गोलंदाजी करण्याच्या परिस्थितीत आहे, याचाही दबाव इंग्लंडवर असेलच .
इंग्लंडला आतां फक्त पाऊसच वांचवूं शकतो , असं म्हणणं आगाऊपणा होणार नाही .

जेनिंग्ज इनिंग संपली...
आता स्वयंपाकी आणि मुळे किती वेळ खेळतायेत त्यावर अवलंबून!

येस! आता सामना खिश्यात येताना दिसतोय! Happy

पोप पण गेले!

आता सहायक स्वयंपाकी आलाय बघु किती भाकरी भाजतो ते!

<<स्वयंपाकी आणि मुळे दोघेही मुळ्या च्या भाजीचा स्वयंपाक करायला आत गेले...>>
पण अजून स्टोक नि वोक आहेत ना!
त्यांना एकदम भोSक करून घाबरवलं तर लवकर बाद होतील! नाहीतर तेहि खेळत बसतील.

बटलर चा पंतकडून सुटलेला कॅच अजून तरी सतावतोय. खूप मोठं नुकसान होणार नाही ही अपेक्षा आहे. कमॉन गाईज, वन मोअर विकेट!

इंग्लंडचं धोरण स्पष्ट आहे ; संधी आहेच तर बॅटींगची प्रॅक्टीस करून घ्यावी. पण आतांच इग्लिश वातावरणात नेमकी गेलंदाजी करायची लय गवसलेलया आपल्या गोलंदाजांनाच हया सरावाचा लाभ होण्याची शक्यता अधिक असावी .

लंचमधे बीअर पिऊन आता जरा आपले लोक सुस्तावले असतील. चहानंतर पुनः ताजेतवाने होऊन खेळतील.
उद्यापर्यंत सामना लांबवला पाहिजे.

लंचमधे बीअर पिऊन आता जरा आपले लोक सुस्तावले असतील. >> झक्की हा बेसबॉल नाहहोलंचमधे क्रिकेट खेळायला, क्रिकेट आहे हो Wink

बटलर नि स्टोक्स चांगले खेळताहेत, अश्विन पूर्ण फिट नाही हे महाग पडतेय.

बटलर आणि स्टोक्स नी गोची केलीये, नवीन बॉल घेतला लगेच, बुमराह जोरात आहे आता, विकेट पडायला पाहिजे, उद्या हेच खेळत असतील तर मॅच ड्रॉ व्हायची शक्यता वाढेल.

ह्या जोडीने २०० खाली लीड आणला तर हरण्याची शक्यता दाट आहे..

एवढे टायपे पर्यंत बटलर गेला!! Happy
पंतांनी सोडलेला झेल १०० करून गेला..
बेअरस्टा गेला लगोलग.

वोक्स स्टोक्स लागोपाठ गेले आता ८ बाद..

बुमराह च्या ४ टेस्ट्स मधे २१ विकेट्स झाल्या आहेत. अजून एखादी मिळू शकते. सुदैवानी त्याच्या चारीही टेस्ट्स द. अफ्रिका आणी इंग्लंड मधे होत्या. उपखंडात पण त्यानं असच खेळावं ही सदिच्छा.

Pages