क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अचानक खेळपट्टी फिरली?? Uhoh

नाही , अचानक खेळाडूंची डोकी फिरली . भारतासारखी. अन्यथा मोइन अली टिच्चून खेळतोच आहे....

काल मस्त कमबॅक केला आपण. त्या हणम्याला दिवसभरात एकच ओव्हर मिळाली !
रच्याकने, शास्त्री भयंकर लकी माणूस आहे हे माझं मत !
संघात असताना रटाळ खेळून सुद्धा ऑडी गाडी मिळवली (आमच्या कणेकरांचं आवडतं गिर्‍हाइक ते.. बॅट कुठे, बॉल कुठे, पाय कुठे.. वगैरे वगैरे )
संघाबाहेर पडला की कॉमेंट्री करुन कमाई केली... ती तो बरीच चांगली करायचा. थोडक्यात मांजरेकर सारखी नाही करायचा Wink
कॉमेंट्री करुन बाहेर पडला.. कोच झाला ! विराट कोहली फॉर्मात असल्यामुळे तसं फारसं काही न करता बरं चाललं आहे शास्त्री बुवांचं सध्याही Happy

25 byes आहेत, पण त्या पंत मुळे नव्हेत, लेग साईडला प्रचंड बाहेर बॉल टाकल्यावर धोनी पण उड्या मारून बॉल अडवू शकणार नाही

८बाद झाले आता शेवटचे दोघे ६०-७० जलद धाव जोडून आमच्या गोलंदाजांची परंपरा सार्थ ठरवतील..

छे ७० धावा ९व्या जोडीनेच जोडल्यात आतापर्यन्त शतकी भागीदारी देखिल करु शकतात! आपल्या गोलंदाजाची अवस्था हीच आहे!
गेल्या पाच पैकी चार कसोट्यात अंतीम ३ फलांदाजांची लुटल्या धावा... हे ही एक पराभवाचे कारण...

आता साडेतिनशे देखिल करू शकतात हे ..

लोकेश राहुलने आपला हट्ट सोडला नाही आठ वेळा सस्त्यात बाद होउनही तो आपली दळभ्द्री ब्याट घेऊन पुन्हा विकेटला लोंबकळू लागला ... मग तो यष्टीमागे उभा असलेला इण्ग्लिश विकेटकीपर बोलू लागला.. बाळ राहुल तुझे तंत्र साफ उघडे पडलेले असूनही आणि काही स्कोर नसताना तू पुन्हा पुन्हा संघात आणि सलामीला येतो आहेस याचा अर्थ भारतात सलामीचे फलंदाज नाहीत, तू वशिल्याचे तट्टू असावास, तुझे कोणेतरी राजकारणात असावे या पैकी काय कारण आहे. या प्रश्नाचे उत्तर तू माहीत असूनही दिले नाहीस तर त्याचा परिणाम तुला माहीत आहेच, दोन्ही डावात अ‍ॅण्डरसनच्या चेंडूने तुझ्या ब्याटीची शंभर श्कले होतील आणि ती मैदानात लोळू लागतील ..... Happy

धन्य त्या इंग्लंडच्या शेपटाची.
शेवटच्या तीन जोड्यांनी १५१ धावा. एव्हढ्या तर आपले पहिले पाच तरी करतील का?
धवन तर गेलाच.

पण दुसर्‍या बाजूचे? ते गेले एकामागून एक तर तो एकटाच कसा खेळेल? म्हणजे त्याला खेळू देणार नाहीत. नाहीतर बुमराह ऐवजी तो एकटाच खेळला असता दोन्ही बाजूंनी. ओव्हर संपल्यावर विकेटकीपरच्या गळ्यात गळा घालून जायचे एका बाजूने दुसर्‍या बाजूला.

सध्याची आपली परीस्थिती काळजीची आहे. पण अजुन बराच सामना बाकी आहे. Hoping for the best!

<strong> पंत पण गेला, पंत ला कसली घाई असते कोणास ठाऊक</strong>
पंत बाहेर होता तेव्हा पंतला घ्या पंतला ह्या ... अशी जपमाल इथे ओढणार्‍यानी याचे उत्तर दिले पाहिजे. अन्यथ तो केवळ विकेट कीपर आहे हे जाहीर करावे...

पंत व विहारीला इंगलीश गोलंदाजांनी त्यांचं नेमकं मर्मस्थान हेरून गोलंदाजी केली ; विहारीला आखूड टप्प्याचे सलग दोन चेंडू, एकावर षटकार व दुसर्यावरही षटकार मारताना नशीबाने वाचला ! पुढच्याच षटकात सलग दोन बाहैर जाणाऱ्या चेंडूना बॅटनै वारा घालताना जोरदार अपील होवून वाचला. दोष देण्याचा अजिबात हेतू नाही पण सुरवातीलाच कसोटीत खेळणं व तेंही इंगलीश वातावरणात, यासाठी तंत्र व मानसिकता यांची खूप अॅडजसटमैंट करावी लागते व भल्याभल्यांनाही तें कठीण जातं . ही जाणीव खेळाडू निवडतानाच असणं अत्यावश्यक.

२०११ साली इंग्लंडने भारताला एकाही डावात ३०० धावा पार करू दिल्या नाहीत. (शेवटच्या टेस्टमध्ये ३०० एक्झॅक्ट झाल्या.) आणि आपण ४-० हरलो. २०१४ साली पहिल्या ड्रॉ झालेल्या व दुसर्‍या लॉर्ड्समध्ये जिंकलेल्या टेस्टमध्ये आपण ३००च्यावर धावा केल्या होत्या. तेव्हा तिसर्‍या टेस्टमध्येही आपण ३०० केल्या, पण हरलो, हे अपवादात्मक. उरलेल्या दोन्ही टेस्ट्समध्ये ३००च काय, २००ही ओलांडले नाहीत व हरलो.

ह्या सिरीजमध्ये आपण जिंकलेल्या टेस्टमध्ये आपण ३००च्या वर धावा केल्या. इतर सर्व (हरलेल्या व चालू) टेस्ट्समध्ये ३००चा टप्पा पार करता आला नाही. ह्या टेस्टमध्ये शेवटच्या डावात काय होतं ते बघायचं. एकंदरीत इंग्लंडला गेलं दशकभर घरच्या मॅचेसमध्ये भारताला 'फाइंड आउट' करायला काहीही त्रास झालेला नाही. (कोहली/नो कोहली, लास्ट माईल/नो लास्ट माईल, टॅलेन्ट/नो टॅलेन्ट काहीही म्हणा.)

Pages