क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हार किंवा ड्रॉ हे ऑप्शन पण विजय देऊन जसा इंग्रजांचा हजारावा सामना आपण भेट दिला त्यांना तसाच कुक च्या अंतिम सामन्याची भेट विजय देऊन संस्मरणीय करतील भारतीय फलंदाज इंग्रजांसाठीं. कुक शतक देखील करेल. आपली उदार परंपरा..

वाईट काय त्यात?
प्रयत्न करूनहि जिंकता येतच नाही. मग जरा उदारता दाखवावी. म्हणजे मग झेल सुटले, वाईट गोलंदाजी नि वाईट फलंदाजी केली तरी कारण सांगता येईल - कूक साठी. हरणे नि शत्रूचाहि आदर या आमच्या थोर, उज्ज्वल सांस्कृतिक परंपरा आहेत!

हि सिरीज ४-१ हरलो तरी एकंदर गोलंदाजी ची कामगिरी बघता मस्त वाटलय अजून तरी. आकडेवारी बाजूला ठेवून दुसरा सामना वगळता सगळे सामने अटीतटीचे होते. २-३ सेशन्स बदलली असती तर अजूनही क्लोज सिरीज होउ शकली असती. कोहली चे दोन स्पिनर खेळवणे किंवा एकच स्पिनर खेळवणे हे दोन निर्णय पण निर्णायक ठरले. तरीही माझ्या लेखी मागच्या दोन सिरीजपेक्षा जास्त चुरशीची झाली हे नक्की. मला सुरूवातीला वाटले नव्हते त्यापेक्षाही अधिक जवळची झाली. (आत्ताच browser load होताना अडकला नि नेमके सिरीज सुरू व्हायच्या आधीचे पोस्ट्स आले. आपापल्या मागच्या पोस्ट एकदा बघून घ्या, मजा वाटेल. Happy )

>> २-३ सेशन्स बदलली असती तर अजूनही क्लोज सिरीज होउ शकली असती +१

मालिका जिंकलो असतोन तर क्या बात होती...तुमचं म्हणणं पटतंय. आपल्याला देखील संधि होती. हा सामना मात्र बरोबरीत सुटेल असं वाटतं.

तौलनिक दृष्टया 1) इंगलीश गोलंदाज इंग्लंडच्या वातावरणाचा अधिक प्रभावीकपणे उपयोग करून घेतात व 2) इंग्लीश फलंदाज, विशेषत: मधल्या फळीनंतरचे , अधिक जिद्दीने व चिकाटीने खेळून धांवसंख्या वाढवतात ( जें चालू कसोटीत आपल्या फलंदाजानी केलं ), या दोन गोष्टी प्राजळपणे मान्य केल्या तर आपल्या या दौरयाच्या पराभवाचं विशलेषण सोपं हेईल.

आज चहापाण्यानंतर आपल्याला खेळायला देतील.

चहापाण्यानंतरच्या खेळात ५-६ बाद करून उद्या जिंकता येईल इंग्रजांना सहज!
पहिल्या दोन दिवसात चहानंतर ६-७ गडी बाद झालेले आहेत हे पहाता असेच आताचे धोरण दिसतयं. आणि कुकसाहेबांना पण शतक करु द्यायचे आहे ना सेंडऑफ देताना नजराना म्हणून!

कूक पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसर्‍या डावात शतक.
शेवटच्या कसोटी सामन्यात पुन्हा तेच.

सिमेट्री - सिमेट्री

कुक साहेबांना भारतिय गोलंदाजांची मानवंदना! असेच चहापानानंतर खेळात झटपट बाद होऊन आमचे फलंदाज त्यांना विजयी करून अविस्मरणिय अशी भेट उद्यापर्यंत देऊ करतील ह्यात तीळमात्र देखिल शंका नाही!
आता मुळे पण शतक करेल थोड्याच वेळात...

यष्ट्यांमागे धोनी नाही ह्याचे नुकसान पण झाले कोहलीला हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो पहिल्या १२ षटकातच दोन्ही रिव्ह्यु गमावले कोहलीने. क्षेत्ररक्षक रचना किंवा गोलंदाजांना मार्गदर्शन हे धोनी मागे असल्यामुळे जास्त चांगले होत होते इथे पंतोबांचा काही उपयोग झाला नाही.

तौलनिक दृष्टया 1) इंगलीश गोलंदाज इंग्लंडच्या वातावरणाचा अधिक प्रभावीकपणे उपयोग करून घेतात व 2) इंग्लीश फलंदाज, विशेषत: मधल्या फळीनंतरचे , अधिक जिद्दीने व चिकाटीने खेळून धांवसंख्या वाढवतात ( जें चालू कसोटीत आपल्या फलंदाजानी केलं ), या दोन गोष्टी प्राजळपणे मान्य केल्या तर आपल्या या दौरयाच्या पराभवाचं विशलेषण सोपं हेईल.>> २ चा मुद्दा अधिक मह्त्वाचा ठरला भाऊ असे वाटते. क्र. १ हा अपेक्षित होता (कमीत कमी मला तरी).

३५०+ चा लीड आहे. दोन्ही टीम्स नी शेक-हँड करून, कूक ची रिटायरमेंट पार्टी साजरी करायला जवळच्या चांगल्याश्या पब कडे प्रस्थान करावं. इव्हेंट मॅनेजर - श्री श्री रविशंकर शास्त्रीबुवांना ह्या इवेंट च्या व्यवस्थापनाची जवाबदारी द्यावी. तिथे ते कूक च्या कारकिर्दीचं रसभरीत (literally and metaphorically) वर्णन करतीलच. त्या गोडव्याला चि. विराट च्या चिमुखड्या बाळ(बोध)बोलांचा तडका सुद्धा देता येईल. संपूर्ण सिरीजमधे चांगली कामगिरी करणार्या पण ऐन मोक्याच्या वेळी ढेपाळणार्या बॉलर्स ना सुद्धा थोडी विश्रांती मिळेल.

आपली ८०% बॉलिंग मस्त झाली (they could not close the games). बॅटींग मधे सातत्यानं कोहली आणी beats and pieces मधे पुजारा, रहाणे, विहारी आणी जडेजा चांगले खेळले. टीम सिलेक्शन मधली धरसोड वृत्ती, सातत्यानं होणारे आणी कधी कधी अनाकलनीय असणारे बदल हे महागात पडले. कोहली एक प्लेयर म्हणून निर्विवादपणे मोठा असला, तरी एक shrewd कॅप्टन म्हणून कमी पडला असं वाटतं. शास्त्री कडून अपेक्षाच नसल्यामुळे 'जितना मिला वही भगवान की देन है' म्हणायचं.

काहो, हा पंत जवळ जवळ प्रत्येक चेंडू लांबलचक सूर मारून, उभ्या आडव्या कोलांट्या उड्या मारूनच अडवतो का? मी इतर यष्टीरक्षक एव्हढा आटापिटा करताना बघितले नाहीत.
माझी तीन वर्षाची नात उगीचच उड्याच मारा, कुठेहि शरीर झोकून द्या असले उद्योग करत असते, तसे वाटते पंतला पाहून.

पंत अजून खूप लहान आहे - वयानं आणी अनुभवानं. त्याला थोडा डिस्काऊंट द्यायला हरकत नाही. इंग्लंड मधे बॉल लेट स्विंग होत असताना विकेटकिपींग करणं सोपं नाही. धोनी चार पावलं मागे उभा रहायचा - ज्यामुळे स्लिप पर्यंत कॅचेस कॅरी सुद्धा होत नव्हते. साहा असता तर फरक पडला असता, पण साहा च्या इंज्युरीज मुळे उपलब्ध पर्यायांमधे पंत हाच सध्याचा, ज्यामधे भविष्याच्या गुंतवणुकीच्या दृष्टीनं पहाता येईल असा विकेट कीपर आहे. बाकी दोन पर्याय म्हणजे आंध्र प्रदेश चा के. भारत आणी झारखंड चा इशान किशन, ज्यांना ग्रूम केलं जातय.

पंत बाहेर होता तेव्हा पंतला घ्या पंतला ह्या ... अशी जपमाल इथे ओढणार्‍यानी याचे उत्तर दिले पाहिजे. अन्यथ तो केवळ विकेट कीपर आहे हे जाहीर करावे... >>> असामीजींनी पंत ला आत घेतल्यापासून त्याच्याविषयी तो एकदम सावत्र झाल्यासारखे बोलणेच टाकले आणि विहारीचा जप सुरु केला.
असामीजी, आपले बदल करण्या न करण्याबाबतीतचे संभाषण आठवले. Proud

अजुनि खेळतोचि आहे ... करन..

४२४ लीड झाला आहे अजून डिक्लेअर करीत नाहीत..

अरे बच्चेकी जान लोगे क्या? Happy

The tactic has its drawbacks - if the nightwatchman gets out before the end of the day, the batting team may need to send out a more capable batsman to prevent the loss of further wickets, thereby costing the team a wicket while negating any benefit from using the nightwatchman; and even if the nightwatchman does survive until the end of the day, the beginning of the next day's play will see refreshed bowlers with better light facing a less capable batsman. As a result, not all captains use the tactic; Steve Waugh, for example, abandoned the tactic during his captaincy of Australia.[1]....विकी बाबा

नाइट वॉचमन बद्दल हे डिबेट सुरू असतेच. पण वर्षानुवर्षे टीम्स नी ते टॅक्टिक वापरण्यामागचे लॉजिकही बरोबर आहे. अनेकदा त्याचा बॅटिंग चा अ‍ॅप्रोच वरच्या बॅट्समेन पेक्षा वेगळा असतो. त्यामुळे नवीन बॉल, स्विंग वगैरे त्याच्या विरूद्ध उपयोगी पडत नाहीत. आणि एक यॉर्कर टाकला आणि परत पाठवून दिला इतकाही तो बेकार नसतो.

नाइट वॉचमन ने उरलेल्या ओव्हर्स खेळून काढल्या आणि दुसर्‍या दिवशी बोलर्स फ्र्स्ट्रेट होईपर्यंत, सुरूवातीचा स्विंग कमी होईपर्यंत वेळ काढल्याचीही खूप उदाहरणे आहेत.

नाईट वॉचमन म्हणून कोणाला पाठवायचे असे तुम्हाला वाटते?
जडेजा आणि विहारी तर मेन ईन फॉर्म बॅट्स्मन आहेत त्यांना पाठवण्याची रिस्क का घ्यावी? शमी/शर्मा/बुमरा तर हमखास दहापेक्षा कमी बॉल्स मध्ये आऊट होणार. पुजारा आणि कोहलीला नाईट वॉचमन म्हणुनच पाठवले होते.

जडेजा आणि विहारी तर मेन ईन फॉर्म बॅट्स्मन आहेत त्यांना पाठवण्याची रिस्क का घ्यावी? >>> हाब, तसे असेल तर टीमला वरच्या फलंदाजांच्या एकूणच सिलेक्शन बद्दल गांभीर्याने विचार करायची गरज आहे Wink जडेजा आणि डेब्युटण्ट विहारी ची विकेट इतरांपेक्षा महत्त्वाची झाली असेल तर Happy

टीमला वरच्या फलंदाजांच्या एकूणच सिलेक्शन बद्दल गांभीर्याने विचार करायची गरज आहे>>>>

फारेंड, आघाडीच्या जोडी विषयी नक्कीच विचार करायला हवा.
दोघांनी प्रचंड निराशा केली. आस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी आताच हवी.

या सेरिजचे फलित एवढे मानता येइल का?
विहारी हे आश्वासक फाईंड आहे.
के एल राहुल व धवन हे कसोटीस निरुपयोगी आहेत. मुरली विजय ही तेवधाच निरर्थक आहे.
पृथ्वी शॉ ला संधी देणे आवश्यकआह्रे
जडेजा पंड्यापेक्शा भरवशाचा आहे.

हो.

मुरली विजय हिंदी पिक्चर मधल्या अ‍ॅण्टीहीरो सारखा म्हणेल - मै पहले से कसोटीके लिए निरूपयोगी नहीं था! इस आयपीएल ने मुझे ऐसा बना दिया Happy बिचारा पूर्वी बरा खेळायचा कसोटीत.

नाईट वॉचमन म्हणून कोणाला पाठवायचे असे तुम्हाला वाटते? >> पंत ला Lol खुश आता का बर्ग Happy पंतबद्दल आता मला बोलणे अयोग्य वाटते कारण तो संघात आहे. ह्या क्षणी तरी इंग्लंडमधे कार्‍थिक ऐवजी तो जास्त चांगली किपिंग करतोय. बॅटीम्ग दोघेही गंडलेले आहेत पण माझ्या मते किपिंग साठी किपिंग हा पहिला criteria हवा. (साहाला पाठीम्बा देण्याचे कारण तेच). भरथ चांगला पर्याय होउ शकेल का हे माहित नाही. पुढे कळेल.

हणुमा विहारीचा record impressive आहे. टेस्ट मधे यायला जे काहीकरायला हवे असे इथे सगळॅ म्हणत आले आहेत ते सगळे बॉक्सेस तो टीक करतोय.

आस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी आताच हवी. >> आस्ट्रेलिया दौरा थोडा वेगळा असेल. तिथे बॉल lateral swing कमी होतो. बाउन्स अधिक असतो. स्विंग हँडल करण्यापेक्षा पेसी बाउन्स होणारे handle करणे जरुरी आहे.

मुरली विजय हिंदी पिक्चर मधल्या अ‍ॅण्टीहीरो सारखा म्हणेल - मै पहले से कसोटीके लिए निरूपयोगी नहीं था! इस आयपीएल ने मुझे ऐसा बना दिया Happy बिचारा पूर्वी बरा खेळायचा कसोटीत. >> actually नाही फा. IPL इथे मुख्य problem नाहि आहे. गेले दोन वर्षे IPl मधे तो राखीव असतो फक्त. त्याचा फॉर्म कोहली नि शास्त्रीने test मधे aggressive batting चे तुणतुणे वाजवत रोहित ला पुजारा/राहणॅ वगैरेच्या जागी आणायला सुरूवात केली तेंव्हापासून गंडलाय. Go figure.

इशांत इंज्युअर्ड होता असं कुठेतरी वाचलं. तसं असेल, तर ४ गोलंदाज खेळवायची रणनीती उलटली असं म्हणावं लागेल. तरीदेखील, कॅचेस सोडणं आणी २/३ अशी सुरूवात होणं कुठल्याच परिस्थितीत क्षम्य असू शकत नाही. शास्त्री-कोहली जोडगोळी किमान कसोटी टीम ची तरी वाताहत करताहेत असं म्हणावं लागेल. विजय, पुजारा वगैरे हार्डकोअर कसोटीपटूंना नीट न हाताळल्यामुळे त्यांचं आणी पर्यायानं भारतीय संघाचं नुकसान झालय. दर सिरीजगणिक काहीतरी नवीन, क्रांतीकारक, देशहितकारक, बलवर्धक करून दाखवलच पाहिजे असं नाहीये.

Pages