क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाडका गेला कोहलीची परत 3 ओव्हर साठी...

अँडरसन समोर प्रचंड चाचपडत होता.. ब्रॉडच्या चेंडूवर जीवदान पण मिळालेले..

पंत बाहेरचे चेंडू छान सोडत होता. इंगलडचया गोलंदाजांनी अप्रतिम फास्ट गोलदाजीचं प्रदर्शन केलं. पंतला 'राऊंड द विकेट' गोलंदाजी करतानाही लाईन, लेंगथ अचूक ठेवली होती. हया गोलंदाजी विरूदध आजचा 300 + स्कोअर आपल्या फलंदाजीला भूषणावह म्हणायलाही हरकत नसावी.

पहिल्या बॅटींगचे आवताण महाग पडणार इंग्रजांना. रशिदला लॉटरी लागली आज पण विराटही अचानक अस्वस्थ झाल्यासारख्या वाटला.
पुजाराचा मॅच अवेअरनेस गंडला आहे, जो बॉल त्याने शंभरातल्या ९९ वेळा सोडला असता त्यावर आउट ते ही लंचच्या ठोक्यावर.
मॅच अ‍ॅनलिसिस करताना जास्त टोकदार बोलायचे नाही असे सगळ्याच भारतीय समालोचकांना धमकाउन ठेवलेले दिसते, किती तो बोटचेपेपणा, स्वान कसा सरळ शिव्या घालतो, कालतर जेलीबिन्स घेउन आलेला!!

काल विको आणी रहाणे मस्त खेळले. मोठ्या सेन्च्युरीज मारतील असं वाटत असतानाच नेमके आऊट झाले. रहाणे अगदी सरळ सापळ्यात अडकला. पंत ने मस्त सुरूवात केली. आवडलं.

आज शेपुट फारच लवकर गुंडाळलं गेलं. पहिल्या सेशन ला बॉलिंग सुद्धा स्वैर झालीये. होपफुली, दुसर्या सेशन मधे सुधारणा होईल.

आपला तो बाब्या किती करायचे ते, आपले शेपूट लवकर गुंडाळले तर मांजरेकर म्हणे चांगले झाले कारण आता बॉलिंग कंडिशन सुधारल्यात भारताला फायदा होईल! अरे मग काय डिक्लेअर करायचे होते का?

लई भारी !
पंडया, बुमराह व पंत आजचे हिरो !
क्षेत्ररक्षण पसरवून शेवटच्या जोडीने काढलेल्या धांवा वाचवून आघाडी वाढवतां आली असती .असो .

<<<क्षेत्ररक्षण पसरवून शेवटच्या जोडीने काढलेल्या धांवा वाचवून आघाडी वाढवतां आली असती .असो >>>
जेंव्हा ९ बाद झाले नि अँडरसन खेळायला आला, विलो वर मायकेल होल्डिंग, शेवटच्या ओवर्समधे सारखा म्हणत होता - " अरे शेवटच्या बॉलला सगळ्यांना जवळ आणा. एक रन घेऊ देऊ नका बटलरला. फार तर एखादा चव्वा जाईल. बॅड क्रिकेट, बॅड कॅप्टन्सी!"
आणि शेवटी चव्वे नि षट्कारहि गेला नि ३३ रन्स दहाव्या विकेटला!

असो, त्या धावा भरून निघाल्या आहेत. आता पुढे बघू.

124-2 ! 292 ची आघाडी! अजून 3 दिवसांचा खेळ बाकी. अपेक्षा वाढणं अगदीं स्वाभाविक!

मस्त खेळले आज. पंड्या, इशांत, बुमराह, पंत आणी नंतर बॅटींग- जबरदस्त. फक्त इंग्लंड ला फार वेळ मिळू नये आणी आपण खूप मोठा स्कोअर करावा- मजा येईल. तीन गुना लगान!

र वि च्या हृदयस्थ हार्दिक ने ५ बळी घेतल्याने इंग्रजांवर दडपण आणणे शक्य झाले आता किमान ४५० धावांचे अव्हान दिल्यास सामना जिंकता येईल..
पंतांनी पहिल्याच सामन्यात छान खुंटी पिळली... आता फलंदाजीत थोडी चमक दाखविली की बाकी दिनेश, वृद्धीमान यांना आराम!

आपण १९७९ साली ओव्हलला ४३८ धावांचा पाठलाग केलेला सामना अनिर्णित राहिला पण जिंकण्याच्या जवळपास आलो होतो सुनिल गावस्करांनी दुसर्‍या डावात २२१ धावा केलेल्या तेंव्हा केवळ ९ धावा कमी पडल्या तेंव्हा अनिवार्य २० षटके संपली!

हार्दिक नि नंतरच्या लोकांना बॅटिंग ची वेळ येण्या आधी अजून १५० तरी धावा करायला पाहिजेत. खरे तर अजून ५० षटकांत १७५ सुद्धा सहज व्हायला हव्या. म्हणजे उरलेल्या ११ षटकात इंग्लंडचा एक किंवा दोन गडी बाद व्हायला पाहिजेत.

तर आता हे कोहली ला कसे कळवावे? तो व्हाट्स अ‍ॅप वर आहे का? निदान त्याचा मोबाईल नंबर असेल तर एसेमेस करतो लगेच.

*अनुस्वारयुक्त शुध्द मराठी * - मीं आसंय कोकणी मालवणी ; स्वर चुकेल पण अनुस्वार... अशक्य !! Wink
* हे कोहलीला कसे कळवावे * - कसंही कळवा पण मेघदूताकरवीं नको ; इतकं छान सगळं जुळून येतंय , त्यावर पाणी नको पडायला ! Wink

तर आता हे कोहली ला कसे कळवावे? तो व्हाट्स अ‍ॅप वर आहे का? निदान त्याचा मोबाईल नंबर असेल तर एसेमेस करतो लगेच. >> कोहलीचा मोबाईल नंबर नाहीये पण अनुष्काचा चालेल का? तुमचा निरोप आहे म्हंटल्यावर ती लगबगीनं स्टेडिअममध्ये जाऊन पर्स्नली देऊन येईल.
हो पण ती स्टेडिअममध्ये गेल्यावर अजून काय होऊ शकते ह्याची जबाबदारी तुमची बरं.
सांगा मग नंबर हवा असेल तर.

"कसंही कळवा पण मेघदूताकरवीं नको" - Happy

आज मस्त खेळले पुजारा आणी कोहली. हळू हळू रन्स आणी वेळ काढत, इंग्लंड च्या बॉलर्स च्या मनोधैर्याला 'बसवलं'. रूट ला, सहावा बॉलर म्हणून स्वतः बॉलिंग ला यावं लागलं, ह्यातच कोहली आणी पुजाराच्या डॉमिनन्स ची कल्पना यावी. अजूनही पुष्कळ वेळ शिल्लक आहे मॅच मधे. इंग्लंड ने एक बॅट्समन (बेअरस्ट्रॉ) आणी भारताने एका बॉलर (अश्विन) गमावलाय. अशा परिस्थितीत माझा अंदाज, भारत डिक्लरेशन च्या मागे न धावता, शक्य तितका वेळ बॅटींग करायचा प्रयत्न करेल असा आहे. बघू काय होतं ते.

"What is Rashid's job here? Is he supposed to be a wicket taking option or containment? He is doing neither.." --- Just going through the motions?

क्रिकइन्फो वरची एक कॉमेन्ट Happy

क्रिकइन्फो वरची आणखी एक कॉमेन्ट:

HappySharan: "The last time Virat made a 100 and a 90, it was in an overseas Test where India had more than enough time and runs to force a result but didn't. In that Test, Virat got out to a spinner in the 90s. Maybe, as an Indian fan, his century isn't the best thing for us? Also, his last 3 Test 100's = India haven't won. Draw Loss Loss.." --- Misuse of stats?

नक्कीच Misuse of stats!

Pages