तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

अरे ज्यांना नाही प्यायची नका पिऊ.. जबरदस्ती आहे का.
अर्ध्या कंमेंट्स विषय सोडून. मला वाटले मस्त किस्से आणि रेसिपी असतील दारू पिण्याच्या.

मुळात दारु पिणे न पिणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,
>>>>

तो तसा असता तर मी ज्याला त्याला त्याच्या हाल वर सोडले असते.
पण एकाने प्यायलेली दारू दुसरयाचाही जीव घेऊ शकते. कुटुंबाची वाताहात करू शकते. ईतरांना त्रासदायक ठरू शकते.
अरे फार कश्याला, आपण फॅमिलीसोबत कुठे जात असू आणि समोर एखादा झुलतराव आला तर आपण त्याच्यापासून आपल्या फॅमिलीला कवर करत चार हात दुरून जातो हा अनुभव सर्वांनीच घेतला असेल.
ट्रेनमध्येही कोणी शेजारी तोण्डाला वास घेऊन बसला तर प्रवास असह्य होतो. एखादी छान पार्टी चालू असते हसतखेळत आणि कोणीतरी नशेच्या भरात अशी काही वर्तणूक करतो की सारा मजेचा पचका होतो. हल्ली फॅमिलीसोबत या पावसाळ्याच्या सीजनमध्ये मुंबईनजीकच्या एखाद्या धबधब्याखाली डुंबायला जावे म्हटले तर आधी तिथे पिणारयांचा उच्छाद तर नाही ना हे चेक करावे लागते. आणि चेक करता पदरी निराशाच येते कारण तो असतोच. आणि तुम्ही म्हणता हा वैयक्तिक प्रश्न आहे?

भम्भाजीराव,
तुम्ही जितकं कुंथणार तितक्या दारू पोस्टीं मी लिहिणार.
बघू या गम्मत. Wink

आता तो चित्रपट येऊन इतकी वर्षे लोटली तरी लोक दारु पितायतच, तर आता उपदेश, प्रवचन देऊन काय फरक पडणार आहे ? पिऊदे आणि मरुदे तिच्याआयला, नाहितरी भारताची लोकसंख्या खूपच वाढलेय !
>>>

पिऊ दे आणि मरू दे हे आवडले.
दारूचे दुष्परीणाम स्विकारलेत तरी.
पण जातीयवाद हा सुद्धा शतको न शतके आहे. परिस्थिती बदलणारच नाही असे धरून आहे तसेच मुकाट बघत राहावे का?

असो,
अवांतर पोस्टीबद्दल क्षमस्व
आपली दारूची चरचा र.गूदया

तुम्ही जितकं कुंथणार तितक्या दारू पोस्टीं मी लिहिणार.
बघू या गम्मत. Wink
>>>

मला आपल्या सडेतोड पोस्ट अवडतात्
पण इथे मला चर्चेत वादात हरवायला वा माझी काहीतरी जिरवायला तुम्ही हा जो तरुण पिढीला दारूची महती सांगायचा स्टॅण्ड घेतलाय तो नाही आवडला.
असो! वाचणार्यांना शुभेच्छा

हे वरचे पोस्ट असेही लिहिता येईल :
अरे फार कश्याला, आपण मित्रंसोबत कुठे गंभीर चर्चा करत असू आणि समोर एखादा पोस्टी छापणारा पाल्हाळभैरव आला तर आपण चार हात दुरून जातो हा अनुभव सर्वांनीच घेतला असेल.
चित्रपट बाफांवरही कोणी सई स्वप्निल शारुख चा वास मारणारा येऊन बसला तर तो बाफ असह्य होतो. एखादी छान गप्पांची मैफल चालू असते हसतखेळत आणि कोणीतरी स्वप्रेमाच्या नशेच्या भरात अशी काही वर्तणूक करतो की सारा मजेचा पचका होतो. हल्ली या पावसाळ्याच्या सीजनमध्ये आलेल्या कथा कवितांच्या धबधब्याखाली डुंबायला जावे म्हटले तरी आधी तिथे या धागासम्राटांचा उच्छाद तर नाही ना हे चेक करावे लागते. आणि चेक करता पदरी निराशाच येते कारण तो असतोच. आणि तुम्ही म्हणता हा वैयक्तिक प्रश्न आहे?
Proud

रुभास्कर-
लुत्फ़-ए-मय तुझसे क्या कहूँ ज़ाहिद
हाए कमबख्त तूने पी ही नहीं...

भाभु - इतकी लोकांची काळजी बघून डोळे पाणावले
फटाक्यांच्या दारू बद्दलही असाच विरोध असावा अशी अपेक्षा.
पिणारा काय आपल्या कर्माने जाईल गटारात लोळत, लिव्हर खराब करून, त्याची फॅमिली त्रास सोसेल
फटाक्यांची दारू समस्त प्राणिमात्रांच्या जीवाशी खेळते, वायू प्रदूषण, श्वसनाचे आजार, आवाज आणि पर्यावरणाची हानी.

मी दारू पिऊन तुझे लिव्हर खराब होणार नाही पण माझी इच्छाच नसतानाही लोकांनी फटाके उडवले तर माझी तब्येत खराब होते त्याचे काय करावे बरे?

https://youtu.be/cxLOwiqZo2A

आणि हो इथे आपले दैवत आपले म्हणजे तुझे दिलखुलास दारू ची जाहिरात करताना दिसून येत आहे त्याबद्दल मौलिक मत वाचायला आवडेल.
https://youtu.be/Fu3BR8uiSz8

अजूनही आहेत सध्या इतकेच

मला दारूचे उदात्तीकरण नाही बघवत.
दारू वाईट नसते तर अतिरेक वाईट असतो असे बोलत समर्थन करणे खरेच हास्यास्पद आहे.

कित्येक सेलिब्रेटी दारूच्या जाहीराती नाकारतात आणि त्यातून मिळणारया मोठ्या कमाईवर लाथ मारतात. ते काय वेडे आहेत का?

यात दैवत येत नाही असे दिसत आहे

https://www.maayboli.com/node/62014
https://www.maayboli.com/node/59431
Submitted by सायो on 19 June, 2018 - 00:45

सायो आज आपण जे केले ते आवडले.
माझे दोन दारू विरोधी धागे आठवणीने लक्षात ठेवून ते नेमके मोक्याच्या क्षणी या धायावर शेअर केलेत.
कृपया सर्वांनी लाभ घ्या _/\_

अहो काका, लक्षात नाही ठेवले. ह्या धाग्यावरुन कलटी मारावीत म्हणून मुद्दाम शोधून आणले आहेत. जनकल्याणाकरता कोणाला तरी आपला वेळ खर्ची घालावाच लागतो. Wink मग त्या धाग्यांवर पाडणार ना पुढची कडबोळी?

फटाक्यांच्या दारू बद्दलही असाच विरोध असावा अशी अपेक्षा.
>>>

आशूचॅम्प, फटाक्यांच्या दारूबद्दल चर्चा त्या संबंधित धाग्यात करूया ना. नसल्यास मी स्वत: काढतो. पण या धाग्यावर जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ हा रवैय्या कशाला?

आणि हो इथे आपले दैवत आपले म्हणजे तुझे दिलखुलास दारू ची जाहिरात करताना दिसून येत आहे त्याबद्दल मौलिक मत वाचायला आवडेल.
>>>

शाहरूख हा काही माझे दैवत नाहीये. दैवतांचे भक्त असतात. मी त्याचा चाहता आहे. जबरा फॅन म्हणा हवे तर. पण त्याच्यात असलेल्या गुणांचा चाहता आहे. त्याच्या दुर्गुणांचे समर्थन मी कधीच करत नाही आणि करणारही नाही. याबाबतीतही त्याला विरोधच.

आत्ताच हा धागा वाचला. श्रीयुत भास्कर राव यांच्या पोस्टस पटल्या व आवडल्या. अत्यंत लॉजिकल विचार. चांगल्याला चांगले म्हणावे. कोण सांगते ह्यापेक्षा काय सांगितले आहे हे पहावे. आपला पराभव केला या भावनेने वैयक्तिक होऊ नये.

मी नवीन असल्याने मला प्रखर विरोध करता येत नाही. निरुत्तर झाल्यानंतर वैयक्तिक हल्ले करणे, हास्यास्पद ठरवणे यामुळे माघार घेतली आहे. पण श्रीमान भासर रव यांनी किल्ला कसा लढवावा याचा एक आदर्श घालून दिला आहे. दारू सारख्या प्रतिष्ठित झालेल्या वाईट व्यसनाविरोधी एकांडी आघाडी उघडणा-या या वीराला एकवीस तोफांची सलामी. असे प्रयत्न करणारा दारू कंपन्यांच्या रडारवर येतो. मग ते लोक काही जणांना हाताषी धरून त्यस धाग्यावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात. त्याचे विचार इग्नोरण्यासाठी उदात्तीकरणाचा रतीब घालू लागतात. या जुन्या ट्रीक्स आहेत. इथेही दुर्दैवाने ते दिसून येत आहे. तरी भद्रजनांनी तिकडे लक्ष देऊ नये ही विनंती,

ज्यांना दारू पिणे चांगले वाटते त्यांनी दारूचे फायदे लिहावेत. जर इथे कुणी डॉक्टर असेल तर त्यांनी दारू मानवी शरीरास उपायकारक असते की अपायकारक असते हे सांगावे. डॉक्टरांनी शपथेवर सांगायची गरज नाही. कारण त्यांनी शपथ घेतलेली असते तेव्हांच त्यांचा डॉक्टर म्हणून जन्म होत असतो. पण दारूच्या अंमलाखाली ती शपथ पातळ होऊ शकते हा एक मोठाच दुष्परिणाम आहे.

दारू पिण्याने लिव्हर खराब होते. हे नन अदर दॅन अमिताभ बच्चनने दहा वेळा सांगितले आहे. लिव्हर हा असा अवयव आहे जो पुन्हा मिळत नाही. प्रमोद पहाजन यांच्या लिव्हरला दुखापत झाली त्यातच ते गेले. लिव्हर शी पंगा घेऊन चालत नाही. उर्दू मधे लिव्हरला जिगर म्हणतात. दिल जिगर जुबाँ क्या है, मै तो तेरे लिये जां भी दे दू .... असे एक जीवशास्त्रीय गाणे आहे. उर्दूमधे जीवशास्त्र महत्वाचे आहे. जिगर वरून अनेक गाणी आहेत, शेरोशायरी आहे. त्यामुळे लिव्हरचे महत्व लोकांना पटायचे आणि ते दारूपासून दूर रहात असत.

पण आता विकृत जमाना आहे. लोक दारूच्या आहारी जात आहेत. हॉस्पिटलमधे लिव्हर खराब झाल्याने गुरासारखे ओरडणारे रुग्ण मी पाहीले आहेत. त्यांना पाहून डॉक्टरांची दारू सुटल्याचेही पाहीलेले आहे. या स्टेजला जावे कि थोडक्यात आवरावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सक्ती कुणावरच करता येत नाही. आपण लोकस्याही स्विकारलेली आहे. ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे गुरासारखे ओरडण्याचे.

पण मला हे विचार मांडायचे नाहीत. कारण मी नवीन आहे. नवीन आयडी कडून निरुत्तर झाल्यास इगो दुखावतो. आणि मला हिंसा मंजूर नाही. कुणाचाही इगो दुखावायाचा नही मला. म्हणून माझी माघार आहे.

बाबी /बार्बी झाले, विपर्यास / विर्यपास झाले, एकूणात मुद्दाम असे काहीतरी घोटाळे करून इनोद करण्याचा प्रयत्न दिसतोय. >>> या चुका होतातच. चुका झाल्या नाही तरी हास्यास्पद ठरवण्यात येत आहे. दुसरीकडे मुद्दाम केल्याचेही आरोप होत आहेत. पण या आरोपाच्या धुराळ्यात मुद्दे हरवले जात आहेत. कदाचित उत्तर नसल्याने हे हथकंडे अजमावण्यात आले असावेत.

निरुत्तर करणा-यास गि-हाईक बनवण्यात येत असतेच.

मदिरेचा धागा यापेक्षा परवडला. निदान विषयाला सोडून ईतके प्रतिसाद नव्हते. पूर्वी सारखी मायबोली आता राहीली नाही Wink

आ.रा. रा.,

मदिरेच्या धाग्यावर तूमच्या ईतक्या डिटेल्ड पोस्टी आठवत नाहीत.

आमचा काॅलेजमधला स्वस्तात मस्त ऊपाय म्हणजे एक बिअर आणि त्यात एक ९० व्हिस्की चकण्याला जे काय मिळेल ते नाहीतर लोणचं..... Happy

मधुरांबे, तुमच्या वेड पांघरुन पेडगावला जायच्या पोस्ट्स भयंकर बोअर मारतायत. आवरा आता.>>>>मुद्दे संपल्यावर जे नैराश्य येते ते व्यक्त होत आहे. समजून घ्यायला आवडेल.

@ शाली आभारी आहे. बदल केला आहे.
मला राग आला नाही. कारण बोअर मारणे, इरीटेट होणे ही गंभीर समस्या आहे. त्याला आपण काय करू शकतो? अपार करुणा दाटते. पण नाईलाज आहे. ते फक्त समस्याग्रस्ताच्या हातात आहे.. गॉड ब्लेस प्युअर चाईल्ड

पूर्वी एक मंदार जोशी म्हणून गृहस्थ होते ते कित्येकदा नवे आयडी घेउन् येत पण थोड्या वेळाने विचार आणि लिखाणाची पद्धत यामुळे उघडे पडत.
आंबेवाल्या गुरुजींचे हेच होत चालले आहे

Pages