तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साइट्स हीही आधुनिक व्यसने
>>>>
नक्कीच !
मलाही आहे हे पुरेसे व्यसन. तरी एक बरे आहे, माझ्या प्रायोरीटीज क्लीअर आहेत. पण त्या प्रायोरीटीजच उद्या राहील्या नाहीत तर माझेही अवघड होईल आणि या व्यसनाचा विळखा बसेल अशी भिती आहेच.
यावरही कोणीतरी धागा सुरू करावा. एकाच धाग्यात सरमिसळ नको. ईथे दारूलाच घेऊया.

ईथे दारूलाच घेऊया.

Submitted by भन्नाट भास्कर on 16 June, 2018 - 14:05

कशी घेऊया हे ही लिहायचेत ना म्हणजे धागाकर्त्याला अपेक्षित असे उत्तर मिळेल

हायला,
साधं प्यायला बसायचं तर किती नियम किती औपचारिकता......

मला रम, व्हिस्की, बिअर, स्काॅच, सिंगल माॅल्ट सगळे चालते. ग्लास काचेचा असेल तरी चालतो नसेल तर प्लॅस्टीकचा, ग्लास नसेल तर कोल्ड ड्रिंकच्या बाटलीतच, सोबत पेप्सी सोडा, पाणी, बर्फ काहीही टाकुन चकण्याला मूग डाळ पासून काॅन्टीनेंटल पर्यंत काही चालतं.

मैफील जमवायला मित्र असतील त्याप्रमाणे “ही पोली साजुक तूपातली” पासून मेहदी हसन, गुलाम अली, शास्त्रीय संगीता पर्यंत काहीही वर्ज्य नाही. एकटाच असेन तेव्हा शक्यतो कोक स्टुडीओ किंवा गझल्स, ट्राॅय, द टर्मिनल, पर्सुट आॅफ हॅप्पीनेस, ZNMD सारखे ठराविक चित्रपट,

थोडक्यात कधीही, कुठेही, कसंही, कितीही......

माझा पिताना एकच नियम....पिऊन राडा करणारे, उद्धट होणारे, भांडण करणारे, रंगाचा भंग करणारे कोणी सोबत नसावे.

काही जण दारु पाणी प्यायल्यासारखे पितात म्हणजे एका घोटात जास्तीत क्वांटीटी आणि कमीत कमी वेळेत असे जास्तीत जास्त घोट. ग्लास किंवा बाटली सरळ तोंडाला लावून बॉटम अप करीत संपूर्ण रिकामं करुनच टेबलावर ठेवतात. अतिशय चूकीची पद्धत आहे ही. अशा लोकांमुळेच दारु बदनाम झाली.

दारु कशी प्यावी? तर लहान मुलांना औषध किंवा बिनसाखरेचे गरम दूध प्यायला दिले तर त्यांना आवडत नसतानाही ते कसे बळजबरीने शिक्षा केल्यासारखे थेंब थेंब क्वांटिटी टाईमपास करीत पितात तसे. किंवा अजुनही सोपे उदाहरण म्हणजे प्रयोगशाळेत पाण्यात अ‍ॅसिड टाकून डायल्यूट करायचे तसे किंवा अ‍ॅसिडला न्युट्रलाइझ करताना थेंब थेंब अल्कली सोडतात तसे. असे सिप सिप मारत पिल्यास शरीरातल्या अवयवांनाही त्रासही होत नाही आणि वेळही छान जातो.

खरं तर लोकांनी पाणीदेखील असेच ठिबक सिंचन केल्यासारखे पिले पाहिजे नाहीतर घटाघटा पाणी पिऊन होतातच पचनाचे आणि सांध्यांचे आजार.

असो. शक्यतो कॉकटेल प्यावी हा माझा चॉईस असतो.

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 16 June, 2018 - 15:01
<<

तुमचा मुद्दा बरोबर आहे.
मात्र आजकाल बारमध्ये इतके निंवात पित बसले तर वेटर दहा वेळा येऊन विचारतो की 'आणखी काही आणू का ?'

जुन्या पातेल्यात दूध नासल असेल तर ते फेकून द्यावे
नव्या पातेल्यात घालून हे वेगळ्या पद्धतीचे दूध म्हणून देऊ नये कोणाला असे शास्त्र सांगते.

बीयर - कर्ल्सबर्ग स्ट्रॉंग सर्वात आवडती, खालोखाल ट्युबोर्ग
दोन्ही नसतील तर मग किंगफिशर, पण या दोन्हीच्या समुदनेस पुढे किंगफिशर फार हार्ड वाटते, जशी रोमनोव्ह ही स्मिर्नोफ च्या तुलनेत वाटते तशी.
निवांत गोव्यात समुद्रकिनारी खुर्ची टाकून एक एक घोट मारत मित्रमंडळीशी गप्पा, सोबतीला खारे काजू, सुरमई फ्राय

व्होडका कायमच हाँगोवर आणते त्यामुळे अगदी माफक
स्मिर्नोफ ग्रीन अँपल सर्वात आवडती

जॅक डॅनिअल्स अगदी जिवाभावाची मित्र असतील तरच खोलावी, आणि पाण्यासारखे दणदणीत पिणारे असतील तर मुळीच सांगू नये बाटली कुठे ठेवलीय ते.
जॅक, डबल ब्लॅक आणि सिंगल malt याना दारू म्हणूंच नये खरे तर, अगदी चवीचवीने आस्वाद घेत विरघळत जण्याचा अनुभव घ्यावा.
जाड तळाचा, रुंद असा काचेचा ग्लास आधी फ्रिजर मध्ये ठेऊन मस्त गार करावा, मग त्यात नजाकतीने हलका पेग बनवावा, एक किंवा दोन बर्फाचे खडे सोडावेत आणि मग निवांत बसून आधी खोलवर त्याचा गंध नाकात जाऊ द्यावा मग हलकेच एक सीप घेऊन जिभेच्या शेंड्यापासून मागे जिथे जिथे टेस्टबड आहेत तिथून त्याला मुक्तपणे विहार करू द्यावा आणि हलकेच पोटात जाऊ द्यावा.
रिकाम्या पोटी पिण्यापेक्षा तासभर आधी हलके जेवण त्यातही मसालेदार, तेलकट पदार्थ नको
सोबत खायला उकडलेली अंडी, खरवलेले तिखट काजू, शेव, उकडलेल्या भुईमूग शेंगा, चीझलिंगस

इतका थाट शक्य नसतो तेव्हा मग टीचर्स, ब्लेंडर्स आणि सोबत सोडा आणि बर्फ आणि बालाजीचे पिझ्झा फ्लेवरचे वेफर्स

पावसाळ्यात ओल्ड मंक आणि रम जोडीला तोड नाही

आशु, खूप कन्फुजन!

दूध पातेले की दोन्ही फेकून द्यावे?

दही देखिल चढते. दुपारच्या वेळी दही भात खा किंवा जेवल्यावर मस्त मठ्ठा घ्या दोन ग्लास बघा कशी झोप येते! मदिरेची मादकता नसली तरी दह्या ताकात नशा आणण्याचे सामर्थ्य असतेच! Wink

दारू म्हणजे वाईट असे काही लोकांचं ठाम मत झालं आहे, धागा भरकतावतायत ते. कोणतीही गोस्ट अति म्हणजे वाईट.. मग ते पाणी का असेना. एकदम जास्त पाणी पिlyane पण ओव्हरहैदरेशन होतच की.

कशी घेऊया हे ही लिहायचेत ना म्हणजे धागाकर्त्याला अपेक्षित असे उत्तर मिळेल
>>>

ते मी माझ्या पहिल्याच पोस्टमध्ये लिहिले आहे ना..
गटाराच्या पाण्यासोबत..

आधी मी धाग्याला अपेक्षित उत्तर दिले. आणि मगच दारूविरोधात बोलायला लागलो.

मला दारूचे उदात्तीकरण नाही बघवत.
दारू वाईट नसते तर अतिरेक वाईट असतो असे बोलत समर्थन करणे खरेच हास्यास्पद आहे.

कित्येक सेलिब्रेटी दारूच्या जाहीराती नाकारतात आणि त्यातून मिळणारया मोठ्या कमाईवर लाथ मारतात. ते काय वेडे आहेत का?

असतील तर हो... मी सुद्धा त्यांच्यातलाच एक वेडा आहे !

पण मी असे एका मराठी संकेतस्थळावर अशी मद्यपानाला प्रोत्साहन देणारी चर्चा घडतेय ती निमूटपणे बघू शकत नाही.

हे वाचून कोणी प्रोत्साहीत होऊन दारु पिणार असेल तर पिऊ दे कि. तश्याप्रकारच्या लोकांना काहितरी कारणच हवे असते प्रोत्साहीत व्हायला. नाही मिळाले तर ते दुसरीकडे शोधून काढतील आणि प्रोत्साहीत होतील. त्यांची काळजी करून उपयोग नाही.

इथली चर्चा मुळात दारू चांगली कि वाईट यावर नाहीच आहे. ती कशी प्यायली जाते/जावी किंवा कशी पिवू नये यावर आहे.

भ भा, भापो.
पण हा धागा दारूचे उदात्तीकरण करणारा का वाटला?

दारूचा एकच प्याला एखाद्या माणसाला कधी तिच्या आधीन करवेल हे सांगता येत नाही. दारू पिऊन काही माणसे बेताल वागाय-बोलायला लागतात, आपले तारतम्य गमावून बसतात असेही निदर्शनास येते पण मग 'दारूचे दुष्परिणाम' अशा नावाचा स्वतंत्र धागाच उघडावा. (इथे काही(च्या) बाही लिहिण्यापेक्षा) गटारीचं पाणी काय !

पण मग 'दारूचे दुष्परिणाम' अशा नावाचा स्वतंत्र धागाच उघडावा. (इथे काही(च्या) बाही लिहिण्यापेक्षा) गटारीचं पाणी काय !
नवीन Submitted by हर्पेन on 16 June, 2018 - 18:38
<<

सहमत !
उगाच कोणत्या ही विषयावर, फालतू प्रवचन द्यायची वाईट खोड असते ऐकऐकला. धाग्यावरच्या पहिल्याच प्रतिसादात ते म्हणतायत कि ते दारु गटारीतील पाणी टाकून पितात' वर लोकांना 'दारुचे दुष्परिणाम' यावर प्रवचन देखील देतायत.

जित्याची खोड नावाचा एक वाक्प्रचार आहे

नाव बदला, आयडी बदला, पण धागा भरकटवणे काही सुटत नाही

दारूचे दुष्परिणाम' अशा नावाचा स्वतंत्र धागाच उघडावा. (इथे काही(च्या) बाही लिहिण्यापेक्षा) गटारीचं पाणी काय !
नवीन Submitted by हर्पेन on 16 June, 2018 - 18:38
>>>>
वाघ म्हंटले तरी खातो अन वाघोबा म्हंटले तरी खातो.
तो धागा काढायचा थोडीच राहणार आहे? बील मात्र तुमच्यावर फाडेल.

दारू पिण्याचा धागा पूर्वीही होता माबोवर. तिथेही बराच दंगा झाला होता. जाणकारांनी लिंकदान केले तर बरे होईल.

आता या धाग्याला काँट्रीब्युशन.

आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात माणूस वेगवेगळ्या प्रकारे दारू पितो. आमची सुरुवात कॉलेजात, होस्टेल लाईफला झाली. जशी ती अनेकांची होते.

सगळ्यात पैली दारू म्हणजे डॉक्टर ब्रँडीची एक बाटली ८-९ जणांनी काँट्री करून आणलेली होती. ही दारू असते, अन ती चाखलेला आमचा रुम पार्टनर होता. त्याच्या घरच्या फ्रीजमधे एक ब्रँडीची क्वार्टर असे, अन ती चमचाभर सर्दीसाठी अन दोन चमचे पाण्यात घालून मजे साठी पितात इतपत ज्ञान त्याला होते.

तर अशी ती क्वार्टर आणून, १८० मिलि ब्रँडी इतक्या लोकांत म्हणजे सुमारे १५-१० मिलि प्रत्येकी आपापल्या ग्लासात घेऊन त्यात पाणी टाकून आम्ही सर्वांनी प्राशन केली.

चव अजिब्बात आवडली नाही. अन नंतर आपल्याला दारू पिल्यामुळे काहीतरी व्हायलाच पाहिजे. ते काहितरी काय? याचा अनुभय (हो अनुभय च. अनुभव येण्याचे भय) यायची वाट पहात बराच वेळ काढला. शेवटी मेस बंद व्हायची वेळ झाल्याने तिकडे जाऊन चेंजचे जेवण उर्फ खिमा पोळी खाल्ले, अन रूमवर येऊन झोपी गेलो.

तर अशी ब्रँडीशी पहिली ओळख. नंतरही आजवर अनेकानेक ब्रँड्या अन वेगवेगळ्या दारवा चाखल्या, दारू चाखण्याची, अनुभवण्याची, एंजॉय करण्याची चव मॅच्युअर होत गेली. हौसेने अनेकानेक प्रकार गोळा केले, अन कॉकटेल्स करून पिणे अन पिलवणे हा स्वयंपाकाइतकाच आनंदी प्रकार आजही करतो. मजा येते.

(अवांतर अन अधिक माहिती : मजकडे अधिकृत दारू पिण्याचे लायसन आहे. महाराष्ट्र सरकार योग्य ती फी आकारून तुम्हाला दारू पिण्याचा परवाना उर्फ परमिट देते. ज्यायोगे तुम्ही 'परमिट रुम'मधे, अथवा घरी दारूचा आस्वाद कायदेशीर रित्या घेऊ शकता. सर्व मद्यशौकिन मित्रांना माझी विनंती आहे, की हे परमिट काढून घ्या. पूर्वी तुम्ही परमिटरूममधे गेलात की परमिटरूम वाला रोज अ‍ॅवरेज जितकी टेबले - रादर खुर्च्या फुल असतात, तितकी टेंपररी परमिट्स १० रुपये पर परमिट हिशोबाने काढत असे. आजकाल टेम्पररी परमिट बंद केले गेले आहे. तेव्हा आपल्या खिशात आपले लायसन असलेले बरे.)

तर, ब्रँडी.

ब्रँडी नामक दारू आयडियली जेवण झाल्या नंतर पिण्याची दारू आहे.

मस्त पार्टीचे डिनर करून स्त्रीपार्टी लोक्स पार्लरमधे गायब झाल्यानंतर, पुरुषांनी बसून सिगार वगैरे शिलगवून हळूहळू कोरीच, किंवा थोडं पाणी घालून गप्पाटप्पा करत सिप करण्याची वन फॉर द रोड, किंवा कॉफीत घालून पिण्याची कोन्याक, असा ब्रँडीचा थाट असतो.

ही दारू वाईन डिस्टिल करून बनवतात. याचा किस्सा असा, की पूर्वी वाईन मर्चंट्सना चाचे लोक (पायरेट्स) पकडून दारूच्या पर बॅरल कर वसूल करीत. तेव्हा वाईन मर्चंट्सनी वाईन डिस्टिल करून ब्रँडी बनवण्याचा शोध लावला. अन १०-१५ ब्यारल वाईनचि १ ब्यारल ब्रँडी बनवून 'कर' वाचवायला सुरुवात केली.

अशा सुरस कथा, त्या दारूचे प्रकार, तिला पिण्याच्या पद्धती, त्याच्या रिचुअल्स, अशा अनेक पैलूंची माहिती घेऊन, अन मग तीला पोटात घेऊन, अनुभवणे, हा आयुष्य जगण्याचा एक भाग आहे. ती दारू त्यावेळी पिताना, सोबत असलेल्या/असलेलीच्या आठवणी, रंगलेल्या महफिली, हा त्याहूनही जास्त आनंददायी भाग आहे.

हे जे लिहिलंय ते खूपच त्रोटक आहे. एकेका दारू प्रकाराबद्दल एकेक रात्र बोलू शकेन अशी ती गोष्ट आहे.

शेवटी,

सोमरसाचे पान करणे, अन मज्जा करणे हे दैवी सुख आहे म्हणे. त्यासाठी 'वर' जावे लागते असे सगळे सांगतात. आम्ही लोकायतवादी चार्वाक.

आम्ही म्हणतो, एकच आयुष्य आहे. 'वर' 'खाली' काही नाही. जे आहे ते इथेच. तेव्हा, तब्येतीत प्या, अन स्वर्गसुख भोगा!

***

(क्रमशः)
नेक्स्ट : होस्टेलची दारू. कोणती ते ओळखा पाहू?

बीयर?
का हातभट्टी? Biggrin

दारू प्यावी का असा विषय घेण्याऐवजी दारू कशी पिता असा अपेयपानास उत्तेजन देणारा विषय घेतल्याबद्दल सर्वप्रथम निषेध.
आयुर्वेदिक सुरा किंवा आदिवासींचे मद्य थोडेफार ठीक (शक्यतो टाळावेच) पण दारू नकोच.
कुठलाही प्राणी दारू पीत नाही.

कुठलाही प्राणी कपडे घालत नाही, स्वत शेतात पिकवून, पदार्थ बनवून खात नाही, गाडी वापरत नाही, पैसा कमवत नाही, देवबिव मानत नाही, कुटुंबसंस्था, आत्या, काका, मावशी नाती मानत नाही, फेसबुक, माबोवर येऊन ड्युआयडी काढून निषेधाच्या पोस्टी टाकत नाही.

कसं काय जमत असेल ना त्यांना

प्राणी खाणे पिणे करतात. मनुष्यही करतो. बाकीच्या गोष्टी पूर्वी माणूस सुद्धा करत नव्हता आणि अजूनही नाही केल्या तर पटकन मानवजात नाहीशी होईल असे म्हणणे आहे काय ? मनुष्य व प्राणी यांना आवश्यक असलेल्या नैसर्गिक गोष्टई एव्हढाच अर्थ घेतला पाहिजे.

माबोवर येऊन ड्युआयडी काढून् >>>> देव त्यांना आणि हकनाक संशय घेणा-यांना माफ करो व आपल्याकडे लाड करण्यासाठी बोलावो.

म्हणजे शिकार केलेले कच्चे मांस असे का

तेही कसे काय जमत असेल ना....फुकाची बडबड नाही, फालतुचे सल्ले नाहीत, गप्प शिकार करायची काय जमेल तर आणि खायचा म्हणे माणूस एके काळी...

मग कंदमुळे खाणारे मांस खाणाऱ्यांचा निषेध करायला लागले. थेट बोलले तर मांसभक्षक अंगावर हाडूक फेकून मारायचे म्हणे त्यामुळे मग स्वताला अतीपवित्र आणि अजून काय काय समजणारे लोक गुहेच्या भिंती निषेधाने भरू लागले म्हणे.

पण हा धागा दारूचे उदात्तीकरण करणारा का वाटला?
>>>>>

सिरीअसली??
जर उद्या कोणी ईथे धागा काढला की तुम्ही मुलींची छेड कशी काढता तर तो टवाळांना उद्युक्त करणारा आणि नवनवीन आयडिया देत प्रोत्साहीत करणारा धागा ठरणार नाही का??

दारूला असे उचलून धरणारा धागा, विषय, पोस्ट दिसली की तिथे निषेध नोंदवणे हे माझ्याकडून सहज घडते. तिथे धागा भरकटत तर नाही ना वगैरे माझ्यासाठी फार दुय्यम होऊन जाते.

येनीवेज,
चुकलो असेल तर सर्वांनीच माफ करा _/\_

केले माफ
तुझ्या पोस्टी वाचून कोणाला गटाराचे पाणी पिण्यास प्रोत्साहन मिळू नये अशी सदिच्छा.....

त्यातल्या टायफॉईड, कॉलरा, आणि अन्य विषाणूंमुळे देवाला लवकर भेटण्याची संधी आहे. दारू पिऊन लिव्हर खराब होऊन जाण्यापेक्षा. मुंबईकरांना कळेल अशा भाषेत म्हणजे फास्ट लोकल.

तर लोकहो, एकवेळ दारू प्या पण या महाशयांसारखे गटारीचे पाणी नको.

Pages