तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

>> On the rocks म्हणजे नक्की काय.....इतर काहीही mix न करता का ?

ग्लासात रम/व्हिस्की आणि फक्त बर्फाचे खडे. खूप पूर्वीच्या काळी इंग्लड मध्ये बर्फा ऐवजी नदीतले थंडगार गोटे वापरत त्यावरून शब्दप्रयोग आलाय असे एकदा ऐकले होते.

ऑन द रॉक्स हे सर्रासपणे दारू + बर्फा च्या काँबिनेशन साठी वापरली जाणारी फ्रेज असली, तरी रॉक्स वेगळे आणी बर्फ / आईस वेगळा.

प्रेमींकरता... टिप्सी बारटेंडर पाहा. वेबसाईट, यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम प्रोफाईल पण आहे. एकसे एक प्रकार दाखवतात...
ही साईट लिंक - https://tipsybartender.com/

डॉक्टर असण्याचा आणि दारूचे समर्थन याचा परस्परांशी काहीही संबंध नाही. इतर व्यावसायिकांनी समर्थन केले तर चालेल पण डॉक्टरने करू नये असं म्हणायचं आहे का तुला विमु? Uhoh
>>>>>

हाताच्या बोटात अमुकतमुक रंगाचा खडा घातला की साडेसाती पळते वा अमुकतमुक मुहुर्तावर लग्न केले की संसार सुखाचा होतो या अंधश्रद्धा आहेत. यांचे समर्थन खरे तर कोणीच करू नये. पण एखादा वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ जेव्हा याचे समर्थन करतो तेव्हा आश्चर्य वाटणे साहजिक आहे. बस्स असेच आश्चर्य त्यांना वाटले असेल. मलाही वाटले.

अर्थात सारेच शेवटी माणसे असतात. अंधश्रद्धा असो वा दारू, यांच्या नादाला कोण कसा लागेल हे सांगता येत नाही.

मला सर्वात जास्त भिती त्या लोकांची वाटते जे म्हणतात मी थोडीशीच पितो आणि मला चढत नाही. असे म्हणणारे लोकंच मग ते सिद्ध करायला पिऊन गाडी चालवतात.

मी दारू कशी पितो.. या ऐवजी मी दारू पिल्यावर काय करतो हा धागा काढा.. किंवा ईथेच यावर चर्चा करा. मला वाचायला आवडेल. कारण उत्क्रांतीची लाखो वर्षे गेली आहेत माकडाचा माणूस होण्यात. दारूने मनात आणले तर क्षणात उलटे करू शकते ईतकी ताकद आहे तिच्यात

....तरी फक्त केस वाढवून देवानंद होत नाही. देव आनंद होणे इतके सोपे नही.
>>>>

मी तर म्हणतो देव आनंद असे होता येतच नाही. ते असावे लागते. आणि तो एकच होता.

बाकी या देवानंद विवेकानंदच्या धर्तीवर असेही म्हणू शकतोच,
दारू पिऊन किडनी (की लीवर?) फेल होऊन मरण्यापेक्षा सीमेवर जाऊन शत्रूंच्या गोळ्या खाऊन मरा.

मी २ सर्विंगच घेणारे/ किंवा आज घेणार नाहीये कारण मला नंतर गाडी चालवायची आहे. हेच बोलणारी माणसं आजुबाजूला बघतो मी.
संगत बदला जग बदलेल. Wink

<< दारूही वा ई ट च! त्यामुळे तिचे समर्थन कोणीच करू नये, डॉक्टरने तर नाहीच नाही! >>
-------- दारु वाईट नाही आहे. कुठलिही गोष्ट अती झाल्यास वाईटच... मग ते पाणी, मिठ, साखर असेल....

दारु कशाला म्हणावे? आयुर्वेदातील अरिष्ट आसवे ही एक प्रकारची दारुच आहे. आता दारु कशी प्यावी सोबत कशी पिउ नये हे पण सांगण्याची गरज आहे.दोन क्वार्टर झाल्या तरी चढत नाही असे फुशारकीने सांगणार्‍यांना मी म्हणतो मग पाणी प्या ना कशाला पैशे वाया घालवता?

मी २ सर्विंगच घेणारे/ किंवा आज घेणार नाहीये कारण मला नंतर गाडी चालवायची आहे.
>>>>

2 सर्विंग काय असते?
मला या दारूच्या टर्म माहीत नाही म्हणून विचारतोय.
सेफ ड्रायव्हिंगसाठी कायद्याने दारूचे लिमिट काय आहे?

दारु वाईट नाही आहे. कुठलिही गोष्ट अती झाल्यास वाईटच... मग ते पाणी, मिठ, साखर असेल....
>>>>>

अशी वाक्ये पाहिली की हसावे की रडावे समजत नाही.
यात दारूच्या जागी सायनाईड टाकून वाचा आणि बघा पटते का?

0.08%
0.0 पेक्षा जास्त असेल तर कार न चालवलेली उत्तम.

जागी सायनाईड टाकून वाचा आणि बघा पटते का? >> सफरचंदाच्या बी मध्ये सायनाईड असते. अशा काही बिया चावून चावून पचन संस्थेत गेल्या तरी काही अपाय होत नाही. पुढच्या वेळी थोडा अभ्यास करा आणि बोला. रादर पटत नसेल तिकडे बोलूच नका.

उसातील, फळातील, फुलातील, धान्यातील शर्करे पासून बनविलेली उत्तम मदिरा वाईट कशी?
आणि अतिरेक हा कश्याचाही वाईटच.

आणि मदिरेचे वाईट पण ती पिणार्‍याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते!
आमचा एक मित्र होता तो भरपूर प्यायचा आणि पोटभर जेवून शांत झोपी जायचा... तर दुसरा एक होता जो एखाद्या पेग मध्येच दंगा करू लागायचा! एकजण होता तो कुणी पाजणारा मिळाला तर भरपूर प्यायचा एरवी महिनो न महिने हात नव्हता लावत! Wink

सफरचंदाच्या बी मध्ये सायनाईड असते.
>>>
भाज्यांमध्ये लोह असते म्हणून कोणी नुसते लोह पित नाही.
सायनाईड किंवा कुठलाही पदार्थ काही आभाळातून कोसळत नाही. तो या निसर्गात ईथे तिथे कुठेतरी असणारच. विषकन्या विष पचवूनच बनतात हे देखील ठाऊक आहे. औषधांमध्येही जास्त झाल्यास अपायकारक असे ड्रग्स असतात.

मुद्दा आहे तो एखादी गोष्ट अति केली की त्रास होतो अन्यथा दारू चारचौघांसारखेच पेय आहे हा भाबडेपणाचा आव आणत दारूचे समर्थन करायचा. आणि हा मुद्दा लावत दारू आणि दुधाला एकाच तागडीत तोलायचा.

मुळात दारू पिणारयाला स्वताला हे प्रमाण कधी ठरवता येते का? दारू हे एक व्यसन आहे. तुम्हाला लागले की तुम्हाला दारू लागतेच. तुम्ही कमीतकमी ईतकी दारू पिणारच की तुम्हाला दारू प्यायलासारखी वाटेल !

उसातील, फळातील, फुलातील, धान्यातील शर्करे पासून बनविलेली उत्तम मदिरा वाईट कशी?
>>>

दूधाच्या पातेल्यात वाटीभर मीठ टाकून वरून चारपाच लिंबू पिळा आणि ते पातेले पाच दिवस तसेच ठेवून सहाव्या दिवशी आतला पदार्थ खायचा प्रयत्न करा.

कच्चा माल काय आहे आणि प्रक्रिया करून तुम्ही त्याचे काय बनवता हे मॅटर नाही करत का?

काही काही तर न पिता, नुसतं नाव ऐकूनच दंगा करतात. इथेच बघा. Wink
>>>>

हो पण अतिरेक नाही करत ना Happy

वीकान्तताला त्या कमिंग आउट धाग्यावर उत्तरं द्यायची ठरलं होतं ना?
>>>
हो आज रात्री देणार आहे.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
फार प्रश्न नसावेत तरी..

मला भावलेला एक देशी प्रकार - ताज्या शहाळ्याच्या पाण्यात गोव्याची चांगल्या प्रतीची फेणी [ किंवा, फेणीत शहाळ्याचे पाणी; प्रमाण आपापल्या कुवतीनुसार] !

तुम्ही दारू कशी पिता?
<<

एकाद्या निवांत विकांताला चार जिवाभावाच्या सवंगड्यासोबत, होडी काढून सरळ सुवर्ण दुर्ग किल्ला गाठायचा, होडीतून चार-पाच जणाना पुरेल इतका मद्याचा व खाण्याचा साठा सोबत घेऊन किल्ल्याच्या बाहेर जो तासलेला काळाभोर कातळ आहे त्यावर चटया टाकून, समुद्राचा भन्नाट वारा व आवाज ऐकत मद्याचा एकएक पेग तळलेल्या सुरमई व बांगड्या सोबत मारायचा,

जेंव्हा-केंव्हा लक्षात येईल की आता विमान कधीही टेकऑफ करेल त्यावेळी उरलेल्या रिकाम्या बाटल्या, कागदाचे तुकडे होडीत टाकून व माश्यांचे काटे वगैरे कावळ्यांना घालून घरी येऊन, मस्त जेवून ताणून द्यावी.

मज्जानू लाईफ.

दुधाला आंबवून केलेले दही ताक लस्सी पितात ना! Wink
>>>>
हो, फार आवडीने. पण मी वर सांगितलेय ते जरा भिन्न आहे. हेच तर सांगायचे आहे. कच्चा माल काय आहे आणि प्रक्रिया केल्यावर काय बनते हे टोटली भिन्न प्रकार आहेत. कच्चा माल पोषक जीवनसत्वे असलेला आहे म्हणून तुम्ही त्याचे काहीही कराल ते पौष्टिकच असेल असे नसते हाच मुद्दा आहे.
मूळात अन्नधान्याची दारू बनवणे हेच नासाडी आहे !

"सरळ सुवर्ण दुर्ग किल्ला गाठायचा, होडीतून चार-पाच जणाना पुरेल इतका मद्याचा व खाण्याचा साठा सोबत घेऊन... एकएक पेग तळलेल्या सुरमई व बांगड्या सोबत"

==> अहो साहेब "सिंहगडवर मांसाहारास बंदी कशासाठी?" या धाग्यावर (https://www.maayboli.com/node/66305)

"मासांहार करणार्‍यांमुळे गडाची कशी दुर्दशा होते हे पाहायचे असेल तर एकदा विशाळगडाला भेट द्या."

अशी मुक्ताफळे उधळणारे ते आपणच ना?

Pages