Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी वहिसकी आणि कोक .. मोस्टली
मी वहिसकी आणि कोक .. मोस्टली 60 चा पेग.. नंतर आणखी एक 60 जर गप्पा चांगल्या असतील तर.. पण नंतर बास.
पत्ता द्या! आलोच!
पत्ता द्या! आलोच!
वहिसकी आणि कोक
हा घ्या प्रकार ४- वहिसकी आणि कोक

this is a joke, right?.......
मी गटारातल्या पाण्यात मिक्स
मी गटारातल्या पाण्यात मिक्स करून पितो. जेणेकरून पिऊन गटारात पडलो तर परिस्थितीशी जुळवून घ्यायला बरे पडते
मागे कुठेतरी वाचलेले, दात न
मागे कुठेतरी वाचलेले, दात न आलेल्या बाळांना दारू पाजताना चमच्याने पाजावी. निप्पल वाल्या बाटलीने पाजल्यास खूप चढते. दारूतले जाणकार प्रकाश टाकू शकतात का?
मी गटारातल्या पाण्यात मिक्स
मी गटारातल्या पाण्यात मिक्स करून पितो. जेणेकरून पिऊन गटारात पडलो तर परिस्थितीशी जुळवून घ्यायला बरे पडते>>>> भास्कर
(No subject)
गरम गरम फ्रेंच बॅगेट ब्रेड,
गरम गरम फ्रेंच बॅगेट ब्रेड, ऑलिव्ह ऑइल विथ हर्ब्स, स्पायसी चीज आणि वाईन.. आणि सूप. धदेउशु
दारूची चॉकलेट सुद्धा असतात.
दारूची चॉकलेट सुद्धा असतात. ज्या पोरांचे चॉकलेट खाऊन दात किडतात त्यांना अशी चॉकलेट बरी. किड झालीच तर तिथल्या तिथे दारूने मरेल.
भंभ्या,
भंभ्या,
इथून कल्टी मार पाहू. तुला दारू आवडत नाही इतपत ठीक आहे, पण दारू प्याली रे प्याली की गटारातच लोळायला हवे ही चुकीची समजूत आहे.
आपल्या सातपुड्यातल्या आदिवासींत बाळ जन्मले की ओठाला मोहाची दारू लावतात. बाळाच्या.
दारू ही लिमिटेड पिण्यासाठीची गोष्ट आहे. एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच आहे. अगदी तुझ्या धाग्यांचाही अतिरेक वाईटच. हो की नै?
>>
मी गटारातल्या पाण्यात मिक्स करून पितो. जेणेकरून पिऊन गटारात पडलो तर परिस्थितीशी जुळवून घ्यायला बरे पडते
<<
अन नक्की काय पितोस गटाराच्या पाण्यात मिक्स करून? कुठल्या गटारीचं पाणी आणतोस? गटारीत पडता येईल अशा साईजच्या तुझ्या आजूबाजूच्या ४ -२ उघड्या गटारींचे फोटो टाक पाहू?
अन नक्की काय पितोस गटाराच्या
अन नक्की काय पितोस गटाराच्या पाण्यात मिक्स करून? कुठल्या गटारीचं पाणी आणतोस?
>>
दक्षिण मुंबईच्या
भास्कर बास कर.
भास्कर बास कर.
दारू ही लिमिटेड पिण्यासाठीची
दारू ही लिमिटेड पिण्यासाठीची गोष्ट आहे. एन्जॉय करण्याची गोष्ट आहे......
Submitted by आ.रा.रा. on 15 June, 2018 - 14:13
आपण डॉक्टर असूनही दारूचे समर्थन करता???
आ. रा. रा. एक नम्बर पोस्ट
आ. रा. रा. एक नम्बर पोस्ट
आपण डॉक्टर असूनही दारूचे समर्थन करता??? >> डॉक्टर असण्याचा आणि दारूचे समर्थन याचा परस्परांशी काहीही संबंध नाही. इतर व्यावसायिकांनी समर्थन केले तर चालेल पण डॉक्टरने करू नये असं म्हणायचं आहे का तुला विमु?
मुळात कोणतीही गोष्टी 'अती' असू नये ती घातकच ठरते, मग ती दारू असो वा अन्न.
त्यामुळे प्रमाणात आनंदापुरतं कोणत्याही गोष्टीची मजा लुटायला हरकत नाही.
आम्हाला दारू वर्ज्य नाही.
आम्हाला दारू वर्ज्य नाही. दारू मनापासून आवडतेच. पण, तरीही
<किशोरपणी सुट्टीत आई बाबा दुपारचे झोपले की चुपचाप उठून शिस्तीत एक 30 चा पेग हळूच व्हायचा.> हे भयानक वाटले. नक्की 'किशोरपणीच' म्हणायचेय ना तुम्हाला?
भंभ्या
भंभ्या

हा घ्या प्रकार ४- वहिसकी आणि कोक Lol
this is a joke, right?.......>>>
या निमित्ताने जाणकारांनी खुलासा करावा. व्हिस्कीत कोक घालणं एवढं अक्षम्य पाप आहे तर ते मर्रिकन लोक जॅक अँड कोक एवढ्या आवडीने का पितात?
इतर व्यावसायिकांनी समर्थन
इतर व्यावसायिकांनी समर्थन केले तर चालेल पण डॉक्टरने करू नये असं म्हणायचं आहे का तुला विमु? >>>
दारूही वा ई ट च! त्यामुळे तिचे समर्थन कोणीच करू नये, डॉक्टरने तर नाहीच नाही!
बावळट आहेत मग ते
बावळट आहेत मग ते
जॅक ची ओरिजनल टेस्ट, गंध आणि समुदनेस कोकच्या मिश्रणाने घालवून टाकतात.
जॅक सोबत बर्फ देखील जास्त असू नये, किंचित गार होईल इतकेच.
काय एकेक. मला तर फक्त एकच जॅक
काय एकेक. मला तर फक्त एकच जॅक आवडलाय आतापर्यंत.
आणि शेवटी बर्फात तर एकदम भारी वाटलाय तो.
त्याच्याजागी दुसरा जॅक असता
त्याच्याजागी दुसरा जॅक असता असता तर काही लोकांचे प्राण तरी वाचले असते
रेडिमेड बर्फ पण होता शेजारी,
रेडिमेड बर्फ पण होता शेजारी, पटकन एक तुकडा तोडून ग्लासात टाकायचा
हकानाका
this is a joke, right?.......
this is a joke, right?.......
>>> येस.
आम्ही पितच नाही
आम्ही पितच नाही

>> कोणतीही गोष्टी 'अती' असू
>> कोणतीही गोष्टी 'अती' असू नये ती घातकच ठरते, मग ती दारू असो वा अन्न
+१११ अगदी सहमत. 'अन्न' ऐवजी 'अन्य' असते तर अधिक अर्थपूर्ण झाले असते. काहीही अति असू नये आणि सुमार पण असू नये.
सिंगल मॉल्ट स्कॉच नुसती (थोडं
सिंगल मॉल्ट स्कॉच नुसती (थोडं पाणी - खुलवण्याइतपत) पिता आली तर छानच. नाहीतर व्हिस्की रॉक्स आणी थोडसं सेल्त्झर घालून पण मस्त खुलते. बर्फ घातला तर सेल्त्झर कमी घालावं नाहीतर सगळं प्रकरण पानचट होतं. क्लब सोडा खूप जास्त overpowering वाटतो. व्हिस्की ची चव मारली जाते. स्मोकी फ्लेवर ची व्हिस्की असेल (ब्लॅक लेबल, ग्रीन लेबल, जॅक डॅनियल्स) तर मात्र बर्फ घालून जास्त मजा येते. त्यात बाकी काही घातलं तर तो फ्लेवर फिका पडतो.
रम आणी व्होडका सुद्धा क्वचित सेल्त्झर + लाईम बरोबर चांगली लागते. बाकी मिक्सर्स घातले की त्यांचीच चव जास्त लागते. रम जिंजर बीअर (नॉन-अल्कोहॉलिक असते) आणी थोडसं लेमन ज्यूस ह्यात सुद्धा चांगली लागते, पण क्वचित. हा एक त्या कोक+रम ला कमी गोड पर्याय आहे.
बीअर थंडगार - शक्यतो आयपीए सारखी थोडी जास्त अल्कोहोल कंटेंट ची असेल, तर मजा येते.
रेड वाईन ची मजा इटालियन जेवणाबरोबर किंवा अत्यंत धकाधकीचा आठवडा गेला असल्यास शुक्रवारी संध्याकाळी सोफ्यावर बसून आस्वाद घेण्यात आहे.
व्हाईट वाईन किंवा लाईट बीअर शनिवारच्या दुपारच्या जेवण्याच्या आधी घेतली आणी मस्त जेवलो की दुपारी थोडीशी हलकी झोप काढल्यावर शनिवार संध्याकाळ छान जाते.
बाकी मार्गारिटा, मार्टिनी वगैरे पार्टी ड्रिंक्स आहेत. मार्गारिटा तर एकदम लाईट, त्या मानानं मार्टिनी जर कडक प्रकरण आहे. पण हे प्रकार करून द्यायला बार टेंडर असेल किंवा पार्टीसाठी तुम्हीच बार टेंडर म्हणून बनवत असाल तर ठीक आहे. नाहीतर स्वतः च्या एकट्याच्या विकेंड ड्रिंक साठी इतका खटाटोप करणं म्हणजे ऑफिस मधे लंच साठी डब्यात आणलेली आदल्या रात्रीची उसळ पोळी खाताना रांगोळी घालून, उदबत्त्या लावण्यासारखं आहे.
दारूही वा ई ट च! त्यामुळे
दारूही वा ई ट च! त्यामुळे तिचे समर्थन कोणीच करू नये, डॉक्टरने तर नाहीच नाही!
<<
@ विमु,
तुमच्यासाठी तुम्हाला समजेल असा एक सुविचार सांगतो.
"केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा"
अर्थात, अभ्यास करा. कशाला 'वा ई ट च' म्हणायचं, हे स्वतःच्या अभ्यासानंतर ठरवा. पुरेसा अभ्यास झाल्यावर पूर्ण रिसर्च पेपर लिहा. नुसतं गृहितक नव्हे.
ता.क.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, कुणी काय बोलायला/म्हणायला/खायला/वागायला/भजायला/पूजायला वगैरे पाहिजे, ते डिक्टेट करणार्या "संघ"टनेच्या पगड्या बाहेर या.
Statutory की काय म्हणतात ती
Statutory की काय म्हणतात ती वॉर्निंग:
पुढील प्रतिसादाच्या प्रेमात पडून नव्याने दारू पिणाऱ्यांसाठी सूचना, आपली कुवत (शारीरिक, आर्थिक आणि मानसिक) ओळखून प्याल तरच मजा करता येईल. उगाच अति पिऊन दारूला शिव्या घालायला लोकांना प्रवृत्त करू नये!
प्रस्तुत प्रश्नात महोदयांनी केवळ दारू विचारले असल्याने दारूच्या वर्गीकरणात येणाऱ्या सर्व (माझ्या अनुभवातील) पेयपान पद्धती-
१. व्हिस्की: ६० चा पेग, त्यात थंड पाणी, असल्यास बर्फ. सोबत खायला भेळ/ boil अंडे/ खारेदाणे. माझे आवडते लसूण चना फ्राय. एक पेग किमान १५ मिनिट तरी संपवू नये. जेवणाआधी बसले असाल तर कोरडे चिकन. चिप्स कधीच नाही. एखाद दुसरा जुना मित्र असावा सोबत, बारचं आधारलेलं वातावरण, हातात गुंडांग गरम किंवा किंग्स.
२. बिअर: उन्हाळ्यात chilled असावी, पण कधी कधी kf स्ट्रॉंग असेल आणि पाऊस/ थंडी असेल तर सामान्य तापमानाची बिअर बेस्ट लागते. मला मगमधून घ्यायला आवडते, बाटली तोंडाला लावून मोठा घोट घेता येत नाही. हळू हळू प्यावी. टॉप to बॉटम मारायला हरकत नाही, पण त्यात मजा अशी नाहीये. सोबत खायला भरपूर काहीतरी. पण शक्यतो तळलेले पदार्थ टाळतो मी. ग्रुपच्या मित्रांसोबत घ्यायचे पेय. कॉलेजच्या आठवणी काढत प्यावी.
३. वोडका: मला तरी वोडका फार स्ट्रॉंग वाटते, वोडका म्हटली की मुलींशी संबंध लावणाऱ्यांचा राग येतो. Smirnoff vanilla in pineapple juice. माझं आवडतं कॉम्बिनेशन. 3 पेग आणि माणूस ढगात. सोबत खायला काही नसले तरी चालेल. (मध्ये ऑफिसच्या पार्टीत काही अतिउत्साही मुलींनी वोडका शॉट्स मारले, तकीला पद्धतीने.. अगदी अंगठ्याच्या बेचक्यात आणि ग्लासच्या कडांना मीठ लावून लिंबाच्या चकत्या समोर ठेवून वगैरे.. फार वाईट वाटलं. तकीला चे संस्कार वोडकावर!)
४. तकीला: कंसात लिहिल्याप्रमाणे, फक्त मिठासोबत मी चाट मसाला पण ठेवतो थोडा. आणि जिभेला न लागू देता सरळ घशात ओतण्याचे प्रयत्न. निव्वळ पार्टी ड्रिंक. नाचणार असलो तरच पितो.
५. Wine: नेहमी जेवणं झाल्यावर पिलो आहे, हलके हलके चढते, सोबत कुणाच्यातरी डोळ्यांची नशा, आणी त्या डोळ्यांत देखील wine ची नशा असेल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. Wine सोबत गाणी ऐकू नयेत, शक्यतो मित्रांसोबत पिऊ नये. फक्त प्रेयसी असावी, तिचे सुंदर डोळे असावेत आणि तुमच्या मनात भरपूर प्रेम. एक सुलाची बाटली आरामात, हळू हळू एकमेकांच्या डोळ्यांच्या नशेत हरवून जात संपवावी. पुढचे काही सांगणे नलगे!
६. जीन: लिंबू सरबतात घालून. फार कमी प्यायलो आहे, पण अनुभव छान होता.
७. रम: ओल्ड monk बद्दल पट्टीच्या पिणाऱ्यांना सांगायची गरज नाही. कडक ड्रिंक. कोक मधून आवडते. सांभाळून पितो. झोपायची सोय जवळ करून, सकाळचा अलार्म लावून, जेवण तयार असेल तेव्हाच पितो.
८. ब्रॅण्डी: झकास ड्रिंक. फक्त mansion house. इतर ब्रँड माहीत नाहीत, ट्राय करण्याचा प्रश्न नाही. Sprite मधून, खायला फुटाणे, किंवा इतर काहीपण.
९. Bacardi plus: rum mixed drink. पुण्यात विचारलेली तेव्हा समजलं, फक्त कर्नाटकात मिळते. जेव्हा मित्र आणि त्याची फॅमिली असेल सोबत तेव्हा घेतलेली, मस्त होती. बीच वर बसून ५ लोकांनी २५ बाटल्या उडवल्या. ड्रिंक ऑफ द मोमेंट, बैठक सोडल्यावर जास्तीत जास्त १५ मिनिट लागतात विसरायला की आपण पिलो होतो. खायला काही नको, फक्त मित्रांची खेचत हसत खिदळत प्यायची.
१०. लास्ट बट मोस्ट फेवरीट: स्कॉच: gentlemans ड्रिंक. स्ट्रिक्टली, दारूच्या काचेच्या ग्लासातच प्यावी. प्लास्टिक ग्लासात स्कॉच ओतून तिचा अपमान करू नये. मी ६० चा पेग, त्यात तेवढंच किंवा थोडं कमी पाणी, बर्फाचे २ खडे घालून पेग बनवतो, खायला चिकनची काहीतरी आटोपशीर डिश (बऱ्याचदा, चिकन / फिश कोळीवाडा) किंवा prawns. कौशिकीची ठुमरी- याद पिया की आये, किंवा गझल. असेल तर शांतपणे बसू शकणारा आणि माझ्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शेरावर खरी दाद देणारा मित्र. स्कॉच नेहमी पीत नाही, पण पितो तेव्हा रॉयल कारभार, चार भिंतीत पिण्याचा प्रकार नाही हा. किंवा ट्रीपला गेलोय, समोर शेकोटी आहे, बांबूच्या खुर्च्या, सोबत आपली प्रेयसी, आणि अजून एखादं मित्र कपल. जबरदस्त अनुभव.
ताजा कलम: व्हिस्की, रम आणि ब्रांडी सुद्धा, एकट्याने पिलो आहे. पण फार कमी वेळा, एकट्याने प्यायची इच्छा होतच नाही. पिऊन गाडी चालवत नाही शक्यतो. चालवली तरी ऑफ द हायवे. मोकळा रस्ता आणि मॅक्स स्पीड 40. जास्तीत जास्त ५ किलोमीटर अंतर असेल तेव्हाच.
कुणालाही पिण्याचा आग्रह करत नाही. चढतेय असं वाटलं, आणि जबाबदार वागण्याचे बंधन असेल तर पिणे थांबवून, जेवण करून(च) झोपतो. मित्र सोबत असतील तर मात्र खूप पितो, पण गोंधळ वगैरे आजवर घातला नाही.
सरतेशेवटी गालिबच्या ओळी,
नफस न अंजुमन-ए-आरजू से बाहर खिंच
अगर शराब नहीं इंतजार-ए- सागर खिंच!
(आपल्या इच्छांच्या गगर्दीतून, आत्म्याला बाहेर खेचू नकोस, जर दारू नसेल आता तर वाट पहा- समुद्राइतकी वाट बघ, पण दारू पी)
आणि अजून एक, जौकचा दारूपासून दूर राहण्यासाठी-
ए जौक देख दुख्तर-ए-रज को मुंह ना लगा,
छूटती नहीं है मुंह से ये काफर लगी हुई!
-राव पाटील
>> "केस वाढवून देवानंद
>> "केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा"
हा हा हा. लहानपणीचा वाक्प्रचार. अनेक वर्षांनी ऐकला. पण आता वाटते वाक्प्रचारातला गर्भित संदेश चांगला असला (अभ्यास करा) तरी फक्त केस वाढवून देवानंद होत नाही. देव आनंद होणे इतके सोपे नही.
असो विषयांतर होईल म्हणून इतकेच.
एक साधा प्रश्न पडलाय.... On
एक साधा प्रश्न पडलाय.... On the rocks म्हणजे नक्की काय.....इतर काहीही mix न करता का ?
ऑन द रॉक्स म्हणजे व्हिस्की
ऑन द रॉक्स म्हणजे व्हिस्की रॉक्स / स्टोन्स. Whiskey Stones are cubes of solid soapstone that will chill your liquor without diluting it. Unlike ice, Whiskey Stones are non-porous and thus odorless and tasteless. So, adding Whiskey Stones to your favorite bourbon will chill the spirit without affecting its taste.
Pages