तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

टकीला पिताना हाती लिंबाची फोड अन बेचक्यात मिठाऐवजी जर हाती शॉट, बेचक्यात मीठ अन नंतर खायला कोकम (आमसुले) ठेवली तर?<< घाण लागेल.
लिंबाऐवजी ताजे रातांबे असतील तर कदाचित ठिक. पण नाहीच बहुतेक.
यावरून एक प्रयोग सुचलाय. कधीतरी करून बघण्यात येईल. यशस्वी झाला तर मग रेसिपी देईन.

हुर्राक काजूचीच असते. फेणीच्या एक पाऊल अलिकडे. केवळ उन्हाळ्यातच मिळते. पहिला पाऊस पडला की खराब होते.
पचनासाठी चांगली असते म्हणतात. उष्ण पडत नाही. ते उष्ण पडण्याचं नीट माहिती नाही पण उन्हाळ्यात इतर हार्ड ड्रिंक प्यायल्यावर जी तलखी जाणवते ती हुर्राक प्यायल्यावर जाणवत नाही हे नक्की.

KolpeWadi Brand Mhanje "BHINGRI" (Original) Ho !!!!!!! Deshi DaruCh

JagBharatlye Sarva Liquor Taste (Actully test ) Kele

Pan Hicha " Gandha" "Chav" Kothehi Nahi

SasurWadi La Gelo Ki Khaas "Farmaish" Karto

Mosambichi "Baag" , Mokla Akash , Tipur Chandana ani Sangat Karnare "Mehune"(In_lawS)

"Houdya ChanGBhala"

काजूच्या फेणीचे दर्दी नाहीत का कोणी इथे?<< फेणी नाही पण मी हुर्राक प्रेमी आहे.>>>>+१११११
हुर्राक + लिंबु + सोडा
डार्क रम + जिरा मसाला + सोडा
वोदका + फ्लेवर्ड सोडा
विस्की + साधं पाणि
स्कॉच निट

कॉकटेल्स मधे
स्क्रु ड्रायवर
लाँग आयलंड टि
मोईतो

दारू पिऊ नये. किती प्यायलो याचे भान रहात नसेल तर नक्कीच.
इथल्या पुस्तकांत लिहिले आहे की पुरुषांनी दोन ग्लास वाईन (किंवा एक हार्ड लिकर, किंवा दोन बीअर किंवा दोन कॉकटेल) नि स्त्रियांनी एक ग्लास वाईन दररोज प्यायली तरी चालेल, शरीरावर, मनावर वाईट परिणाम होणार नाहीत.
पण हे सांगणे म्हणजे दररोज पौष्टिक खा नि व्यायाम करा असे सांगण्यासारखे आहे. आवडीचे पदार्थ (तळकट, मसालेदार) चापून खायचे नि क्रिकेटची मॅच बघायची एव्हढाच व्यायाम, असे बर्‍याच लोकांचे होते.

नीधप, तुमच्या रेसीपी आवडल्या (सध्या तरी फक्त वाचून आणि कल्पना करून आनंद घेणे सुरू आहे) मी आज दोघा कलीग सोबत तावातावाने भांडलो की कॉकटेल बनवायच्या प्रक्रियाना रेसिपीच म्हणतात.. त्यांना दुसरा शब्द ठाऊक नव्हता, पण रेसिपी म्हणत नाही या मुद्द्यावर दोघीही ठाम होत्या..
रेसिपीच म्हणतात ना इंग्रजीत की अजून कोणता अधिक योग्य शब्द आहे?

मी नेहमी बीयर चा चाहता आणि विशेष प्रसंगी वाईनचा आनन्द घेणारा.
गेले दोन वर्षे बीरा व्हाइट आवडू लागली आहे.
एक Edelweiss नामक बीयर एका हॉटेलात promotion मधे मिळाली. ती खूप आवडली. तिला aftertaste मधे banana flavor जाणवत होता. बरेच ठिकाणी चौकशी केली पण ही इतर कुठेच मिळत नाहिये. कोणी try केली आहे ?

बीयर ची चव डेव्हलप व्हावी लागते. बाजूला इतक्या ब्रूअरीज असूनही पिता येत नाही. ते लोक चव घ्यायला छोट्या शॉट च्या ग्लासात आणून देतात तीच संपवता येत नाही. मित्र मैत्रिणीना घेऊन जायला चांगली जागा आहे त्यांना आवडत असेल तर. मी आपली लॉंग आयर्लंड आईस्ड टी नाहीतर वोडका घेते. कधीतरीच घ्यायची तर उगाच तोंड वाकडं करून कधीतरी आवडेल या आशेवर कशाला प्यायची, आपल्याला आवडेल तेच पिऊन आनंद लुटायचा!

९० मि.लि वोडका + Electral २ चमचे + लिंबु (चवि प्रमाणे) + २ ग्लास पाणी.
९० मि.लि वोडका + नारळ पाणी (२ नारळ)

लाल मिर्चि चि चटणि चखण्या साठि.

वरिल मिश्रण चांगले ढवळुन. थोडे थोडे sip sip मारत, आवड्ता सिनेमा बघणे.

मी अकरावीत असेन तेव्हा.
आम्ही ४-५ चुलत भावन्डे आणी वडील + दोन काका असे मुंबैला मलबार हिल वर संध्याकाळी गेलो होतो. परत येताना अचानक पाउस सुरू झाला. तेव्हा झटकन बाजूच्या एका इराणी हॉटेलात शिरलो.
तिथे बीयर serve करत होते. काका लोकांनी पट्कन १८ + लोकांसाठी बीयर मागवली. १८ + नव्हतो फक्त मी आणी एक भाउ.
समोर (आज ज्या ग्लासात चहा मिळतो , अगदी तशाच पण मोठ्या आकाराच्या ग्लासात) बीयर आली. बाहेर चिम्ब पाउस , कोंदट हवा . बीयरचा एक प्रकारचा दर्प हवेत पसरला ! अर्धवट वय.. मनाला तरल बनवणारं पहिल्या पावसाचं धुंद वातावरण.. त्या समोरच्या सोनेरि पेयाने माझ्यावर भुरळ घातली...
काका मला म्हणाले , चव घेउन बघायला हरकत नाही !
घाबरत घाबरत एक घोट घेतला ... आणि अचानक एका थंड , कडू चवीने जिभेचा ताबा घेतला.
खरं तर दुसारा घोट घेण्याची फारशी इच्छा राहिली नव्हती ...पण ते वय असे होते कि कुतुहल - आकर्षण - काहितरी वेगळे , वलयान्कित , धाडसी (?) अशा संमिश्र भावना जागवणारे काहितरी.... जे शब्दात वर्णन करता येत नाही असे काहितरी ...
मोठे सगळे आनंदाने आस्वाद घेत आहेत, यामुळे एक अनामिक विष्वास आणि आकर्षण या संदिग्ध मनस्थितीत तीन चार घोट प्यायलो.
काहितरी मोठे जगावेगळे केले असल्याचा, जणू जग जिंकल्याच्या साराखी काहिशी अनामिक भावना मनावर सावटली.... आणि तो एक गंध मनात घर करून गेला.

पुढे कॉलेज संपेपर्यंत हे सगळे विसरून पण गेलो. कारण आमच्या कुणाच्याच घरात दारू पिणे ही "जीवन शैली " " दूर दूर तक" नव्हती , आणि अजूनही नाही! मित्रांच्या तशा पार्टींपासून कायम दूरच राहिलो.
मग नोकरी सुरू झाली. ऑफिस मधून थेट मैदानात जायचो ,, भरपूर पळणे - आणि फूटबॉल - बास्केट्बॉल खेळणे ... उन्हाळ्यात अक्शरशः टीशर्ट पिळून मग सॅक मधे टाकावा लागे..
एकदा घरी परतत असताना मित्र भेटला... गप्पा मारता मारता कसे कुणास ठाउक , शेजारच्या दुकानातून दोन बीयर घेउन त्याच्या studio वर गेलो. भरपूर व्यायामाने आलेली "runner's high" स्थिती ! गच्चीत जमिनीवर बसलो. मित्राच्या हातात guitar ! मग मी माझी compositions गाऊ लागलो.
गुंतलेला जीव मायेच्या फुलाशी
पांगले सारे नभासम दूर देशी
ऐकताना रुद्ध कंठाची कहाणी
पापणीला पेलवेना चंद्रपाणी...
.... महानोर
संध्याकाळच्या सोनेरी आकाशाच्या खाली .. सुंदर स्वरबद्ध केलील्या कवीता ..आणि साथीला बीयर.... ती सुरांबरोबर अलगद अंगात भिनत गेली....
जुन्या मनात रुजलेल्या नात्याला ओळख सापडावी.. तशी !

दारू प्यायल्याने बोर्ड बिघडतो होय! मला वाटलं त्याच्याशी शिक्षणाचा, साक्षरतेचा संबंध असावा.पण असोच शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचाही संबंध नसतो तितकासा खास असे सहज जाणवून गेले एक विविक्षित पोस्ट वाचून.

मस्त रानातील घर , जवळचे चार मित्र जे भारतात आल्यावरच भेटतात ,ड्युटी फ्री मधून घेतलेली गोल्डन गुज आणि शिवास रिगल 21 वर्षे जुनी , सोबत भरली वांगी , ज्वारीची भाकरी , उकडलेली अंडी , आणि इतर चाकना , शिवास रिगल फक्त पाण्यात आणि आत्ता काचेचे कुब मिळतात , बर्फा ऐवजी ते वापरून ,मस्त चांदणे सोबत मित्र रात्र कशी संपते ते कळत ही नाही , वरश्यातून एकदा ही मैफिल असतेच इतर वेळेस घेत नाही , गेली 27 वर्षे हे चालू आहे.

रम किंवा व्होडकाच्या पेगमध्ये टबॅस्को सॉसचे दोन थेंब टाकून पाहिलेत कोणी? पेपर सॉस पाहिजे.
मस्तं तिखट चव लागते आणि झटकाही.

हुर्राक और तान... क्या याद दिलाई... सुभानल्ला
गोव्याला गेलो की हुर्राक हमखास पितोच, पण परत येताना आणतो ती मात्रं फेणीच!

दारुने माणसाचा माकड होतो हे कानावर आलेलं आहे, पण टेलरने दारु प्यायल्यावर बोर्डावरच्या बायांचे बाप्ये होतात हा शोध इथेच लागला.

>>रम किंवा व्होडकाच्या पेगमध्ये टबॅस्को सॉसचे दोन थेंब टाकून पाहिलेत कोणी? पेपर सॉस पाहिजे.<<
ब्लडीमेरी बेटर ऑप्शन आहे... Happy

बियरच्याच गप्पा निघाल्या आहेत, तर होस्टेलला ४-५ जणांनी मिळून बियरची एक बाटली आणून तिचे पेग वगैरे बनवून प्याल्याचे किस्से सगळीकडे फेमस असतात.

पहिली बियर कधी प्यालो ते आठवत नाही, पण अंडरग्रॅज्युएट दिवसांत फार बियर प्याली गेली नाही.

त्याचं पहिलं अन एकमेव कारण म्हणजे हिशोब. एक बियर पिणे अन एक ९० पिणे हे "इफेक्टिवली" सारखेच. मग आजही ५५-६० रुपयांत रमची ९० मिळते अन स्ट्राँग बियर १७० ला. बेंबट्या, घाल पाहू बोटे! Wink त्यामुळे इन जनरलच बियर कुणी फारसे पीत नसे. बहुतेक सगळे रम अन काही व्हिस्की वाले.

तसेही आपण (इंड्यन) लोक बियरच्या बाबतीत अत्यंत मागासलेले.

बियर म्हणजे श्ट्रांग अन माईल्ड अशा दोन प्रकारची असते, त्यातही माइल्ड पिणे मूर्खपणाचे असते, अन त्यातही टिनपेक्षा बाटली स्वस्त, इतपत(च) माहिती बहुतेकांना असते. आजकालच्या आयटीसॅव्ही मुलामुलींना बंगलोरी पब कल्चरमुळे ठाऊक झालेली ड्राफ्ट बियरही फार लोकांना ठाऊक नसते.

ड्राफ्ट बियर सगळ्यात आधी वेंकीज चा पब सुरू झाला होता लालदेवळाच्या बाजूला, तिथे ठाऊक झाली. १० रुपयांत मग भरून मिळायची. अन सोबत शेंगदाणे फुकट. ४० रुपयांत पिचर मिळे, त्यात ५ मग भरत. तिथे बियर पिऊन मग चौपाटीच्या अमित दा ढाबा वर हाफ तंदुरी खाणे ही स्वस्तात मस्त चैन होती.

बियरचे एऽल, लागर्, स्टाऊट, अन काय काय प्रकार असतात. बियर हे ब्रेडसोबत खायचे अन्नपदार्थांपैकी प्रकरण होते, इजिप्तच्या हमुराबी कोडमधे तिचा उल्लेख आहे. बियरच्या स्वतंत्र देवता आहेत, (हो, एक नाही अनेक) अन इजिप्शियन देवता नेफ्तिस हिची प्रार्थना म्हणजे बियर बनवायच्या रेसिपीचे श्लोक आहेत. Lol या अन असल्या चटकदार माहितीचा गंधही आपल्याकडे नसतो.

आमच्याकडे ढाब्यावर गेलं, अन वेटरला बियर कोणती विचारलं, की हमखास झिंगारू अन बडगुजर (अर्थात बडवाइजर) अशी नावे ऐकू येतात. दारूच्या नांवांचा गावातल्या वेट्रांनी केलेला अपभ्रंश हा आयटम एंटरटेनिंग आहे. स्मर्नॉफला हमखास शिमरन म्हणतात.

दिवसभराचं काम आवरून घरी जाताना इळभर पबमधे स्थिरावून टंबलर भर स्टाऊट एल रिचवली की घरी जाणे हा उद्योग अनेक इंग्रज करतात, ऑस्ट्रेलियात पाण्याऐवजी बियरच पितात वगैरे रोचक माहिती इंग्रजी पुस्तकं वाचायला लागली की मिळते.

एकंदरित बियर म्हणजे जास्त न चढता टाईमपास गप्पाटप्पा करीत पिण्याचा प्रकार. शक्यतो माइल्ड प्यावी.

दुपारी प्यायचीच असेल तर बियर. किंवा एकादं लाईट कॉकटेल. मला तरी दिवसा घेता येत नाही. संध्याकाळी हमखास डोकं दुखतं.

बियर अँड व्हिस्की व्हेरी रिस्की अशी म्हण आहे. अन या म्हणी पायी, झिंगातुर लोक होस्टेलला बियरसोबत व्हिस्की पीत असत. किंवा रादर व्हिस्कीचा पेग झाल्यावर एक बियर हाणत असत.

पण बियरच्या ग्लासात व्हिस्कीचा शॉट भरून टाकलेले 'डेप्थ चार्ज' कॉकटेल देखिल फेमस आहे.

बियर नुसती पीत नाहीत, तर वाईनसारखी स्वयंपाकातही वापरतात. कधीतरी बियरबम चिकन बनवलं, तर त्याची पाकृ टाकीन माबोवर.

तसं बियर पुराण अनंत आहे. आफ्टरॉल फार जुनी दारू आहे ती. पण सध्या इतकेच.

पहिली बिअर (की बीअर?) माझा किस्सा जबराट विनोदी होता Happy हॉस्टेल वर जेव्हा दारू सुरू झाली तीच मुळी व्हिस्की पासून. ५,६ वेळा oc blue, ib, rs झाली होती. मी त्यावेळी ठरवलं होतं की आपल्या गावात कधीच प्यायची नाही. तर एकदा घरून परत येताना मला भाऊ सोडायला आलेला, माझी गाडी चुकली. नेमकं बस स्टॉप वर भावाचा एक मित्र आला. माझं जाणं कॅन्सल झालं. पिण्यातला दर्दी माणूस, तो म्हटला की चला हॉटेलला बसू, घरी कुणी नव्हतं माझ्या म्हणून गेलो. भाऊ पीत नाही, आणि मी पितो हे त्याला माहित नव्हतं. मग तुम्ही फक्त बसा, मी एक बिअर मारतो मग जेवण करू असं त्या भावाच्या मित्राने सांगितलं. हॉटेलला बसलो, डिसेंबर महिना होता, थंडी जाम. माझी भयंकर इच्छा होती एखादा पेग मारायची, पण भाऊ सोबत असल्याने मी गप्प. दर्दी माणसाने विचारलं
"काय पाटील, तुम्ही घेणार का?"

"नाही दादा, मी पीत नाही."

"पाहून वाटत नाही तुमच्याकडे की तुम्ही घेत नसणार असं"

हो नाही करता करता मी थोडा विचार करून बोललो की बिअर घेतलीय २ वेळा. (बिअर कधी घेतलीच नव्हती, पण कॉलेजच्या मुलांच्यात बिअर घेतलेली चालते, व्हिस्की पेक्षा mild option असं अगाध ज्ञान त्यावेळी डोक्यात होतं, पुन्हा भाऊ समोर होता, त्याने तर डोळे इतके मोठे केले की बाहेर पडतील असं वाटत होतं. रिस्क अँड बेनिफिट calculate करून मी बिअर दोन वेळा घेतल्याचं ठोकून दिलं)
ऑर्डर सुटली, २ बिअर, ग्लास, आणि लसूण फ्राय टेबलावर आले,

दर्दी माणसाने आपला ग्लास भरला, आणि मला विचारलं
"तुला किती भरू?"

मी: मला जास्त नको, मी फक्त एक पेग घेईन!

त्यावेळी दर्दी माणसाच्या डोळ्यात जे हसू होतं, ते का होतं हे मला हॉस्टेलला गेल्यावर कळलं!

Pages