दारूचे दुकान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 March, 2017 - 02:10

दारूचे दुकान !

गल्लीत दारूचे दुकान उघडले, आणि दुधाचा धंदाच बसला !

- ऋन्मेष

---.---.---.---.---.----.---

काल ही लघुकथा लिहिली होती. मायबोलीवर प्रकाशित केली होती. पण आज तो धागा उडाला आहे. अर्थात याला बहुधा मीच जबाबदार आहे. मलाच कमीत कमी शब्दात अपेक्षित आशय वाचकांपर्यंत पोहोचवता आला नाही. त्यामुळे काही जणांनी आपल्या मनाने अर्थ काढले आणि धाग्यावर थोडासा गोंधळ उडाला.

अर्थातच, तो धागा गोंधळ उडवण्याच्या हेतूने काढला नव्हता. दारूला विरोध करणारे माझे या आधी बरेच प्रतिसाद मायबोलीवर येऊन गेले आहेत. या धाग्यामागेही तसाच उदात्त हेतू होता. त्यामुळे धागा उडाल्याचे वाईट वाटले. म्हणून कथेचा अर्थ समजावत धागा पुनर्रजिवित करत आहे. त्या अनुषंगाने ईच्छा असल्यास चर्चाही अपेक्षित आहे.

--------------------------

कथेचा अर्थ फारच सोपा आहे.

दुधाचा धंदा बसला कारण लोकांनी आपल्या मुलांच्या दुधाचे पैसे आपल्या दारूवर खर्च करायला सुरुवात केली.

दारूचे दुष्परीणाम म्हणून आपण बरेचदा स्वास्थ्य, आरोग्य, अपघात, मारामारया, दंगे या विविध पैलूंवर जास्त चर्चा करतो.
पण दारूचा सर्वात मोठा फटका आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांना बसतो. या दारूने आयुष्यात प्रवेश केल्यानंतर त्यांचे ईतर गोष्टींचे बजेट कोलमडून पडते. व्यसनाच्या आहारी गेलेल्याला दारू ही जीवनावश्यक गरज वाटू लागते. तिला तो प्राथमिकता देतो आणि ईतर जीवनावश्यक गोष्टींना त्यापुढे दुय्यम समजले जाते. मग बायकापोरांच्या दुधाचे, कपड्यांचे, शिक्षणाचे पैसे दारूसाठी वापरले जातात. त्या पैश्यांसाठी बायकापोरांना कामाला जुंपणे, मारहाण करणे हे ही ओघानेच होते. वर कथेत उल्लेखल्याप्रमाणे कित्येक गल्ल्या, कित्येक गावं आहेत या देशात. तिथून ही किड गेल्याशिवाय या देशाचा, आपल्या समाजाचा रूट लेव्हलवर विकास होणे अशक्यच आहे !

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,

४ शब्दांचा धागा काढल्यामुळे तो अप्रकाशीत केला होता. यापुढे असा धागा काढू नका.

माहिती सांगताय की,
लोकांची मते जाणून घ्यायची आहे???
म्हणजे प्रतिसाद त्या अनुषंगाने द्यायला....

एडमिन, 8 शब्द होते Happy
यापुढे काळजी घेईन. शब्दसंख्येपेक्षाही धागा निरर्थक होत त्यातून काहीच् निष्पन्न न होणे असे घडू नये याची Happy

कथा वा धागा सुचायचे तात्कालिक कारण असे,
गेले वर्षभर आमच्या ऑफिसजवळ एक दुकानाचा गाळा बघतोय. सर्वात पहिले तिथे हॉटेल होते. जराही चालत नव्हते. मग ते हळूहळू फास्ट फूड स्नॅक्स ते अगदी चहाखारीच्या टपरीपर्यंत आले. पण तरीही चालत नव्हतेच. एवढी मोठी जागा फुकट जात होती. तिचे भाडेही निघत नसावे. त्यानंतर मध्यण्तरी तिथे ईलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान उघडलेले पाहिले. शुकशुकाटच दिसायचा. कालाण्तराने ते ही बंद पडले. मग एवढे दिवस तो गाळा बंदच होता. पण काल संध्याकाळी ऑफिसहून परतताना तिथे मरणाची झुंबड उडालेली दिसली. काय हा चमत्कार, काही फुकट तर नाही ना वाटत आहे म्हणून उत्सुकतेने पाहिले तर तिथे वाईन शॉप उघडले होते.

ओह.. आडमिंन ने स्वतः उडवलं काय.. मला वाटलेलं एका चाहादीखोर आयदी ने चहाडी केली तुमची.. मी काल बोललं होत ना.. पांगे घेऊ नका त्या आयदी शी...

चान आहे लेख...पुलेशु

दारूची सवय सुटणे फार फार फार कठीण आहे हो. अगदी खूप सुशिक्षित, चांगल्या घराण्यातले, चांगले संस्कार झालेले, सध्या चांगल्या संगतीत असलेले, सगळे काही, म्हणजे नोकरी, घर, आर्थिक व्यवस्था, सर्वांचे शरीरस्वास्थ्य उत्तम असूनहि, लोक चक्क दारुडे बनतात. तशी सवय न लागणेच महत्वाचे, नंतर काही खरे नाही.
स्वानुभव हो, दुसरे काय?
नि मग ज्यांना कष्ट करूनहि पुरेसे पैसे मिळत नाहीत, परिस्थिती सुधारण्याची काही आशा दिसत नाही, मार्ग दिसत नाही, ते वैतागून दारूच्या मागे लगेच लागतात.
स्वातंत्र्यानंतर अनेक ठिकाणी संपूर्ण दारुबंदी होती - कायद्याने. मग हाटभट्टीची, शरीरास अत्यंत धोकादायक अशी दारू कमी पैशात मिळू लागली. कायदा पोलीस काही करू शकले नाहीत - थोडासा दोष लाचलुचपतीचा होता, पण ती कुठल्या देशात नसते? रशियात, अमेरिकेत, इतर देशात सुद्धा असते. तेंव्हा कारण ते नाही.
शेवटी कंटाळून सरकारने ठरवले दारुबंदी उठवावी. निदान कर, सरचार्ज इ. लावून पैसे तरी मिळतील.

अनेक अनेक गोष्टी व्यक्तीने स्वतः करायचे ठरवले तरच होतात, सांगून, कायद्याने होत नाहीत. जगभरात खून करू नका असे सांगतात, खून करण्याविरुद्ध कायदे आहेत. होतो का उपयोग?

जगभरात खून करू नका असे सांगतात, खून करण्याविरुद्ध कायदे आहेत. होतो का उपयोग?
>>>>>>>>
आता असा विचार करून बघा की खून करायचे लायसन काढले की तुम्ही कोणाचाही खून करू शकता. किंवा गल्लोगल्ली सुपारी (पानातली नाही (पान वहीतले नाही)) घेऊन खून करायची दुकाने उघडली आहेत. फक्त लोकांनी कोणाचाही खून करताना स्वत:च नितीमत्ता पाळावी अशी अपेक्षा ठेवलीय. तर मग सांगा खूनांचे प्रमाण वाढेल, कमी होईल, की आहे तेवढेच्ज राहील.

दारूची सवय म्हणा किंवा कुठलंही व्यसन म्हणा माणसाला असतेच (ह्याला कोणीच अपवाद नसतो) ... कोणाला सिगारेट तंबाखूचं असेल कोणाला पान सुपारी मावा जर्दा वगैरेचे असेल ... परिणाम तर त्याचा नेहमीच वाईट होणार असतो अशीच आपली ( व्यसनं न करणाऱ्याची ) समजूत करून दिलेली असते लहानपणापासून. पण कधी कधी .... किंवा बऱ्याचदा आपण बघतो कि लोकं दारू पितात पण ती अगदी मस्त टुणटुणीत असतात तब्येतीने... काही हॉस्पिटलायझेशन नाही ... थोडक्यात आपल्या बच्चन साहेबांचा डायलॉग खोडून काढतात कि - "दारू पिने से लिव्हर खराब होता है ... "
हीच गोष्ट वर्षानुवर्षे ... अगदी वयात आल्यापासून आजन्म तंबाखू खाणाऱ्यांच्या बाबतीत पाहिलीय कि त्यांना काही कॅन्सर झालेला नाही शेवटपर्यंत ... मग काय निष्कर्ष काढायचा ह्यावरून ? काहीतरी लॉजिक फसतय ... कुठेतरी आपलाच समजून घेण्यात झोल होतोय कि नक्की काय दुष्परिणाम फोकस करायचे !!

ज्याची जशी ऐपत तसे तो व्यसने करत राहतो आणि नंतर आर्थिक कुचंबणा सुरु झाली तरी व्यसनाचा ग्राफ मात्र त्या प्रमाणात खाली न येता सतत वाढतच राहतो आणि हाच मोठ्ठा प्रॉब्लेम घडवतो सगळ्याच स्तरावर ! उदाहरणासहित पाहायचे झाले तर ...

व्यसन १) सिगारेट

दुष्परिणाम शारीरिक -
फुफुस श्वास नलिका विकार, पण हे सगळ्यांना सारखेच लागू नाही तर प्रत्येकाच्या तब्येतीनुसार आणि प्रारब्धानुसार चढउतार दिसतो.

दुष्परिणाम आर्थिक - हॉस्पिटलाझेशन झाले तरच खरी झळ अन्यथा फार नाही

दुष्परिणाम सामाजिक - स्वतःचे बजेट घसरले कि उधारी मागण्याची सवय. मग त्यातून वाद विवाद हाणामाऱ्या वगैरे आणि आधी सुरु केलेल्या स्वताच्या प्रेस्टिजसाठीचा ब्रँड जाऊन आता तंबाखूला तंबाखू म्हणून कुठलाही स्वस्त ब्रॅण्ड मनाला पचतो ... कॉलेजमध्ये हे डिग्रेडेशन गोल्डफ्लेक किंवा मार्लबोरो पासून सुरु होऊन सम्भाजी बिडीपर्यंत पोहोचलेलेसुद्धा पाहिले आहे काही जणांच्या बाबत Lol
मुख्य सामाजिक प्रॉब्लेम धूर ... आणि पॅसिव्ह स्मोकिंगचे वाढते पेशण्ट

बाकीची उदाहरणे अशाच स्पष्टीकरणासहित भरपूर आहेत ... आणि दुर्दैवाने आर्थिक व शारीरिक पेक्षा सर्वांचेच सामाजिक परिणामच अधिक लिहावे लागतील.

आता असा विचार करून बघा की खून करायचे लायसन काढले की तुम्ही कोणाचाही खून करू शकता.
केला विचार.
दारुच्या दुकानाला लायसनच द्यायचे नाही असे ठरवले तरी बेकायदेशीरपणे दारू विकणे, विकत घेणे चालू राहिलेच होते दारुबंदीच्या काळात. पूर्ण दारुबंदीच्या काळात दारुच्या पार्ट्या होतच होत्या. मीच कधी कधी त्यात असे. काही लोकांनी संयम ठेवला नि ते नाही बनले दारुडे माझ्यासारखे. लायसन कुणालाहि नव्हतेच, ना दारू विकत घेण्याचे ना पिण्याचे!
आता दारू पिण्याचे हि "लायसन" (परवानगी) आहे, पण तरीहि अत्यंत कमी पिणारे किंवा अजिबात न पिणारेहि असतातच. व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे.
मा़झे म्हणणे असे की व्यक्तीने स्वतःच स्वतःला मर्यादेत रहायला शिकवले पाहिजे, फार फार थोड्या लोकांना ते जमते.
विशेषतः राग! राग मर्यादेत न ठेवता आल्यामुळे कायदा असला तरी लोक खून करतात.
स्वार्थीपणा. यावर मर्यादा नसल्यास मनुष्य प्राणी कुणाचाहि खून करायला वा करवायला मागे पुढे पहात नाही.

शिक्षण, शिक्षण शिक्षण नि नुसतेच कॅटचे स्पेलिंग, कॅल्क्युलस वगैरेच्या जोडीने, संयम इ.