तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

ऑफिसातून निघायला रात्रीचे २ वाजलेले, अश्यावेळी या शहरात खायला काही मिळायची बोंब, पण दारू एका ठिकाणी मिळायची. पार्टनरला अंडाभुर्जी आणि इतर काहीतरी सोय लावायला सांगून निघालो, बस स्टँड जवळ एका दुकानाच्या शटरला जमिनीलगत साधारण 15x30 सेमीचा तुकडा कापून बनवलेली खिडकी, शटर वाजवून काय हवे ते सांगायचे, विकणारा आतून किंमत सांगेल, तेवढे पैसे काढून त्या खिडकीतून आत हात सरकवायचा, पैसे उचलून ते लोक लगेच हवा तो माल बाहेर सरकवतात, आणि खिडकी बंद. त्या खिडकीला आतून पण एक sliding शटर होतं!
तर त्यावेळी काही कारणास्तव त्याच्याकडे फक्त मॅकडॉवेल होती. ती पण टेट्रा पॅकिंग. आलो घेऊन रूमवर, वाटेत चार वेळा पोलिसांनी धरलं आणि तोंडावर फुंकर घालायला लावली, पिलो नव्हतो म्हणून वाचलो, जे लोक दुसरा फेरा करत होते त्यांना पकडत होते.
रूम वर कोपरा फोडून ग्लासात ओतायला गेलो तर खालीच सांडली बरीचशी. इस्कॉट झाला.. दुसऱ्या दिवशी पॅक फोडण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी म्हणून एका मिनीबारला गेलो, MRP शॉपला लागून पत्र्याची एक खोली, 4 फूट उंचीवर बसवलेल्या फळ्या, त्यावर तल्लीन झालेली श्रमिक पब्लिक. मी जे शोधत होतो ते दिसलं शेवटी. टेट्रा पॅक!
सर्वात आधी त्या गुरुजींनी पॅक चे वरचे दोन टोकं धरून वरची पट्टी सरळ केली, मग त्याचे दोन्ही कोपरे हळू हळू तोडून उडवले. आणि एका कोपऱ्यातून दारू प्लास्टिकच्या ग्लासात. शाळेत शिकलेला हवेच्या दाबाचा सिद्धांत !

शिश्नच उभा राहतो कुठे >>
त्यांच्याकडुन चुकून होतेय की चुकांच्या नावाखाली मुद्दाम करत आहेत हे त्यांनाच माहीत.

दारू प्यायची मजा फक्त रानात, सतरंजी अंथरून सोबतीला हिरव्या मिरच्या, मीठ, उकडीवल्याल्या श्यांगा अन अंडी, गार वारा, रात्रीची येळ अन सोबतीला मित्र.

आवडतं पेय,

-ओल्ड मोंक काहीच न घालता गार पाण्यात मिसळून (व्हॅनिला चव भारी लागती)

- व्हाईट रम आधारित पिनाकोलाडा (हे शिस्तीचे प्रयोग रानात शक्य नाही, ह्या ड्रिंक्सला पुढे रा.ना. अर्थात रानात न्हाय असे नमूद करू)

-ब्लडी मेरी (राना)

-चिल्ड बियर (कुठली पण) अर्थात बियर चिल्ड घेऊन यायच्या, लागतील तितक्या फोडायच्या उरलेल्या गोणपाटात घालून जवळच्या पाटात, हौदात वगैरे बुडवून ठेवायच्या, कासऱ्याला बांधून विहिरीत घालायच्या फंदात पडू नये एखादं जास्त पिऊन विहिरीत पडलं तर रंगाचा बेरंग होतो (ऐकीव)

जेवायला सोबत गावठी कोंबडा कालवण, किंवा हिरीतल्या खेकड्यांचं कालवण, शाकाहारी असाल तर झणझणीत अत्र्यावरली वांगी, भाकरी

अजून काय हवंय आयुष्यात!.

दारू प्यायची मजा फक्त रानात, सतरंजी अंथरून सोबतीला हिरव्या मिरच्या, मीठ, उकडीवल्याल्या श्यांगा अन अंडी, गार वारा, रात्रीची येळ अन सोबतीला मित्र.
>>>> आह.. मजा आ गया सिर्फ पढकेही

बरे .. त्या दुसर्या धाग्यावर लोक म्हणत होते निर्जन/ सुनसान ठिकाणी ,छेडछाड/ बलात्कारासारखे गुन्हे दारू प्यायलेल्या लोकांकडून होतात म्हणून.
तुम्ही सगळे लोक निर्जन ठिकाणी बसून नाही ना पीत?

धाग्याचे समर्थन करणाऱ्या आणि त्या विरोधात येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून साधारण अमेरिकेतील गन कंट्रोल विषयावरच्या चर्चांची आठवण आली, खूप साधर्म्य वाटलं. दारू वाईट की माणूस? गन वाईट की माणूस? असं काहीतरी.

त्यांच्याकडुन चुकून होतेय की चुकांच्या नावाखाली मुद्दाम करत आहेत हे त्यांनाच माहीत.<<<
अहो प्र आणि शि मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, कोणताही कीबोर्ड वापरला तरी.. असो, जास्त बोलण्यात अर्थ नाही.

बरं हे सगळं जाउद्यात,

मायबोली वरील कोणकोणत्या सदस्यांसोबत बसले आहात/बसायला आवडेल? इथं खूप जबरदस्त वल्ली आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.
मी कुणासोबत बसलो नाही पण बसायला आवडेल अशी लिस्ट:
बेफिकीर, आरारा, शाली, आशुभाऊ (champ लिहायला भयंकरच कष्ट होतात, पुन्हा त्यात अनुस्वार न येता म्प येतंय जे पाहायला बरं वाटत नाही) जेम्स वांड, आणि निधप च्या हातचे ते एलआयआयटी! लिस्ट वाढू शकते अजून!
नवा धागा काढणार होतो, पण उगाच

Rofl
अहो पाटील काका, बेफी आणि आरारांना एकत्र आणलंत तर मग तुम्हाला अखिल माबो शांततादूत म्हणून गौरविण्याचा मी प्रस्ताव मांडेन. Proud Light 1
मी दारूविरोधीच पण आरारांच्या पोस्टी भारी आहेत !

माझे लिखाण आवडल्याच्या पोस्टी लिहिणार्‍या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!

त्यातली लेखनशैली व आठवणी आवडल्याची ही पोचपावती आहे, असे मला तरी वाटते. मी किंवा पोस्ट आवडलेल्या कुणीही यात 'दारू पिणे कसे छान! तुम्हीही प्या!' असे लिहिलेले मलातरी जाणवलेले नाही.

पुढच्या दारू प्रकाराबद्दल व ती कशी पितात हे लिहिण्याआधी धाग्यावर आलेल्या प्रतिसादांना पोचपावती इथे लिहितो.

***

सगळ्यात आधी म्हणजे, "डॉक्टर", "तुम्ही" "कशीकाय पिता?" (बाप्रे! डॉक्टर अन पितात!!) या शंकेला उत्तर.

कॉलेजात नाना पाटेकर कुण्या कार्यक्रमासाठी गेस्ट म्हणून बोलावलेले.

मी तेव्हा सिग्रेटी ओढत असे. (हो. सर्व प्रकारची तंबाकू, सर्व प्रकारांनी चाखली आहे. ओढण्याची, खाण्याची अन कसलीकसली. माझ्या खडूस मैत्रिणींनी मिळून मला कोरीव लाकडी सिगारेट केस, लायटर अन पाईपही बड्डे गिफ्ट म्हणून दिलेले आहेत. हां. तपकीर अन मिश्री कधी नाही वापरली.)

तर, त्याकाळी, माझे सिग्रेट ओढणे वर्ल्ड फेमस होते, अन होल कॉलेज क्न्यु इट. पोस्ट्ग्रॅज्युएट असल्याने ओटी साईडरूममधे मी अन प्रोफेसर सोबत विड्या फुंकू शकत असू. अन मी स्टेजवरच इन्फॉर्मल मुलाखतीदरम्यान नानाला विचारले, 'तुम्ही सिगारेट का ओढता?' कारण हा भाऊ सिग्रेट हातात घेऊन कॉलेजच्या पायर्‍या चढताना अखिल विद्यार्थीवृंदाने पाहिलेला होता.

उत्तर होते, 'आवडते म्हणून.'

तर "कशीकाय" पिता? = आवडते म्हणून.

आता कशी काय पिऊ शकता??

झिंगून सुरी घेऊन कापाकापी करणारा डॉक्टर येतोय का डोळ्यासमोर?

ऑनेस्टली.

व्यसन लागलेले डॉक्टर्स पाहिलेत. व्यसन सोडवणारेही अन सोडणारे डॉक्टर्सही पाहिलेत. (हो अशीच एक दिवस सर्व प्रकारची तंबाखू सोडली. फॉर रिझन्स. अन त्यानंतर अजिब्बात आठवणही नाही आलेली. दिवसाला ४०-४० सिग्रेटी ओढत होतो पूर्वी.)

दारूच्या नशेत पेशंटजवळ जाणारा एकही नाही पाहिलेला.

डॉक्टरकीच्या दुसरीत फार्मॅकॉलॉजीत अल्कोहोलचा मोठ्ठा धडा आहे. अन सगळ्यांना तो समजलेला असतो. कदाचित हे कारण असावे. इतरही सर्व 'ड्रग्ज' अन त्यांचे इफेक्ट्स, अ‍ॅडिक्शन पोटेन्शिअल्स, अ‍ॅडिक्शन पॅटर्न्स, जेनेटिक रीझन्स, डिपेन्डन्स, टॉलरन्स अन अनेकानेक बारकावे फक्त दारूचे नाही, तर चहापासून हेरॉइन कॅनाबिस दारू तंबाखू केटॅमिन.. सग्ळ्यांचेच.

तरीही पितात, कारण लिमिटमधे प्याली की मजा येते. आवडते.

असं,

झालंय झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट होऊन पावलं थिरकायची असोत.

फांसले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था.. म्हणणार्‍या गुलाम अलीसोबत आर्ततेने आठवणी काढायच्या असोत.

साला काय मस्त माणूस होता यार! गेला बिचारा.. म्हणत स्वतःच्या इन्व्हिसिबिलिटीचीच समजूत काढायची असो.

इन फॅक्ट कोणतीही ह्यूमन इमोशन असो. अल्कोहोल तुमचे पर्सेप्शन बदलते. वेगळे इन्द्रधनुष्य तुमच्या डोक्यात थुईथुई नाचू लागते.

आतल्या मनाला व्यक्त होण्यासाठी संस्कार अन समाजाने बसवलेली फिल्टर्स, दारूने नरम होतात. फर्स्ट इफेक्ट ऑफ अल्कोहोल इज लॉस ऑफ सोशल इन्हिबिशन्स.. (लॉरेन्सची फार्मॅकॉलॉजी. Sir, it maketh and unmaketh. It provoketh the desire and taketh away the performance! मॅकबेथ, दुसरा अंक, प्रवेश ३. शेक्सपियरची ही क्वोट त्याच पुस्तकात अल्कोहोल अन सेक्सुअल पर्फॉर्मन्सबद्दल दिलेली आहे. इन काँटेक्स्ट टु निर्मनुष्य जागी दारू पिणारे लोक Wink )

अनेक कलंदर कलाकार मैफिल सुरू करण्याआधी समोर तांब्यापेल्यात वारुणी ठेवून मग सूर लावताना पाहिले आहेत.

हा जाणीवांचा वेगळा स्पेक्ट्रम ज्यांनी अनुभवला, ते दारू घेतात. कारण तिच्या कडू जहर चवीनंतर येणारा जो आत्मानुभव असतो तो तुमच्या मेंदूला आवडतो.

आता यापुढे तुमचे नशीब असते. काहींना नाही झेपत. त्यांना धरून औषधाची गोळी ऑपरेशन करून मांडीत बसवावी जेणेकरून पिताच येत नाही. पण जर तुम्हाला रिस्पॉन्सिबली घेता येत असेल, तर नक्कीच घ्यावी.

सोशल ड्रिंकींग अन अल्कोहोलिझम या फार वेगळ्या गोष्टि आहेत. आपली मर्यादा ओळखून मग जगावे ही बॉटमलाईन.

प्रत्येकालाच दारू न पिता रेसिंग कार २०० च्या स्पीडला न्यायची हिम्मत होत नाही. पण याचा अर्थ असाही नाही की प्रत्येकाने तसा प्रयत्न करायलाच हवा!

असो. हा प्रतिसाद जरा रँबलिंग होतोय. अजूनही याच थीमवर लिहायचंय, अन धाग्यावरच्या जेन्युइन साददात्यांना प्रतिसादही द्यायचा आहे. पण बघू. जमल्यास लिहितो थोड्यावेळाने, सध्या अर्जंट कॉल आहे.

मस्त प्रतिसाद!
आणि हो, जर दारू सरसकट शरीराला वाईटच्च असेल तर त्यावर एक संपूर्ण उद्योगधंदा चालतोय नव्हे पळतोय आणि त्यात नवनवीन गोष्टीही येतायत हे नजरेआड करून चालणार नाही. आणिक हे वारूणीपुराण पार महाभारतापासून अस्तित्वात आहे... सो ती वाइइट्च आहे यास काही तसा अर्थ नाई.
झेपत असेल तर, आवड असेल तर आणि एखादवेळेस नवीन काही चाखून पाहायची असेल तर एखादा ग्लास घेऊन पाहायला काही हरकत काही, अर्थात हे मा वै म.
कुठल्याही अगदी कुठल्याही गोष्टीचं व्यसन हे वाईटच हे ही आहेच...

राव पाटील - नका इतके कष्ट घेऊ, मला चाम्प, चॅम्प किंवा निसते आशु म्हणले तरी चालेल. नाव लिहायला अवघड आहे मलाही मान्य आहे, मलाही कधी स्वतःचे नाव लिहायची वेळ ओढवली तर चक्क कॉपी पेस्ट करतो स्वतातचे नाव.

आणि नक्की बसू एकदा, पुण्याला आलात की. बेफि आणि आरारा असतील सोबत तर मी एक हलके चिलखत घेऊन कोपऱ्यात बसेन मस्त.

तरी काही सांगता येत नाही रॉहू आणि झक्की आजोबा समोरासमोर आल्यावर शांतपणे वागले म्हणतात. त्यामुळे प्रत्यक्ष हे दोघे अमोरासमोर आले तर कसे वागतील सांगता येणार नाही.

अनेक गोष्टींवर उद्योग धंदा चालू असतो म्हणजे त्यांचं जस्टीफिकेशन करायचं का ? वेश्याव्यवसाय, सट्टा, मटका, दहशतवाद यावर अनेकांचं पोट असतं. मग काय ते या कारणामुळे अ‍ॅक्सेप्ट करायचं का ?

माबोवर वाचनापूरता येत असू तेव्हा अशुभाऊंची जम्मू ते पुणे सिरीज जोरात सुरू होती, असल्या अवली (सकारात्मक दृष्ट्या!) माणसांसोबत दारू पिणे एक मान असेल माझा. बाकी शाली भाऊ तर आजकाल घरचं प्रकरण वाटत्यात. चरप्स, राव पाटील (कसला सणसणीत आयडी तेच्यायला) अन डॉक्टर आ.रा.रा. हे सन्माननीय मेम्बर आवडतील सोबत बसून प्यायला.

वाटेत चार वेळा पोलिसांनी धरलं आणि तोंडावर फुंकर घालायला लावली, पिलो नव्हतो म्हणून वाचलो, जे लोक दुसरा फेरा करत होते त्यांना पकडत होते.
>>>>>

पण मग पोलिसांना समजवायचे ना..
दारू पिणे वाईट नसते तर तिचा अतिरेक वाईट असतो.
तसेच दारू प्यावी का नाही हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
आमच्या तोण्डाला वास येतही असेल, पण तुम्हाला मुद्दामहून घ्यायला कोणी सांगितलेय.
वगैरे वगैरे..
मला एक न्याय आणि पोलिसांना दुसरा ...

परत तेच???
तुम्ही दारू कशी पिता असा धागाय..
तुम्ही दारू का पिता नाही.

अहो पण दारू कशी पिता धाग्यात लोकं दारूचे किस्सेही सांगू लागले आहेत. आणि गंमत म्हणजे त्यातही नकळत दारू कशी वाईट आहे वा त्याचे दुष्परीणाम सांगत आहेत. पण तेच मी बोलल्यावर कबूल मात्र करत नाहीयेत.

असो.. शुभरात्री.. आणि चीअर्स !

अरभाटाच्या लेखातला ओल्ड फ्याश्न्ड टंबलर आहे त्यात हे करायचेय.

१/३ ग्लास भरेल एवढे बर्फाचे खडे + खडे बुडतील इतका ऑरेंज ज्यूस किंवा पायनॅपल ज्यूस किंवा दोन्हीचे मिश्रण + साधारण ७०% ग्लास भरेल एवढी बिअर (मी ट्युबोर्ग घेतली. तुम्ही कुठलीही घ्या) + २० मिली टकिला + ४-५ थेंब लिंबू + आवडत असल्यास एखादे पुदिन्याचे पान.

चव स्मूथ वाटेल त्यामुळे बच्कन प्यायला जाल तर फसाल. हळूहळू प्या.
निर्जाबैंचे कायमचे तत्व लक्षात ठेवा. आपल्या पैशाने प्यायलेल्या दारूमुळे आपलेच मनोरंजन झाले पाहिजे. दुसर्‍याच्या पैशाने प्यायली तरी आपल्या पोटात गेलेल्या दारूने मनोरंजन आपलेच झाले पाहिजे. इतरांचे मनोरंजन होता कामा नये. Proud

चांगभलं!

ट्युबोर्ग आणि ऑरेंज पाईनपल ज्यूस आणि वर टकीला आणि बर्फ

मिश्रण वाचूनच गडबडलोय, पण तुम्ही इतक्या अधिकारवाणीने सांगताय तर ट्राय करतो आणि रिव्हू देतो.

Pages