तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

आंबेवाले भास्कर, तुमच्या दोघांसाठी (खरंतर तुम्ही एकच आहात हे एव्हाना लक्षात आलंय, पण आता schizophrenic झालाच आहात अनायासे तर तुमच्या आजाराचा मान ठेवून दोघांसाठी म्हणतो) नवा धागा उघडलाय, ज्या लोकांना दारू प्यायची नाही किंवा सोडायची आहे ते लोक तिथे येतील, धाग्याचे नाव "दारू का पिऊ नये?" असे आहे, तरी यापुढील सारी प्रवचने तिथे करावीत ही नम्र विनंती. कृपया या धाग्याचा कचरा करू नये!

<लिव्हर शी पंगा घेऊन चालत नाही. उर्दू मधे लिव्हरला जिगर म्हणतात. दिल जिगर जुबाँ क्या है, मै तो तेरे लिये जां भी दे दू .... असे एक जीवशास्त्रीय गाणे आहे. उर्दूमधे जीवशास्त्र महत्वाचे आहे. जिगर वरून अनेक गाणी आहेत, शेरोशायरी आहे. त्यामुळे लिव्हरचे महत्व लोकांना पटायचे आणि ते दारूपासून दूर रहात असत.>
हायला..ब्येक्कार! हहपुवा..

हे राम!
अहो द्रौपदीला पण एव्हढे पती नव्हते इतक्या नावांशी संबंध जोडू पाहतात इथे लोक. निरुत्तर झाले आहेत हे लक्षात आले आहे..

मुसलमान औ’ हिन्दू है दो.. एक मगर उनका प्याला,
एक मगर उनका मदिरालय..एक मगर उनकी हाला..

दोनों रहते एक न जब तक मस्जिद-मन्दिर में जाते,
बैर बढ़ाते मस्जिद मन्दिर मेल कराती मधुशाला..!

हे ह्या धाग्यावर पटलं अगदी

दारू पिणे वाईट असे म्हणून इथे विषयांतर करणार्यांसाठी
१. इथे कोणीही; दंगा करणे , हुल्लड्बाजी करणे , शिस्तभंग करणे या गोष्टींचे समर्थन करतच नाहिये. असे करणारे केवळ "दारू पिल्यामुळे" असे वागत असतील तर त्यानी दारू पिऊच नये किंवा त्यांच्यावर सतत कोणीतरी नियंत्रण ठेवणारा हवा.
पण म्हणून दारूमुळेच हे सारे होते हे म्हणणे बालिश आहे.
दारू पिऊन वाहनही चालवायला नाही पाहिजे.
मला वाटते हे सगळ्यानाच मान्य आहे , यात कोणाचेही दुमत नसावे.
२. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. " प्रमाणामधे सर्वकाही असावे" अशी एक सुन्दर कविताही शाळेत पठ्यपुस्तकात होती.
३. कोणतीही गोष्ट स्थळ - काळ - प्रमाण - समाजशिस्तीचे संकेत , या सगळ्यांच्या चौकटीत राहून केली तर तिचा आनंद घेता येतो.
अणुशक्ती , Antibiotic औषाधे ... ही अशी काही उदहरणे आहेत. ज्यांचा हुशारीने आणि विवेकपूर्ण केलेला वापर यामुळे मानव जातीचा फार मोठा फायदा झाला आहे.
४. हा धागा मला वाटते त्या प्रमाणे दारू पिण्याचा आनंद कसा वाढवावा हे सांगण्यासाठी आहे. घ्यावासा वाटला तर घ्या नाहीतर सोडून द्या.

निरुत्तर झाल्यावर वेगळ्या आयडी ने येऊन असंबद्ध आणि उकसावणाऱ्या पोस्टीं टाकणे ही पद्धत जुनी झाली आंबेवाले गुरुजी, नवीन शोधा काहीतरी

नाही नाही हे मंदार जोशी आहेत असे माझे चुकूनही म्हणणे नाही, हे बरेच सुसह्य आहेत. मी फक्त उदाहरण दिले.

आंबेवले आपण निरागस, भाबडे असल्याचा जो आव आणत आहेत तो किती कंटाळा आणणारा आहे राव

अहो यांना मुळात त्रास होतच नाही, आभासी जगातील आपले उपद्रवमूल्य अबाधित राखण्यासाठी धागे भरकटवणे आणि फालतू धागे काढणे हे एकमेव जीवितकार्य असल्याने ते कधीच कोणता धागा ब्लॉक करणार नाहीत! दुर्लक्ष करा सरळ..!

आरारा, येऊ द्या पुढची पोस्ट. वाट बघतोय

मुळात दारूला विरोध असेल तर ती कशी प्यायची याहा शिश्नच उभा राहतो कुठे??
उद्या तुम्ही बलात्कार कसा करता असा धागा आत्मानंद या नावाखाली चालवून घ्यायचा का?

https://www.maayboli.com/node/66464
हा बालिश प्रकार आहे. हे म्हणजे मच्छरदाणी बांधून आत सगळे डास गेले की दार बंद करून बाहेर झोपण्याची जुनाट युक्ती आहे. डाससुद्धा फसणार नाहीत आता..

पण तुम्ही डास थोडीच आहात? तितकेच इरिटेटिंग आहात हे मान्य आहे पण स्वतःला डासाच्या रांगेत नेऊन बसवणे म्हणजे जरा अगदीच

तुमची स्मरणशक्ती थोडी कमजोर आहे असे दिसून येते
धाग्याचा विषय दारू कशी प्यावी हा आहे
प्यावी अथवा नाही हा नाही
बोलताय काय मग या विषयावर?

मुळात दारूला विरोध असेल तर ती कशी प्यायची याहा शिश्नच उभा राहतो कुठे??
उद्या तुम्ही बलात्कार कसा करता असा धागा आत्मानंद या नावाखाली चालवून घ्यायचा का? <<< @admin सदर आयडी जाणून बुजून चुकांच्या नावाखाली अश्लील लिखाण करत असल्याची शक्यता आहे, कृपया योग्य ती कारवाई करावी.

कृपया विषयावर बोला
नवीन Submitted by मधुरांबे on 19 June, 2018 - 12:36
<<
Lol
--
अहो लोक विषयावरच बोलत होती सुरुवाती पासून.
तुम्ही व ते दुसरे भास्कर दोघांनी मिळून ह्या धाग्यावर विषयांतर सुरु केले.
--
आता विषयाला धरुन "तुम्ही दारू कशी पिता" ह्यावर तुमचा एकादा अनुभव टंका बरे.

मुळात दारूला विरोध असेल तर ती कशी प्यायची हा प्श्नच उभा राहतो कुठे??
उद्या तुम्ही बलात्कार कसा करता असा धागा आत्मानंद या नावाखाली चालवून घ्यायचा का? >>>>

हे वाचले नाही का?

आंबे, बलात्कारासारखा गंभीर विषय केवळ उखाळ्या काढण्यासाठी वापरत असाल, तर तुमच्या माणुसपणावरही शंका येते!

एका कॉलेज इलेक्शनला आमचा जीएस निवडून आणल्यावरच्या मिरवणूकीत ढोलताशांच्या गजरात कुणीतरी ओल्डमंकची बाटली हातात दिली
Submitted by आ.रा.रा. on 18 June, 2018 - 21:58
>>
आणि हे इतरांच्या भेदभावयुक्त वागण्यावर टीका करत फिरणार...

Rofl
कैच्याकै चाल्लंय.

रावपाटील तुमच्या अ‍ॅडमिन यांना उद्देशून लिहिलेल्या पोस्टीस +१
*
अहो ८० वाले,
आपल्या ग्रूपचा जीएस निवडून आणायचा, यासाठी इलेक्शन्स होतात, की दुसर्‍या ग्रूपचा आणण्यासाठी?
आता १९ साली तुम्ही आजिब्बात भेदभाव करू नका. अन पंजावर शिक्का मारा बरं!

लोकहो, आता यापुढची पोस्ट फोटोसकट टाकणार आहे. दरम्यानच्या काळातले काळूबाळू विनोद एंजॉय करा.

आरारा हॉस्टेल ची पोस्ट मस्त. त्या चौपाटीवरच क्लब सँडविच प्रकार प्रथम चाखला व ऑफकोर्स कोर्टिंग. जुनी प्रिया स्कूटर होती ती भटकायला पुण्यात ठेवली होती अहोंनी. तेव्हा वुड-बी अहो. व प्रिया आणि प्रिया अशी फाको प ण दरवेळी. तिथे जवळ मधुर मिलन मंगल कार्यालय होते का? पुसटसे आठवते.

परवा फादर्स डे निमित्त लंच ला गेलो होतो. तर अहोंच्या स्मृती प्रीत्यर्थ एक मस्त पैकी मार्टीनी मागवली. गुलाबी कलरची मस्त आली. त्याला जेम्स बाँड सिनेमे व हिरो जाम आव्डायचा व जेम्स बाँड मार्टीनी पितो हे ते कनेक्षन.
दारूतला खरा दर्दी तोच. मी काय पुणेरी भट लग्न होईपरेन्त नॉन्व्हेज पण खाल्ले नव्हते. हे स्टीलच्या भांड्यात रम
प्यायचे उद्योग त्याचे सांगलीला काका बरोबर चालायचे ( आजीला लक्षात यायला नको जसे काही वास येतच नाही. )
बरोबर चारमिनार पिवळा हत्ती. !!!) आमच्या घरी पार्ट्या करणे, मित्र मैत्रीणींबरोबरे रात्र उशीर परेन्त पीत बसणे गप्पा
मारणे जुनी गाणी ऐकणे जीवनावर चर्चा करणे असे त्याचे चाले त्यामुळे मला वेळोवेळी नोकरी संभाळून पार्टीची तयारी करणे, तीन चा र प्रकारचे जबरी चकणे सर्व्ह करणे , रात्री बेरात्री अन्न, पोळ्या गरम करू वाढणे ही कामे होती. हैद्राबादेत प्रचंड उकाडा त्यामुळे सीझन सुरू होताच बीअर आणणे चालू व्हायचे. त्या सा ठी दोन ग्लासेस फ्रिझर मध्ये ठेवायचे काम माझे. ( बरोबर कोणी फुकटा आला तर प्यायला!!)

एकदा चार मित्र बसले होते. मी पुण्यात. हे हैद्राबादेत. तर त्या मित्राच्या घरच्या काही प्रश्नांवर चर्चा चालू होती. आता हे आपण हून घरी गेले असते किंवा रात्री तिथेच झोपले असते तर चालले असते कि नाही. पण रात्री दोन तीन वाजता
हा गाडी काढून त्यांना सोडायला गेला. सर्व फुल टाइट असणार टर्निंग वर सिगरेट हातातून पडली व कंट्रोल जाउन डिवायडर वर गाडी घातली. चारी जण हॉस्पिटलात. मला नेक्स्ट डे कळले. मग मी घरी आल्यावर तब्येतीकडॅ लक्ष देणे, गाडीचे रिपेअर्स करणे वगैरे मी केले. दारू व्यसन नसले तरी ही, आव्ड असणे , सिगरेट, हाय बीपी व मधुमेह याचा एकत्रित परिणाम मी त्याची तब्येत खंगत जाताना बघितला आहे. परत सांगायला गेले तर राग येत असे.

तो गेल्यावर दोनच दिव्सात मी घरातील सर्व महाग व्ह्सिक्या माती दगड ज्या काही बाटल्या होत्या त्या ड्रायवर ला देउन टाकल्या, तो ही जाम पियक्कड. गौड खानदानातला म्हणजे हे लोक शेंदीची झाडे लिलावात घेतात व त्याची नंतर दारू काढून विकतात. हाच त्यांचा व्यवसाय.

आता त्या क्रिस्टल ग्लासेस मधून नारळ पाणी पिते उन्हाळायात व ऑकेजनल ड्रिंकर. म्हणजे अगदीच पार्टी वगिअरे असेल तर एक बीअर, सेलेब्रेशन किंवा स्पेशल इव्हेंट असेल तर शांपेन इत्यादि. पण घरातले दारू कल्चर अगदी खतम करोन टाकले.

कटप्पा, विडंबन धागा काढल्याने खूप मजा वाटली.

आरारा एक वेगळाच धागा काढा, या धाग्यात खूप गोंधळ झालाय, पोस्ट सापडत नाहीत.
आत्मशांतीचे अनुभव असे नाव द्या म्हणजे धागविभू बोर मारणार नाहीत कदाचित

बेफाट धागा, नुसतेच आम्ही कसे टूनन होतो किस्से असतील म्हणून उघडत नव्हतो, पण इकडे वेगळीच मजा आहे, अगदी कॉलेज मित्रांच्या पियक्कड गृप मध्ये बसून केलेला टाईमपास वाटतोय Happy
या धाग्याचे निवडक 5पोस्ट
1) आरारांच्या सगळ्या
2) होमो सेपिअन , आईने-अकबरी ची आठवण झाली पटकन
3) आशुचॅम्प च्या सगळ्या
4)मैत्रेयी चे एकही मारा पर शोल्लीड मारा पोस्ट
5)अभि-नव चे आमचा GS

रापरापा कोण आहेत ठाउक नाही. पण ते खार खाऊन आहेत. आणि आता कांगावा करीत तक्रारी करत सुटले आहेत. दुर्दैवावी आहे. अशा आयडींना इग्नोर केले आहे. तसेच काही आयडी विनाकारण धारेवर धरत आहेत. आत्ता चूकून अन्यत्र भाषा पाहिली आणि भीती वाटली.

मला भांडणे वगैरे ची भीती वाटते. कृपया तुम्हा लोकांच्या आधीच्या भांडणात ओढू नये ही हात जोडून विनंती. इथून पुढे तुम्ही कितीही वैयक्तिक हल्ले केले किंवा धारेवर धरले तरी तुमच्याशी संवाद साधण्याचे बळ माझ्याकडे नाही.

हंगामा है क्यूं बरपा, थोडीसी जो पी ली है,
डाका तो नही डाला, चोरी तो नही की है. वाह वा, क्या बात है.

मी दारू कशी पितो?. " क शी ही " हे त्याचे सोपे उत्तर आहे.

कशी कशी प्यायली , कशा कशा बरोबर प्यायली, कुठे कुठे प्यायली, कुणा कुणा बरोबर प्यायली, किती किती प्यायली, कुठली कुठली प्यायली हे आणि याची हजारो परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स याच्यावर मात्र ग्रंथ होउ शकेल. Happy

चिअर्स.

Pages