सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
वा देवकी मस्त गुलाबी रंग.
वा देवकी मस्त गुलाबी रंग. माझ्याकडे पण होता आधी आता गेला.
जागुताई आताच तुमच्या
जागुताई आताच तुमच्या अबोलीच्या.धाग्यावर प्रतिसाद दिला पण तो धागा नविन लेखनमध्ये दिसत नाही,
तुम्हाला दिसतोय का
मिरचीच्या पानांवर काळ्या
मिरचीच्या पानांवर काळ्या मुंग्यांनी (एकदम लहान का.मुं) अंडी घातली होती. माळयाला विचारले तर म्हणाला, मीठ घाला.तसे मीठ घातले आणि मिठाचे पाणी पानांवर फवारले.लगेच दुसर्या दिवशी झाडाची बरीच पाने कोळपून गळून गेली.आता भिती वाटतेय की झाड जगेल की नाही म्हणून.२-३ वर्षांपूर्वीपण मिरचीच्या झाडाला अशा धावर्या मुंग्या लागल्या आणि झाड त्यामुळे मरुन गेले होते.त्यावेळी मीठ घातले नव्हते.
वर्षा नाही दिसत धागा. परत
वर्षा नाही दिसत धागा. परत टाकून बघ रिप्लाय.
काळ्या मुंग्या कुंकवाच्या वासाने पण जातात. कुंकु टाकायचे थोडेसे
काय म्हणतायेत निसर्गप्रेमी.
काय म्हणतायेत निसर्गप्रेमी. खूप दिवसांनी आले इथे. भारी वाटलं. मस्त एकेक फोटो, माहीती. क्रोमवरुन आले तरी बरेच फोटो दिसत नाहीयेत. असं का बरे होतंय.
अंजू,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंजू,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
क्रोमवरुन आले तरी बरेच फोटो दिसत नाहीयेत. असं का बरे होतंय.>>>>>>>>>.खरं आहे अंजू. मला पण क्रोम वरून काही फोटो दिसले नाहीत.
मिरचीच्या पानांवर काळ्या
मिरचीच्या पानांवर काळ्या मुंग्यांनी (एकदम लहान का.मुं) अंडी घातली होती>> मला पण हाच प्रश्न विचारायचा होता...कोणाला माहिती आहे का?
आमच्या कडे चुलीतील राख
आमच्या कडे चुलीतील राख धुराळतात मिरचीच्या रोपावर कीडे कीटक येऊ नयेत म्हणून.
पूर्वीचे धागे वाचलेत तर बराच
पूर्वीचे धागे वाचलेत तर बराच फायदा होईल. त्यात औषधे आहेत. तरीपण एक कॉमन घरगूती औषध म्हणजे मिरची, लसूण, आल, हळद, हिंग एकत्र वाटायच त्यात भरपूर पाणी घालून ते फवारायच. किड निघून जाते.
मी इनोरा संस्थेत जाऊन आले
मी इनोरा संस्थेत जाऊन आले गेल्या आठवड्यात. त्यांचं "पर्णार्क" नावाचं कीडनाशक प्रॉडक्ट आहे ३६ औषधी वनस्पतींच्या पानांपासून बनवलेलं. ते आणलं फवारण्यासाठी. ते फवारलं, त्या दिवसापासून पाऊस पडतोय
त्यामुळे किती उपयुक्त आहे समजलं नाहीये अजून.
ओह. पाउस नसेल तेव्हा मार आणि
ओह. पाउस नसेल तेव्हा मार आणि आम्हाला सांग. मी मागे कडूलिंबापासून तयार केलेल कोणत तरी औषध आणल होत. पण त्याने सगळीच कीड नाही जात.
Thank you शोभा१, VB आणी जागू
Thank you शोभा१, VB आणी जागू
खूप दिवसानी आले परत इथे.
जागू तुमचा गावठी गुलाबाचा फोटो अप्रतीम!!!
नमस्कार निगकर्स.
नमस्कार निगकर्स.
कुठे गायब झालेत सगळे? पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या वातावरण छान आहे. रानफुलेही खुप दिसायला लागली आहेत.
आजची काही फुले
आजची काही फुले


राम राम!
राम राम!
रानफुलेही खुप दिसायला लागली आहेत. >>>>>>>>>>>>>>जागू, फोटो येऊदेत इकडे.
व्वा! मस्त फुले. माझी पोस्ट
व्वा! मस्त फुले. माझी पोस्ट पडली आणि तुझे फोटो दिसले.
(No subject)
शोभा उद्या काढेन फोटो आणि मग
शोभा उद्या काढेन फोटो आणि मग टाकेन इथे.
वॉव जागुताई, खुप सुंदर
वॉव जागुताई, खुप सुंदर
सुप्रभात
सुप्रभात

(No subject)
कऊ माझ्याकडेही आहे ही
कऊ माझ्याकडेही आहे ही जास्वंद.
(No subject)
मस्त जागूताई
मस्त जागूताई
मस्त फोटो. .
मस्त फोटो.
शोभा कसल फुल?
शोभा कसल फुल?
सगळे नि.ग. वाले कुठे गडप
सगळे नि.ग. वाले कुठे गडप झाले आहेत?
सोमवारी सुग्रण पक्षांच दर्शन
सोमवारी सुग्रण पक्षांच दर्शन झाल


जागू, मी ४ दिवस गावाला गेले
जागू, मी ४ दिवस गावाला गेले होते. आजच उगवलेय.

सुगरण व तिचा बंगला छानच!
गेले चार दिवस मी हॉस्पीटल
गेले चार दिवस मी हॉस्पीटल मध्ये अडमीट होते, तेथे त्यांची छोटीशी नर्सरी आहे, आज डिस्चार्जच्यावेळी तीथल्या receptionist ने त्यातल एक गुलाब.दिले.
खुप आवडले मला, अगदी प्रसन्न वाटले.
मी रोज त्या फुलांकडे बराच वेळ बघत रहायची हे ओळखले होते तीने, अन म्हणुन अलाउड नसतानासुद्धा हळुच गुपचुप त्यातले एक फुल दिले तीने.
ईतके मस्त वाटतेना जेव्हा.कोणीतरी आपल्या नकळत आपली दखल घेत.
Pages