निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हेमाताई तुमच्या कोकणातील अनुभवही इथे सांगा ना.

वर्षा कबुतर खुप घाण करतात आणि नुकसानही.

हो ताई, नुकसान नाही केले काही पण घाण खुप केलेली.

मम्मी अशी वैतागलेली ना तेव्हा, एकतर ती नको म्हणताना आम्ही हट्ट करुन ती अंडी तशीच ठेवली होती.

आमच्याकडे कामाला येणार्या मावशी पण खुप वैतागल्या ते सर्व साफ करताना

वर्षा हे कांचनचे फुल आहे.

सध्या गवत असेल त्या ठिकाणी खुप चतूर फिरत आहेत. रस्त्याने येताना मला खुप छोटे छोटे हेलीकॉप्टर फिरताहेत अस वाटत होत.

धन्स ताई,

सध्या गवत असेल त्या ठिकाणी खुप चतूर फिरत आहेत. रस्त्याने येताना मला खुप छोटे छोटे हेलीकॉप्टर फिरताहेत अस वाटत होत. >>> नुसत्या विचाराने सुद्धा मस्त वाटतेय.

जागू, कांचनचं असं फुल प्रथमच पाहिलं. सुंदर आहे.
मस्त आहेत गुलाब. पाठव सगळे इकडे. Happy

अमॄता, छान आहे सोनटक्का. Happy (सोनटक्काच ना? )

अमृता मला सोनटक्का खुप आवडतो. त्याचा शुभ्र रंग आणि मंद सुगंध हवा हवासा वाटतो.
गुलाबही सुंदर आहे.

शोभे अजून एक राहीला फोटो गावठी गुलाबाचा नंतर टाकेन.

वॉव जागू,
गुलाब सुंदर की तुझे फोटो टिपायचे कौशल्य सुंदर ? जे काय असेल ते पण खूप सुरेख!

धन्यवाद देवकी. हे सगळे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत.
झिपरीच्या झाडाला काही वर्षापूर्वी खुप डिमांड होत. गजरे हारात घालण्यासाठी हारवाले झिपरीच्या शोधातच असायचे. हौशी बायकांनाही झिपरीचा गजरा लागायचा. झिपरी लावली की गज-याची किंमतही वाढायची. गजराही हिरव्या रंगामुळे जास्त फ्रेश दिसायचा. नवरीच्या वेणीतही झिपरी लागायची. मग झिपरी गेली आणि ईंग्लिश पाला नाव माहीत नाही मला नक्की पण पातळ आणि मोठे पान मोरपंखाप्रमाणे असणारा पाला आला. हा खुप महाग असायचा. इतका महाग होता की आपली श्रीमंती दाखवण्यासाठी बायका नुसत्या पाल्याचाही गजरा घालायच्या. साधारण ३००-४०० ला तो गजरा तेव्जा असेल. फुलांमधे हा पाला घालून केलेला गजरा ५०-१०० रु. ला असायचा. आता पाल्यांची जागा रिबिणी, कापड, आणि रेडीमेड रिबिणींच्या गुलाबांच्या छोट्या फुलांनी घेतली आहे. बिचार्या झिपरीचा मान आता खुपच कमी झाला आहे.
1505093862848.jpg

आमच्याकडे सकाळी पडला पाऊस. ऑफिसला येताना थांबला होता. पण वातावरण मस्त झाले होते. रस्त्याने दुतर्फा असलेली रानफुले एकदम टवटवीत होऊन त्यावर फुलपाखरे खेळत होती.

हे मोबाईलवरून टाकलेले फोटो सरळ का नाही येत?

जागू, सुंदर गुलाब आणि झिपरी!
मलाही सोनटक्का आवडतो. मी शोधात आहे त्याच्या.

जागुताई मस्तच, काल पावसात भिजली अन आज त्यामुळे ताप आला सो ऑफिसला दांडी.
घरी नुसती झोपुन खुप ऊदास अन कंटाळवाणे वाटत होते, या वरच्या सगळ्या गुलाबांना पाहुन खुप बरे वाटले.

मनापासुन आभार.

टिना, अगदी बरोबर, आमच्याकडे गावी पानाफुलांचाच गजरा असतो.

मला अबोलीचा गजरा खुप आवडतो, मी नाही माळत केसात, पण मम्मासाठी आवर्जुन घेते.

Pages