निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वावे, मीसुद्धा डेली डंपचंच डिझाईन वापरून घरी कम्पोस्टिंग करत होते काही काळ. त्यांच्या डिझाईनसारखा "खंबा" जुने रंगाचे डबे वापरून घरीच बनवला होता. इनोराचं कम्पोस्ट स्टार्टिंग मिक्स आणि मायक्रोबियल लिक्वीड वापरत होते त्यासाठी. ओला कचरा, थोडा पेपर, जुनी माती असं सगळं घालत होते त्यात. इथे थोडं लिहिलंय त्याविषयी.
आता आमच्या विंगच्या गच्चीत (७ मजले * ४ फ्लॅट) इतक्या सगळ्यांना एकत्र मोठी बाग करायची आहे, त्यासाठी कम्पोस्ट हवेय. त्यासाठी प्रयत्न चाललाय. फ्लॅटच्या गॅलरीमध्ये ऊन फारसं येत नाही. (माझ्याकडे उन्हाळ्यात ऊन येतं , हिवाळ्यात अजिबात नाही :()वरच्या गच्चीत भरपूर ऊन आहे. (खरं तर वर बाग केली तर वरचा मजला कमी तापेल - ३ अंशाचा फरक पडतो असं प्रिया भिडे म्हणत होत्या. तेही एक वर बाग करण्याचं कारण आहे.) सगळ्यांच्या बागेचं जमलं नाही तर परत घरचं कम्पोस्टिंग सुरू करणार.

ओह! तुमचा आधीच प्रयोग करून झालाय कंपोस्टिंगचा. पण मग का थांबवला? वाचले तुमचे ब्लॉग्ज आत्ता.
कंपोस्ट करताना त्यात किडे (maggots) होतातच. पण ते बाहेर येत नाहीत मोस्टली.
मला वाटतं तुम्ही परत सुरू कराल तेव्हा डब्यांना बारीक बारीक छिद्रे पाडून घ्या. ( कशी ते माहीत नाही :-D)
माझ्याकडे stack composter नाही daily dump चा.
२ सेपरेट डबे आहेत.
IMG_20170826_232419.jpg

यात जे पिवळं दिसतं आहे त्या ठिकाणी छोटी छोटी छिद्रे आहेत.

सुदुपार लोक्स,
IMG_20170827_133151.jpg

आमच्या कुंडीतल्या मिरच्या
IMG_20170827_142803.jpg
पंचवीस मिरच्या मिळाल्या.(१ फोटोबाहेर आहे.)
IMG_20170827_142709.jpg

मस्तच गं देवकी..
फोकस हवा तिथे नाही होतोय गं.. अजुन काही फोटो काढं बरं

देवकी , मस्त ग .
घरच्या मिरच्या तिखट न लागता गोड लागतात का ग ? (स्मित)

देवकी,
पिवळी फुले- फोटोखाली ओळी लिहिल्यात त्यातली बाभळी; अन खाली लाल पांढरीफुले आपली नेहमीची मधुमालती....

मी फोटो टाकला आहे तो रोज पायनॅपल अडेनियम.>>>>>> मला गुलाब वाटलेला.पण तुझी पोस्ट वाचल्यावरती परत फोटोतील कळ्या पाहिल्या.मस्त प्रकार आहे.
कऊ, मिनी अ‍ॅक्झोरा मस्त आहे.

जागु खुप सुंदर आहे गुलाब. गावी आमच्यात अंगणात आहेत फुलझाडे, त्यात असे गुलाबी गुलाबही आहे.
लहान असताना गावी गेले की बॉयकटमध्येही लावायची

कऊ सुंदर फुल आहे.>>हो पण ती नक्की कोणती आहेत कोणाला माहित आहे का??
गावी वेतोबा मंदिरासमोर होती ही

वर्षा धन्यवाद.

कऊ हा हिरवागार फोटोही सुंदर.

धन्यवाद जागू..
कोकणात कुठेही जाऊन फोटो काढा तो मस्त असतोच

कऊ,. कोकण कधी पाहिले नाही.पण एकदा भेट द्यायची ईच्छा आहे.
जागु हे निसर्गाचे धागे खुप छान आहेत, एकदम रीफ्रेशींग.

गावी वेतोबा मंदिरासमोर होती ही>>>>>>> कऊच्या पहिल्या फोटोतील फुले मिनी अ‍ॅक्झोरा आहेत.त्याचे मोठे भावंड असावे.कोकणात त्याला पिटकुळीची फुले म्हणतात.

कोकणात त्याला पिटकुळीची फुले म्हणतात.>>>
धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल..
कोकणात मुलाची पाचवी असली की ही फुलं वापरतात असं इथले पुजारी काका बोलत होते

Pages