सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
अंजूताई इन्डोअर प्लांट लावा
अंजूताई इन्डोअर प्लांट लावा मग. >>> लेकरू नाही ठेऊ देणार. मागे होते.
आमच्या बाल्कनीतला नविन मेंबर
आमच्या बाल्कनीतला नविन मेंबर...:)
सायु नवीन मेंबर सुंदर आहे.
सायु नवीन मेंबर सुंदर आहे.
आता शेवंतीचा बहर येईल. माझ्याकडे मागच्या वर्षी आणलेल्या तिन शेवंती टिकून आहेत अजून माझ्याकडे. रवीवारी मलाही नवीन मेंबर आणायचे आहेत.
सायु,सोनटक्का मस्त टवटवीत आहे
सायु,सोनटक्का मस्त टवटवीत आहे.पि.गुलाब झकास आहे.
वा! सायु, फारच सुन्दर!
वा! सायु, फारच सुन्दर!
सोनटक्का पन छानच.
सोनटक्का पण छानच.
झाडाफुलांच्यात रमायचं असेल तर
झाडाफुलांच्यात रमायचं असेल तर मला गावाला जायला लागेल. तिथे भरपूर जागा. मनसोक्त आनंद घेता येईल पण खूप लांब आहे गाव आमचं त्यामुळे लंकेत सोन्याच्या विटा.
सायु गुलाब गोड.
अन्जूताई तुमची कलात्मक बाग
अन्जूताई तुमची कलात्मक बाग ह्या धाग्यावरच फुलवा मग. आम्हाला आवडेल.
<<आता शेवंतीचा बहर येईल.
<<आता शेवंतीचा बहर येईल. माझ्याकडे मागच्या वर्षी आणलेल्या तिन शेवंती टिकून आहेत अजून माझ्याकडे.<<
माझ्याकडे शेवंती टिकतच नाही.. का कोणास ठाउक! आतापर्यन्त कितीदा आणली. म्हणजे नर्सरीतुन आणल्यावर त्याला जेवढ्या कळ्या असतात त्या उमलुन गेल्या कि नन्तरच्या अगदी तुरळक कळ्या येतात..त्या ही छोट्या, खुरटलेल्या. आणि मग थाम्बतच सगळ. काय कमी पडत असावे तीला? पोयटा माती पण आहे. जमिनीत, कुन्डीत दोन्हीकडे लावुन पाहिली.
आजुबाजुला उन्च मोठी झाडे असल्याने ऊन खाली पोहोचत नाही, हे कारण असेल का?
शेवंतीला उन लागत. माझ्याकडची
शेवंतीला उन लागत. माझ्याकडची जास्त पाण्यामुळे पावसाळ्यात जायची. ह्यावेळी मी कुंडीतच लावून ठेवल्या त्यामुळे राहील्या.
जागू प्लीज अहो जाहो नको.
जागू प्लीज अहो जाहो नको. कलात्मक बाग वगैरे, अरेरे. पळून जातील सगळे. इथले फोटोच स्वतःची गोष्ट स्वतः च सांगतात आणि काहीजण उत्तम माहीती देतात त्यात रमायला अर्थात आवडेल आणि आवडतंच.
बर मग पुस्तकात वाचलेली
बर मग पुस्तकात वाचलेली माहीतीवगैरे शेयर करू शकता आम्ही फोटो टाकतो.
<<शेवंतीला उन लागत.
<<शेवंतीला उन लागत. माझ्याकडची जास्त पाण्यामुळे पावसाळ्यात जायची. ह्यावेळी मी कुंडीतच लावून ठेवल्या त्यामुळे राहील्या.<< ओके जागु! ... मग मला आता टेरेसवर ठेवावे लागेल शेवन्ती!
सुदुपार!!!
सुदुपार!!!

सायुपासून स्फूर्ती घेऊन
सायुपासून स्फूर्ती घेऊन सोनचाफ्याचे कलम माळ्याकडून आणवून घेतले.पण ते खूपच मोठे मोठे व्हायला लागलेय. आज त्याच्या पानांवर ब्बारीक मुंग्यांनी अंडी घातलेली काढत होते,तर हा पाहुणा दिसला.त्याच शेडचा.आता हा प्रकार फुलपाकहराची अळी आहे की असाच टोळभैरव आहे माहीत नाही.पण अंडी लागलेल्या पानावर मात्र नव्हता.
माझ्या सोनचाफ्यावरही हीच किड
माझ्या सोनचाफ्यावरही हीच किड आहे.
जागू, तू काय केलंस? काढून
जागू, तू काय केलंस? काढून टाकलीस का?
हो. काढावीच लागते नाहीतर ती
हो. काढावीच लागते नाहीतर ती पाने - फुले सगळी खाऊन टाकते.
मी ठेऊन दिली आहे.कदाचित
मी ठेऊन दिली आहे.कदाचित फुलपाखराची असेल म्हणून.जास्त नुकसान करेल तर काढून टाकेन.
ओके देवकी. वृत्तांत कळवत रहा
ओके देवकी. वृत्तांत कळवत रहा.
कुंडीच्या अवतीभवती साळुंक्या
कुंडीच्या अवतीभवती साळुंक्या वावरत असतात.आता त्यांनी ती कीड खाल्ली की ती पानावरून पडली कळत नाही.पण आता कीड नाही.
टाचणी
टाचणी

सुसंध्या!
सुसंध्या!

सगळ्यांचे फोटो सुंदर!
सगळ्यांचे फोटो सुंदर!

हा आमच्या गच्चीवर आलेला दयाळ
शोभा१,वावे,फोटो मस्त!
शोभा१,वावे,फोटो मस्त!
सुप्रभात!
सुप्रभात!
आज पहाटेपासून (पावणेपाच्/पावणेसहा) कावळयांच्या ओरडण्याचा आवाज येत होता.झाली यांची कटकट सुरु,म्हणून दुर्लक्ष केले आणि झोपून गेले.७.३०वाजता उठले तरी त्यांचे ओरडणे चालूच! खिडकीतून पाहिले तर एका झाडावर बरेच कावळे बसले होते.आसपास पाहिले तर काही दिसत नव्हते.जवळ्जवळ ६०-७० कावळे जमले होते.मीच ४७ मोजले.शेवटी त्यांच्या सुरातला वेगळेपणा जाणवून खाली उतरून आजूबाजूला फेरी घातली.पण काहीच दिसले नाही.तितक्यात सोसायटीच्या भिंतीपलीकडून प्राण्याच्या ओरडण्याचा आवा॑ज आला.इमारतीमधे काम करणारी पूजा आल्यावर तिला म्हटले बघ जरा.पण ती म्हणाली ते पहा झाडात काहीतरी हलतंय.वर कावळे ओरडत असल्यामुळे म्हणाली,कावळा असेल तर हात लावू नका.झुडुपात पाहिले तर कावळाच अडकलेला होता.लहानसा दिसला म्हणून हात लावू की नको असं झाले.तितक्यात जवळ मांजा दिसला.पूजाला घरून कातर आणायला सांगितले.मांजा खूप वाईट तर्हेने पंखात अडकला होता.अगदी एस आकारात मांजा अडकला होता.तो हळुह्ळू कापला.शेवटचा ३-४ इंचाचा तुकडा काढायचा प्रयत्न करत असताना ,पंख फिरवला.तेव्हा कावळा अलगद बोटाला चावला.(जणू आता पुरे ना ) आणि भुर्र्कन उडून गेला. वाईट त्या राहिलेल्या तुकडयाचे वाटले.
सकाळ एकदम भारी गेली.
देवकी खुप चांगल काम केलस.
देवकी खुप चांगल काम केलस. पण हे कावळे टोचतात भारी. विशेषतः जेव्हा घरट बांधतात ना तेव्हा आपण जवळ गेल की टोचे मारतात. त्यांना आपण त्यांच्या पिलांना काही हानी पोहोचवू असे वाटत असेल.
बापरे देवकी ताई भिती नाही
बापरे देवकी ताई भिती नाही वाटली का????
पण खुप छान केले तुम्ही.
लहान असल्यापासुन एकतीये की पक्ष्यांना जर आपण म्हणजे माणसांचा स्पर्श झाला तर दुसरे पक्षी त्यांना टोचुन मारुन टाकतात , ह्यात काही तथ्य आहे की ऊगाच असे पसरवलेले आहे.
हे वाचुन एकदा आम्ही काही
हे वाचुन एकदा आम्ही काही दिवसां करीता बाहेर गेलो असताना आमच्या बल्कनीत घरट्याच्या धाग्यात गुंतुन मरुन लटकलेल्या चिमणीच्या पिल्लाची आठवण झाली.
खुप वाईट वाटले होते तेव्हा.
देवकी, शाब्बास!
देवकी, शाब्बास!
Pages