सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
मायबोली गणेशोत्सव २०१७ मधील
मायबोलीकरांनो, लक्ष असू द्या!
सुप्रभात
सुप्रभात

सध्या माझा कंडीतला पारिजातक
सध्या माझा कंडीतला पारिजातक मला निखळ आनंद देतोय.....
आईच्या अंगणातली गुलबक्षी++ मस्त!!
वा सायु मस्तच.
वा सायु मस्तच.
माझ्याकडील आजची फुले
माझ्याकडील आजची फुले

भारीच ..
भारीच ..
कुंडीत प्राजक्ता आपलं हे प्राजक्त लावलायस..किती हौशी तू
कुंडीत प्राजक्ता आपलं हे
कुंडीत प्राजक्ता आपलं हे प्राजक्त लावलायस..किती हौशी तू>>>>> + कितीतरी.
सुप्रभात
सुप्रभात

अरे व्वा! मस्त मेजवानी
अरे व्वा! मस्त मेजवानी डोळ्यांना.
सर्वच फोटो मस्त !
गेळाचं फुल प्रथमच पाहिलं. रंग पण किती पांढरा शुभ्र आणि पिवळा धमक! पिवळ फुल तर प्लास्टिकचं वाटतय. निसर्गाची किमया भारी.
G.Anurag, सर्वच फुले सुंदर!
कोकणात भारींगाच्या कोवळ्या पानांची आणि फुलांची भाजी करतात>>>>>>>..भारंगीची फुलं पाहून तिच आठवण झाली.
शोभा ही तुझ्या करता... >>>>>>>>>>>धन्यवाद! सुंदर गुलबक्षी!
आमच्याकडे पण आज प्राजक्ताचा सुंदर सडा पडला होता.
जागूताई, मी आत्ता बघितलं ...
जागूताई, मी आत्ता बघितलं ... हा भाग घरेची बाग ऐवजी संस्कृती विभागात गेलाय चुकून.
पुण्याला जिमखान्यावर प्रिया भिडे म्हणून आहेत, त्यांची गच्चीतली सेंद्रीय बाग बघायला गेले होते मी मधे. त्यांच्या घरातला ओला कचरा, जवळपासच्या बंगल्यांमधला ओला कचरा, जिमखान्यावरच्या झाडांचा पालापाचोळा असं सगळं त्या गेली १० एक वर्षं त्यांच्या गच्चीवरच्या बागेत कुजवताहेत. बाहेरून कुठलीही माती न वापरता या कचर्याच्या खतात त्यांनी झाडं लावली आहेत. त्यांच्या मते मातीमध्ये आपण झाडं लावतो, त्यात पुरेशी हवा खेळती राहात नाही. इथे माती वापरतच नाहीत, त्यामुळे झाडाला भरपूर खाऊ मिळतो, शिवाय मुळांपाशी हवाही चांगली खेळती राहते. झाडं अगदी भरभरून फुलतात - फळतात मग. इतकी सुंदर बाग आहे ही! जेमतेम वर्षभराचं पपईचं झाड होतं एक. आठ एक फूट उंच होतं ते. पपयांनी पूर्ण लगडलेलं! असेच तोंडली, दुधी, पॅशनफ्रूटचे वेल, शेवगा, तुती, चिक्कू, पालेभाज्या, रताळी, टोमॅटो-भेंडी-वांगी असल्या भाज्या - भाजीपाल्याचं जंगलं झालं होतं त्यांच्या गच्चीवर! बघून डोळे खरोखर तृप्त झाले.
https://www.facebook.com/soilcircuit/ इथे त्यांचं फेसबुकवर पेज आहे.
मस्त फोटो..
मस्त फोटो..
अरे वा गौरी..
मध्यंतरी मी वाचलेले त्यांच्याबद्दल...आता जाऊन बघायची उत्सुकता आहे..पण असच कसं जाणार? तुम्ही जाण्यापूर्वी त्यांची अपाँटमेंट घेतली होती का? कि सरळ जाऊन धडकल्या घरी?
वा गौरी वाचूनच किती छान वाटल.
वा गौरी वाचूनच किती छान वाटल. टीना तुही जाऊन बघून ये आणि फोटोही काढून आण.
सुदुपार...
सुदुपार...

कुंडीत प्राजक्ता आपलं हे
कुंडीत प्राजक्ता आपलं हे प्राजक्त लावलायस..किती हौशी तू Happy+ धन्स टीना, देवकी..
जागु पांढरे कृ.क. अप्रतिम... याला सुवास असतो का ग ?
मध्यंतरी मी वाचलेले त्यांच्याबद्दल..+
प्रिया भिडे ग्रेट काम केलय त्यांनी, पुणेकरांनी जरुर भेट द्या!
नमस्कार निगकर्स !
नमस्कार निगकर्स !
शोभा, मनोगत मस्त !! सर्वांचे फोटो सुंदर आहेत.
प्रिया भिडेंच्या बागेला भेट
प्रिया भिडेंच्या बागेला भेट देण्यासाठी आधी नावनोंदणी करावी लागते. १०० रुपये शुल्क असतं. यामध्ये त्या कम्पोस्टिंग विषयी एक माहितीपुस्तिका देतात, स्लाईडशो दाखवतात आणि त्यांच्या बागेत घेऊन जातात. साधारण २ तासांचा कार्यक्रम असतो शनिवारी संध्याकाळी / रविवारी सकाळी. साधारण ८ - १० लोकांनी नावनोंदणी केली म्हणजे त्या कार्यक्रम ठरवतात. (मी गेले त्या दिवशी २ जणी बाहेरगावाहूनही आलेल्या होत्या!) मला अजून १ -२ जणांना घेऊन जायचंय परत. टीना, तू पण येतेस का तेंव्हाच? आमच्या सोसायटीमध्ये मोठी गच्ची आहे, तिथे बाग करावी असं बर्याच जणींना वाटतंय. त्यामुळे आम्ही त्यांची बाग बघायला गेलो होतो. अर्थात आम्हाला लगेच उद्यापासून बाग करता येणार नाहीये. सगळ्या सोसायटीमध्ये आमच्या एकाच विंगचा वेगळा कम्पोस्ट प्रकल्प करता येणार नाही. सोसायटीचा प्रकल्प आधीच आहे, तो नीट चालत नाहीये. त्यात लक्ष घालावं लागेल. मग गच्चीवर रोज जाण्यासाठी परवानगी मिळवावी लागेल, त्यानंतर मग पाण्याची व्यवस्था, मग बाग ... सगळ्यांचा उत्साह कुठवर टिकतोय बघायचं. यातलं सगळं झालं नाही, तरी जितकं होईल तितकं चांगलंच आहे!
कम्पोस्ट स्टार्टिंग मिक्स, मायक्रोब सोल्युशन आणायला "इनोरा" (http://www.inoraindia.com/) ला पण जाणार आहोत. तिथे अजून काही मार्गदर्शन मिळतंय का बघायचं.
सायु ह्या फुलाला वास नसतो ग.
सायु ह्या फुलाला वास नसतो ग.
गुलछडीचा फोटो खुप सुंदर आला आहे.
गौरी शुभेच्छा.
सुप्रभात..http://farm5
सुप्रभात..
गौरी , छान सविस्तर माहिती.
सायु ह्या फुलाला वास नसतो ग. +++ अच्छा!
जिप्सी,वाढदिवसाच्या खूप खूप
जिप्सी,वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

अरे व्वा, जिप्सी हॅप्पी बर्थ
अरे व्वा, जिप्सी हॅप्पी बर्थ डे
(No subject)
स्निग्धा,बसून घे ग.
स्निग्धा,बसून घे ग.
आलेच, माझी जागा पकडून ठेव
आलेच, माझी जागा पकडून ठेव
सगळ्या सोसायटीमध्ये आमच्या
सगळ्या सोसायटीमध्ये आमच्या एकाच विंगचा वेगळा कम्पोस्ट प्रकल्प करता येणार नाही.>> गौरी, तुम्ही आपापल्या गॅलरीत कंपोस्टिंग सुरू करू शकता. मी गेले ६ महिने घरचा ओला कचरा कंपोस्ट करत आहे. त्यातून जवळपास २० किलो कंपोस्ट तयार झाले. पैकी थोडे मी वापरले, तर बाकी आमच्या सोसायटीत विकायला ठेवले ते हातोहात संपले.

हा माझा घरचा पालक
इथे बंगळूरमध्ये Dailydump
इथे बंगळूरमध्ये Dailydump नावाची कंपनी आहे जी कंपोस्टिंगचे सर्व साहित्य पुरवते, पण पुण्यातही असेलच काही ना काही.
जिप्सी,वाढदिवसाच्या खूप खूप
जिप्सी,वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
मी गेले ६ महिने घरचा ओला कचरा
मी गेले ६ महिने घरचा ओला कचरा कंपोस्ट करत आहे.>>>>>. वावे, उलगडून सांगा ना कसे करायचे ते.
मी कसं करते ते सांगते. मी
मी कसं करते ते सांगते. मी डेली डंप या कंपनीचा कंपोस्टर वापरते. कंपोस्टर म्हणजे एक छोटी छोटी छिद्रे पाडलेली आणि झाकण असलेली बादली असते. त्यांचीच रिमिक्स पावडरही मिळते. त्या पावडरमध्ये नारळाच्या शेंड्यांची पावडर आणि microbes असतात.
आधी बादलीत ४-५ मुठी पावडर टाकते. त्याच्यावर आजचा ओला कचरा ( kitchen waste) . त्यावर परत कचरा झाकेल एवढी ( २-३ मुठी) पावडर. वर वर्तमानपत्राचा कागद ठेवून झाकण लावते.
दुसर्या दिवशी पेपर काढायचा. कचरा टाकायचा. पावडर टाकून परत तोच पेपर ठेवून झाकण.
बादली भरेपर्यंत हेच रोज. असे २ कंपोस्टर माझ्याकडे आहेत. दोन्ही भरले की पहिल्यातलं मिश्रण वेगळ्या मोठ्या बादलीमध्ये काढते.
एकूण २ महिने लागतात साधारणपणे कंपोस्ट तयार व्हायला. मधून मधून ढवळत राहावे Microbes घालून.
मस्त गप्पा आणि फोटो .
मस्त गप्पा आणि फोटो .
पहिल्या सारखा धागा बहरतोय ... छान वाटतय.
जिप्सी, वादिहाशु.
<https://www.maayboli.com/node/63532
हे वाचा .. आवडेल तुम्हाला .
या एक दोन महिन्यात तरी माझं
या एक दोन महिन्यात तरी माझं नक्की नाही गौरी.. सगळे विकेंड लाईनअप केलेय..
Pages